Thursday, August 28, 2014

#FavoriteBappa



आता उद्या आपल्या घरी गणपतीयेणार. पुढचे सातचे सात दिवस आपण त्यांना सुंदर दिमाखात ठेवणार. पण हे सात दिवस सरल्यावर अपली खरी जबाबदारी वाढेल. असं नाही वाटत तुम्हाला? घरचा पाहुणा मग आपल्या अख्ख्या गावाचा पाहुणाहोणार. घरी असताना मान राखला, पण आता घराबाहेर असताना किती मान राखला जातो यासाठी आपण काहीतरी करू शकू का?

मलाआठवतंय मागच्या वर्षी मी हे असं TooBusyToDoGood लिहिलेलं. आत्ता काहीच दिवसपूर्वी जन्माष्टमी नंतर लोकांचे पोस्ट वाचताना मला परत त्याचीच आठवण झाली. पण आता दरवेळी एवढंच बोलण्यापेक्षा यावेळी जरा वेगळं करायचं का?

बाहेर जाऊ, आणि आपल्यातलेच कोणी हरहुन्नरी कसे कसे उत्सव साजरा करतायत याबद्दल लिहायचं का? म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, नकळत त्रागा करताना आपण जे नावडते आहे त्याला जास्ती भाव देत आलोय. की अमुक अमुक मुळे त्रास होतो. तमुक तमुक चूक आहे. अशामुळे गैरसोय झाली. तशामुळे ट्राफिक गंडलं! पण कुठेतरी कोणीतरी काहीतरी उल्लेखनीय करत असेलच की! यंदा आपण त्यांनाभाव दिला तर? अगदी भरभरून. त्यांना प्रोत्साहन दिलं तर? त्यांच्याबद्दल माहिती शेअर करू.

असा हा थोडासा बदल आपण आपल्या वागण्या बोलण्यात करून बघू! म्हणजे “पुढच्या वर्षी लवकर या” असं गणपतीला सांगताना आपल्यालाही पावशेर जोश जास्ती चढेल. म्हणजे असं म्हणता येईल, की बाप्पा बघ, यावेळी हे असं असं सुद्धा घडलं, पुढच्या वेळी ये, अजून काहीतरी करून दाखवू!

तेव्हा आपल्याला आढळलेल्या कोणव्यक्तीने, मंडळाने, कुटुंबाने, साजरा केलेल्या उल्लेखनीय गणेशोत्सवाबद्दल इथंलिहूया. नेहमीची लफडी होतातच पण त्यांना फाटा देऊन कोणीतरी काहीतरी बदल करायचाप्रयत्न करत असेल (आणि मला खत्री आहे, असं खूप लोक असतील), त्यांच्याबद्दल एकमेकाला सांगू. शेवटी कसंय, आपल्या लाडक्या सणाच्या दिवशी कोणाची गैरसोय होत असेल, तर तेही चांगले नाहीच न! कदाचित आपण चांगल्याचा प्रचार न करणं हेही त्यामागचं कारण असूच शकतं की! कदाचित आपण चांगल्या गोष्टीना जास्ती भाव दिला तर हळू हळू गैरसोयीचा भाग कमी होईल.

तर मग करायचं असं? जर इथं शेअर केलात तर ठीकच. आपण सगळेच वाचू आणि कौतुक करू. आपापल्या फेसबुकवर केलात तर हा #FavoriteBappa सहित करा. बघू पुढच्या दोन आठवड्यात आपल्याला काय काय सापडतं! ते सगळं मग आपल्याकडून गणपतीला souvenir असं म्हणू!


आपल्या सर्वांचे अनुभव वाचण्यास उत्सुक,
एक तुमच्या सारखाच भक्त


ता.क. खरं सांगायचं तर मला इथं चांगलं म्हणजे कसं याची काही उदाहरणं द्यायची होती. पण खास नाही सुचली. पण कदाचित पुढच्या वर्षी हाताशी खूप उदाहरणं असतील. अशी अशा नक्कीच आहे.


(Photo credit: Sayali)

No comments: