Friday, April 27, 2007

कहाणी साठा उत्तराची

डोक्याचा भुगा झालाय राव ... कोणाला काय वाटत असेल? का वाटत असेल? तसे नाही तर कसे? बापरे ईतका विचार जर कॉलेज मधे वगैरे केला असता तर अत्ता कुठेच्या कुठ गेलो असतो.

विचार थांबत नाहीत ... मीही स्वस्थ बसत नाही. उगाच दहाजणाना त्रास देतो. बिचारे तेही मदत करतात -
'गप रे रोह्या ... उगाच नाही त्या भानगडीत पडू नको!'
'अरे पडू कसे नको? माझी मैत्रिण आहे ती'
'लडकी का चक्कर ... बाबूभैय्या! लडकीका चक्कर...!'
'माहीत नाही चक्कर का काय ते! पण चक्कर येऊन पडायची वेळ आलीये!'

लोक मदत करत जातात ... मी त्याना धन्यवाद करत जातो ... ते म्हणतात फ़ॉर्मल होऊ नको ... मी म्हणतो उगाच त्रास देतोय तुम्हाला ... मग ते म्हणातात की मित्रांचा कधी त्रास होत नाही. तेही खुश, मीही खुश.
विषय राहतो बाजुला.

जरा वेळाने परत ती आठवते. कसा सैरभैर झालेलो, तेही आठवते. पण मीच माझी समजूत कढतो. कदाचीत केल्या त्या चुकांची शिक्षा होती ती की असे लाचारपणे बघत बसावे लागतेय.

काय राडा आहे!? हे का संपत नाही. आणि मीच कसा अडकतो या सगळ्यात ... तेही अलगदपणे?

फार दिवसापुर्वी ...
माझ्या एका मैत्रिणीला कोणी काहीतरी बकवास मेल केले ... ते मेल माझ्या एका जवळच्या मित्राने केले असे काही एका विद्वानाने शोधून काढले! झाली गोची! बराच गोंधळ ... बराच आरडाओरडा झाला ... नंतर सगळ्यांनाच त्रास होऊ लागला ... बिना उत्तराची कहाणी अशीच बंद झाली.

हा विद्वान मला परत भेटला ... कलाकार वेगळे होते ... पण कथेमधे आम्ही दोघे मात्र होतो. हा मला परत का भेटला ... कसा भेटला ... मलाच का भेटला हे अजुन मलाही कोडे आहे! पण योगायोगाला उत्तर नसते! याची GF कोणीतरी पळवली! आता का पळवली ... कशी पळवली ... पुढे काय? ...! झाले विषय सुरू ... आणि गुंतत गेलो आम्ही! परत रहस्य ... बऱ्याच गोष्टी उलगडल्या. बराच गुंता झाला. हा विद्वान आणि मी कधीही चांगल्या भाषेत एकमेकांशी बोललो नाही पण एकमेकाला त्रास बाकी भरपुर करून घेतला.

'कोण हा कुठला विद्वान ... तू गुंतलास कशाला त्यात!?'
'होते काहीतरी त्यात ... की ज्याच्याशी माझाही कुठूनतरी कसातरी संबंध लागत होता! don't we say in corporate life - take ownership? running away is not the way! आणि I really thought I had a some chance to make things better and I tried my best. पण कदचीत मला पाहिजे तसे बेटर नाही झाले काही किंवा my best was not that enough'
'लयी शाणा आहेस ... काहीतरी निरर्थक बोलतोयस! म्हणे ownership! तुला काम कमी असते काय?'
'अरे कामाचा काय संबंध?'
'नाहीतर काय? तुझा साहेब गेला परदेशी म्हणुन तुला हे सगळे धंदे सुचतायत! BTW कधी येणार आहे तो परत?'
'येईल २ दिवसानी'
'चॉकलेट वगैरे आणतो की नाही तुमच्या साठी?'
'आम्ही काय लहान मुले आहे काय? म्हणे चॉकलेट्स!!'
'वा रे वा ... ! जालीम प्यार, चॉकलेट्स आणि आईसक्रिम ... यांचा वयाशी संबंध नसतो!'
'बरे झाले सांगीतलास ... लक्षात ठेवेन!

बिना उत्तराची आणखी एक कहाणी संपली. विषय हे असे भरकटतात ... ऊत्तरंतर माहीत नसतातच पण ती शोधायचा प्रयत्नही होत नाही! बोलता बोलता गाडी सांगलीला यायची ती कोल्हापुरला जाते. आणि आपण काय? आपले लोक दोनही कडे! चिंता कोण करतो. पण कहाणी संपते ... अशीच.

एक मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडला ... दोघेही माझ्या ओळखीचे ... दोघांच्याही कथा मला माहीत. पण त्या दोघाना नाही माहीत! किती दिवसापासून ओळखत होतो मी त्याना? फार नाही पण थोड्याश्या प्रसंगातून कळुन जायचे की कोणाच्या मनात काय आहे! आता पंगा एवढाच की ... हे प्रसंग कदचीत मला जास्ती visible होते... ! कसे सांगू मी हे त्या दोघाना की लोकहो ... तुम्ही एक मेकावर खरच प्रेम करताय ...! उगाच नाही ते तर्क वितर्क करत बसू नका!

'don't tell me की तू यामधेही पडलास?'

स्वतःवर जाम विश्वास! मग सुरू केले चक्र ... त्यातही नशिब पहा ... एक या गावात ... तर ही दुसऱ्या गावात! आटोकाट प्रयत्न केला दोघाना समजावायचा! पण दोघे होतेच आधी उध्वस्त ... मी आणखी जास्ती उध्वस्त केले! कोण होतो मी त्यांचा? काय संबंध माझा? पण आई शप्पथ सांगतो ... त्याना परत आनंदात बघायची इच्छा होती! आणि तसे झालेही असते. पण असो ... व्हायची ती गोची झाली ...! मधे कोणी माझेच नाव त्या पोरीशी जोडू लागला! पण who cares? शेवटही खरब झाला ..! त्या दोघानी एकमेकाकडे पाठ फिरवलीच की जे व्हायचे होतेच पण दोघांसाठी मी हिरो झालो! काय हा किताब! मी आजही त्याना भेटतो. ते चांगले बोलतात मझ्याबद्दल पण नाही यार !! ते चांगले बोलले की मला हे बाकीचे सगळे आठवते ... गोची ... त्रास ... उध्वस्त ... किंवा, जे मला करता नाही आले ते.

'लोक फार सुखी होते ... मी जाऊन राडा केला!'
'नाही रे ... जे व्हायचे ते होणारच होते ... तू प्रयत्न तरी केलास!'
'पण शेवटी सहन कोणी केले? रडलो काय मी होतो? दारू वगैरे काय मी हाणली! दुःख होतेच रे आधी ... मी जरा enlarge करून दिले!'
'वेडा आहेस'
'तेच आधी कळायला पाहीजे होते. सगळे लोक वाचले असते'
'तुला एक सल्ला देऊ?'
'कुठला'
'तू पीत नाहीसच ... पण कधी पिऊपण नको!'
'हा हा ... हे तू म्हणावेस? का रे बाबा?'
'लेका, न पिताच तुझी ही हालत! पिलास तर गालिबच होशील!'
'तुम्हाला free मधे शेर ऐकवेन ना! :)'
'तेही असेच असायचे!!'
'उगाच चॅलेंज नको देऊ .. हा?'

झाले! बिन उत्तराचा आणि एक विषय संपला.

काय आहे हे? का आपण रोखू शकत नाही! स्वार्थ तर नसावा! मग काय? की स्वार्थच. उगाच लोकांच्यामधे मोठे व्हायचा! रडायला काय, लोक रडतात की ... माझे काय जाते? हा तर माज नसेल! नसेल. असे नसेल. माझेच सगे ... माझाच व्याप... मग मी त्यांच्याहून वेगळा कसा? म्हणुन का मी त्याना त्रास देत बसावा? याला अंत कधी... की हेच आयुष्य? कोणी बोलत नाही काही म्हणजे मोकाटपणे सगळ्यांच्याच अयुष्यात लुडबुड करावी का!? की हा अट्टाहास ... सगळे आपल्या मनासारखे करायचा! सगळ्याला आपलाच रंग लावायचा. पण मीच का? मला काय हक्क!?

एक ना दोन! किती सांगू? कथा घडत गेल्या ... मी गुंतत गेलो. हिरो होत गेलो... पण कधी कोणाला खुश नाही करू शकलो. जे दोघे वेगळे झाले ते खुश आहेत ... नाही असे नाही, पण त्याना जसे खुश मी विचारात पहात होतो ... ते तसे नाहीत.

