नदीच्या बाजूने, एक्सट्रा हॉट लाते आपल्या नेहमीच्या रियुजेबल कप मधून घेऊन, ती सरावाच्या रस्त्याने चालू लागली. हे वीकेंड टू विकेंड आयुष्य, त्याच्यामध्ये अखंड सुरु असलेली गिरणी, अमक्याच्या तमक्या aspiration साठी तमाम जनतेची सुरु असलेली पळापळ, हे सगळं नको असून अंगवळणी पडलेलं. आता त्याबद्दलच कितीवेळा न कुरकुर करणार? हे नाही तर दुसरं काय? असा मोदी नाही तर कोण? टाईप प्रश्न स्वतःच्या तोंडावर मारून, पूर्वी स्वतःला गप्प पण करायची ती. पण लवकरच हे नाही तर आणखीन सदतीस वेगवेगळ्या शहाण्या, वेड्या, आगळ्या, वेगळ्या, चमत्कारिक, राहून गेलेल्या आणि नव्याने सापडलेल्या अशा य गोष्टी तिनं स्वतःच शोधलेल्या. आता मग गप्प करायचे मार्ग कमी पडत चाललेलं. एवढं सगळं असून घोडं तटलंय कुठं हा प्रश्न कसा हाताळायचा यामध्ये थोडा काळ निघून गेला. कॉफीचे दोन चार घोट घशाखाली उतारलेही. एव्हाना त्याचीही सवय झालेली.
फिफ्टी फर्स्ट डेट्स मध्ये ड्रयू बैरीमोर ची प्रत्येक सकाळ जशी रिकॅप ने व्हायची तशी, हिची सहसा असली नदीकाठची कॉफीवाली वॉक सुद्धा असल्या रिकॅप ने सुरु व्हायची. फरक एवढाच, की, काहीवेळा ती हिला थोडीशी गिल्टकडे झुकलेली अशा अवस्थेत सोडून जायची. आता हे बदलायला हवं. असं तिच्या मनात यायचं. ती वाईल्ड मध्ये शेरील नाही का म्हणत, जर मागे जाऊन एखादी गोष्ट बदलायची संधी असेल तरीही मी काहीही एक बदलणार नाही. तसं हवं आपणपण असं तिला वाटायचं. अशा हळू हळू स्वतःशी गप्पा रंगवत तिची यात्रा सुरु झाली. स्वतःबरोबर आपणच इतकं खडूसपणे वागलो तर मग बाकीच्यांबद्दल का तक्रार करा? हे असलं तत्वज्ञान पचवायचा आटोकाट प्रयत्न करताना, हाताला येतील ते सिनेमे, वेब सिरीज, आणि टीव्ही शो ती मदतीला घ्यायची. यावेळी तिनं एन्डगेम मधला डायलॉग हाताशी घेतला. You judge people on the good things that they did, not the bad ones. म्हणजे आता मीही स्वतःला स्वतः केलेल्या खूप भारी गोष्टी आठवून छान फील करावलं पाहिजे. सिम्पल! हे असंच स्वतःला ऐकवताना, तिलाच खुद्कन हसू आलं. मागच्या वेळी हा डायलॉग एन्डगेम मध्ये नाहीचे असं एकाने चॅलेंज केल्यावर कशी मजा झालेली हे ही आठवलं. पण तिचं ठरलेलं कधीच की तिच्यासाठी हा डायलॉग एन्डगेम मध्येच आहे.
कोफी आता थंड झाली. तुझं कोफी पिणं हे म्हणजे पंचवार्षिक योजने सारखं आहे, असं तिला सांगणाऱ्या लोकांना तीही उलट सांगत असे की, एका घोटात प्यायची असेल तर मग पाणीच प्यावं न? तेही आठवलं. सगळे आपलेच प्रश्न, सगळी आपलीच उत्तरं. तिच्या वॉकी मध्ये सगळे हजेरी लावून जायचे. थोडं पुढं जाऊन ती बाजूच्या बाकड्यावर बसली. हा इथे मायक्रोवेव्ह असता तर लगेच जरा गरम करून घेतली असती कोफी. असा विचारही तिला चाटून गेला. प्रत्येक कॅफे मध्ये कसे कोणताही लॅपटॉप किंवा फोन चार्ज करायचे चार्जिंग पॉईंट्स असतात, तसे कुठलीही कॉफी कुठेही थंड पडली, की ताबडतोब जरा गरम करून द्यायसाठी, रस्त्यातल्या कोणत्याही कॅफे रेस्टॉरंट मध्ये सोया असावी, अशी तिची क्रांतिकारी कल्पना परत एकदा आठवून परत तिलाच मजा अली. आजूबाजूला नजर टाकून मग, तिनं स्वतःला विचारलं की, तर मग आता मॅडम? आता तरी बूड हलवणार की परत आहेच पुढच्या वेळी, इसी समय, इसी जगह, इसी बात को लेकर फिर मिलेंगे?
