Sunday, September 08, 2019

Part 2: ओक्साना, खय्याम, आणि मिन्स्कचं बॉर्डर कंट्रोल ऑफिस

(Day 2, 9:something am)
"दिमित्री मित्रा, अपना साथ एवढाच. निघतो मी आता."
दिमित्रीनं आपला गुगल ट्रान्स्लेटर लावून अर्थ समजून घेतला. मग त्याने रशियन मध्ये उत्तर दिलं जे त्याच्या गुगल ने इंग्रजी मध्ये माला बोलून दाखवलं. "खरंच? इतक्यात?"
ही अशी आमची गमतीशीर चर्चा असणार होती. पण मग अब वो हो न सका. और ये आलम है.
"दे इकडं फोन. टाईप करतो. आता मोठं सांगायचंय...
तुला माहिती आहेच की काय काय ड्रामा सुरूय. आता आलो परत कधी, तर भेटू. किल्ल्या टेबलवर ठेवून जाईन."
तर मग, देऊन घेऊन, एवढंच मिन्स्क आलं वाट्याला... सध्या तरी. ओक्साना, खय्याम, आणि मिन्स्कचं बॉर्डर कंट्रोल ऑफिस.
.
.
.
.
.

(Day 2, 1:something am)
मला खय्याम म्हणाला, "कदाचित मी त्यांना टेररिस्ट वाटलो म्हणून मला थांबवून ठेवलं."
मी म्हणालो, "बाब्बो. मला वाटलेलं की माझ्यावर नजर ठेवायला म्हणून आलेला गार्ड आहेस तू. नंतर समान उचलून आणलास तेव्हा कळलं की तुला पण असच माझ्यासारखं धरलंय."
"तुला का धरलेलं?"
"आवडतं लोकांना. अधून मधून धरत असतात मला."
"मला खूप प्रश्न विचारत होते. तुला काय करत होते?"
"मला परत जा म्हणत होते. मग पाय मोकळे करायला, खाली वर, जरा पळापळ केली. हात झाडले आणि मग दोन तीन पर्याय पडले आकाशातून. म्हणजे, असं मला वाटतंय. आणि तात्पुरता सुटलो मग. आता रात्रीतून आणखी काहीतरी शोधायचं. तू काय केलास?"
"काही नाही. मला सोडलं नंतर असच. पण माझं सोड, तुझी जरा जास्ती screwed up स्टोरी आहे. तू काय करणारेस आता?"
.
.
.
.
.

(Day 1, 10:something pm, in the flight)
"ओक्साना चा अर्थ काय?"
"काय माहित? मला वाटतं की काही अर्थ नाही त्याला. ऐकायला छान वाटतं म्हणून ठेवलं असेल नाव असं"
"इंड्या मध्ये अर्थ बघून नाव ठेवतात. ... ... ..."
"बाब्बो, सोव्हिएट युनियन माहिती आहे न? तेव्हा असलं अर्थ, बिर्थ, जात, धर्म वगैरे काही प्रकार नसायचे प्रकार आमच्याकडे."
"हे माझं out of syllabus आहे. त्यावर आता काय बोलू? आता चाललोय मॉस्को मध्ये. पोचलो तर मग जरा थोडं ज्यादा कळेल. तशी पहिलीच वेळ कम्युनिस्ट देशात जायची."
"कळेल कळेल. कुठं जाणारेस?"
"हं. सध्या सायबेरिया पर्यंतच जाईन म्हणतोय या अमुक अमुक ठिकाणी. अजून कुठे जाऊ का?"
"अरे वा. तिथं तर माझं होम टाऊन आहे."
"मग तू मिन्स्कला काय करत्ये?"
"तसं मी सायबेरियामध्ये पण काहीच करत नाही. आम्ही सगळे सन्फ्रान्सिस्को मध्ये राहतो खूप वर्षं झाली. मिन्स्कला मित्रपरिवार म्हणून थोडे दिवस."
"मला वाटलं, तुला माहिती असेल इथलं. पुढे दोन तीन दिवस कुठं जायचं ते सांगितलं असतंस की."
.
.
.
.
.
.

(Day 1, 11:something pm, बॉर्डर कंट्रोल)
"Impossible आहे. हे नाही करता येणार तुला."
"मी निघण्यापूर्वी विचारलं होतं स्पष्टपणे विमानतळावर. सगळी कागदपत्रं दाखवलेली त्यांना. बाजूला थांबवून तपासून, मग सोडलं त्यांनी. ते कसं?"
"बाब्बो, माझा देश. हा त्याचा नियम. हा त्याचा कागद. हा सूर्य, हा जयद्रथ."
"पण ते ..."
"ते आणि तू. माझं हे असं आहे बघ. मॉस्कोला जायचं नाही. इथ थांब हवं तर. त्या साठी ही अशी नियमावली. थांबा. पाहा. आणि जा. तुझा प्रश्न आहे. मी फक्त माहिती देणार. सोडवायचं काम तुझं."
पुढे पाच मिनिटं त्यानं मला नियम समजावण्यात घालवले. झाली की आता मध्यरात्र. आवाज पण घुमत होता. अख्ख्या लॉबी मध्ये आणखी कोणीच नव्हतं. असली VIP ट्रीटमेंट असतेच की आपल्याला. पण ठीके. फोकस कर भाव. इकडं तिकडं नको बघू. शेवटी आशय असा होता. की तू जे ठरवलायस ते होणार नाही आहे. घरी जा. नाहीतर खूप पैसे खर्च कर. आणि मला त्यातलं काहीच करायचं नव्हतं.
"कोई नई काक्के, मै वापिस आऊंगा."
"आधी नीघ तरी इथून. त्याचं काय करतोस? हा दरवाजा. इधर मिन्स्क. पण तिकडे गेलास तर मॉस्को वगैरे विसर. उधर युरोप. तिकडे गेलास तर काय कुठेपण जा. माझं काही येत नाही. ते तू जाणे, तुझं तिकीट जाणे.
तेरेको इधर जाना है की उधर?"
.
.
.
.
.
.
(Day 1, 10:something pm in the flight)
ओक्साना म्हणाली, "फोन सुरु नाही माझा. सन्फ्रान्सिस्को वालं नेटवर्क चालत नाही इथं."
माझी शिप्पारस सुरूच होती. "चांगलं आहे की. हवाच कशाला फोन?"
"हो. फोन डिटॉक्स. बरोबर. पण तरीही मी एअरपोर्टवर बघणारे मिळतं का वायफाय. पण शक्यता कमीच. मला एकूणच मिन्स्कचं एअरपोर्ट आवडत नाही. चटकन बाहेर पडलं की विषय मिटला."
"शाब्बास. थांबशील थोडा वेळ फोन शिवाय. एवढं काय?"
"तू राहा. माझी काही हरकत नाही. मी बघते माझं मी."
"हो राहीचं. मला नकोच फोन खाली उतरल्यावर."
.
.
.
.
.
.
(Day 2, 2:something am in the Uber)
"भाऊ... all said n done. हे सगळं करायला, आपल्याला हवा फोन. शंभर फोन करायचेत. तुझ्याकडे सिम नाही. माझ्याकडे रोमिंग चालेना. भरवशाच्या म्हशीला टोणगा. जगात सगळीकडे रोमिंग चालतं माझं पण ते खाली स्टार मारून दोन चार देश दिलेले असतात जिथं रोमिंग चालत नाही आणि आपण म्हणतो, इथं कोण जाणारे तडफडायला? तर. त्याच देशात येऊन आता विकेट जाणारे कदाचित! वेलकम टू मिन्स्क!"
"मी ऐकलंय की, मिन्स्क म्हणजे, युरोपमधलं सर्वात स्वच्छ शहर. किंवा टॉप टेन मध्ये तरी आहे म्हणे."
"शाब्बास. आता अंधारात मला फक्त तारे दिसतायत. एकदम स्वच्छ."
"मला तर इथे दहा महिने राहायचंय. व्हेनिस मध्ये सुटसुटीत असतात गोष्टी. मला वाटलं तसंच इथेपण असेल. एअरपोर्ट वर सीम कार्ड मिळेल. मग झालं. पण उद्या होईल काहीतरी. तुझं जरा किचकट आहे."
"हं. असो. करू काहीतरी. अजून दांडी उडालेली नाहीए. जमलं तर भेटू उद्या सकाळी. कॉफी टाकू. बचेंगे तो और भी लडेंगे."
.
.
.
.
.

(Day 3, 2:something am, somewhere in the middle of warsaw)
.
.
.
.
.
चारू उगाच आगाऊ पणे म्हणाली, "तुमच्या दोघांची हेअर स्टाईल केवढी सेम आहे!".
मी: "माझी जराशी वेगळी आहे. नीट बघ. वर लागलंय मला मधोमध. खून भारी मांग आहे.आता पुढच्या वेळी भादरताना प्रॉब्लेम. सुदीपचं नाही आहे तसं."
सुदीप: "ये लडको के प्रोब्लेम्स, तुम क्या जानो चारुलता."
चारू: "चारू नाव आहे माझं."
मी: "सुदीप ला परत काहीतरी आठवलं. परत हसायला लागलाय मधेच."
मी: "वेटर काका. तुमच्याकडे कॅण्डल आहे का?"
वेटर: "वेडा आहेस का?"
मी: "ठीके, की. नाही आहे तर नाही आहे.
चारू: "सुदीप अजून हसतोय. एकटाच."
मी: "तू केक काप."
सुदीप: "Do you guys realise किती रँडम आहे हे सगळं! गेले ३-४ तास आपण कुठूनही कुठेही फिरतोय वॉर्साव मध्ये. चालत, पावसात, स्कुटर वरून, मग उबर काय? तो ड्रायवर काय? मधेच ते डेंजर रेस्टॉरंट काय? आणि आता हा केक."
मी: "नॉट जस्ट येनी केक. जग्गात भारी केक. तोही केवळ चारूसाठी बनलेला."
सुदीप: "Would you have believed 24 hours ago, that 3 strangers like us, who were grappling with their own plans, ज्यांचा आज आटा इथे एकत्र असायचा काहीही संबंध नव्हता, एकत्र तर सोड, एकूणच वॉर्साव मध्येच असायचा स्कोप नव्हता, are now here, singing Happy Birthday, in this god knows what cafe!"
चारू: "मला तर हा बर्थडे नक्की लक्षात राहील."
मी: "ठीके रे. केक खाने के लिए हम कहीभी जा सकते है. Btw, आता परत कसं जायचं? माझं कार्ड ब्लॉक झालंय! तुमचं सुरु आहे न?"
.
.
.
.
.

(Day 3, 1:something am, in warsaw)
"तू वॉर्साव ला काय करतोयस? तिथं कुठून पोचला?"
"अगं. तो आता मोठ्ठा किस्सा आहे. थोडक्यात सांगायचं तर, स्वस्त तिकीट मिळालं म्हणून आलो."
"तुझं पुढचं काय करणारेस? येतोयस न रशिया मध्ये?"
"मी जर मुलगी असतो, तर जरा त्यांनी बेटर ऐकलं असतं माझं. Now I will have to play harder."
"ते सांगूच नको. उग्गाच!"
"ठीके. ठीके. आलो की बोलूच. सांगेन तुला मग. आत्ता तिकडे चांद्रयान, आणि इकडे मी, एकाच वेळी लटकलोय. लिटरली एकाच वेळेला."
.
.
.
.
.

... and as always
पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त.

Part 1: नमनाला घडाभर तेल

I had seen umpteen stories of people who disappeared from radar just like that. Off the daily routine, out on the road, to do whatever they wanted to do or whatever they did not. And I always wondered how the heck does it happen? For someone who always traveled for work, the fundamental questions were unending... like who takes care of money, itinerary, bookings, and of course there are chores ? How? कौन होते है ये लोग? (Remember the opening monologue from RDB? Yes. That one. It started playing inside my head almost every time.) But then you see, social media is not something you take seriously. Do you?


Very soon, I literally started meeting these people! Like in the good old real social world. When I did half marathon, I met someone who traveled the world to participate in marathons. Pick a cause. Pick a run. #simple #मज्जानूलाईफ


The other year, I met someone who downsized the life style. Sold the house. went around the world. Learnt Yoga. Became a teacher.


I wrote to a couple of folks who did intercontinental roadtrip and guess what? They were real too. We ended up talking on phone.


