निळाशार गोव्याचा समुद्र,
"आजतरी जमिन काबीज करुच" म्हणुन ऊसळून येणारी प्रत्येक लाट,
आणि मग "येतेच परत" म्हणुन मागे जाणारी तीच लाट,
भीजलेल्या वाळूमधून उघड्या पायाने केलेली पायपीट,
पाण्याचा हवाहवासा वाटणारा गारवा,
मंद वाऱ्याची झुळूक,
अंगावर आलेले शहारे,
आम्ही दोघे,
उगाच सुरू असलेली बडबड,
मधेच फुलणारे हास्याचे फवारे,
निळे आकाश ... सगळा आसमंतच निळा,
या निळाईत निघालेल्या कॉलेजमधल्या आठवणी,
कॉलेजमधली लफडी,
कॉलेजमधली खुन्नस,
कॉलेजमधल्या पैजा,
प्रोफेसर,
जरनल ... काही हरवलेली पाने ... काही जागवलेल्या रात्री,
हॉस्टेल मधले संगीतमंडळ,
बासरीवाला फुल्या, गिटार घेऊन राजा, गायला मात्र सगळाच गाव आणि माझी रूम,
दुपारचे जेवण, मामाचा डब्बा, भरपूर गप्पा आणि माझी रूम,
जेवणानंतरची सुस्ती, २ बेड वर १० जण आणि माझी रूम,
लॉबी मधे cricket, टकाटक बॉल आणि cricket महाकुंभ!
Badminton mix doubles आणि बाजूची तोबा गर्दी, Badminton Men Singles आणि ओसाड कोर्ट!
कॉलेज
कॉलेज
कोवळे कोवळे प्रेम,
घडवलेले प्रेम, उडवलेले प्रेम, बनवलेले प्रेम,
प्रेमाच्या व्याख्या, प्रेमावर debate, प्रेमातील भावना आणि भावना भोसले
रोज डे, चॉकलेट डे, वॅलेंटाईन डे, ट्रॅड डे
गॅदरींग, गाणे, दंगा, कोजागीरीची दारू
कॉमन ऑफ ... पी एल् ...
लॉन ... ६ ची ट्रेन ... बरेच काही
परत एक पायावर पाण्याची झुळूक,
"येईन परत" सांगून जाणारी लाट,
माझ्या हातामधे एकजीव झालेला तिचा हात,
तिचे निखळ हासू,
कधीही आसू न यावे असा गोड चेहरा,
चेहऱ्यावर आलेली एक बट,
कपाळावरून खाली भुवईपर्यंत ...
वाऱ्याबरोबर हेलकावे खाणारी बट आणि "माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही" म्हणणारी ती
परत एक पाण्याची झुळूक...
आमची पहीली भेट,
मनामधले हलकेसे हेलकावे ... अगदी त्या वाऱ्यावर हलणाऱ्या बटी सारखे
एक अगतीकता ...
बरेचसे 'घडवून' आणलेले योगायोग ...
लिहीलेली emails ...
मोठे मोठे chats
उगाच केलेले वाद ...
मधे मधे लुडबुडणारे मित्र
पुर्वीची अर्धवट प्रेम प्रकरणे ...
ती सांगण्याआधीची घालमेल
सांगीतल्यानंतर वाटलेले समाधान
सर्व काही सेट असतानाही ... प्रपोज करताना उडालेली धांदल
उत्तरासाठीची उत्सुकता!
आणि एक झुळूक पायावर ...
परत तेच सांगणारी लाट
सुखावणारा गारवा
तिचे निखळ हासू
काहीतरी करून दाखवायची जिद्द
"तू फक्त बरोबर उभा राहा, बाकी मी बघून घेईन" हे सांगतानाचा तिचा आत्मविश्वास
बघीतलेली स्वप्ने ...
आलेले अनुभव
मधेच निःशब्द संवाद
उगाच क्षितीजावर काहीतरी शोधणारी नजर
एकमेकाच्या अनुभवामधे काही ना काही साम्य शोधणारे आम्ही दोघे
हातामधला हात आणि परत एक झुळूक ... पायावर
18 comments:
rohit...hats off to you...maja ali yaar vachun.....barech divasanni....keep it up...he style pan khup avadali......thoughts reality on off....jasa kharakhara hota tasa....very good...
Mast lihila aahes!! Goa.. niLashar samudra.. aaNi tee sahich!
lai bhari Rohya!!
"bhavna and bhavana bhosale"! he.. he.. :-)
one anecdote.. that plastic ball for lobby cricket was called "takatak" :-)
btw.. is this inspired from a true life incident? :-)
Jhinklayas Bhava! faar bhari !! ekdam sagalya junya athawani jagya zalya!!!
दादा खरंच मस्त लिहिली आहेस.....
NADKHULA......lihinyachi shaili aawadali....sagal dolya samor ubh rahat....college madhe(actually...collegechya BAHER) kiti danga ghatlas te kalal....keep it up!!!
Awesome...jarasa vel lagala vachayala marathit asalyamule...but was worth the every second spent on reading it...keep writing!!
"येईन परत" सांगून जाणारी लाट,
माझ्या हातामधे एकजीव झालेला तिचा हात,
kay sundar jamalay rohitdada...!
ekdum sahi.
खुप सुंदर आहे जीवन
फ़क्त आनंदाने जगायला हवं
विकत मिळत नाही कधीच
म्हणूनच प्रेम करणं शिकायला हवं...
Ekdam Chan lihilays!!! Aawadala!!! Tuza ya aadhicha blogahi chaan hotaa... College che divas athavale... ajunahi college madhech aahe, paN ti aapalya college wali majaa naahi!!
majaa aali vachun...
rohya, u r at your best...BTW you r always at your best..pan mast maja aali vachul, thoda vel 4 varshe mage gelo..too good..hats off
College chi chari varsha dolyasamor ubhi rahili.
Jamalatar "lecture chalu astana paper chya chitorya var kelele chats" add kar ki.
mast ahe re...
as cool as if real to us.....
sure u r doing well with this..
Enjoyed with the gr8 story & drama...
Wonderful Rohya..ekdam Cool..
Keep it up and Wish you all the best..:)
sagala wachala lihilela... khoop oghawata lihitos... lihit raha
majhya lihinyawaril pratikriyanbaddal khoop dhanyawaad.
archana
झकास!
All three stories..very well written, Rohit. Keep it up. Why dont you take up some other subjects too?
Post a Comment