वाटेत आलेल्या सर्व गोष्टींचं काहीना काहीतरी एक लॉजीक असलं पाहिजे. नसेल सापडत तर शोधलं पाहिजे. स्वतःला पटल्याशिवाय काहीच करू नये. पण स्वतःला पटलय तेच बरोबर असही म्हणू नये. हे असले सगळे ठोकताळे तिने एकदम शाळेपासून बांधलेले. मुलींच्यात फारशी ती कधी रमलीच नाही. किंवा तिच्यासारखं विचार करणाऱ्या मुली तिला कधी मिळाल्याच नाहीत. तिला स्वतःचे विचार इतके सोपे, सरळ वाटायचे की त्याचं कोणालातरी विश्लेषण वगैरे करावं किंवा ते कोणालातरी पटवून द्यावेत हे तिच्या ध्यानीही यायचं नाही. समोर दिसणारी प्रत्येक घटना "अहं, असं थोडीच असतं?" म्हणण्यापेक्षा "हं, असंपण असतं तर" अशी बघायची. तिचं कोणाशी कधी काही बिनसलंच नाही. किंवा ती बिनसायच्या गावाला गेलीच नाही. समोरच्याचीपण काहीतरी बाजू असेल, आणि ती काय असेल याची तिला फार चटकन जाण यायची. आपली मुलगी भलतीच समजुतदार म्हणून आईला तर भारी कौतुक. आई लहानपणी तिला कायम सांगे, "तुझी मोठी बहिण आहे न ती? तिला कसं वाटेल याचा विचार नको करायला तू!" हे जरा विलक्षणपणे तुच्यात भिनलेलं. सगळ्यावेळा ती तू असाच विचार करत बसे. कदाचीत म्हणून तिला कधी कोणाला समजून घ्यायला जड गेलेच नाही. आईला भरून यायचं तिचा समजुतदारपणा बघून. पण मुलगी स्वतःच्या विचारांची जरा जास्तीच पक्की आहे हे नंतर जाणवू लागल्यानंतर उगाच तात्विक खटके उडायचे. "मुलींनी असंच करायचं असतं" किंवा "मुली असंच करतात" म्हणून तिनं पण काही काही करावं (किंवा नाही करावं) ही आईचं मतं तिला कधीच पटायचं नाही. काहीही लादलं की ते चांगलं असो किंवा वाईट, तिच्यातला रीबेल जागा व्हायचा. आणि मग प्रचंड हेका - ते न करण्याचा! गोष्टी सापेक्ष असतात. आणि हे ज्याना पटत नाही त्यांच्याशी तीचं कधीच फारसं पटलं नाही. एखाद्याला चांगली किंवा वाईट वाटलेली गोष्ट तिला वेगळी वाटूच शकते, या मताची ती. त्याच्या उलटही सत्य होतं. तिला आवडणाऱ्या किंवा नावडणाऱ्या ईतराना आवडाव्यात यावरही तिचा आग्रह नसे. या अशा सगळ्या प्रकारामुळं तिच्या मैत्रीणी कमी होत्या, आणि मित्र जास्ती. किंवा असं म्हणू, की तिच्या मैत्रिणींना तिच्या वागण्याला whimsicality वगैरे लेबलं लावण्यात जास्ती ईंटरेस्ट होता पण मित्रांमधे कधीच कोणाला अशा लेबलांची गरज पडली नाही. "मी काय टिप्पीकल मुलगी नाहीए" असं ठसक्यात आणि अभिमानानं सांगणाऱ्यांतलीही ती नव्हती. आपलं वेगळेपण तिला माहित होतं आणि ती ते जपून होती. मुलांच्यात तिला कोणी प्रश्न नाही केले, किंवा अमुक अमुकच कर वगैरे तत्वं पण ऐकावी लागली नाहीत. मित्रांच्या कोंडाळ्यात बऱ्याचदा ती एकटीच मुलगी असल्यानं तिचं बऱ्याचदा ऐकलंही जायचं. हे सर्व काहीही असलं तरी बाकीच्या असंख्य मुलींसारखी आपल्या आईबाबांच्या फार जवळ होती. एकदम पारदर्शी. अगदी सग्गळंच्या सग्गळं सांगायची. ते घरी पटलं जरी नाही तरी कोणी घरातून तिच्यावर बंधनं नव्हती. तात्विक खटके वगैरे वेगळी बात पण त्यांचा अतिरेक कधीच झाला नाही.
