Saturday, January 04, 2014

Rewind


I missed the lake today. सकाळी उठलो तेव्हा गाडी काढून लेकवर जाऊन यावं असं वाटलं. अमेरिकतल्या ज्या काही थोड्या गोष्टी मिस करतो, त्यातली ही एक. माझ्याबरोबर असलेल्या प्रत्येकाला किमान एकदा तरी मी तिकडे घेऊन गेलोच होतो. पुढच्या वेळी त्यांच्यापैकी कोणी असायचे नाही बरोबर, हा भाग वेगळा. खूपवेळा कुठल्याशा पार्ट्यांना जायचे टाळून मी एकटाच लेकवर जाऊन बसायचो. किंवा सकाळी बाकी लोक उठायच्या आत चक्कर मारून यायचो. It was always peaceful. It was always soothing. एक थकेला कॅफे होता बाजूला. तिथे चुकून कधीतरी कधीतरी काहीतरी घेतलं असेल. तिथल्या walking trails ना, बेंचेस ना, काठावरच्या बाकड्याना माझी आठवण असावी. लेकवर बहुदा एकटाच जायचो पण तरीही लेकवर एकटं नाही वाटायचं.

एखाद्या ठिकाणाशी काहीही कारण नसताना जवळीक होते, तशातली ही लेक होती. Love at first sight! लेकच्या बाजूची walk, किंवा मध्यरात्री Stanford University वर मारलेला फेरफटका, या गोष्टी माझ्या स्वतःच्या होत्या. माझ्या हक्काच्या. US वरून तुझ्यासाठी काय आणू, असं विचारलं कोणी तर मी या दोन गोष्टी नक्की सांगेन.
Post a Comment