... And the list went on.


And I wondered ऐसा उनमें क्या है जो मुझमे नहीं? Well, I definitely had one thing which they didn't... Questions. And then there was a करके देखो moment. Getting out of the Aristotle era of debating everything, and entering into the era of experimenting.


So there. For whatever it's worth. Stepping out on a solo trip, road trip, hostel trip, public transport trip or whatever you call it.


Follow me for the updates here.


https://www.instagram.com/deshkatha/


बीना followers वाला अकाउंट अच्छा नहीं लगता। When I become a social millionaire, I'd give you a shout-out. पक्का!






Monday, September 02, 2019

क्रमशः

"खूप जोराची लागलीय!" असं म्हणून ती बाहेर पडली. तरातरा चालत ट्रेन स्टेशन वर आली. एक स्टॉप पुढे गेली. पलीकडच्या प्लॅटफॉर्म वर जाऊन उगाच ट्रेन बदलली. आणखी एक स्टॉप गेली. आणि उतरली. पुढचे सगळे जिने चढून उतरून स्टेशनच्या बाहेर आली. रंगीत माणसं हुंगत, जवळचा एक छोटेखानी कॅफे हुडकून, तिथल्या एका खिडकी पाशी बस्ता टाकून बसली. एका मिनिटात उठली आणि काउंटरला जाऊन एक कॅपूचीनो मागवली. तिथल्या बॅरीस्ताने सवईनुसर लॉयल्टी कार्ड घेतेस का म्हणून विचारलं. तिनं ऑफ कोर्स मान हलवली. त्यानं शिक्का बीक्का मारून किती कॉफ्या रिचवल्या की मग एक कॉफी फुकट मिळणार वगैरे गणित सांगितलं. "मी लॉयल होण्यात एक्सपर्ट आहे" असं म्हणत तिनं परत मान हलवली आणि कार्ड उचललं.

सुमारे सहा महिन्यापूर्वी ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये सारुक खान बनून प्रोजेक्ट मधल्या पोराटोरांना काय ऐकवलेलं ते आठवून मग स्वतःशीच हासूनही झालं.

.
.
.

"हवीतच कशाला ही कार्ड इतकी? If you are loyal to everyone, then you are loyal to no one. काय मोठा खजाना जमा होणारे हे दोन चार कॉफ्या फुकट मिळवून? एवढं तिकडं पैसे मिळवायचे आणि इकडे एक एक कॉफीची गणितं मांडायची? सरळ आपापली कॉफी घ्यावी आणि चालते व्हावे. कोणी सांगितलंय उगाच ते कार्ड शोधा, मग त्यावर शिक्का मारून घ्या. आणि तोवर आपल्या मागे उभे असलेल्यांची रांग पंगवा. त्यापेक्षा हे सगळं टाळलं तर किती लोकांचा किती वेळ वाचेल? आणि त्या कॉफीवाल्याला द्यायच्यात आहेत दर नऊ कॉफी विकल्यावर दहावी कॉफी फुकट, तर अशीच दे न म्हणावं समोर येणाऱ्याला! ज्याला अचानक अशी फुकट कॉफी मिळेल त्याला किती छान वाटेल सरप्राइज! येईल की पठ्ठ्या परत परत! वर कागदाची आणि शाईची बचत, ती वेगळी." असं म्हणत सगळी कार्ड कानाकोपऱ्यातून काढून कचऱ्यात स्वाहा केलेली. आणि ऑफ कोर्स, पोरं टोरं पण पांगलेली.
.
.

नंतर काही महिन्यात परत फ्रेश मध्ये कार्ड जमा करणं सुरू पण झालेलं. "अधे मध्ये उगाच हट्टाने क्रांतिकारी व्हायची भूक म्हणजेच बीइंग ह्युमन की!" ते ही असं पान पुसून.
अणि इथे झोपला तोच सारुक!

.
.
.