रिया. तिला कधी काय ट्राय करावंसं वाटेल हे कधीच कोणाला झेपलं नाही. मग ते खाणं पिणं असो, काही अयुष्यातले डिसिजन असो किंवा कपडे वपडे असो. एकदम डगळा ग्रे कलरचा टी शर्ट, आणि ब्लॅक कलरची ट्राउजर. कानात हेडफोन्स, आणि दंडाला स्ट्राईपमधे बांधलेला आयपॉड. अशा प्रकारचे तिच्याकडे कमीतकमी ७-८ सेट असावेत असा सगळ्यांचा संशय. कोणी उगाच ह्याव घाल किंवा त्याव मेक अप कर म्हणंलं की तू चिडून असंलं काहीतरी घालून यायची. मग ते ट्रेकींग असो, किंवा कोणाला भेटायचं असो. ती तशी त्यातही सुरेख दिसायचीच. पण कदाचीत ते तिच्या लाईवली वागण्या, बोलण्यामुळं असेल. तिचं आजूबाजूला असणं कधीच लपून राहिलं नाही. १० मिटरच्या परिघामधे ती आहे, तर तिच्याकडं दुर्लक्ष करणं कोणालाही अशक्य. मग ते त्या डगळ्या टी शर्ट मधे का असेना? हिच रिया बऱ्याचदा चकितही करायची. गडद पिंक कलरचा गळ्यापाशी चुण्या असलेला वी शेपचा सिल्की टॉप, खांद्यापर्यंत पोचता पोचता राहिलेले सिल्वर कलरचे थोडेसे लांबसे पण तिच्या उभट शेहऱ्याला शोभणारे कानातले. वर रे बॅनचा ब्राऊन शेडचा गॉगल किंवा नाहीतर डोळ्यात हलकंसं काजळ. केस खांद्यावरून नदीसारखे वळून पुढे आलेले. तेही असे की त्यामुळं ना तिचे कानतले दडायचे ना डाव्या गालावरची खळी. डाव्या हाता स्पोर्ट्स लूक वालं, मोठ्या पण फॅंसी डायलचं घड्याळ. उजव्या हाता एक किंवा जास्तीत जास्ती २ कडी. खाली काळा स्कर्ट, आणि हाय हिल्स. आणि स्कर्ट असेल तरच दिसणारे डाव्या पायावर तळाकडच्या बाजूला केलेला सुर्याच्या चित्राचा काळा गडद टॅटू. रिया एक संपुर्ण पॅकेज होती. काहीनी तिला व्हिमजिकल म्हणलं, काहीनी मुडी, काहीनी बेब तर काहीना असलं काही लेबल लावायची कधीच गरज वाटली नाही. रिया त्यांच्यात विरघळून जायची. या शेवटच्या कॅटेगरीतल्या लोकांच्यात ती सहसा फार रमे.
---------------------------------------------------------------------------------------
त्याची गणितं फार सोपी होती. टेढं मेढं आयुष्य असलं की गणितं आपोआप सोपी होतात. घरातल्या भावंडांपैकी हा सर्वात शांत. कोणाच्या ना अध्यात ना मध्यात. पण आई वडिलांच्या तू तू मै मै नं वीटलेला. घरच्या एकुणच भाईबंदकीनं वीटलेला. कसा काय शाळेमधे वगैरे नंबरात आला हे घरच्यानापण कोडं. एकदम शिंपल्यामधे रहाणारा जरी असला, तरी कधी एकदा घराबाहेर पडतो याची घाई असलेला. त्याच्या घराबद्दल, त्याच्या गावाबद्दल, त्याच्या माणसांबद्दल कधी फारसं आकर्षण त्याला कधीच नव्हतं. तसा द्वेषही नव्हता. पण एकुणच स्वतःच असं आयुष्य घडवण्याचा किडा फार लहानपणापासूनचा. घरच्या कटकटीमुळं असो किंवा कशामुळंही, पण त्याला बाहेर पडायची विलक्षण ओढ. कॉलेजसाठी म्हणून जेव्हा गाव सोडायची पाळी आली तेव्हा त्यालाही पंख फुटायला सुरू झाले. आता आई बाबांची झिगझिग नाही. भावंडांशी तुलना नाही. आरडा ओरडा नाही. मुलगा कुठल्यातरी चांगल्या कॉलेजात शिकतो आणि त्याला कशाची ददात नाहीये, हे घरच्यांसाठी पुरे होतं. घरच्यानी याहून जास्ती त्यात पडू नये हे त्यालाही हवं होतं. सगळी कामं आपल्याआपण चुपचाप करायची सवय लहानपणापासूनच. त्यामुळं हळू हळू त्याच्या कामात कोणी नाक खुपसलेलं त्याला कमी जमायचं. त्याची सगळी स्वतः बनवलेली तत्वज्ञानं. स्वतःला खपतील तशी. काही चुकलं, दुखलं, की तो एकटाच बसून राही. मग स्वतःचीच काहीतरी थेअरी बनवे की जी थेअरी त्याला परत नॉर्मलला आणे. ज्याना कोणाला याच्या थेअऱ्या मान्य नसायच्या, ते सगळे याच्या लेखी हिप्पोक्राईट होते. कॉलेजमधे हवी तितकी ऐश केली. काही करायचे की नाही वगैरे असले विचार त्याच्या मनात कधीच आले नाहीत. जे जे मनात कधी न कधी आलेलं ते ते सर्व करून घेतलं. बाईक्स फिरवणं सुरू झालं. डिस्क, ड्रिंक्स वगैरे सर्वांवर हात मारून झाला. त्याला व्यसन कधीच कशाचं नव्हतं. पण साधू संतांसारखा अलिप्त तो मुळिच नाही राहिला. बिचकत बिचकत डेटींगही सुरू झालं. पण त्याच्या असल्या मुडीपणाला सांभाळेल अशी मुलगी कुठे कोण भेटेल. आणि यालाही ते नखरे सांभाळणं कधी जमलं नाही. बघता बघता कॉलेज संपलं. जॉब सुरू झाला. नोकरी बरोबर शेवटी छोकरीही मिळाली. तसंही रीलेशनशीप्स बद्दल कुतुहल असतच. यानी ठरवून पाय घसरवला. पुढे त्यावरही थेअरी केली - "मी उघडपणे तरी करतोय, उगाच वर वर फिलॉसॉफ्या मांडून लपून छपून तरी कोणावर मरत नाही! हिप्पोक्राईट साला, मला सांगतोय!? Idealism is bull shit!". काही दिवसात फेसबूक, ऑर्कूटवर कमिटेड स्टेटस झळकला. "You look great together", "Cute Couple", "Made for each other" असल्या कमेंट्सचा भडीमार सुरू झाला. छोकरी पुढे गेली ऑस्ट्रेलिया. फोनवरचं प्रेम ते! किती काळ टिकणार? शेवटी त्यानं सांगून टाकला की बाई आपलं तसंही आता बरचसं आयुष्य वेगळं झालय. मी काय ऑस्ट्रेलियाला येणार नाही आणि तुही भारतामधे येशिल असं काही नाही. उगाच काय अडकायचं. लव आज कल सारखं, किस्सा बंद केला. "We had a steady relationship but then we mutually broke up. No hard feelings". अशा लेबलनं सही सलामत त्यातून बाहेर. थोडंफार वाईट काय ते वाटलं. ईतक्या वर्षाचं नातं. पण आयुष्याला एकदा का वेग आला की असल्या तात्पुरत्या भावनांना वेळ नसतो. एक मुलगी गेली पुढची तयार. त्याची पर्सनॅलीटी तशीही जबरदस्त. दिसायला नेटका, ब्रॅंडेड जॅकेटस, शर्टस, ट्राउसर्स. स्वतः कमवायचा, स्वतः ऊडवायचा. त्यात बारा गावचं पाणी पिलेला. आदर्श वगैरे जरी नसला तरी फारसं वावगे आणि विचित्र विचार नसलेला. कोणीही सहज ईंप्रेस होईल असा. नाही म्हणता म्हणता असेच ३-४ अफ़ेअर्स खटा खट झाले. एकदा मोठ्या भावाने प्रेमाने भेटून सांगीतले की बाबा रिलेशन म्हणजे काय चिरमुरे फुटाणे आहे का? थोडं चित्त थाऱ्यावर ठेवा. कधी ही तर कधी ती! हे काय जगणं का काय? घरच्यांशी नाही पण त्याच्या मोठ्या भावाला याच्या बऱ्याच करतूता माहीत होत्या. दोघांच्या पहिल्या गर्ल फ्रेंडचं नाव वैष्णवी. कायच्या काय मजा यायची त्याला बोलताना "तुझीवाली नाही रे माझीवाली वैष्णवी". फरक एवढाच मोठ्या भावानं त्याच्यावाल्या वैष्णवीशी लग्न केलं. यांचा mutual agreement वाला ब्रेक अप झाला. तसंही उपदेशांचा कोटा आणि सिजन असायचा. तो संपल्यावर भाऊही खुश आणि हाही खुश. आयुष्याला आलेल्या वेगाची त्याला झिंग चढलेली. झालेल्या प्रत्येक गोष्टी तशाच घडण्यामागं काहीतरी कारण होतं आणि आपण तेव्हा जे वागलो ते बरोबरच वागलो अशा स्वरुपाची तत्वं तो जाता जाता तयार करून स्वतःच्याच मनाला गप करायचा. नव नवं काम, नव नवे लोक यांच्या गर्दीत इतका रमून गेलेला की कधी २ घटका बसून आपण काय करतोय, कुठं जातोय याचा विचार बिचार कधीच नाही करायचा. झपाझप कामातही वर चढत गेला. हळहळत बसणे वगैरे कधीच केलं नाही. प्रत्येक वेळी त्याच्याकडे आणखी दहा गोष्टी तयार असायच्या करण्यासाठी. एक नाही झाली तर पुढची.
