Tuesday, November 02, 2010

Blind Date (Contd)

(पुर्वार्ध: Blind Date)

ब... प्पी... दा...!  ब... प्पी... दा...!  ब... प्पी... दा...!  ब... प्पी... दा...!  म्युजिक थांबलेलं तरी आता या अवाजानं जमिन हादरत होती. बप्पीदांबद्दल मला काही आकस नाहीये पण खरं सांगावं तर असं वाटलं, काय यार? बप्पीदांसाठी काय ईतका दंगा करायचा? पण पक्का मुरलेला डिस्कवाला समोरे तुषार कपूर आला तरी त्याला तु... षा... र! तु... षा... र! असे चित्कार टाकेल. म्हणजे माझं तुषार कपूरशीही वाकडं नाहीये. पण असो. डिस्कमधे येऊन खुश असल्याचा आविष्कार (किंवा साक्षात्कार) करण्यासारखी हीपण एक रिच्युअल असावी. किंवा जसा प्रचंड टॉलरन्स हा एक युएसपी आहे डिस्कचा, तसाच लोकांना बीनशर्त प्रेम करणं हाही दुसरा युएसपी असावा. मग तो तुषार असो किंवा बप्पीदा. जो मेन गेस्ट असेल त्याच्या तालावर मुकाट्यानं सगळे खुश होऊन नाचतात. किती विन-विन सिच्युएशन ना? असं आणि कुठं होतं यार? लोक ईतके गुण्यागोविंदानं नांदताना आणखी कुठे दिसतील? बप्पीदांची एंट्री जबरदस्त झाली. लोकांचा आवाज, ड्रमरने तेव्हाच धडाधड काहीतरी वाजवलं. बप्पीदांचा हात वर होताच, ठाकरेंसारखा. गळ्यात चेन्स. काळा पोषाख. आधीच पुरेसा लाईट नसतो डिस्क मधे. त्यात एवढासा देह. काळा काय म्हणून घातला असेल पोषाख? पण चालायचच, त्यावर चेन होत्या भरपूर. एकदम लखलख चंदेरी केलेलं बप्पीदाना. काहीतरी २-४ वाक्यं म्हणली यार त्यानी! पण आठवत नाही आजिबात. लोकानी टाळ्या मारल्या जब्राट.

हे सगळं सुरू असताना, आख्खी जनता वर बघत होती आणि एकच गरीब, गरजू, होतकरू तरूण आणि त्याच्याबरोबर आलेली फटाकडी खाली बघत होते. मी आणि सॅली होतो ते.
"Damn! Sally, I lost it!! s#it! I guess I dropped it. I knew it man! I just knew it. Who gets the phone no dance floor yar!?"
सॅलीला सहानुभूती होती की डिस्कची मजा खराब केल्याचा राग, हे काही समजून घेण्याच्या मनस्थीतीत मी आजिबातच नव्हतो. मी तिच्याकडं बघतही नव्हतो. अशक्य गोष्ट! असं कसं काय करू शकतो मी? एकदम सुरूवातीपासूनच्या सगळ्याच गोष्टी चुक वाटू लागल्या. फ्रेंड सिटींग?? असं कधी असतं का? साल्या माझ्या मित्राची फ्रेंड एकटी म्हणून तिला मी एंटरटेन करायचं? मला समजतात तरी काय लोक? आणि मी ही हिच्याबरोबर नाईट आऊटला कसा काय लगेच जाऊ शकतो? जगात असलेल्या अब्जावधी पर्यांयांपैकी कोणता पर्याय निवडला तर म्हणे डिस्क!?? का? का? डिस्क का? गरज काय होती? कधी नाचून माहीत नाही पण आम्हाला गोरी पोरगी घेऊन नाचायचय! साला निजामाची औलाद असल्यासारखं एका खिशात वॉलेट आणि दुसरीकडं फोन घेऊन नाचायची हौस. Impossible! I am just freaking impossible fellow!! वॉलेट आठवल्यावर क्षणभर आणखी पोटात बुडबुडा आला, पण वॉलेट होतं जाग्यावरच. ते अजुन हरवलं नव्हतं. सध्या फक्त फोन डिजास्टरच सुरु होतं. सॅलीपण बिचारी त्या गर्दीमधे खाली मुंडी फोन धुंडी करत होती. बप्पीदांचं बोलणं संपूच नये अशी मनोमन प्रार्थना करत मी माझा शोध सुरू ठेवला. कारण नंतर लोक परत नाचायला लागले तर मला हार्ट अ‍ॅटॅक येणार हे नक्की होतं. काहीही सुचत नव्हतं. एकदम शुन्य. There was no possible explanation I had for the situation! कोणावर साला ब्लेमपण टाकता येत नव्हता यार. फोन कधी पडला असेल? म्हणजे बप्पीदा येणार असं सांगीतल्यावर जेव्हा म्युजिक थांबलं, तेव्हा मला कळलं की फोन नाहीये खिशात. याचा अर्थ नाच सुरू असतानाच पडलाय फोन. आई शप्पथ सांगतो, छातीतून कळ येणं बाकी होतं. खास वाट बघून मुद्दमहून पांढराशुभ्र आयफोन घेतलेला. कायच्या काय जपून वापरलेला. एवढा महागाचा फोन घेण्याचं सत्कार्य करताना हजारदा विचार केलेला. आणि आता सगळं कोणाच्यातरी पायदळी तुडवलं गेलं असणार होतं. फोनवर एक स्क्रॅच आला तर दु:ख, पुढचे सगळे माफ, असलं गणित मी कित्येकाना सांगितलेलं. आता मला सगळे स्क्रॅच एकत्र मिळणार होते. वेळ जसा जसा वाढला तसे मला एकसंध फोन मिळण्याची आशा कमी होत होती.

सॅलीनं तेवढ्यात बोलावलं.
"Hey ... he saw your phone! I guess"
हे अशक्य आहे. मगाशी हिच्या कमरेत हात टाकून नाचताना ही पोरगी मदतीलापण येईल असं खरं सांगतो आजिबात वाटलं नव्हतं. एक शामका साथ, करा ऐश, कल हम कहा तुम कहा. असला प्रकार सुरू होता. पण कोणताही अशेचा किरण तेव्हा पुरेसा होता.

"Who? Did you find any phone? White one ... iPhone ..." पुढे 3GS, IOS4 हेही सांगायची फार ईच्छा होती
"White one. Yes. I did. It was on the floor"
बप्पीदांचे शब्द तिकडं संपले. म्युजिक परत सुरू. बप्पीदांचं गाणं सुरू. लोकांचा नाच सुरू. जमिनीचं हादरणं सुरू!!
माझा फोन जमिनीवर सापडला?? म्हणजे जमिनीवर होता तो! किती वेळ कोणास ठाऊक? तो सापडला याला? खाली बघून कोण कशाला नाचेल? म्हणजे पायच दिला असेल!! स्क्रीनवर दिला असेल का? नाही! नकोच. स्क्रीन कशी होती हे विचारायचं धाडसच नाही झालं. मी मख्खासारखा बघत होतो त्याच्याकडं. सॅलीनं विचारलं पुढं. "Where is it now?" स्वाभावीक प्रश्न होता हा. पण मला नाही सुचला. सॅलीला सुचला. त्या बाबाने स्टेजवर दिला म्हणे बप्पीदा यायच्या आधी. अशक्य योगायोग होता तो.

मी स्टेजकडं धाव घेतली. सिक्युरीटीनं आडवलं. स्टेजवरतर आणखी जोरात आवाज होता. त्याला सांगायचा प्रयत्न केला की माझा फोन स्टेजवर कोणाकडंतरी दिलाय. त्याला कळेना. आवाजामुळं तसंही घसा दुखेपर्यंत ओरडून बोलायला लागत होतं. विलन सारखं त्यानं मला फारसं काही न ऐकून घेता हाकललं. स्टेजवर जोवर बप्पीदा आहेत तोवर बाकी कोणाला एंट्री नाही! हाताशासारखं मी स्टेजच्या बाजूला ऊभा होतो. बप्पीदांचा डायहार्ड फॅनसारखा आधाशासारखं त्यांच्या गाण्याकडं बघत. माझ्यामागं एक गोड गोरी मेम असूनही! फोन आत्ता कोणाच्या पायात नाही हे ही कुठं थोडं होतं! पण काय? असंख्य शिव्या देऊन झालेल्या माझ्या मलाच! सॅलीनं मधेच मागे ओढलं. म्हणाली, "I want to use the restroom!" मनात म्हणालो, मग कर ना युज! मला काय सांगते? ईथ मी माझा फोन शोधायचं सोडून रेस्टरूम शोधू काय? पण हे डिस्कमधे नॉर्मलच. ढसाढसा प्यायची, आणि मग रेस्टरूमला पळायचं. तसंही बप्पीदा दमल्याशिवाय फोन मिळणार नव्हता. गेलो मॅडमबरोबर रेस्टरूम शोधायला. छताकडं बघत, भींतीवर रेलून बाहेर वाट बघत ऊभा राहीलो. मॅडम घुसल्या आत. किती मुर्खपणा केलाय आपण याचं गणित वर छतावर मांडायचा प्रयत्न करत होतो. म्युजिकपासून लांब आल्यामुळं आता तुलनेनं जरा शांत वाटत होतं. एवढ्यात एक सीक्युरीटी गार्ड दिसला. त्याला शांतपणे माझी दर्दभरी कहाणी सांगीतली. कमीत कमी मी काय म्हणतोय हे त्याला कळालं तरी होतं. निर्दयीपणानं मला स्टेजवरून हाकलणारा पहिल्या गार्डसारखा हा नव्हता. म्हणाला मदत करेल. त्यानं विचरलं, "Your girlfriend is inside?" आता या प्रश्नाचं ऊत्तर आपण जे काही पाहतो सिनेमामधे ते साफ चुक आहे. आजिबात एनर्जी नव्हती स्पष्टीकरण देण्याची आणि मुख्य म्हणजे गरजही नव्हती. कुठं त्याला शब्दबंबाळ करू सांगून की, 'नाही बाबा, ती फ्रेंड आहे जी गर्ल आहे?' किती बकवास? गौतम बुद्धाना जसा बोधी वृक्षाखाली साक्षात्कार झाल्यावर आनंद झाला चक्क तसं वाटलं मला तिथं! हे सगळं स्पष्टीकरण देण्याचं प्रकरण थोतांड आहे. मी दाबात काहीही आढेवेढे न घेता म्हणालो, "Yes, She is inside." आहाहा. काय ते सुख. ज्ञान प्राप्तीचे. पण गार्डनं पुढच्याच वक्यात विकेट काढली. "She is taking lot of time". आता यावर काय उत्तर देतात कोणाला ठाऊक? आता माझी गर्लफ्रेंड आहे म्हणजे ही किती सेकंदात रेस्टरूममधून बाहेर येते याचं गणित मी ठेवावं की काय? की 'तुला काय घाई आहे बाबा?' असं विचारावं गार्डला? शेवटी शरण येऊन, अरे ही आत्ता पाच सेकंदापुर्वी या प्रश्नाबरोबरच माझी गर्लफ्रेंड झालीये तेव्हा मला माहित नाही की का वेळ लावतेय, असं सांगावसं वाटलं. खरं तर मुलीना लागतो कशाला ईतका वेळ यार? आता लेका तुझी गर्ल फ्रेंङ असती तर तुला मी विचारलं असतं काय? पण असो, ईतक्यात सॅली आलीच बाहेर. हसली गोड आमच्याकडं बघून. सगळे प्रश्न, शंका चुपचाप आपल्याआप जाहिरातीतल्या मुह के किटाणूंसारख्या अचानक गायब झाल्या. आमची गाडी परत आत गेली. बप्पीदांचा निरोप घेणं सुरू होतं. माझ्या दिल की धडकने वाढलेली. लोक ओरडत होते परत ... ब... प्पी... दा!!! ब... प्पी... दा!!! ब... प्पी... दा!!! मला भेटलेला गूड मॅन गार्ड मगासच्या विलन गार्डशी आता बोलायला गेला. माझ्याकडे मधे मधे हात वगैरे करून काहीतरी सुरू झालं त्यांचं. मीही केविलवाणा चेहरा घेऊन ऊभा होतो. पण बाजूला सॅली होती. माझा केविलवाणा चेहरा आणि फटाकडी सॅली, यामधे साहजिकच सॅली जिंकत होती. पण काही का असेना. कोणाकडंका बघून होईना, फोन मिळाल्याशी कारण. विलन गार्डच्या चेहऱ्यावरची माशीही हालत नव्हती, लेकाचा मख्खासारखा ऐकत होता. मग कुठेतरी गेला आत मधे. मी परत वर चढलो स्टेजवर आणि गूड मॅन गार्डला विचारलं की बाबा काय झालं? तो काही बोलेल तोपर्यंत मगासचा विलन गार्ड क्लायमॅक्सला एकदम चांगल्या माणसासारखा हातात फोन घेऊन आला. खुशिनं पागल होणं काय असतं त्याची अनुभूती मिळाली मला पुढच्या काही क्षणात. स्क्रीनवर काहीही नव्हतं!! एकदम स्वच्छ. जसं काही झालंच नाही. एक रेघोटी होती हलकीशी पण तीही स्क्रीन प्रोटेक्टरवरच. मला विश्वासच बसत नव्हता. खुशीची परीसीमा! दुधात साखर म्हणजे समोर तमाम जनता खुशित बेभान झाल्यासारखी नाचत होती. जणू काही माझ्याच साठी. सुखद अनुभव होता तो! खरं सांगू तर हे ही वाईट नाही ना? कोणीतरी खुश आहे म्हणून आपण नाचावं. जसं काही आपणच खुश आहोत. खुश व्हायला कशाला काय कारण लागावं? कारण नसताना डिस्कमधे येऊन नाचलं तर बिघडलं कुठं? जगाच्या पाठीवर माझ्यासारख्या कोणा वेड्या माणसाला त्याची जवळ जवळ गमावलेली गोष्ट मिळाली म्हणून तमाम जनता नाचली तर काय वाईट? आता जनतेला आनंदाचा तपशील माहीती असावा असं थोडीच आहे? डिस्क ही एकदम मंदिर वगैरे सारखी गोष्टी वाटली क्षणभर. मी स्टेजवरून खाली ऊतरलो.


पण रुको ... पिक्चर अभीभी बाकी था मेरे दोस्त! एक शेवटची हिकअप अजुनही बाकी होती!

 ============================================================  
मी फोन वापरून पाहिला. सगळं सुरू होतं.  रात्रीचे २ वाजून गेलेले. सॅलीला आता ड्रिंक हवं होतं. परत डान्स फ्लोरवर जायची माझी ईच्छा नव्हती. फोन घेऊन तर नक्कीच नाही. आम्ही बारकडं रस्ता वळवला पण थोड्या वेळात संपलंच सगळं. म्युजिक थांबलं. लोकही पांगायला लागले. आम्हीही बाहेर पडलो. रात्रीचे ३ वाजत आले होतो. माझा हात सॅलीपेक्षा माझ्या खिशाकडंच जास्ती होता. फोन सही सलामत परत मिळाला या धक्क्यातून मी अजुन बाहेर आलो नव्हतो. घरी परतताना, फोन खिशातून घसरून कारच्या सीटखाली घसरला तेव्हा मी गाडी चालवत असताना कसरत करून तो परत खिशात ठेवला. अब एक पलभी दुर रहा जाये ना, असं. आम्ही घरी आलो. गादीवर पडल्या पडल्या झोपलो. म्हणजे, आपआपल्या गाद्यांवर पडल्या पडल्या झोपलो. अंगात आजिबात एनर्जी नव्हती. फ्रेंड सिटींगचा प्लान जवळ जवळ अंगावर येता येता राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा मित्र परत येणार होता आणि माझं हे फ्रेंड सिटींगचं प्रकरण संपणार होतं.

सकाळ झाली. मित्र काही आला नव्हता, पण सॅलीनं काहीतरी बनवलेलं. फटाक गोऱ्यापान मुलीनं सकाळी ब्रेकफास्ट बनवलाय म्हणून ऊठवणं यापेक्षा सुंदर ते आणखी काय. मुकाट्यानं उठून लगेच तयार झालो. काही तासांपुर्वीची माझी हालत आणि आत्ताची यात जमिन आसमानाचा फरक होता. फोन बघण्यासाठी नजर फिरवली, पांघरूणाच्या पसाऱ्यात काही दिसेना. समोर असा ब्रेकफास्ट तोही सॅलीनं बनवलेला. ते सोडून पांघरूण कोण आवरेल? पण परत फोन आठवला आणि मनाशी म्हणालो, ते काही नाही! आधी लगीन फोनचं. आत्ता जेव्हा विचार करतो, तेव्हा वाटतं सगळ्या ईलेक्ट्रॉनीक्स गॅजेट्सनी आयुष्य बरबाद केलय. मी सॅलीच्या ब्रेकफास्टसोडून आयफोनसाठी पझेसीव होतो! असो. ऊठलो. झरझर आवरलं सगळं. सॅलीनं एव्हाना आशा सोडून स्वतः खायला सुरू केलेलं. मी परत भेळसटलेलो. मला परत फोन सापडत नव्हता! आता हे म्हणजे अतिरेकी होतं. शक्यच नाही. पण माहित होतं गाडीमधे असेल. सॅलीचा ब्रेकफास्ट तसाच ठेवून मी पार्कींगकडे पळालो. आपला कर्वे रोडची जितकी रुंदी तितकाच रस्ता मधे होता पर्किंग आणि अपर्टमेंटमधे. कारमधे सगळीकडं पाहीलं, फोन कुठंच नव्हता! आता ऊगाचच अनईझी होत होतं. वर येऊन सॅलीच्या फोनवरून कॉल देऊन पाहिला. फोनवर रिंग तर वाजत होती. पण आख्ख्या अपार्टमेंटमधून कुठूनही आवाज येत नव्हता. परत गाडीमधे जाऊन पाहिलं. परत फोनवर रिंग वाजत होती, पण गाडीतूनही कुठूनही आवाज येत नव्हता! सॅली माझ्याकडं "What a loser?" अशा नजरेनं बघतीये असं मला उगाचच वाटलं. पण बिचारी शोधायला मदत करत होती! आता हे मात्र नक्की होतं की मी डिस्कमधे फोन नक्कीच पडला नव्हता. मला मधे गाडीमधे सीटखालून फोन काढतानाची कसरत आठवत होती. आता गाडी पार्कींगमधे लावून ते अपार्टमेंटपर्यंत येईपर्यंत काय होऊ शकेल? यावेळी मी नाचतपण नव्हतो. मला फायनल डेस्टीनेशन मुवी आठवला. म्हणजे काल कदाचीत चुकून सापडलेला फोन! त्याला जायचच होतं. आता गेला बापडा. विचार तर हाच होता. पण मन मानायला आजिबात तयार नव्हतं

मी परत परत कॉल करत होतो. कधी खाली जाऊन कार मधे तर कधी परत घरामधे शोधत होतो. अचानक रिंग बंद झाली! कट. वाजता वाजता कट!? पुढे वाजेचना. डायरेक्ट वॉईसमेल मधे! आई शप्पथ!? म्हणजे फोन चोरला कोणीतरी? आणि आता बंद केला! नाही. हे म्हणजे शक्यच नाही. पण कधी करेल हे कोणी? पार्कींगमधून घरापर्यंत येताना पाखरू नव्हतं रस्त्यावर. १० सेकंद लागले असतील फार फार तर. तेवढ्यात? कसं यार? काहीच अर्थ लागेना. वेडा झालेलो जवळ जवळ. त्यावर अशक्य गोष्ट कुठली असेल तर, १२ तासामधे आयफोन हरवल्याची दुसरी वेळ आणि मला मधेच आपण फेसबूकवर काय स्टेटस टाकणार याचा विचार आला! खरं सांगतो असाच विचार आला! किती कृर! पण आपलेच दात आपलेच ओठ! काहीतरी खरच बेसिकमधे गंडलंय माझ्या! फेसबूक?? काहीही काय

"How to track lost iPhone" यावर लगेच गूगल करायचं ठरवलं. मशिन ऊघडलं तसं नवं ईमेल आलं. यश कडून. "Your phone is with Navin. Please call me once you get it." आता मात्र मी बेशुद्ध पडायच्या मार्गावर होतो. यश? नविन? यांचा संबंध काय? दोघेही माझे कलीग. नविन तर त्याच अपार्टमेंट कॉंप्लेक्समधे रहायचा पण पार दुसऱ्या टोकाच्या ईमारतीत. म्हणजे मी रस्त्यात पाडलेला फोन नविनला मिळाला? आणि त्याने यशला फोन केला? काहीच गणित लागेना. यानी माझा बकरा केला असावा! पण कसा? सॅलीनं माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून मला काहीही न विचारायचं ठरवलेलं. तिनं ब्रेकफास्टची प्लेट ठेऊन फोन सुरू झालेले. तिचा डार्लिंग यायचा होता. ती कशाला माझ्या फोनचं सुतक करत बसेल? मदत केली मात्र तिनं, कशाला नाही म्हणू? गोड दिसत होती कारमधे फोन शोधायला आलेली तेव्हा. नाईट ड्रेसमधे कदाचीत सगळ्याच मुली सुंदर दिसत असाव्यात. कदाचीत तेव्हा अजिबात मेकअप नसतो म्हणुन असेल. पण असो. पोरीनं गिवअप तरी कधीच मारला नव्हता माझ्यावर. सगळीकडे मदत करत होती. माझं पुढं चक्र सुरू झालं. फोन नविनकडं कसा? याचं कुतुहल असलं तरी जरा हायसं पण वाटलं. त्याच विचारात मी सॅलीकडं गेलो. ती पाठमोरी होती बाल्कनीमधे. फोनवर बोलून झालेलं तिचं नुकतच. तिला कळलं मी मागे ऊभा आहे. चपापून वळली मागं. माझ्या चेहऱ्यावरचे लॉस्ट लूक अजुन गेलेले दिसत नव्हते. मी तर भेळसटलेलो होतोच तसाही. "What? What happened?" असं ती म्हणेपर्यंत मी तिचा हात पकडला. आता क्षणभर तिच्या चेहऱ्यावरही लॉस्ट लूक आले. आत्तापर्यंत गोड वगैरे दिसणारा चेहरा जरा वेगळाच दिसला. पण मला लगेचच कळलं की मी न काही बोलताच तिच्या हातातला फोन घ्यायचा प्रयत्न करत होतो. आता तिला थोडीच कळणार की मी कोणते ईमेल बघीतले? आणि काय विचार आहेत माझ्या मनात सुरू ते. हॅंग झाली बिचारी जरा वेळ. आपले विचार कृतीपेक्षा वेगात पळतात यावर कित्येक शिक्षकानी कॉलेजमधे टाहो फोडलेच होते. आज थोबाड वगैरे फुटलं असतं. किंवा नाहीही. गोड आहे पोरगी असलं काही नसतं केलं. मी फोन प्रकरणामधे ईतका गुंगलेलो की काय घडतय बाजूला याचं ध्यान तसं कमीच झालेलं. सॅलीचा फोन घ्यायचा माझा प्रयत्न अजुन सुरू होता आणि तिला कळत नव्हतं मी काय करतोय ते!

"Dude! What are you doing?"
"अरे... I found the phone ... let me make a call ना! Please" हे असं ईंग्लीशमधे बोलताना मधे "अरे" आणि "ना" करणं मला अजिबात आवडत नाही तरीही अशा मोक्याच्या क्षणी मी असलं काही हमखास करतो.


तिनं सोडला फोन. हसली गोड परत आणि येडा मुलगा आहे असा लुक देऊन गेली आतमधे! अशक्य मुली असतात राव! या असल्या प्रसंगी कशाला तिनं असं गोड दिसावं? असो. मी नविनला कॉल लावला. म्हणाला की तो मुवी थेटर मधे आहे? मी मनात विचार केला, दुपारी बाराला कोण जाईल मुवीला? पण ते सोड, याला माझा फोन तिथं कुठं मिळाला? नविनच परत म्हणाला २ ला परत येईल तेव्हा देईल फोन. मी यशला फोन केला.
"बाबा! काय भानगड? तुला काय माहित नविनकडं फोन?"
"त्यानं कॉल केलेला मला. त्याला वाटलं तू गेलास शिकागोला"
"पण त्याला मिळाला कसा फोन?"
"मी सांगीतलं त्याला घ्यायला."
"???? तुला काय माहित फोन कुठं होता?"
"तुला जेवायला बोलवायचं होतं ना बाबा. सकाळपासनं कॉल करतोय. शेवटी फोन कोणीतरी ऊचलल्यावर ओरडलो मी, क्या भाई कितनी बार बुलाया तुझे?"
"मग?"
"तिकडून जरा दबकून आवाज आला, मै भाई नाही हू!"

आता मात्र सगळ्या मगासच्या टेन्शनचं रुपांतर पोट धरून हसण्यात झालं. या त्रयस्थानं यशला सांगीतलं की त्याला रस्त्यात आयफोन दिसला. पांढरा म्हणून दिसला, काळा असला तर मिस झाला असता. मधेच आपण पांढरा फोन निवडला याचं कौतुकही वाटलं. यशला सॅली प्रकरण माहित नाही म्हणून त्यानं जवळचा म्हणून नविनचा नंबर दिला. नविननं फोन घेतला खरा, पण मी शिकागोला असेन म्हणून तसाच मुवीला गेला आणि यशनं मेल कलं, चेक करायला की मी शिकागोला गेलो की आहे अजुन.

सुन्न!


अगदी अशिच अवस्था झालेली माझी! अशक्य नशिब होतं ते!

२ ला नविनकडून फोन घेतला. फोनवर अजुनही स्क्रॅच नव्हते पडलेले!

Monday, October 25, 2010

Blind Date

(या कथेचा मगच्या पोस्टशी संबंध नाही. नवा गडी नवं राज्य)
(कथा पुर्णपणे नसली तरी थोडीशी काल्पनिक आहे. त्यात कशाशीही साधर्म्य वगैरे शोधण्याचा प्रयत्न करू नये. साधर्म्य सापडल्यास, तो वाचकाचा कल्पनाविलास असेल, आणि त्याला लेखक जबाबदार नाही.)

अमेरीकेच्या रणधुमाळीमधे यावेळी बऱ्याच काही तिरपांगड्या गोष्टी घडल्या. शक्य असतं तर प्रत्येकावर काही ना काहीतरी लिहीलं असतं. पण असो. आता परत "आत्याबाईना मिशा असत्या" प्रकारच्या बाता नको मारायला. "अमेरीकेच्या लेटेश्ट ट्रिपमधे" असे म्हणायचे होते खरं तर, पण उगाच ईफेक्ट तयार करण्यासाठी रणधुमाळी वगैरे. नकोत्या ठिकाणी नाही ते करण्याचा किडा जरा उपजातच आहे आपल्याला काय करणार? पुण्यातून निघताना मला आठवतय, आदितीशी बोलणं सुरू होतं. कशाबद्दल? तर ब्लाईंड डेटबद्दल. म्हणे किती मज्जा येईल नं! आपण थोडीच मागं हटणार बाता मारायला? सुरू एकदम जोरदर चर्चा आणि कल्पनांचे मनोरे. पण आता कसं आहे नं, की देवानं पण काही गोष्टी विचित्र बनवलेत यार. म्हणजे ज्याचा जोरदार विचार कराल म्हणे तसलं काही खरच घडतं. याची खरच काही गरज नव्हती. पण आता करणार काय? म्हणालो नं, देवानं खरच काही विचित्र बनवलेत गोष्टी. काही लोकांसाठी ते शाहरुख खाननं बनवलेलं असेल. शिद्दत, कयामत, सजिश, कायनात वगैरे तो जे काही म्हणतो तसं. पण मुद्दा काय पुढे अमेरीकेत असल्या काही गोष्टी घडल्या. अगदी अशाच नाही, पण आता जवळपास देव डी आणि देवदास मधे जेवढा फरक होता, तेवढ्या फरकानं घडल्या. एक जवळपास ब्लाईंड डेट घडून आलीच आली. वर आणि बरेच काही उगाचच पणावर लागले. कारण काहीही नाही. बस झाले, एवढेच.

सॅली नावाची एक फटाक पोरगी योगायोगानं पदरात पडली. म्हणजे पडली म्हणजे एकदम धपाक करून पडली. आले देवाजीच्या मना. कोणा अमुकची तमुक फ्रेंड वगैरे. फ्रेंड सिटींगचा जॉब मिळालेला एका ईवीनींगसाठी. आता कसा आणि का ही वेगळी कथा. पण माझी सो कॉल्ड ब्लाईंड डेट अशी सुरू झालेली. ज्या गोष्टी एकत्र नाही यायला पाहिजेत, त्या सगळ्या एकत्र येऊ लागल्या, की बऱ्याच भलत्या आणि असंबद्ध गोष्टींची श्रुंखला सुरू होते. तसा प्रकार होता. माझ्या सुपिक डोक्यानं सॅलीला सुट होईल आशी आयडिया काढली. आम्ही डिस्को नाईटला जायचा प्लान केला. तोही बप्पी लहरी येणार होता त्या वाल्या. तीही लगेच तयार झाली. ऑलमोस्ट म्हणालीच - "What an idea, sirji". आता हे का केलं? याची मला आजिबात कल्पना नाही. मी तसा डीजे डिस्क वाला माणूसही नाही. पण आता काय सांगू? योग असतात सगळे, जशी सॅली धपाक करून पदरात पडलेली तसे. 

लगेच तयार होऊन आम्ही पोचलोही, अ‍ॅवलॉन नामक देसी डिस्कमधे. सॅलीतर आलेलीच फटाक कपडे घालून. माझ्या मंदबुद्धीनं गडबडीत एक काळा पायजमा आणि लाल टीशर्टवर भागवलं. डिस्कमधे पोरींना ड्रेस कोड नाही पण मुलाना मात्र आहे या स्वार्थी परंपरेचा मला क्षणभर विसर पडलेला. तसंही देसीच डिस्क आहे, करू अ‍ॅडजस्ट ही असली मनातल्या मनात कारणं केली अ‍ॅवलॉनला पोचल्यावर.  गोऱ्या पोरीना तसंही देसी गाण्यांची, खाण्याची भलती आवड. तशी सॅलीलापण. कोणा माझ्या देसी मित्रानंच पटवलेली हिला. आणि हिच्याबरोबर मी डिस्क मधे. "नादखुळा, गणपतीपुळा, तुमच्या लाईनीवर आमचा डोळा" हे जे काही लहानपणी शाळेमधे बोबडे बोल ऐकलेले, थोडंफार तसंच होणार होतं. म्हणजे माझा डोळा वगैरे नव्हता सॅलीवर पण त्रयस्थ होऊन पहाल तर तशी डेटच ना ही. असो. आपल्या डेट तशाही मनातल्या मनातच व्हायच्या. सॅली आणि मी पुसटशा पिवळ्या लाईटखालून लाईनीतून काऊंटर पर्यंत आलो. आत जाऊन येड्यागत देसी नाच करायला तिकीटपण काढले. माझ्या पायजम्याला कोणी जमेत धरलं नाही. कदाचीत सॅलीसारखी चिकनी पोरगी आत येणार नाही या भीतीनं मला डिस्काऊंट मिळाला असावा. दणदणीत आवाजात आत "पग घुंगरू" सुरू होतं. ड्रम बीट वर आख्खी जमिन वर खाली होतीये असं वाटत होतं. ईतकं जुनं गाणं का वगैरे विचार येण्याआधीच समोर बप्पीदांचं पोस्टर बघितलं. सोन्याच्या माळांच्याखाली दबलेला भलासा देह. डोळ्यावर गॉगल. हात वर उंचावलेला. ठाकरेंनी ही पोज आधी शोधली की बप्पीदांनी, असा उगाचच पीजे मनात येऊन गेला. सॅलीकडे बघीतलं आणि पीजे सांगायचा मोह आवरला. काय काय explain करणार हिला? ठाकरे कोण असा पहिला प्रश्न असायचा हिचा. आमच्या कोल्हापुरामधे असलं कोणी म्हणलं असतं तर आजुबाजूचे ४-५ शिव सैनिक पुढं सरसावले असते. काहीतरी काम मिळाल्याचं सुख असतच की. पण असो, त्यात नको पडायला. तसंही तिथे एकमेकाशी बोलायचं म्हणजे जवळ जवळ किंचाळूनच बोलावं लागणार होतं. मग आपली एनर्जी सांभाळून खर्च करणंच भलं.

बाईंनी मोर्चा बारकडं वळवला. काहीतरी दोन चार ग्लास रिचवल्याशिवाय या नाचणार कशा? किंवा याला मूड क्रिएशन म्हणूया. सुरेख पोजमधे बार स्टूलवर बसून बाईंनी चोहीकडे नजर टाकली. क्षणभर मला वाटलं की सगळं म्युजिक अचानक थांबलय आणि सगळे लोक (आणि कपल्स विशेषतः) रागानं (किंवा असुयेनं वगैरे) माझ्याकडं बघतायत, "भला ईसकी लडकी मेरे लडकीसे सफेद कैसे?". आता माझी काय चुक यार, कधी पडतो लंगुरके मूह मे अंगुर. सॅलीच्या ड्रिंकच्या ऑफरने मी तसा लगेचच भानावर आलो. बाईंसाठी वोडका आणि माझ्यासाठी लिंबू सरबत! छ्या! असं कसं. मी कशी अशी ऑर्डर करू? आजूबाजूच्या तमाम कपल्सको जेलस बनायेंगे वाल्या मगासच्या कल्पनेला यानं तडा गेला असता. तेवढ्यात सॅलीनेच तशी ऑर्डर करून टाकली. काहीही म्हणा, गोऱ्या पोरींच्या तोंडी काही छानच वाटतं. माझ्यासाठी हिने लेमोनेड (लिंबू सरबतचं लेमोनेड व्हायला ईतकं पुरे होतं) मागीतलं हे बघूनच, मला परत सगळी कपल्स परत माझ्याकडं मत्सरानं बघतायतचा भास झाला. परत म्युजिकवगैरे थांबलय असलं सगळं वाटलं. बार टेंडरनं एकदम विरक्त भावनेनं माझ्यासमोर जेव्हा लेमोनेड बडवलं तेव्हा थेट कॉलेजच्या कॅंटीनमधल्या वेटरची आठवण झाली. तोही असंच टेबलवर येऊन ऊपकार केल्यागत कटींग वगैरे बडवून ठेवून जायचा. अर्धा चहा कपात, अर्धा खालच्या थाळीत. ईथे थाळी नव्हती, पण प्रकार थोडाफार तोच होता. तसंही ग्लासमधे बर्फ जास्त! त्यातलं सांडणार काय? एकदा हातात ग्लास आला की बास. त्यात लेमोनेड आहे की वोडका हे फक्त तुम्हालाच माहित. परत एंबॅरेसमेंटचा सवाल नाही. सॅलीनं तिचे काहीतरी अनुभव सांगीतले. कधीकाळी मागे जेव्हा देसी डिस्कमधे आलेली तेव्हाचे. कळो न कळो हसणं प्राप्त होतं. तसं हसलो. मी सहसा येत नाही डिस्कमधे ही माहिती देण्याची गरज नव्हती. पण दिली उगाचच. तिला कळाली असेल नसेल काही कळालं नाही पण तिनंही मान हलवून माझ्यासारखंच प्राप्त हसुन दाखवलं. तसंही कोणी डिस्कमधे गप्पा मारायला थोडीच येतं? आणि येऊही नये म्हणून तसंही दणादण म्युजिक. आणि ते तर बप्पीदांचं! एव्हाना, नौ दो ग्याराह वगैरेची गाणी पण झालेली. तशी नॉन-बप्पीदा गाणीही होतीच. सॅलीनं मधे बप्पीदा कोण वगैरे समजून घ्यायचा माफक प्रयत्न केला. आता हिच्या ब्रायन अ‍ॅडम्स वगैरे उदाहरणांसमोर आता मी कसं समजवावं या प्रश्नातून त्या दाणादाण म्युजिकनं मुक्ती केली.

समोर आता आत घुसण्याकडे कूच केली. अशक्य उत्साहामधे नाचणारी जनता बघून जोश नाही चढला तर नवल. बाजुला सहसा कपल्सच असावीत. मला उगाच वाटलंही, हे सगळे खरच ईतके खुश असतील का? की असं बेहोश होऊन नाचतायत? ईतका आनंद! ईतकी मस्ती! जन्नत! काय माहित? खरच काय झालं असेल असं? मला त्यांच्या आनंदाचं नेहमीच कौतुक वातलय. पण नंतर नंतर तेही मॅनीप्युलेशन वाटायला लागलेलं. तिथं असं कोणीच नव्हतं याची मला अगदी खात्री होती जो ईतका वेड्यासारखा खुश होता. खरं तर दिवसभर कचकच झाली, कधी आठवडाभर बॉसनं डोकं खाल्लं, किंवा बरेच दिवस खुश झालोच नाही, मला वाटतं की असं काही झाल्यानं तिथं आलेली जनता खुप असावी. आठवड्याच्या खुशीचा कोटा भरवण्याची ही रिच्युअल! एकदम बेहद्द खुश होणं गरजेचं तर आहे. पण घडत काही नाही तसंलं! मग स्वतःच स्वतःचा मामा बनवायचा. नाचायचं ईथं येऊन. परवा झुठाही सही मधे जॉन अब्राहम पण पाखीला तेच सांगतो. वेडे, दुःखी झालीस की नाच. देवानंही कुठल्यातरी वेदामधे सांगीतलं असेलच की, वत्सा, दुःखी कष्टी झालास की नाच! शंकराचा तर स्वतःचा ब्रॅंडही होता. पण काहीही म्हणा, तिथे आलेले लोक खुशतर दिसत होती. एकमेकांच्यात मिसळलेले. ४-५ जणांचा घोळका जरी असेल तरी त्यांच्याही बऱ्याच कलाकारी चालू. वेगवेगळ्या पोज घेऊन गाण्याची नक्कल करण्याच्या. काही लोक केवळ नाच एंजॉय करत होते. आपल्यामधेच गुंग. नाचाची देसी स्टाईल तशी एकमेवाद्वितिय. वर डिस्को गाणी. आम्हीही त्या अनोळखी आनंदाच्या जश्नमधे सामिल झालो. ओळख असो नसो, काही तासांपुर्वी बऱ्यापैकी अनोळखी आणि एकमेकांसाठी अनभिज्ञ असलेलो आम्हीही तिथे मिसळून गेलो. नाचू लागलो. उड्या मारू लागलो. वेगवेगळ्या पोज देऊन एकमेकाना अ‍ॅप्रिशिएट करू लागलो. नाही म्हणलो तरी, कपल म्हणून नाचू लागलो. तेवढ्याशा छोट्या जागेमधे तसे भरपूर लोक मावलेले. पण सगळेच तितकेच झिंगलेले. आत आल्यावर तो लेमोनेड पिऊन नाचतोय की वोडका, हे कोणा सांगा. तसे एक टकीला शॉट सॅलीमुळं माझ्यात पण रिचलेला. त्यामुळं मीही काही फारसा वेगळा नव्हतो. सगळे सारखेच असल्यानं कोणाला कोणाचा धक्का वगैरे कळत नव्हतं. नाहीतर आपल्याला तर सवय कुठली? तर, धक्का लागला तर एकदम अक्षम्य गुन्हा केल्याचा लुक घेण्याची! पण तसं काही नसतं डिस्क मधे. सगळे किती छान नाचतोय असाच लूक देतात. तेही लूक दिला तर. नाहीतर रनटाईम अ‍ॅडजस्ट करणं सुरू असतच. कदाचीत हेही एक कारण असावं लोक डिस्कमधे येण्याचं. प्रचंड टॉलरन्स.

पण असो. सगळं सुरू होतं. बप्पीदा स्टेजवर येणार अशी अनाऊंन्समेंट झाली. लोक नाचायचे थांबले. स्वतःला स्थिरस्थावर करून झालं की जसं काही बप्पीदा काय म्हणतील. किंवा असच असेलही बुवा. कशाला प्रत्येक गोष्टीवर कमेंट करा? माझेही हात खिशात गेले. सॅलीबरोबर नाचताना मला आमच्या ऑफिसमधल्या एका बॉसचं दर्शन झालेलं. उंचीला जरा कमी, रंग सावळा. तरीही तिथल्या डिम लाईटमधे दिसलाच मला. अचानक माझ्यातल्या "लोग क्या कहेंगे" वगैरे जागा होऊन, शक्य तितक्या जागा बदलून पाहिलेल्या. आता या फिरंगबरोबर असं डिस्कमधे? आता हे का आणि कसं घडलं याचं ऊत्तर मी घरी जाऊन तयार करायचं ठरवलेलं. आताच हा येडा भेटला तर काय सांगू! आता म्युजिक थांबल्यावर परत एकदा माझं लक्ष चौफेर गेलं. काय सांगा, माझ्याच मागे ऊभे असायचे साहेब! पण असं काही नव्हतं. कदाचीत मलाही तिथं बघून त्यानीही असाच लपाछीपीचा डाव सुरू केला असावा. काय सांगा? हे सर्व सुरू असताना खिशातल्या हाताला अपेक्षित जाणिव नाही झाली आणि माझी असली नसलेली सगळी झिंग सर्रकन ऊतरली. समोरच्यानं मधेच परत अनाऊंन्समेंट केली, "Put your hands together for BA....PPI....DA!" आणि हात तसेच खिशामधे ठेवून सॅलीकडे वळून मी जवळ जवळ किंचाळलो, "सॅली!! माय आयफोन??"

(क्रमशः)
पुढचा भाग: Blind Date (Contd)

Friday, October 08, 2010

The Right Choice

ही कथा मला सलग सादर करायची नाहीये. म्हणुन एका विशिष्ठ क्रमाने पोस्ट्स टाकतोय. क्रम कथेच्या सुरुवातीला नमुद करत आहे. तसंही प्रत्येक पोस्ट स्वतंत्रही वाचता यावा असा लिहिताना प्रयत्नही केलाय.

...
...
...
...
...
...

==========================================




"हॅलो, ... स्वप्नील?"
"हं ... कोण?"
"विसरलास का गाढवा? यहीच दोस्ती बघ!?"
"कोण आहे?"
"साले best cribber in the world!"
"रिया?? Shit yaar! कळालंच नाही. Hi yaar."
"अरे आता आपण अहेच चीज अशी तर काय करणार? कसा आहेस?"
"मस्त! चकाचक"
"So what do you crib about in your new company?"
"साले सगळे चोर यार. कोणाला काम करायला नको! मलाच सांगतात, मग मीही कारणं करतो नवी नवी! मी का मरू एकटाच!?"
":-) ... Some things never change!"
"हा हा! राईट! बाकी तुझं काय चाललय? तुला असलं काही ऐकायला आवडणार नाही म्हणा! कसा आहे तुझा बॉस? माझी आठवण काढतो का?"
"Yeah right! तुला दिवस रात्र मिस करतो! कुठे गेला होनहार स्वप्नील म्हणुन हळहळतो! आणि काय? तुझा नंबर वगैरे मागतो म्हणू का?"
"lol! तुला कंटाळा येत नाही एकाच ठिकाणी चिकटून बसायचा? बदल यार आता तू पण कंपनी!"
"Eternal Discussion आहे ते आपलं!"
"..."
"..."
"..."

एव्हाना दोघानीही ऐसपैस जागा वगैरे शोधली होती निवांत गप्पा मारण्यासाठी. मधे उगाच एक ऑकवर्ड स्तब्धता येऊन गेली.
"तुझी आठवण आली रे आज."
"अरे आता आपण अहेच चीज अशी तर काय करणार?"
"माझं वाक्य आहे ते!"
"थोडा चुरा लिया यार ... अ‍ॅडजस्ट करो! हा हा"
"कसा आहेस बाकी? आंटी? गुरू? कसय पब्लीक?"

या अशा स्तब्धता दोघानाही अनपेक्षित नव्हत्या पण दोघेही सरावलेले आता त्याला. दोघानीही एकत्र मिळून निर्णय घेतलेला कधी काळी - शुन्य संपर्क ठेवण्याचा. बऱ्या वाईट अशा सगळ्याच निवडलेल्या रस्त्यांची जबाबदारी त्यानी कधीच टाळली नाही. जेव्हा स्वतःवरच शेकलं, आणि त्यांच्या नात्यावरच गदा आली, तेव्हा त्यानी ती ही स्विकारलेली. बऱ्या वाईटाची समज खुप छान होती त्याना. वाईट गोष्टी केल्या, पण त्या वाईट आहेत हे समजून उमगून केल्या. आणि समजून उमगून केल्या म्हणून स्वतःला उदात्तही केलं नाही. किंवा म्हणूनच जे काही वाट्याला आलं त्याचा आहे तसा स्विकार केला. ते अंगावर शेकलं म्हणून काय झालं!? स्वप्निल आणि मायानी लग्न केलं हे रियाला नक्कीच माहित होतं पण दोघंही बोलताना मायाचं नाव किंवा लग्नाचं नाव सोयिस्करपणे कधीच काढायचे नाहीत. मायाच्या नावानं रियाची कानशिलं लाल होतात हे स्वप्निललाही माहित होतं. दोघांच्यामधे एक विचित्र सामंजस्य होतं - दूर गेले तरी "Mutual Understanding" थोडीच गेलेलं? एकमेकाला आपण चांगलं ओळखतो याचा रास्त माजही होता - प्रत्येक कृतीमधून प्रकर्षानं दिसणारा. पण सगळं बीन बोलता. तिला कळायचं. त्याला कळायचं. बस. तो अजुनही टिकून होता - ३-४ वर्षानंतरही.

"मी ठीक गं. आंटी आहे गावाकडंच. तिची शाळा सुरू आहे. गुरू आता डॉन झालाय, पुढच्या वर्षी अकरावीला जाईल. तुझी आठवण काढतो अधे मधे. विचारतोही की रिया काय करते वगैरे? पहिला प्यार आहेस त्याचं तू तसंही!"
"फ्लर्ट लेकाचा. त्याला अजुन आठवते मी? गोड आहे यार तो."
"बाकी तुला का आज अचानक ...?"
"असच रे ... उपरती वगैरे येते ना ... त्यातला प्रकार आहे हा"
"काही झालं का?"
"स्लॅम बूक बघत होते. तू चिकटवलेली नोट दिसली परत - जीत के दिखला देंगे, अगर तुम साथ हो वाली. मग म्हणाले What the heck ... उचलला फोन आणि केला कॉल."

"सही है. उपरती कशाची झाली बाळे पण तुला?"
"बाष्कळ बडबड मिस करतेय मी. केलीच नाही रे बरेच ... वर्षं! Sensible बोलण्याचा अतिरेक झालाय म्हण नं!"
"मॅडम मोठ्या झालाय म्हणा की! म्यानेजर म्हणू का आता तुला?"

"नाही रे. पण अचानक एकटं वाटलं. आपली आठवण आली. म्हणजे ईतकी वर्ष असलेला ईनर्टनेस अचानक गळून पडला. तुला कितीही क्रिबर म्हणले तरी मनामधे असलेली घुसमट पोटतिडकीनं लगेच शिव्या देऊन बाहेर काढण्याला मिस करतेय. क्रिब मारून का होईना तू आतून एकदम स्वच्छ रहायचास, मला ते अजुनही जमलच नाहीये. मी फक्त तुझ्याच बाबतीत क्रिब मारत राहिले म्हणुन आपल्यातलं understanding जास्ती स्वच्छ होतं. पण मला हे बाकी कधीच जमलं नाही. कचरा साठतो रे बराच मग. आज काल कोणी सहसा गप्पा मारायलाही मिळत नाही. आधीच बाकीच्या मुलींशी माझं फारसं जमत नाही तशाही मुली कमीच ईतक्या लेवल वर. बाकींसाठी सिनीअर झालेय मी. कधी कधी वाटतं की जावं रस्त्यावर आणि म्हणावं ओरडून What the Fxxx! पण कसे मीच मला कसे वेडे नियम घालून घेतलेत? त्यामुळं तेही करवत नाहीये. नाही तिथं आपला समजुतदारपणा अडवा येतो यार."

"रिया, मला फारसं झेपत नाहीये तू काय बोलतेयस? कशाबद्दल सुरू आहे हे सगळं?"

"आपण केलेल्या लफड्यानंतर आपण मोरालबद्दल कमीच बोलावं असं आहे. पण आपण भारी होतो यार - When I look back today, I just love our decision to go apart and cut all the chords. आपण जे किडे केले त्यानंतर थोडंफार स्वतःच्या नजरेत उभं रहायची ताकद त्यामुळं आली. कितीतरी लोकाना आपण भरडलं असतं आपल्या बरोबर जर तसच खेळत अडखळत बसलो असतो तर. तू उत्तर द्यावस अशी अशी ईच्छा नाहीये पण कुतूहल आहे मला, मायानं कसं स्विकारलं तुला? की तिला नाहीच बोललेलास अजुन काही?"

"... हं .." फार वर्षानंतर ऐकला तिनं त्याचा असा हुंकार. मागच्या वेळी ऐकेलेला तेव्हा प्रश्नांची अशक्य सरबत्ती सुरू होती त्यांची. आपलं काय होणार? हे आपण का केलं? आपण करू शकू का? तिच्या एका प्रश्नाच्या लडीनंतर त्याच्या नजरेत रोखून बघितल्यावर एक मोठ्ठा श्वास घेउन त्याचा असा हुंकार यायचा. तुझं सगळं मान्य आहे मला. आणि माझ्याकडंही त्याची काहीही उत्तरं नाहीयेत पण आपण तेही निभावून नेऊ याची खात्री आहे. त्याचं हे उत्तर टचकन डोळ्यात पाणी आणुन गेलेलं. आपण दोघही निभावून नेऊ याचा एकमेकाबद्दल असलेल्या विश्वासाचं सर्टीफीकीट म्हणून ते पाणी आलं असावं. रिया स्वतःवर चिडली की फार वेगात श्वास घ्यायची. त्याचंच एक पार्श्वसंगित व्हायचं. एकत्र मिळून literally जग जिंकायच्या त्यांच्या वेड्या प्लानचीही आठवण त्याना तेव्हा झालेली. आणि आता आपल्याला वेग वेगळं जिंकावं लागेल म्हणून जगाची वाटणीही त्याचवेळी रडत रडत करून झालेली. त्या हुंकारानंतर हा हुंकार. हा हुंकारही रियाला बरच काही सांगून गेला. तिच्या मनामधे कुठेतरी तळागाळात लपलेली स्वप्निल आणि मायासाठी असलेली अपराधी भावना परत उफाळून आली.

"तू उत्तर द्यायला आजही बांधिल नाहीयेस स्वप्निल. माझं आपलं नेहमीसारखं बडबडणं सुरू आहे रे ... मला एक श्रोता हवाय कदाचीत. कदाचीत तुला परत एकदा युज करतेय माझ्यासाठी! किंवा परत सॉरी वगैरे म्हणायचा ड्रामा करतेय"

"काय झालय रिया? तू ठिक आहेस ना? काही केलयस का तू?"

"आठवतय? मी म्हणालेले माझ्या आयुष्यात गोष्टी फार प्रेडिक्टेबल होतात. मी जशी दुसऱ्यांशी वागते ना, देव बरोबर तसच काही माझ्या आयुष्यात घडवतो. कॉलेजनंतर कदाचीत हेच बिनसलं. तोपर्यंत मी खरोखर इनोसंट आणि चांगली होते. पण नंतर जरा भकटले. बऱ्याच जणांना त्रास झाला माझ्यामुळं आणि आता माझा टर्न आलाय. किती कपल्स माझ्या मुळं भांडली असतील रे? माझं कधीही ईंटेन्शन नव्हतं रे की कोणाला त्रास व्हावा. पण आता कोणी माझ्यावर ईंप्रेस होऊन माझ्याशी बोलतो तर मलाही फ्लर्ट करायला मजा यायची. एक वेडा जोश होता कदाचीत तो. I swear to God, मी कधी काही वावगं केलं नाही पण त्यामुळं कोणा तिसरीला त्रास होतोय हे न कळण्या ईतकी मी ईनोसंटही नव्हते. पण त्याची ग्रॅवीटी नाही कळली रे कधीच. मी वावगं नाही केल्याचा अभिमान असला तरी मी ते थांबवू नक्कीच शकले असते. पण मी ते नाही केले. त्या त्या वयाची नादानी होती ती. लोकाना डिवचायला जितकी मजा येते ती सगळी घेतली. पहिली थोबाडीत बसली ती जेव्हा तुझ्या आयुष्यात माया आली तेव्हा. Virtually २४ - २४ तास एकत्र काढल्यानंतरही आपल्यामधे काही रीलेशन नाहीये किंवा तुला मी त्या नजरेनं बघितलं नाही सांगताना माझ्यामधे केवळ मुर्खपणा ठासून भरलेला. तू मायामधे गुंतल्यावर वेड्यासारखं तुझ्यावर परत प्रेम करतानाही अक्कल गहाण ठेवलेली. आपण चुक केलीच. तिच्या तुझ्यावर असलेल्या विश्वासाचा अनड्यु अ‍ॅडवांटेज आपण घेतला. आठवतय? आपण शेवटचं भेटलो तेव्हा मी म्हणालेले. मला याची किम्मत चुकवावी लागणार आहे. मी केलेल्या सगळ्या गोष्टी मला परत दुसऱ्या बाजूनं उपभोगायला मिळतातच."

"कोणी काय केलं तुझ्याबरोबर रिया? सरळ सांग न? Did someone hurt you?"

"मला कोण काय करेल रे. मीच एवढे किडे केलेत. त्याचीच फळं अधे मधे मिळतात. आपण शेवटचं भेटलो तेव्हा तुला माया भेटलेलीच. मी अलिप्त होते सगळ्यांपासून. पण मग मलाही भेटला कोणीतरी. आणि आता माझी माया झाली आहे. Tables have turned! कदाचीत तुझी माया गाढव होती. मी नाहीये, मी स्वतः शोधुन काढलं सगळं लफडं. तो मला सगळं सांगणार होता खरं खरं. मला विश्वास आहे त्याच्यावर. खुप. पण कदाचीत त्याआधीच मी शोधुन काढलं. तोही घाबरलेला. त्याचं सुरूवातीचं डिनायलही फार मनाला चावून गेलं! आठवतय? Fear of Losing! आपण किती तास खपवलेले त्यावर? परत त्याच गिरणीत विचार दळायला टकलेत. दुखतं यार! फार दुखतं. तुझं आणि मायाचं प्रकरण समजल्यावर जेवढं रडू आलेलं, स्वतःवर चीड आलेली, तेवढीच चीड आली आज! अशक्य! मला नाहीच सांगता येणार शब्दात! कदाचीत त्या प्रत्येक मुलीला अशीच चीड आली असेल ना जेव्हा त्यांचा हिरो माझ्या call वर असायचा. किंवा माझ्या sms मधे त्यांचा मोबाईल भरलेला असायचा. माझ्या ईमेलला चोरुन रिप्लाय करायचा! हे सगळंच्या सगळं झालं रे माझ्याबरोबर यावेळी. आठवतय आपल्या शेवटच्या काही दिवसात, तू मायाला रिया म्हणून २-३ दा हाक मारलेलास. आपण बोललेलो याबद्दल. मायाला कसं वाटलं असेल हे मी अनुभवलं! कदाचीत मायालाही असंच चीटेड वाटलं असेल ना जेव्हा तिच्या नाकाखाली आपलं अफेअर थोड्या दिवसासाठी परत सुरू झालेलं. म्हणजे जर कळलं असतं तर! किंवा जेव्हा कळलं असेल तेव्हा. Whatever. त्याचीच किंमत मी आत्ता मोजतेय. परत सगळं battlefield वर उभं आहे स्वप्निल. माझं करीअर, personal, social, professional life! माझी काही मागची देणी फेडायचीयेत कदाचीत. मी स्विकारलाय जे माझ्या वाट्याला आलय ते. पण फार एकटी आहे रे आत्ता. निभाऊन नेईन मी हेही. माहितय मला. पण फक्त कुठेतरी मन मोकळं करायचं होतं. आणि तुझ्याशिवाय आणि कोण समजू शकेल? म्हणून विचारलं की मायनं कसं स्विकारलं तुला?"

"... तुला सांगू रिया. बऱ्याचदा आपणच गोष्टी Complicate करतो. आपण केपेबल नव्हतो गं डिसीजन घेण्यासाठी. आणि हे आपल्याला माहित नव्हतं. आपल्याला डिसीजन घेण्याची power मिळाली. आणि जेव्हा वेळ आली तेव्हा we misused our power. केवळ ऑप्शन आहे म्हणुन नकारानं सुरुवात केली. मला अजुनही आवडतं की आपण भानावर आलो. आपण चुका केल्या, पण आपण त्या सुधारल्याही. आपण दुर जाण्याचे दोनही निर्णय तुझेच होते. दोनही वेळी फार रडवलं पण खरं सांगतो. दुसऱ्यावेळी त्याहून चांगलं काहीही नव्हतं. I remember I still tried to reach out to you even after that and you absolutely did not respond. I wrote to you also, how could you do this? we need each other to recover n all पण तुझं बरोबर होतं. आपलं दोघांचं एकमेकांबरोबर असणंच आपल्याला आणखी वीक बनवत होतं. आपल्याला आपल्यातून बाहेर येण्यासाठी आपण दुर जाणं महत्वाचं होतं. आपलं आपल्या मोमेंटरी ईमोशनल सर्जला भीक घालणं ही आपली चुक होती. आणि तुला कदाचीत हे माझ्या आधी कळलेलं. आणि मला अजुनही तुझं अप्रुप वाटतं माझ्या कुठल्याही ईमेल ला रिप्लाय न केल्याबद्दल! आपण मायाला नक्कीच चीट केलं. माझा माझ्यावरचा विश्वासच उडालेला. कोणावरचाही. अगदी लहान मुल जरी बघितलं तरी वाटायचं की उद्या मोठा होऊन आपल्यासारखंच लफडी करणार आहे. लोकाना दुखावणार आहे. धोका देणार आहे! प्रेम वगैरे गोष्टी जवळ जवळ लोप पावलेल्या. We were apart. We had people who wanted to see us happy. We had no answers for them. We had no option but to live. We had no option to crib in front of each other. We had no way to sympathize each other in person. We did not have option of each other. And believe me that's the only reason we could do it. That's the only reason why we are standing tall today. नाहीतर तसच घोळत बसलो असतो"

"माहित नाही यार. पण खरं सांगू. माझा विश्वास आहे त्याच्यावर. पण आता प्रत्येक वेळी हे चीटींग आठवणार. ते कसं विसरू? मला माहित आहे त्यानं बंद केलय ते प्रकरण. तो आता मी सोडून कशामधे गुंतलेला नाहीये. पण तो खोटं बोलला माझ्याशी, हे कसं पटवून देऊ स्वतःला? मी सगळं बदलायला तयार होते यार. फार दुखतं रे! खरच फार दुखतं! त्याला बघताना फार छान वाटायचं. आता त्याला जवळ करताना वाटेल, मी काही exclusive नाहीये. आणीही कोणीतरी ईथच कुशीत होतं! आता मला हे चिटींग आठवतं. कदाचीत मायासारखं डोळे बंद करून बसले असते तर बरं झालं असतं. गाढव कुठली? आपोआप गोष्टी बरोबर झाल्याच असत्या ना. तोही आलेलाच होता बाहेर. मलाच घाई"

"..."

"..."

"रिया. खरं सांगू. आपोआप काहीही होत नाही.
आणि हो. माया गाढव नव्हती. She was a bigger person! It was up to us to reward it or take undue advantage. She also had lot of options to decide our fate - guess she made the right choice - unlike us she did not start with negative!"

Sunday, August 08, 2010

A lot can happen over a coffee




वाटेत आलेल्या सर्व गोष्टींचं काहीना काहीतरी एक लॉजीक असलं पाहिजे. नसेल सापडत तर शोधलं पाहिजे. स्वतःला पटल्याशिवाय काहीच करू नये. पण स्वतःला पटलय तेच बरोबर असही म्हणू नये. हे असले सगळे ठोकताळे तिने एकदम शाळेपासून बांधलेले. मुलींच्यात फारशी ती कधी रमलीच नाही. किंवा तिच्यासारखं विचार करणाऱ्या मुली तिला कधी मिळाल्याच नाहीत. तिला स्वतःचे विचार इतके सोपे, सरळ वाटायचे की त्याचं कोणालातरी विश्लेषण वगैरे करावं किंवा ते कोणालातरी पटवून द्यावेत हे तिच्या ध्यानीही यायचं नाही. समोर दिसणारी प्रत्येक घटना "अहं, असं थोडीच असतं?" म्हणण्यापेक्षा "हं, असंपण असतं तर"  अशी बघायची. तिचं कोणाशी कधी काही बिनसलंच नाही. किंवा ती बिनसायच्या गावाला गेलीच नाही. समोरच्याचीपण काहीतरी बाजू असेल, आणि ती काय असेल याची तिला फार चटकन जाण यायची. आपली मुलगी भलतीच समजुतदार म्हणून आईला तर भारी कौतुक. आई लहानपणी तिला कायम सांगे, "तुझी मोठी बहिण आहे न ती? तिला कसं वाटेल याचा विचार नको करायला तू!" हे जरा विलक्षणपणे तुच्यात भिनलेलं. सगळ्यावेळा ती तू असाच विचार करत बसे. कदाचीत म्हणून तिला कधी कोणाला समजून घ्यायला जड गेलेच नाही. आईला भरून यायचं तिचा समजुतदारपणा बघून. पण मुलगी स्वतःच्या विचारांची जरा जास्तीच पक्की आहे हे नंतर जाणवू लागल्यानंतर उगाच तात्विक खटके उडायचे. "मुलींनी असंच करायचं असतं" किंवा "मुली असंच करतात" म्हणून तिनं पण काही काही करावं (किंवा नाही करावं) ही आईचं मतं तिला कधीच पटायचं नाही. काहीही लादलं की ते चांगलं असो किंवा वाईट, तिच्यातला रीबेल जागा व्हायचा. आणि मग प्रचंड हेका - ते न करण्याचा! गोष्टी सापेक्ष असतात. आणि हे ज्याना पटत नाही त्यांच्याशी तीचं कधीच फारसं पटलं नाही. एखाद्याला चांगली किंवा वाईट वाटलेली गोष्ट तिला वेगळी वाटूच शकते, या मताची ती. त्याच्या उलटही सत्य होतं. तिला आवडणाऱ्या किंवा नावडणाऱ्या ईतराना आवडाव्यात यावरही तिचा आग्रह नसे. या अशा सगळ्या प्रकारामुळं तिच्या मैत्रीणी कमी होत्या, आणि मित्र जास्ती. किंवा असं म्हणू, की तिच्या मैत्रिणींना तिच्या वागण्याला whimsicality वगैरे लेबलं लावण्यात जास्ती ईंटरेस्ट होता पण मित्रांमधे कधीच कोणाला अशा लेबलांची गरज पडली नाही. "मी काय टिप्पीकल मुलगी नाहीए" असं ठसक्यात आणि अभिमानानं सांगणाऱ्यांतलीही ती नव्हती. आपलं वेगळेपण तिला माहित होतं आणि ती ते जपून होती. मुलांच्यात तिला कोणी प्रश्न नाही केले, किंवा अमुक अमुकच कर वगैरे तत्वं पण ऐकावी लागली नाहीत. मित्रांच्या कोंडाळ्यात बऱ्याचदा ती एकटीच मुलगी असल्यानं तिचं बऱ्याचदा ऐकलंही जायचं. हे सर्व काहीही असलं तरी बाकीच्या असंख्य मुलींसारखी आपल्या आईबाबांच्या फार जवळ होती. एकदम पारदर्शी. अगदी सग्गळंच्या सग्गळं सांगायची. ते घरी पटलं जरी नाही तरी कोणी घरातून तिच्यावर बंधनं नव्हती. तात्विक खटके वगैरे वेगळी बात पण त्यांचा अतिरेक कधीच झाला नाही. 

रिया. तिला कधी काय ट्राय करावंसं वाटेल हे कधीच कोणाला झेपलं नाही. मग ते खाणं पिणं असो, काही अयुष्यातले डिसिजन असो किंवा कपडे वपडे असो. एकदम डगळा ग्रे कलरचा टी शर्ट, आणि ब्लॅक कलरची ट्राउजर. कानात हेडफोन्स, आणि दंडाला स्ट्राईपमधे बांधलेला आयपॉड. अशा प्रकारचे तिच्याकडे कमीतकमी ७-८ सेट असावेत असा सगळ्यांचा संशय. कोणी उगाच ह्याव घाल किंवा त्याव मेक अप कर म्हणंलं की तू चिडून असंलं काहीतरी घालून यायची. मग ते ट्रेकींग असो, किंवा कोणाला भेटायचं असो. ती तशी त्यातही सुरेख दिसायचीच. पण कदाचीत ते तिच्या लाईवली वागण्या, बोलण्यामुळं असेल. तिचं आजूबाजूला असणं कधीच लपून राहिलं नाही. १० मिटरच्या परिघामधे ती आहे, तर तिच्याकडं दुर्लक्ष करणं कोणालाही अशक्य. मग ते त्या डगळ्या टी शर्ट मधे का असेना? हिच रिया बऱ्याचदा चकितही करायची. गडद पिंक कलरचा गळ्यापाशी चुण्या असलेला वी शेपचा सिल्की टॉप, खांद्यापर्यंत पोचता पोचता राहिलेले सिल्वर कलरचे थोडेसे लांबसे पण तिच्या उभट शेहऱ्याला शोभणारे कानातले. वर रे बॅनचा ब्राऊन शेडचा गॉगल किंवा नाहीतर डोळ्यात हलकंसं काजळ. केस खांद्यावरून नदीसारखे वळून पुढे आलेले. तेही असे की त्यामुळं ना तिचे कानतले दडायचे ना डाव्या गालावरची खळी. डाव्या हाता स्पोर्ट्स लूक वालं, मोठ्या पण फॅंसी डायलचं घड्याळ. उजव्या हाता एक किंवा जास्तीत जास्ती २ कडी. खाली काळा स्कर्ट, आणि हाय हिल्स. आणि स्कर्ट असेल तरच दिसणारे डाव्या पायावर तळाकडच्या बाजूला केलेला सुर्याच्या चित्राचा काळा गडद टॅटू. रिया एक संपुर्ण पॅकेज होती. काहीनी तिला व्हिमजिकल म्हणलं, काहीनी मुडी, काहीनी बेब तर काहीना असलं काही लेबल लावायची कधीच गरज वाटली नाही. रिया त्यांच्यात विरघळून जायची. या शेवटच्या कॅटेगरीतल्या लोकांच्यात ती सहसा फार रमे.

---------------------------------------------------------------------------------------

त्याची गणितं फार सोपी होती. टेढं मेढं आयुष्य असलं की गणितं आपोआप सोपी होतात. घरातल्या भावंडांपैकी हा सर्वात शांत. कोणाच्या ना अध्यात ना मध्यात. पण आई वडिलांच्या तू तू मै मै नं वीटलेला. घरच्या एकुणच भाईबंदकीनं वीटलेला. कसा काय शाळेमधे वगैरे नंबरात आला हे घरच्यानापण कोडं. एकदम शिंपल्यामधे रहाणारा जरी असला, तरी कधी एकदा घराबाहेर पडतो याची घाई असलेला. त्याच्या घराबद्दल, त्याच्या गावाबद्दल, त्याच्या माणसांबद्दल कधी फारसं आकर्षण त्याला कधीच नव्हतं. तसा द्वेषही नव्हता. पण एकुणच स्वतःच असं आयुष्य घडवण्याचा किडा फार लहानपणापासूनचा. घरच्या कटकटीमुळं असो किंवा कशामुळंही, पण त्याला बाहेर पडायची विलक्षण ओढ. कॉलेजसाठी म्हणून जेव्हा गाव सोडायची पाळी आली तेव्हा त्यालाही पंख फुटायला सुरू झाले. आता आई बाबांची झिगझिग नाही. भावंडांशी तुलना नाही. आरडा ओरडा नाही. मुलगा कुठल्यातरी चांगल्या कॉलेजात शिकतो आणि त्याला कशाची ददात नाहीये, हे घरच्यांसाठी पुरे होतं. घरच्यानी याहून जास्ती त्यात पडू नये हे त्यालाही हवं होतं. सगळी कामं आपल्याआपण चुपचाप करायची सवय लहानपणापासूनच. त्यामुळं हळू हळू त्याच्या कामात कोणी नाक खुपसलेलं त्याला कमी जमायचं. त्याची सगळी स्वतः बनवलेली तत्वज्ञानं. स्वतःला खपतील तशी. काही चुकलं, दुखलं, की तो एकटाच बसून राही. मग स्वतःचीच काहीतरी थेअरी बनवे की जी थेअरी त्याला परत नॉर्मलला आणे. ज्याना कोणाला याच्या थेअऱ्या मान्य नसायच्या, ते सगळे याच्या लेखी हिप्पोक्राईट होते. कॉलेजमधे हवी तितकी ऐश केली. काही करायचे की नाही वगैरे असले विचार त्याच्या मनात कधीच आले नाहीत. जे जे मनात कधी न कधी आलेलं ते ते सर्व करून घेतलं. बाईक्स फिरवणं सुरू झालं. डिस्क, ड्रिंक्स वगैरे सर्वांवर हात मारून झाला. त्याला व्यसन कधीच कशाचं नव्हतं. पण साधू संतांसारखा अलिप्त तो मुळिच नाही राहिला. बिचकत बिचकत डेटींगही सुरू झालं. पण त्याच्या असल्या मुडीपणाला सांभाळेल अशी मुलगी कुठे कोण भेटेल. आणि यालाही ते नखरे सांभाळणं कधी जमलं नाही. बघता बघता कॉलेज संपलं. जॉब सुरू झाला. नोकरी बरोबर शेवटी छोकरीही मिळाली. तसंही रीलेशनशीप्स बद्दल कुतुहल असतच. यानी ठरवून पाय घसरवला. पुढे त्यावरही थेअरी केली - "मी उघडपणे तरी करतोय, उगाच वर वर फिलॉसॉफ्या मांडून लपून छपून तरी कोणावर मरत नाही! हिप्पोक्राईट साला, मला सांगतोय!? Idealism is bull shit!". काही दिवसात फेसबूक, ऑर्कूटवर कमिटेड स्टेटस झळकला. "You look great together", "Cute Couple", "Made for each other" असल्या कमेंट्सचा भडीमार सुरू झाला. छोकरी पुढे गेली ऑस्ट्रेलिया. फोनवरचं प्रेम ते! किती काळ टिकणार? शेवटी त्यानं सांगून टाकला की बाई आपलं तसंही आता बरचसं आयुष्य वेगळं झालय. मी काय ऑस्ट्रेलियाला येणार नाही आणि तुही भारतामधे येशिल असं काही नाही. उगाच काय अडकायचं. लव आज कल सारखं, किस्सा बंद केला. "We had a steady relationship but then we mutually broke up. No hard feelings". अशा लेबलनं सही सलामत त्यातून बाहेर. थोडंफार वाईट काय ते वाटलं. ईतक्या वर्षाचं नातं. पण आयुष्याला एकदा का वेग आला की असल्या तात्पुरत्या भावनांना वेळ नसतो. एक मुलगी गेली पुढची तयार. त्याची पर्सनॅलीटी तशीही जबरदस्त. दिसायला नेटका, ब्रॅंडेड जॅकेटस, शर्टस, ट्राउसर्स. स्वतः कमवायचा, स्वतः ऊडवायचा. त्यात बारा गावचं पाणी पिलेला. आदर्श वगैरे जरी नसला तरी फारसं वावगे आणि विचित्र विचार नसलेला. कोणीही सहज ईंप्रेस होईल असा. नाही म्हणता म्हणता असेच ३-४ अफ़ेअर्स खटा खट झाले. एकदा मोठ्या भावाने प्रेमाने भेटून सांगीतले की बाबा रिलेशन म्हणजे काय चिरमुरे फुटाणे आहे का? थोडं चित्त थाऱ्यावर ठेवा. कधी ही तर कधी ती! हे काय जगणं का काय? घरच्यांशी नाही पण त्याच्या मोठ्या भावाला याच्या बऱ्याच करतूता माहीत होत्या. दोघांच्या पहिल्या गर्ल फ्रेंडचं नाव वैष्णवी. कायच्या काय मजा यायची त्याला बोलताना "तुझीवाली नाही रे माझीवाली वैष्णवी". फरक एवढाच मोठ्या भावानं त्याच्यावाल्या वैष्णवीशी लग्न केलं. यांचा mutual agreement वाला ब्रेक अप झाला. तसंही उपदेशांचा कोटा आणि सिजन असायचा. तो संपल्यावर भाऊही खुश आणि हाही खुश. आयुष्याला आलेल्या वेगाची त्याला झिंग चढलेली. झालेल्या प्रत्येक गोष्टी तशाच घडण्यामागं काहीतरी कारण होतं आणि आपण तेव्हा जे वागलो ते बरोबरच वागलो अशा स्वरुपाची तत्वं तो जाता जाता तयार करून स्वतःच्याच मनाला गप करायचा. नव नवं काम, नव नवे लोक यांच्या गर्दीत इतका रमून गेलेला की कधी २ घटका बसून आपण काय करतोय, कुठं जातोय याचा विचार बिचार कधीच नाही करायचा. झपाझप कामातही वर चढत गेला. हळहळत बसणे वगैरे कधीच केलं नाही. प्रत्येक वेळी त्याच्याकडे आणखी दहा गोष्टी तयार असायच्या करण्यासाठी. एक नाही झाली तर पुढची. 

स्वानंद या नावाचे बरेच चाहते, तर बरेच द्वेष्टे तयार झालेले. त्याला त्याचं काहीही नव्हतं. आयुष्य असंच जगायचं असतं यावर त्याचं आजिबात दुमत नव्हतं. आणि ज्यांचं होतं ते त्याच्यासाठी हिप्पोक्राईट होते! काळ लोटत गेला, हळू हळू सगळे आजूबाजूचे त्याचे मित्र मैत्रीणी लग्नं वगैरे करून आपापल्या व्यापात अडकू लागले. आता काहीही प्लान केला की सगळे पुर्वी सारखेच एक्साईट व्हायचे पण मग थोड्या वेळानं कन्फर्म करतो असं सांगून तासानी फोन करायचे की अरे ते अमुक अमुक काम आलय रे, यावेळी जमणार नाही. स्वानंदलाही कल्पना यायचीत की घरी जाऊन बायकोची परवानगी नाही मिळाली म्हणून डिच मारतोय साला. जॉबच्या लगेचचे २-४ वर्षात जी काय घनीष्ट मैत्री झालेली लोकांबरोबर, जे काही प्रकार केलेले, त्यापुढं त्यानंतरच सगळंच फिकं होतं. थोडंफार एकटं पडणं सुरू झालेलं. पण ते उघडपणे मान्य करेल तर तो स्वानंद कसला. त्याच्या थेअऱ्या तोकड्या पडत चाललेल्या, पण काहीतरी नक्कीच नवा एपीसोड सुरू होईल याची खात्री होती त्याला. असंच एकदा अनपेक्षीतरित्या मित्राच्या सीसीडीतल्या पार्टीमधे एका एकदम अनईंटरेस्टींग कपड्यातल्या पण अशक्य active, आणि impossible to ignore अशा मुलीची गाठ पडली. एकमेकाची खेचताना म्हणा, किंवा एकमेकाला टोमणे मरताना म्हणा, दोघानीपण तमाम जनतेला सही एंटरटेन केलं. डगळ्या टी शर्टमधल्या रियाची आणि स्मार्ट, हॅंडसम स्वानंदची ती पहिली भेट.

Tuesday, March 23, 2010

Shift of Origin

ईश्कीया बघून सकाळी ११ला कोथरूडच्या सिटी प्राईडमधून बाहेर पडलो. पार्कींगचे ५-१० रुपये वाचावे म्हणुन गाडी थिएटरच्या शेजारच्या बिग बझारच्या पार्कींगमधे लावलेली. थिएटर आणि बिग बझारच्या मधला रस्ता दुसऱ्या बाजुला बंद. म्हणुन वर्दळ कमीच. पार्किंगकडे जाणारेच कोणी असेल तर तेवढेच. बरोबरच्या लोकाना टाटा बाय बाय करत करत त्याच रस्त्यावरून मी गाडीपर्यंत आलो. पुढचे कार्यक्रम ठरवण्यासाठी फोनाफोनी सुरू झाली. येरझाऱ्या घालायला खुल्या पार्किंगपेक्षा सुंदर आणि कुठली जागा? त्यातही सकाळची वेळ म्हणुन रस्ताही अगदीच मोकळा मोकळा आणि लख्ख! गाड्या काढणारे आणि लावणारे सोडले तर आणखी कोणी नाही. थिएटर मधून बाहेर पडून पार्कींगपर्यंत आलो. येताना त्या रस्त्यावर नजरेत येतील असे चाळे करणारी टोळी दिसलेली. साधारण अकरावी-बारावीतली मुलं असावीत. एका स्कूटीसारख्या गाडीवर बसलेली मुलगी, समोर तिच्या दोन मैत्रीणी, आणि तिला जवळ जवळ मिठी मारून बाजुला ऊभा असलेला तिचा मित्र. मिठीही अशी मारला होता की जसं काही गाडी आपोआप सुरू होऊन त्या मुलीला घेऊन गेली तर काय घ्या! त्यांचे हास्यविनोद सुरू होतेच, थोड्या वेळात रोमान्सपण सुरू झाला. समोरच्या मैत्रीणींचे खिदळणेपण त्यातलाच एक भाग होता.

माझ्या येरेझाऱ्या सुरू झाल्या. अधेमधे डोळ्याच्या कोपऱ्यातून या चौकडीच्या कलांकडे पण नजर होतीच. फोनवर बोलत बोलत, या टोकापासून त्या टोकापर्यंत फेरी मारायचो. मग पलटी मारताना या चौकडीकडे नजर जायची. परत दुसऱ्या टोकाकडे जायचो. परत पलटी. परत नजर. असला प्रकार करत फोनवर बोलणं सुरू होतं माझं. आधी वाटलं मला की आता हे लोक तसेही गायब होतील, थोडं फार माझ्यामुळं अवघडल्यासारखं वाटेलच ना? या लोकाना माझ्यामुळं ऑकवर्ड वाटेल या कल्पनेनंच मनातल्या मनात मलाही मजा येत होती. कॉलेजमधे कसं मुद्दामहून कबाबमे हड्डी बनून लोकाना त्रास देताना मजा येते तशी. आसुरी आनंदाची मजा! पण कुठचे काय? समोरचे प्रकरण लाजणारं आजिबात नव्हतं. बरोबरच्या दोन मैत्रीणीनी पण या दोघाना नाही लाजवलं तर मी कशाला लाजवेन? मधेच गाडीवरची मुलगी खाली ऊतरली. मुलाने लगबगीने परत दुसऱ्या बाजुला जाऊन तिला हात दिला. "उतर सिंडरेला, तुला पायात सॅंडल देतो की आणि कुठे काय देतो!" अशा अविर्भावात. ती लाजतेय का रडतेय काही कळत नव्हते पण मुलगा तिला कंफर्टेबल करायच्या प्रयत्नात मनापासून दंग होता. ती लाजत नक्कीच नसावी! (उगाच मलापण काहीबाही अपेक्षा!) समोर येरझाऱ्या घालणारा मी अनकंफर्टेबल होतो की नाही होतो याची कोणाला तमा? त्या मुलाला तर मिसुरडंपण फुटलं नसेल. साधारण अकरावी बारावीचीच जनता असावी. पण फुलऑन रस्त्यावर चुम्माचाटी सुरू होती! ईश्कीया बघून आल्या आल्या मला रस्त्यावर लाईव ईश्क वगैरेचा डेमो सुरू होता. थोड्या वेळाने तो मुलगा निघून गेला. दमला असावा किंवा त्या मुलीनच सांगीतलं असावं की आता बास, बाकी उद्या! तिन्ही मुली परत खिदळत पार्किंगकडं आल्या. माझ्याच जरा बाजुला त्यांच्या गाड्या होत्या. त्यावर यांचं बस्तान बसलं. तेवढ्यात दुसरा एक मुलगा त्यांच्यामागून आला, आणि त्यांच्यातल्याच दुसऱ्या मुलीला पकडला. आता यांचा रोमान्स सुरू झाला! आता मलापण बाल्कनीपेक्षा स्टॉलचा अनुभव होता! पहिल्या रांगेत बसून क्रिकेटच्या मॅचची रंगत जास्ती असते म्हणतात. तशी रोमॅंटीक सिनेमाची रंगतपण पहिल्या रांगेतून जास्ती येते हे ज्ञान तेव्हा झालं. आता मगासचा आसूरी आनंद वगैरे सगळं मावळून मलाच तिकडून काढता पाय घ्यायची पाळी आलेली. माझे फोनही सगळे संपले. मी ही निघालो.

पण हा सिनेमाबाहेरचा सिनेमा ऊगाच डोळ्यांच्या कोपऱ्यात अजुन स्पष्ट-अस्पष्ट चालू होताच. ही ११ वी, १२ वीची मुलं, आणि कायच्या काय प्रकार!? आधी मला कळेना, मला राग आलाय की नुसतंच द्वंद्व सुरू आहे. राग वगैरे काही खरच नव्हता, पण काहीतरी आतल्या आत सुरू नक्की होतं. मला नवल (किंवा जेलसी?) कशाचं वाटतय हे मी शोधत होतो. म्हणजे ११ वी १२ वीच्या मुलांनी "हा असला"  प्रकार करावा? की "११ वी १२ वीच्या" मुलांनी हा असला प्रकार करावा? माझा आक्षेप त्या प्रकाराला होता की त्या वयोगटातल्या मुलाना यावर मीच अडखळलो. म्हणजे हे ऊद्या जर माझ्या वयाच्या कोणी केलं तर मी ईतकाच विचार केला असता की विनासायास accept केलं असतं? तसं, माझ्या वयाच्या बऱ्याच जोड्या ठरलेल्या स्पॉटवर हमखास आपली प्रेमप्रकरणं भेळ वाटल्यासारखी दाखवत उभी असतातच. खोटं का बोला? जागाही वेगळ्या सांगायला नकोतच. पण मी कितीवेळा इतकावेळ त्याचा विचार केलाय? म्हणजे ज्या त्या वेळी काहीतरी चेष्टा म्हणा, किंवा काहीतरी तात्विक म्हणा, ज्या ज्या मुडप्रमाणे कमेंट टाकलेच असतील. मतं व्यक्त केलीच असतील. पण विषय तिथल्या तिथेच बंद व्हायचा. असा रेंगाळत नाही रहायचा. आज जरा जास्तीच तरूण जनता दिसल्यानं मलापण जरा अजोबापण चढलं असावं! पण अस्वस्थ नक्कीच झालं होतं. त्याना अनकंफर्टेबल करण्याच्या प्रकारामधे, मीच अनकंफर्टेबल झालेलो.

Out of the numerous things that typically excite or impress teen age, perhaps romance is one of the most easily accessible thing! When we were at that age, perhaps, we always had someone, may it be parents or siblings, accompanying us. They probably were always helping us make sense out of whatever we saw, we experienced. I don't remember as many incidents when I selected what I wanted to watch and what not, this decision was always in safe hands; someone always did that for me. I was not driven by someone. I always had my own freedom to make choices, but I was never left alone to interpret things that I was seeing around me. Someone always had time for me. I think, early independence is something to think about for these kids. फार लवकर त्याना स्वतःच्या स्वतःच्या जग बघायला सोडलय आपण. या सगळ्यात जर कोणी अशा सहज सुलभ प्रलोभनाना बळी गेला तर त्याची काय चुक? बळी वगैरे पडत नाही घ्या कोणी. जे येइल भोगासी, त्यातून काहीतरी बनवत जातातच लोक. पण तरीही.

मी त्याना का दोष देऊ? "समोर जे काही पाहिले ते जर माझ्या वयातल्या कोणी केलं असतं तर मी कदाचीत accept केलंही असतं" या विचाराचं postmortem माझ्या मनात सुरू होतं! कदाचीत कुठेतरी मी आधीच हे accept केलय. आता त्याला वयाचं बंधन घालून कदाचीत मी माझ्याच ईगोचे लाड पुरवतोय. किंवा खरच काहीतरी चुकल्याचं खोलवर सलतय. जे झालं, जे दिसलं, त्याला लाख नावं ठेवून नव्या पिढीच्या नावानं दंगा करणं फार सोपं आहे. त्यामधे मलापण काही सलणार नाही. पण एखादा प्रश्न परत परत बोलून दाखवला म्हणजे सुटत नाही. तो आहे हे मान्य केलं तरीही तो सुटत नाही. त्याला कोण जबाबदार आहे हे हिरीरीनं सिद्ध जरी केलं तरी सुटत नाही! हे सगळे स्वतःला समाधान देणारे सोपे पण एकदम निरर्थक मार्ग आहेत.

कदाचीत माझ्या लहानपणी मी या गोष्टी निषिद्ध म्हणुन पाहिल्या, म्हणुन आज मला त्या चुक वाटत असाव्यात. या मुलानी तशा नाही पाहिल्या. भुमितीमधे "Shift of Origin" ची एक फार सुरेख कल्पना असते. अक्षावरती किंवा रेषेवरती, शुन्याच्या उजवीकडच्या सगळ्या जागा "धन (+)" आणि डावीकडच्या म्हणजे "ऋण (-)". शुन्य म्हणजे ओरीगीन, उगम, केंद्र. त्याच्या जागेवरून ठरणार की बाकी गोष्टींच्या जागा धन की ऋण ते! आता हाच शुन्य जर थोडा डावीकडं हलला, तर मग पुर्वी ऋण (-) असलेल्या जागा आता धन (+) होणार. शुन्याची जागा जशी हलेल, तशा इतर जागांशी निगडीत असलेली चिन्हं बदलतात. यालाच "Shift of Origin" म्हणतात. एकदम सरळ आणि सोपी संकल्पना. आपण लहानपणी जे बघतो ते शुन्य. एकदम निर्विवाद मान्य केलेलं सत्य. तो आपला ओरीगीन, उगम, केंद्र. त्यावरून धन आणि ऋण गोष्टी ठरणार. त्याला चांगल्या आणि वाईट म्हणू. माझ्या पुढची पिढी त्यांच्या लहानपणी जे बघेल ते वेगळे असेल. कदाचीत डावीकडं सरकलं असेल, तर माझ्यासाठी ऋण (-) असलेल्या जागा त्यांच्या साठी आपसूक धन (+) झालेल्या असतील! नाही का?

आता हे "shift of origin" त्यांच्यासाठी कोणी केलं? त्यानी नक्कीच नाही केलं! हे आपणच केलं. पिढ्यानी पिढ्या हा ओरीगीन, हा शुन्य, हलत आलाय. आता तो मुळात कुठं होता कोणालाच माहित नाही. जे आज समाजाला चुक वाटतय, ते उद्या बरोबर वाटेल, परवा परत चुक वाटेल. हे सगळ सरळ करायला मला हा शुन्य उजवीकडं न्यायचाय की डावीकडं मला काहीच माहीत नाहिए. जे आत्ता चांगलं वाटतय, ते सत्य, आणि तेच बरोबर. या एवढ्याच तत्वावर बाकीचं माझं ज्ञान आधारीत आहे. बाकी सगळं मिथ्या! हे बरोबर की चुक? मला नाही माहित. पण हे अस्वस्थ करणारं नक्कीच आहे.

Thursday, March 18, 2010

पावसावर आणखी एक कविता

मागच्या आठवड्यात अचानक संध्याकाळी इथे पुण्यात फार  जोरात पाउस आला. तेव्हा अदिती बरोबर गप्पा मरताना जमुन गेलेल्या काही ओळी (म्हणजे तिनंच जमवलेल्या!).


काय मस्त वाटतं ना? पाऊस भारी असतो अरे
दर सकाळी यावा, तुफान एकदम, वारा सुटून वगैरे

धूळच धूळ सगळीकडे, श्वास कोंडेल असा वारा
दोन मिनिट सुद्धा बाहेर गेलं तर आंघोळ होईल असा

काम सोडून दिसेल तिथून त्याच्याकडे बघत राहावे
गाणी येतात कोणाला! पण उगीचच काहीतरी गुणगुणावे

उगीचच काढून कारण काहीतरी जागेवरून उठायचे
गरम चहा कॉफी आणि गप्पा यातच ऑफीसचे तास संपायचे

जबरदस्त, सॉलिड, जन्नत वगैरे काहीही विशेषणे त्याच्या नावावर खपतात
तंबुस केशरी संध्याकाळीवर त्याचा सडा आणि मग मातीचा वास घेऊन तासचे तास निघतात

Saturday, February 06, 2010

पुढच्यावेळी जरा जपून ...


… and you always feel that you have plenty of time in hand!



मला अजुनही आठवत नाहीए आम्ही काय बोलत होतो. कदाचीत खरच असावं आई म्हणायची तसं. माझं लक्षच नसतं तिच्या बोलण्याकडं. गाडी चालवताना थोडंसं मागं झुकून आई काय बोलते वगैरे प्रकार जरी सुरू असले तरी मधेच वाऱ्यामुळं तिचं ऐकू यायचं बंद व्हायचं. पण मग अंदाजानं आमची गाडी सुरू असायची. म्हणजे असायची तरी. अधे मधे माझं कसं लक्ष नाही बोलण्याकडं याबद्दलही चार शब्द व्हायचे. म्हणजे आईचा एक, आणि माझे सफाईचे तीन! पण खरच माझं लक्ष नसावं! आणि आज सफाई द्यायची संधी पण नव्हती!

विशूच्या घरी जायचं म्हणून निघालेलो आम्ही. भारूमावशीकडून संध्याकाळी सात-आठच्या सुमारास निघतानाची चर्चा लक्षात आहे. येतानाचा जरग नगरकडचा रस्ता खराब आहे म्हणून सुभाष नगरकडून जायचं ठरत होतं. ईतपत लक्षात आहे. आश्याला विशूकडं ये म्हणून सांगून आम्ही निघालो. ऍक्टीवावर ढांग टाकून बसलो. आईनं काहीतरी सीटखालच्या डीक्कीत ठेवलं. माझा नेहमीसारखा सीटवरून ऊठायचा आळस, पण तशीच सीट वर करून काहीतरी ठेवलेलं. पण खरच आठवत नाहीए की काय बोलत होतो. की गप्पच होतो कोण जाणे! पण नेहमीसारखा थोडंसं मागं झुकून आई काय बोलतीये याकडं लक्ष द्यायचा प्रकार सुरू होता. थोडासाच रस्ता पार केला असेल, आणि आमची गाडी लडबडली.

"खटॅक्क्‍ खड्‍" असा आवाज करून गाडीनं जोरात आपली नाखुशी दाखवली. माझ्या हातातलं हँडल एकदम चुंबकाकडं खेचलं जावं असं खाली गेलं! मी काही सावरेन ईतक्यात ते तेवढ्याच स्पीडनं वरही आलं. खांद्याना झटका लागला. "अरे अरे" असं म्हणायचं संपायच्या आत गाडीचा आणि आईचा संबंध तुटला. मी आपण कसे चतूर या नादात कदाचीत स्वतःला संभाळलं. किंवा संभाळायचा प्रयत्न केला. परत एकदा "काय ते खड्डे!", "मी अजुनही कसे बेसावध चालवतो?", किंवा "रस्त्यावरचे लाईट्स", "ट्रॅफिक" अशा असंख्य गोष्टींवर उखडण्याच्या मूडमधे जाण्याच्या आधीच गाडीवर आई नाही हे लक्षात आलेलं. एका क्षणाचे ईतके काही भाग असतात याचा आलेला तो एक भयाण अनुभव होता. गाडीचा ब्रेक कच्चकरून दाबला. दुपारच्या टळटळीत उन्हामधे चालताना जशी कोरड पडते, तशी घशाला कोरड पडलेली. मागे वळलो रस्त्याच्या बाजूला एक बाई पडलेल्या. पालथ्या. चेहराही जमीनीशीच खिळलेला. तेवढंच काय ते दिसलं. बाकीचं तिथं होतं की नव्हतं मला अजुनही आठवत नाहीए. तिच माझी आई होती. गाडी तशीच साईड स्टॅंडवर सोडून मी मागे पळालो. की चालत गेलो? माहीत नाही. पण मागे गेलो. समोर फक्त तिलाच बघत. गाडी सुरूच होती मागे. पहीली अपेक्षा की मी तिच्यापर्यंत ती थोडीशी कण्हत ऊठावी! नंतर वाटलं चेहरा तरी ऊचलावा तिनं मदत मागण्यासाठी. हात, पाय, काहीतरी हलावेत. दुखलं वगैरे असेलच की. शेवटी वाटलं की कमीत कमी वाऱ्यानंतरी हालचाल व्हावी! मी जवळ जात होतो तसा तिचा निश्चलपणा जास्तीच भडक वाटू लागला. काही मोठसं आपल्याला कधीच होणार नाही, असं का कोणास ठाऊक मला बऱ्याचदा वाटायचं. ते तेव्हाही आठवत होतं. पण ती अजीबातच हलत नव्हती! Parents category is always special. They should always be in commanding position. You always want to see them stronger and stronger. Last thing you would expect is to see them helpless. Disable. Someone, you always drive energy from. You don't want them to be so unable. That's perhaps the most uncomfortable moment. Helpless moment. I realized it hard way. I realized it when I was in no position to even acknowledge.

जवळ गेलो, वाटलं, मी ऊचलायचा प्रयत्न केला की तीही ऊठून बसेल. असच बसतात ना फिल्म वगैरे मधेही. तिनं तसलंही काही केलं नाही. डोळे भिरभिरवले ईकडून तिकडे. मी जे ऊचलतोय ते शरीर तिचंच आहे याचं भान तिला नव्हतं. तिच्या शरीरालाही नव्हतं. जसं की आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टींपैकी तीही एक अचल वस्तू बनली होती. केसं चेहऱ्यावर आलेले. भुवयांवर माती लागलेली की खरचटलेलं हे मला कळलं नाही. तिच्या काळ्या पांढऱ्या केसामागे चेहऱ्यावर एक मातीचाही तिसरा रंग आलेला. गालावर काहीतरी खरचटलेलं. थोडंसं रक्तही होतं. त्याचा चौथा रंग. मी बघीतलंही नसेल नीटसं. "आई, आई" असं एक दोनदा बोललो असेन, पण त्यामुळं तिच्या चेहऱ्यावर काहीही फरक पडला नाही. कसं बसं तिला अर्धवट ऊचलू शकलो असेन. अशा प्रसंगी किती जोर लावावा, किंवा किती पोटतिडकीनं जोर लावावा ही दोनही गणितं नविन होती. अर्धवट ऊठवल्यावर माझ्या छातीवर डोकं ठेवलं तिनं. रस्त्यावर आम्ही दोघेच फक्त नाही हे एव्हाना लक्षात आलं माझ्या. थोडी बोहोत गर्दीही चटकन जमलेली. हे जग म्हणजे एक प्रोजेक्ट आहे, आणि हे आपल्याला असाईन झालेलं टास्क आहे, असा काहीसा फिल आला. का कोणास ठाऊक? स्वतःची लाजही वाटली. ते ही का कोणास ठाऊक? देवाचा नेम चुकला कदाचीत. माझ्या ऐवजी त्यानं कमजोर प्लेअर निवडला. काय केला तोच जाणे. पण काहीतरी नवाच डाव मांडलेला.

"आजी पाणी पाहिजे का" वगैरे म्हणत कोणी पुढं आलं. माझी आई, काकू वरून आजी कधी झाली कळालंच नाही मला. वाटलेलं अजुन बराच अवकाश आहे त्याला. कदाचीत मीही एव्हाना मुलावरून प्रौढ वगैरे होणं अपेक्षीत असावं – आजूबाजूच्या माणसांच ऐकत - त्याना वेळ देत. एवढ्यात कोणीतरी पाणी आणलं. आईला पाणी देण्याईतपतच काहीतरी करू शकलो, पण ती पीत होती की नव्हती माहीत नाही. भारू मावशीला फोन केला, "आईचा छोटासा ऍक्सीडेंट झालाय, सुभाष नगरच्या रस्त्यावर, तू येणार काय?" ती आलेच वगैरे काही म्हणाली. "रिक्षात घालू चला" असंही कोणी म्हणालं. "माझी मावशी येईल गाडी घेऊन." या वाक्यावर मी तिथंच बसून होतो. आई अजुन तशीच निश्चल, माझ्या कुशीत होती. एक कारवाला थांबला. म्हणाला, माझी कार आहे, चला चटकन हलवूया. रिक्षापेक्षा हा पर्याय बरा होता. एक दोघानी हात दिला. मी खांद्यातून पकडलं, कोणी हात धरले. कसं बसं ऊभी राहीली आई. आधी मी गाडीत शिरलो, मग आईला आत घातलं. त्या कारवाल्यानं त्याच्या घरच्याना रस्त्यावर ऊभं केलं. आणि आम्ही निघालो. कोणालातरी गाडीची चावी आणायला सांगीतली. भारूमावशीच्या घराजवळ आलोच होतो, तेवढ्यात आई बोलायला लागली.

"काय झालय मला?", "आपण कुठं निघालोय?", "हे कसं झालं?", "माझा डावा खांदा का दुखतोय?", आणि मग परत "काय झालय मला?". सगळी ऊत्तरं दिली. आणि मग परत पुढचा प्रश्न "काय झालय मला?" भारूमावशीच्या घरापर्यंत जाईपर्यंत या सगळ्या प्रश्नांचं किमान दहावेळा पारायण झालं. मी दाहीवेळा ऊत्तरं दिली. या चालू प्रकाराचा निष्कर्ष लावायचं धाडस आणि वेळ दोनही गोष्टी नव्हत्या. पुढच्या तासाभरात, किंवा त्याहून कमीच वेळात, गाडीच्या प्रत्येक पुढच्या स्टॉपवर एक-दोन नातलग वाढत गेले. आधार नर्सिंग होम पर्यंत पोहोचेतो सगळे जमले. तसं वेगळं काहीच झालं नाही. ऊपचारतर सुरूही झाले नव्हते. आईचा त्याच त्याच प्रश्नांचा रतिब सुरूच होता, पुढचे प्रश्न माहीत असल्यानं आमची ऊत्तरंही वेगात सुरू होती. पण आता सगळे घरचे चेहरे परत बघून आपल्याला काही होऊ शकत नाहीचा फिल परत एकदा आला. काहीतरी होईलच.

कोण डॉक्टर, काय टेस्ट, कुठले रिपोर्ट्स अशा बऱ्याच गोष्टीनी आता डोक्याचा ताबा घेतला. ईथवर येताना जेव्हा जेव्हा आईच्या खांद्याला हात लागेल, तेव्हा तेव्हा ती खूप ओरडायची. फार असह्य वेदना व्हायच्या तिला. मला फार वाटत होतं, मला परीस्थीतीचं गांभिर्य अजुनही कळत नाहीए असं का कोणास ठाऊक सारखं वाटत होतं. बऱ्याच गोष्टी जशा आत्तापर्यंत "का कोणास ठाऊक" वर सोडलेल्या, तशी ही पण एक सोडली. ओर्थोचे डॉक्टर येईपर्यंत ३ वेगवेगळ्या डॉक्टरनी तपासण्या सुरू ठेवल्या. आईच्या त्याच त्याच प्रश्नांच्या सरबत्तीला बघून CT Scan करायचंही ठरलं. डावा डोळ्याच्या वरचा भाग बऱ्यापैकी सुजून फुगला होता. आता आणखी सुजला की बघवणार नाही ईतका. पण डॉक्टरनी तो दुसऱ्या दिवशी वाढेल असं सांगून आधीच चेतावनी दिली. खरचटलेल्या जखमा स्वच्छ झालेल्या. X-ray काढून झाले. Fracture होतं. डाव्या खांद्याचा Joint शाबूत होता, पण त्यापसून काही सेंटीमीटरवर Fracture होतं. X-ray मधे दोन तुकडे दिसत होते, त्यांच्यामागे तिसराही असेल, असं डॉक्टरनी सांगीतलं. Admit करायला लागणार हे कळालं. आईचे प्रश्न सुरूच होते. "काय झालय मला?", "आपण कुठं निघालोय?", "हे कसं झालं?", "माझा डावा खांदा का दुखतोय? "मोडलाय?" तिच्या प्रश्नांची शंभरी होत आलेली. पण हे ऐकायला मी एकटा नव्हतो. आता आपली अशी बरीच माणसं होती आजूबाजूला. माझ्या महिनोन्महिने अदृश्य होण्याला "त्याला काम असतं" या कारणाखाली स्वतःच लपवून अविरत प्रेम करणारी. आपण एकटे नाही याची जशी जाणीव झाली त्यापुढं सगळ्या प्रकारात मी नव्हतोच अशी नवी जाणीव व्हायला लागली. कोणी लिफ्ट दिली. कोणी गाडीतून घालून आणलं. कोणी हॉस्पीटल हुडकलं. या सगळ्या प्रकारत मी केवळ ऊपस्थीत होतो पण अलिप्त होतो. कधी कधी आपण स्वतःवर जरा जास्तीच क्रिटीकल होतो, त्यातला प्रकार. पण "तू करतोस, तुला कळत नाही" असं म्हणायला आई आज भानावर नव्हती. कधीतरी "हो बाई, खरय तुझं" असलं काही कधीतरी म्हणायचं राहूनच गेल्यासारखं वाटलं.

एकुणच या सगळ्यामधल्या माझ्या अनुपस्थीच्या फिलींगमधे मला ईन्शुरन्सची आठवण झाली. ती का झाली कोणास ठाऊक? आत सगळा गोतावळा सोडून मी बाहेर आलो. धिरजनं फोनवर प्रोसीजर सांगीतली. अंकितनं ऑफिसमधल्या या संबंधी काम करणाऱ्या माणसाला जोडून दिलं. त्यानं पटकन ईंशुरन्सचा आयडी दिला. एक बाजू सुरक्षीत झाली. मी आत आलो. CT Scan ला कधी जायचं याची वाट बघत बसलो.

अधेमधे ऑपरेशन थिएटरमधे जाऊन डॉक्टरबरोबर प्रश्नोत्तरं झाली. ऑपरेट काहीच करायचं नव्हतं, तरीही ती OT मधेच होती. प्रत्येकवेळी तिच्या डाव्या डोळ्यावरचा भाग अधिकाधिक सुजलेला वाटला. आणि त्या त्या प्रत्येक वेळी ती माझ्यासमोर रस्त्यावर निपचीत पडलेली आठवायची. बिन हलता! आणि मला माझ्याच बेजबाबदारीची जाणिव व्हायची. तरीही मी आत जायचो. तरीही मी तिच्या समोर ऊभा होतो. कारण मी कदाचीत तिथं नव्हतोच. तिच्या जखमा आता ऊठून दिसत होत्या. तिचे तेच तेच प्रश्न आता जास्ती रास्त वाटत होते. मलाही तेच प्रश्न पडत होते. "हे तिलाच का झालं?", "कुठच्या कुठं जात होतो आपण?". तिनं शंभरदा ऐकलेलं पण अजुनही तिला माहितच नव्हतं तिला काय झालय ते. भुवयांच्यामधे नाकावरच्या जखमेवर थोडंसं रक्त होतं. खाली खरचटलेला भाग तपकीरी पडत चाललेला. भंडारा ओढतात कपाळावर तसं तिथेही खरचटलेलं. ओठावर, हनुवटीखाली खरचटलेलं तो भाग आता निळा दिसत होता. मुका मार लागलेला. हाताचे कोपरे, गुडघे, त्यांचीही तिच अवस्था. प्रत्येक जखम आपाअपलं अस्तित्व पाळीपाळीनं दाखवून देत होता. त्यांच्या विरुद्ध पेनकिलर असा लढा आई लढत होती. अशा माझ्या कितीतरी जखमा आजवर तिनं घालवलेल्या. ती म्हणायची "पुढच्यावेळी तरी जरा जपून". तिच्या या वाक्यातला कळवळा हा असा कळावा? ईथे मला हे तिचं वाक्य परत म्हणायचीही संधी नव्हती. तिची थोडीच काही चुक होती? पुढच्यावेळी मलाच जरा जपून वागायचं होतं. पण आज ती सांगायच्या भानावर नव्हती. तिची प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. "काय झालय मला?", "आपण कुठं आहोत?", "हे कसं का झालं?", "माझा डावा खांदा का दुखतोय?", "मला गुडघ्याला का चरचरतय?". CT Scan च्या वेळी ते मशीन बघून क्षणभर भारावून गेली. "असं सिनेमामधे असतं तेच का हे?" हे ही विचारली. विषय नकळत बदलला म्हणून का काय कोण जाणे पण क्षणार्धात झोपली. मशीन सुरू झालं. अंगाई वगैरेसारखा त्याचा आवाज मुळीच नव्हता, पण तिला झोप आली.

पुढे रीपोर्ट नॉर्मल आले. सुज आणि जखमा बऱ्या व्हायची वाट बघणं सुरू झालं. डोक्याला मार लागला म्हणून एक-दोन दिवस थांबून मग सर्जरी करायचं ठरलं. हात लटकवायची वगैरे गरज नव्हती. हातामधे प्लेट्स आणि स्क्रू लावायचं ठरलं. आजच्या शनीवार सकट दोन दिवस जाऊन सोमवारी सर्जरी करायची ठरली. हे दोन दिवस आईने पुर्ण आराम करावा यासाठी मी आणि माझी बहिण तैनात. कुठेही काही खुट्टसाही आवाज होणार नाही याची काळजी घेत. "तू झोप मी जागं राहणार" यावर भांडत. अगदी लहानपणी आई बाबा दुपारी झोपायचे तेव्हा आमची आभ्यासाची वेळ असायची किंवा आमचीही झोपायची वेळ असायची. एकत्र असताना बिना भांडण करता बसणं तसंही कठिण. तेही जमलं तरी हाताचे चाळे बंद असणं आणखी कठिण. "कुचकुच करू नका!" या आईबाबांच्या वाक्यावर आम्ही दोघेही मग शांत बसायचा प्रयत्न करायचो. असंख्य वेळा ओरडून घेतलं असावं या विषयावर. पण ते शांत बसून त्याना झोपू देणं आम्हाला कधीच जमलं नाही. आज ते जमवायची पाळी अशी विचित्र रित्या समोर आली. सर् सर्‍ असे बरेचसे प्रसंग डोळ्यासमोरून सरकत होते. काकूची आजी झालेल्या माझ्या आईला बघून, माझंही मुलाचं माणुस होणं सुरू होतं! I hope.


येत्या सोमवारी सर्जरी झाली की या सगळ्यावर पुर्णविराम लागणार होता. एक विनाकारण सुरू झालेलं पर्व संपणार होतं.

Sunday, January 24, 2010

स्वप्नातला राजा

(नटरंग सिनेमातले काही प्रसंग या पोस्टमधे वापरलेले आहेत. तसे फार काही सिनेमातलं गुपित ऊघडलय असं काही नाहीए, पण तरीही आपली एक सुचना.)

सिनेमा पहिल्या तासाभरातच अशा एका ठिकाणी येतो की, गुणाला जर तमशा टिकवायचा असेल तर नाच्या म्हणून स्वतःच ऊभं रहायची वेळ आलेली असते. त्यानं हे ठरवल्यानंतर एक सीन आहे, एक क्षणभर. तुफान पावसात, राजाच्या वेशामधे दगडावर ऊभा असलेला गुणा. अशक्य कन्विक्शन. नजर थेट समोर, क्षितिजाच्या थोडीशी वर. चेहऱ्यावर तेच राजाचे जबरदस्त भाव. पावसाच्या थेंबांचे असंख्य बाण थेट चेहऱ्यावर आपटून गलीतगात्र होऊन निखळून पडताना. तरीही नजर स्थिर.

कसं होतं ना, बऱ्याचदा कलेपेक्षा कलाकार मोठा होतो. आपल्या ध्येयापेक्षा कधी आपणही मोठे होतो. छोटेमोठे आपलेच नखरे ऍटीट्युड बनून आपल्यालाच कायमचे लटकू लागतात. वाट तिसरीच होते किंवा या लेबल्सच्या वजनानं आपण चालणंच बंद करतो. लेबल्स सांभाळू की चालत राहू. एखादं क्षणिक यश मिळवून देणारं लेबल आपल्याला आख्खं चालणंच विसरायला लावतं. जेव्हा जेव्हा मी कोणालातरी यासगळ्या चक्रावर मात करताना बघतो, मला भलतं भारावून जायला होतं. या सिनेमामधे, सुरुवातीला गुणा कायम राजाच्या पात्राची तालीम करताना दिसतो. राजाचं पात्र त्याच्या अगदी अंगात ऊतरल्यासारखं. पडद्यावर गुणा आला की आता "परदानजी" म्हणूनच आरोळी मारेल ईतपत. पण नंतर त्याचं स्वप्न, तमाशा टीकवायची वेळ आल्यावर त्याला या स्वप्नातल्या राजाची आहुती द्यावी लागते. आपलं स्वप्न तमाशा ऊभा करणं आहे, कला दाखवणं आहे, एक राजा साकार करणं एवढ्यावर सीमित नाही. हे गुढ ऊकलणं फार मोठी गोष्ट आहे. मला खरच असलं काहीतरी बघून फार विलक्षण काहीतरी वाटतं. आणि आदरही.

असं होतं ना बऱ्याचदा (कमीत कमी माझ्याबाबतीत तरी बऱ्याचदा होतं) की "मंजिलसे बेहतर लगने लगे है रास्ते!" आणि चक्क यात काहीच वाटत नाही. Royally given up! असं काहीतरी. कदाचीत बहुतंशी लोक असच करतात, किंवा करताना दिसतात. म्हणून आपलाही Tolerance आपसूकच वाढलेला असतो. आजुबाजूच्या घडणाऱ्या बह्वंशी गोष्टींसारखं काहीतरी केलं की आपण "फार काही" वावगं करत नाहीए आणि म्हणून बरोबर करतोय, ही भावना काय जोर करून बसलेली असते मनात! हे आजुबाजुला बघून अनुकरण आणि तुलना करायची जी आपली सवय आहे ना, कदाचीत सर्वात बेस्ट आणि वर्स्ट आहे! असुन अडचण, नसून खुळांबा!

पण असो. अधे मधे असं काही बघीतलं की मग परत सगळी जळमटं सरकवून परत आपल्याला खरं काय करायचं होतं आणि आपण आत्ता खरच ते करतोय की रस्त्यातल्या कशाच्या प्रेमात पडलोय, ही असली गणितं घालायला होतं.

प्रत्येकाकडं एखादं स्वप्न असतच. त्यात जो तो राजाही असतो. स्वप्नं घडवण्यासाठी राजेपणाला तिलांजली देण्याचा प्रसंग जेव्हा येतो, तेव्हा बरेच मोहरे गळतात. जे टिकतात तेच कदाचीत हिरे बनतात.