हे चक्र तिचं सुरू असायचं. आता परत एकदा कार्डांचा साठा त्यांचं अस्तित्व वेगळं जाणवेल इतका मोठा झालेला. तिनं एकदा सगळ्या पसाऱ्याकडे नजर टाकली. यावं कॅफे. त्याव कॅफे. याचं सँडविच. त्याचा बरिटो. कुठे डोनट. कुठे ज्यूस. मग झालच तर किराणा माल. घ्या. प्रत्येकाचं प्रॉमिस. कधीतरी, काहीतरी वस्तू फुकट द्यायचं. आणि ज्यामध्ये तिला काडीमात्रही रस नव्हता. तिच्या लेखी दर कार्डामागे एक वेगळीच गोष्ट फुकट मिळायची. आणि त्याची उत्कट तहान लागली, की ती "जोराची लागलीय" म्हणून असेल तिथून बाहेर पडायची.

तेवढ्यात कॉफी आली. तीही एव्हाना थोडी शांत झालेली. स्टेशनवरचा लाल जॅकेट मधला तिकीट वाला म्हातारा, एकमेकांच्या खोड्या काढणारं कपल, फोन मध्ये घुसलेली मुलगी, गलेलठ्ठ बॅग घेऊन रस्ता चुकलेला मुलगा, टुरिस्ट म्हणून आलेले काका काकू आणि त्यांना अक्कल शिकवणारं त्यांचं शेम्बड नातवंड. या सगळ्यांबरोबर झालेल्या अडीच तीन सेकंदाच्या नजरा नजरेत छोट्या छोट्या गप्पा मारून झालेल्या तिच्या. अभी के लिए वो काफी था. रिचार्ज डन. "कॉफी है... काफी है" असं स्वतःशीच म्हणत तिनं निवांत श्वास घेतला.

आजचं कार्ड आणि त्यावरचा शिक्का म्हणजे हे सगळं. असं पॅक करून तिनं कार्ड आतमध्ये ठेवलं. बाकी परत आहेच की, कॉन्फरन्स रूम. व्हाईट बोर्डिंग. मिनिट्स ऑफ द मिटिंग. क्लायंट. टीम. बॉस. ईमेल. कॅलेंडर इन्व्हाईट. आणि काय नि काय नि काय.

शाळा, कॉलेज, एमबीए, पचवत पचवत, प्रत्येक टप्प्यावर केलेल्या सेलेब्रेशन गणिक, झालेली ही आखीव रेखीव, शिस्तबद्ध प्रगती. या चाकोरीमध्ये अडकवून घेण्यासाठीची अखंड धडपड. आणि मग हीच धडपड जरा अति झाली की अचानक, भरगच्च कॉन्फरन्स मध्ये, किंवा अपने पराये घेऊन थाटलेल्या छोट्या मोठ्या मिटींग्स मध्ये, नेमून दिलेल्या चौकोनी जागेत, किंवा कुठेही, तिला वाटायचं की कोणाशी बोलणंच नाही झालं की य काळात? काहीही संबंध नसणारं, काहीही पॉईंट नसलेलं, कही से - कही को भी - आओ - बेवजह चले - वालं २ सेकंद ते २ तास अशा कुठल्याही मोजमापात बसू शकणारं.

कहा गए वो लोग वगैरे मेलोड्रॅमॅटिक व्हायच्या आधी मग, तेच बोलणं हुडकण्यासाठी मुँह उठाके बाहेर पडते. ही माझी माझी छोटीशी रोडट्रीप. सापडलं मला हवं ते की जाते परत. आणि मिळतं की इथे तिथेच काहीतरी.

.
.

गलेलठ्ठ बॅग घेऊन रस्ता चुकलेला मुलगा आता आपल्या रस्त्यावर जायला परत निघाला. जाताना तिला म्हणाला, "तुला एक सुचवू काय? म्हणजे आता हलकी झालीचेस तू. पण तरीही आपलं उगाच. तुझ्यामुळे फुकट मिळालेल्या कॉफीचं ऋण फेडायला म्हण."
तिनं मान हलवली. "एका अमेझिंग पॉईंटला आपण आटा आहोत. याचा विचका करू नको." हे आपलं मनातल्या मनात.
"तू ऍप वापरू शकतेस की. लॉयल्टी कार्ड गोळा करण्या पेक्षा?"

.
.

परीस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यानं मौका-ए-वरदाद वरून पळ काढला. त्यालाही त्याच्या रोडट्रीप वर जायचं होतं. पुढचा पाडाव. प्राग.