'हे सगळे relative आहे रे ... तू उगाच भेळ करू नको त्याची! काय ते? खुश आहेत ... पण तुला पहिजे तसे खुश नाहीत!? तू खरच दारू पिऊ नको रे बाबा!'
त्याने भेळ दिली हातात ...
हातात भेळ आली की विषय आपसूकच बदलतात.
'भावा, इथेच मजा आहे. परवाच एका सिनेमामधे पाहिले ... कोणी सांगत होता ... चांगले आणि वाईट यामधले एक निवडायचे असेल तर ठीक आहे, पण चांगले आणि खुप चांगले यातले निवडणे कठीण होते! हा इथे असा पंगा आहे. माझ्या विश्वात हे लोक अजुनही खुश झाले असते'
'कुठला सिनेमा? ते परवा तुझ्या छावीशी बोलत होतास तो?'
'हा तोच... पण तिला छावी म्हणू नको'
'त्यात हे असेही होते होय?'
'विषय बदलू नको रे! तुला सिनेमा दाखवून आणतो नंतर'
'त्याचा काय ambassadorआहेस काय?'
'थांब रे ... मी काय सांगत होतो ? विसरलोच बघ!'
'तू तिच्याशी बोलत होतस ... या सिनेमा बद्दल.'
'नाही ... ते नाही. ...'
'तेच की ... चांगले ... आणि खुप चांगले ... असे काहीतरी.'
'घालवलास बघ! ... पण हो तिच्याशी पण बोललो हे.'
'म्हणालो ना ... ambassador!'
'तिचेही आयष्य बदलून टाकलेय मी! ... प्रेम वगैरे करते ... की करायची ... माझ्यावर. की फक्त आवडतो मी कदाचीत ...!'
'तू नाही करत?'
'मी काही नाही करत ... मी फक्त राडा करतो! भेळ करतो ... काहीच नाही मिळाले तर लोकाना मेल करतो!'

कथेने वेगळे वळण घेतलेले... यवेळी मैत्रिण माझी होती... कथेमधे मीपण होतो... गुंता मीच केलेला... त्रास मात्र तिला होणार होता. त्रयस्थ होऊन गोची करायचे भाग्य नव्हते यावेळी. कथा माझ्याभोवतीच फिरत होती.

'प्रेम करतोस तिच्यावर? की फक्त आवडते तुला ती?'
'काय विचित्र प्रश्न आहे! हे आता अवडते की प्रेम आहे म्हणजे काय? हा काय सायन्सचा पेपर आहे काय? की सांगा हे solid का liquid? असे काही नसते रे! आणि नाही ... मला या सगळ्यात पडायचेच नाही. I don't know if I like her or love her or whatever ... but I know I have messed up something and have to make neat and clean'
'कधीतरी आपली रूम पण अशीच neat and clean करायचा विचार नाही काय येत?'
'You know what? It feels like thousands of suction pumps are sucking your heart all the way down'
'अरे बाबा पण तुझा काय संबंध ... ती नाही ना तुझ्याबरोबर आता? कोण कुठे कोणाबरोबर ...! तिला अक्कल नाही काय? तू कशाला सारखे चमच्याने भरवायला पाहीजे! तिला काहीतरी वाटत असेलच की'

'डोक्याचा भुगा झालाय राव ... कोणाला काय वाटत असेल? का वाटत असेल? तसे नाही तर कसे? बापरे ईतका विचार जर कॉलेज मधे वगैरे केला असता तर अत्ता कुठेच्या कुठ गेलो असतो. '
'गप रे रोह्या ... उगाच नाही त्या भानगडीत पडू नको!'
'अरे पडू कसे नको? माझी मैत्रिण आहे ती'
'लडकी का चक्कर ... बाबूभैय्या! लडकीका चक्कर...!'
'माहीत नाही चक्कर का काय ते! पण चक्कर येऊन पडायची वेळ आलीये! आम्ही अजुनही मित्र आहोतच की! असेच सोडतात काय कोणाला वाऱ्यावर?'
'आणखी एक भेळ आणू?'

...
...

साठा उत्तराच्या बऱ्याच कहाण्या बिना ऊत्तरी संपल्या. तशी ही आणखी एक कहाणी. तीला मी कधीतरी बोललो ... उगाच माझ्यामागे लागू नको, तुला बरेच चांगले भेटतील ... (जे मझ्यासरखे गोचीखोर नसतील! ... हे मनामधे. कारण बाकी कोणाला कधी पटतच नाही की मी गोची करतो!). 'Move on'. तीनेही ऐकले कदाचीत माझे ... दैवाने अजब डाव खेळला ... अम्हाला दोघाना फर फर दूर घालवले ... मी अमेरीकेत आलो ... आणि perhaps she 'moved on'. She found someone!.
पण हे माझ्या विश्वात मला आनंदी दिसत नाहीत!

आहे की नाही गोची? याला म्हणतात नशिब ...

ऊसकीभी जिद है बिजलीया गिरानेकी
और मेरीभी जिद है वही आशियाना बनानेकी!

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. All well that ends well, and if it's not well then it's not an end yet.

झालीए सुरू आणखी एक कहाणी ... साठा उत्तराची ...

(सूज्ञानी अमेरीकेत भेळ कशी खाल्ली विचारू नये ... ईथे सगळे मिलते)

कथेचा उत्तरार्ध - पाच उत्तरे ... न मिळालेली