यावेळी फोन करायला कोणीतरी हवं असा तिचा कायमचा हट्ट. असं कसं आपण इथवर पोचलो की कोणीच सापडू नये अशावेळी भंकस करायला? केवढे सारे आपले खास लोक, पण या बॅक स्टोरी च्या अनुषंगाने बोलणारे त्यात कोणीच कसं नाही? की आपली बॅकस्टोरी च बोअरिंग आहे? अचानक तिला तिची आज्जी आकाशातून खवचटपणे बोलतेय असं वाटलं, "एवढं शिकलीस तर कोण लग्न करणार तुझ्याशी? बसशील मग एकटीच!" कधी काळी आपल्याला छान कॉफी चे घोट घेताना आज्जी आठवेल, हे तिला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. पण हुजूर... हर किसीका वक्त आता है! तर आज्जीचा का नाही? बोल बये. तुही बोलून घे. तुझ्याकडे स्वर्गात फोन असता तर तुझ्याशीच बोलले असते आत्ता! असं म्हणून, तिनं आणखी एक घोट घेतला. एकमेकांचं अजिबात समजत नसलेल्या माणसाशी तर खूपच सुरेख आणि मोकळ्या मानाने गप्पा होऊ शकतात यावर तिचा जाम विश्वास. मग तो फ्लाईट मध्ये शेजारी घोरत पडलेला माणूस असो, शालूची कुत्री असो, किंवा कानठळ्या बसणारं म्युजिक असलेल्या पब मधली मित्रमैत्रिणींची गॅंग असो.
जरा उगाचच सॅड केलं की आपण हे असा विचार करून तिनं आजूबाजूला खरंच कोणीतरी कॉफी गरम करून देईल का वाली नजर टाकली. हा समोरून एक उंचापुरा, डार्क, हँडसम, गप्पीष्ट, हुशार, मुलगा आला, म्हणाला, मी हे इथेच राहतो बाजूला. अजिबात माईंड करू नको. माझ्याकडे खूप सारे मायक्रोवेव्ह आहेत. ये इकडे, तुला तर चक्क नवीन कॉफीच देईन. तुझी कॉफी ठेव इथेच. कबुतरांना होईल!
naaaaaah. तिनं मान हलवली. इतकी कशी गचाळ creativity आपली! म्हणूनच आपल्याला असं कधीच कुठं कोणी भेटत नसावं! You got to frame it in your mind, and then allow it to manifest! असलं बिन मिठाचं MBA मधे रटलेलं वाक्य तिला आठवलं. अंगावर झुरळ पडल्यासारखं तिनं ते झटकून दिलं आणि सरळ उठलीच. झाली की रात्र खूप. जाऊ आता परत. असं म्हणत, राहिलेल्या कॉफीचा आणखी एक घोट घेतला. शेवटी और कोई हो ना हो ये कॉफी साथ रहेगी. थंड का असेना. मी हिलाच गरम समजून पिणार असलं लॉयल वाक्य म्हणून तिनं स्वतःला पण पुसलं.
बघता बघता, गुंतण्यासाठी सगळ्यांनीच आपापले कोष निवडलेले. तिला वाटायचं की, आपण सोडून कदाचित कोणच इतका विचार करत नसावं! कदाचित सगळ्यांचं पुढं जाऊन होणारही असेल की फुलपाखरू! मग आपलं कधी ठरणार की आपला कोष बनलाय म्हणायचा, की कधी बनणार नाहीचे म्हणायचं?
