Friday, October 18, 2013

सहज आठवलं म्हणून ...

आठवणीतल्या काही गोष्टी. काही ऐकीवातल्या. काही अनुभवलेल्या. काही बनवलेल्या. पण काहीतरी सांगून गेलेल्या. किंवा बरेच प्रश्न टाकून गेलेल्या. अशातलीच ही एक.

पुण्यातून मुंबईमध्ये कामासाठी जात होतो. Express Way सुरु व्हायचाच होता. हिंजेवाडी ब्रिज ओलांडला. संध्याकाळी परत येताना या इथेच गाड्या तुंबून काय हालत झालेली असेल याचा विचार आला. उगाचच उजवी भुवई वर आणि डावा डोळा लहान करून स्वतःशीच नाराजी व्यक्त केली. उगाच चीप चीप आवाज करत ड्राईवरला विचारलं, "तुला काय वाटतंय? कसं सुरुये सगळं आपल्याकडे एकूणच? काय होईल?"

"वाट लगा है देश का! हे नाही होत. ते नाही होत." असं आपल्यासारखंच काहीतरी बोलेल असं वाटलेलं मला. असलं बोलत, घरी किंवा ऑफिस मध्ये बसणं हाच असतो की आपला विरंगुळा.

"मस्त सुरुये सगळं!" तो म्हणाला.
"मस्त सुरुये?"
"हं!"
"पूर्वी ५-६ तास लागायचे या रस्त्यावरून मुंबईला पोचे पोचेपर्यंत. आता २-३ तास लागतात. तेव्हापासून चालवतोय गाडी मी. आणखी ३-४ वर्षामध्ये, साहेब, सिंगापूर होईल इथे!"
"किती तास चालवतोस गाडी दररोज?"
"कमीत कमी १२ तास तरी होतातच"
"कमीत कमी?"
"हो. त्यावर एक तास जरी झाला तर ज्यादा पैसे मिळतात."
"किती?"
"प्रत्येक तासाचे पन्नास रुपये."
"इतका वेळ बाहेर असतोस?"
"घर बैठके क्या है साहब? पैसा बहार है! देश तो आगे बढ राहा है, घर बैठा तो पीछे रेह जाऊंगा."

This is where the country is heading. Either with us. or without us! and this driver could see it. Can we?
Post a Comment