स्वानंद या नावाचे बरेच चाहते, तर बरेच द्वेष्टे तयार झालेले. त्याला त्याचं काहीही नव्हतं. आयुष्य असंच जगायचं असतं यावर त्याचं आजिबात दुमत नव्हतं. आणि ज्यांचं होतं ते त्याच्यासाठी हिप्पोक्राईट होते! काळ लोटत गेला, हळू हळू सगळे आजूबाजूचे त्याचे मित्र मैत्रीणी लग्नं वगैरे करून आपापल्या व्यापात अडकू लागले. आता काहीही प्लान केला की सगळे पुर्वी सारखेच एक्साईट व्हायचे पण मग थोड्या वेळानं कन्फर्म करतो असं सांगून तासानी फोन करायचे की अरे ते अमुक अमुक काम आलय रे, यावेळी जमणार नाही. स्वानंदलाही कल्पना यायचीत की घरी जाऊन बायकोची परवानगी नाही मिळाली म्हणून डिच मारतोय साला. जॉबच्या लगेचचे २-४ वर्षात जी काय घनीष्ट मैत्री झालेली लोकांबरोबर, जे काही प्रकार केलेले, त्यापुढं त्यानंतरच सगळंच फिकं होतं. थोडंफार एकटं पडणं सुरू झालेलं. पण ते उघडपणे मान्य करेल तर तो स्वानंद कसला. त्याच्या थेअऱ्या तोकड्या पडत चाललेल्या, पण काहीतरी नक्कीच नवा एपीसोड सुरू होईल याची खात्री होती त्याला. असंच एकदा अनपेक्षीतरित्या मित्राच्या सीसीडीतल्या पार्टीमधे एका एकदम अनईंटरेस्टींग कपड्यातल्या पण अशक्य active, आणि impossible to ignore अशा मुलीची गाठ पडली. एकमेकाची खेचताना म्हणा, किंवा एकमेकाला टोमणे मरताना म्हणा, दोघानीपण तमाम जनतेला सही एंटरटेन केलं. डगळ्या टी शर्टमधल्या रियाची आणि स्मार्ट, हॅंडसम स्वानंदची ती पहिली भेट.
13 comments:
छान लिहिले आहेस, सहिच !!!
नेक्ष्ट भाग लवकर पायजेल. वाचक उच्चुकाय. शरू श्रीधर अनि परागचीपण पुढची ष्टोरी तुमी लिवा. आनून देतो आतापर्यंतचे भाग.
धन्यवाद अभिजीत.
हृषिकेश, शरु, श्रीधर आणि पराग नेहमी आठवतात मनोहरमधे जेवताना. तिथेच तू संपवलेलीस त्यांची श्टोरी! विसरलास की पार्ट २ सुरू केलायस?
what happens next?
hey mast aahe...pan pudha ajun kay tyachi uchukata aahe..te kadhi lihinar ..
फारच सुंदर लिहिले आहेस.
रवी विश्वासराव
dusara bhag vachanyachi vachakanchi "URGENCY" lekhakane krupaya lakshat ghyavi.....
dusara bhag vachanyachi vachakanchi "URGENCY" lekhakane krupaya lakshat ghyavi.....
Flow mast. Pudhacha bhag yeu de lavkar. Yavar natak lihayla maja yeil :P
Gr8 stuff bosses, you rock! gr8 characters. Jaldi se agla part bhi likho!
raju, khartar lekhakch whayacha tu mast. shabdancha sacchepana janvatoy.
पुढचा भाग कधी येणारे अरे? परदेशातुन आणतोय्स का?
ही characters मस्त तयार झाल्येत.. स्वानंद तर लई आवडला.. रिया जराशी टिपीकल वाटली, पण मग आता त्यामुळे पुढे मज्जा यायली हवी दोघांची.. लिही पटापटा
Post a Comment