त्याची बरीच गणितं अनुत्तरित होती. तरीही गाडी म्हणाल तर फुल्ल स्पीड मध्ये! खरचटलेले खांदे, पण बंद पडलेलं GPS. हा समोर असला तरी याचा पत्ता काय कोणाला लागणार? बाबा आजम च्या काळात तिची आणि त्याची जमलेली गट्टी, आता ट्रेजर हंटिंग साठी वापरता येईल अशा अवस्थेत होती. म्हणजे होती हे जरी नक्की असलं तरी कुठल्या माळ्यावर अडकलीय हे दोघांनाही माहिती नव्हतं! आता स्वतःला शोधायचं की माळे साफ करत फिरायचं हा जरा अवघडच ट्रेड ऑफ की. कधीतरी बसू भंकस करत, आणि सापडेल परत एकदा, अशी तिची बिनबुडाची अपेक्षा. खूप सारे मायक्रोवेव्ह असलेल्या माणसासारखी. तिनं त्याला फोन लावलाच. विषय थोडीच लागावा आपल्याला बोलायला? पण मग २ - ३ मिनिटात नवं काही सापडेच ना. यावेळी तिनं ठरवलेलं की, बोलूच. पण बोलणं सुरु झाल्यावर तिळाचे कळलं नाही की, exactly काय बोलायचं होतं? त्यापेक्षा chatting च बरं! त्याच्या दृष्टीनं त्याला फोन आला, त्याने घेतला, हिनं काही आपलं सांगितलं नाही तर, त्यानं आपलं पाल्हाळ सुरु केलं. लाजतो कशाला? मैत्रीण न आपलीच! जाऊ दे. पुढच्या वेळी ठीक करू, असा विचार करून तिनं थातुर मातुर कारण सांगून फोन बंद केला. हे असले, संवाद तिला, खूप कुठेतरी आतमध्ये लागायचे. परत एकदा तसंच थोडंसं अस्वस्थ वाटल्यावर, हे कसे नाही लागले पाहिजेत आपल्याला, यासाठी पुरवण्या शोधायला तिनं सुरुवात केली. कुठला सिनेमा बिनेमा चटकन आठवेना. मग, युट्युब आठवलं. कुठेतरी, काहीतरी सापडेल, त्यातून आपण अनालॉजी काढूच. मग जरा बरं वाटेल. असल्या थेयऱ्या काढून, तिनं पर्समधून फोन उपासाला. कानात हेडफोन्स खुपसून, काहीतरी सुरु केलं.
याला फोन नकोच करायला हवा होता. मागचे य संवाद असेच अधांतरी. एखादा कुठला तरी आपला क्लिक झाला असावा. तरीही का आपण असं हावरटासारखं करतो? actually चेटकिणीसारखंच आपण त्याच्या डोक्यावर बसतो. हे असलं काहीतरी गिल्ट म्युजिक बॅकग्राऊंडला सुरुच! पुढचा घोट घ्यायला जाणार तर कॉफी संपलेली. चला छान झालं. म्हणून तिनं कप फोल्ड करून, पर्स मध्ये टाकला, आज काल नसतंच काहीही बघण्यासारखं युट्युब वर. आपणच काहीतरी बनवलं पाहिजे, असा स्वतःशीच निश्चय करून, आपल्या सदतीस गोष्टींमध्ये, अडतिसावी आणखी एक गोष्ट जोडून, तिनं फोनपण बंद केला आणि पर्स च्या बर्म्युडा ट्रिअँगल मध्ये टाकला. उद्या सकाळी उठेन, एक धासू आयडिया येईल, मग आपण त्यावर फुल ऑन काम कारेन. एकदम चारो ओर रोशनी होईल. इधर उधर से टाळ्या बिळया. एखादा टेड टॉक आपणही देऊ, आजचा हा दिवस ही त्यात सांगू, की कशा अवस्थेत होते मी, हा टर्निंग पॉईंट यायच्या आधी. वगैरे वगैरे.
पण मग जरा वेळ थांबून तिनं विचार केला. तसं फार वाईटही कुठं चाललंय? पैसे मिळतात, कामपण बरं सुरु आहे. खायला प्यायला भरपूर आहे. फिरायला मिळतं. छ्या! हे कसं आपल्या स्टोरीमध्ये बसणार? अचानक रॉकस्टारच्या रणवीरची कैफियत तिला आठवली. आपल्या लाईफमध्ये सॉलिड प्रॉब्लेम नाहीये. म्हणून सॉलिड मोठ्ठ काही होत नाहीये! हेच कारण असणारे. नाहीतर..... आपण रॅशनल विचार करतोय, हाच आपला खरा शत्रू!
आता उद्या सकाळी उठून कॅन्सर वगैरे झाला तरच काहीतरी होऊ शकेल आपलं. नाहीतर पुढच्या वेळी आहेच परत येरे माझ्या मागल्या!
naaaaah. आपल्या creativity चं खरंच काहीतरी केलं पाहिजे. मे बी पुढच्या वीकेंडला आता, असं म्हणून तिनं शेवटी चादर ओढलीच.