Monday, March 02, 2015

What The Duck!

आपल्या आपल्या perspective ची गोष्ट आहे.
एक वॉरफिल्म बघून बाहेर आलो आत्ता. संपता संपता जरा डोकं जडच झालं. आता ज्यांना आवाडत असेल वॉरफिल्म त्यांच्यासाठी खूपच सही बनवला होता सिनेमा. आता जे खरंय तेच तर दाखवलेला. कोणी का तक्रार करा? पण आपल्याला जरा जड गेलाच किस्सा सगळा. आपल्यासाठी नाही ब्वा युद्ध मारामाऱ्या वगैरे असं वाटत असतानाच, कारण नसताना दिमाग जरा tangent मध्ये गेला.

आपल्या लहानपणीचा एक शो आठवला. एकदम उलट effect होता पण त्याचा.
अभ्यास करावा. बाहेर खेळ खेळावे. ते सोडून टीवीला काय चिकटून बसलाय? वगैरे सगळ्या प्रकारचं रागावणं खाऊनही मी तो शो बघायचो. त्यामध्ये असायचा पण खूप सारा दंगा! खूप सारे पैसे, मग त्या मागे चोर उचक्के, मग पळापळी, धडपड, एकमेकावर कुरघोडी, मग मधेच कधी कधी काला जादू, भूतं, आणि पुराणातली रहस्यं वगैरे! आणि कधी कधी एकदम सायन्स, gadgets, आणि रोबॉट वगैरे!

तेव्हा त्या शो मध्ये आवडायचं ब्वा आपल्याला हे सगळं. कसं का असेना? डोकं बिकं जड बीड नाही व्हायचं. आणि तेव्हाच का? आत्ता पण.

आता म्हणाल तर हा सगळा गोंधळ. नाही तर काहीच नव्हतं.
एकदम सोपा, सरळ, आणि सहज शो वाटायचा.
त्यातले सगळे लोक आपलेच असायचे.
म्हणजे शहाणे वाले पण! आणि वेडे वाले पण.
आपल्याला दोघांचं पण कौतुक.
ह्ये मोठमोठाले प्रश्न असायचे कधी कधी त्यात. म्हणजे आता जगाचं काय होणार वगैरे. अशा लेवलचेही.
आणि मग चला बाजारातून चार काकड्या आणतो अशा सहजतेने ते सोडवले पण जायचे.
आणि ते सगळं चालायचं आपल्याला.
सोपंच तर असायचं असतं की सगळ्यांनी.
माणसांनी आणि प्रश्नांनी. दोघांनीही.

असो.

सांगायचा मुद्दा काय. तर आपल्याला लयी आवडायचा हा असला शो. आणि आत्ता असंच वाचता वाचता असं वाचलं की हा आपला असा शो आता परत येणारे म्हणे. २०१७ मध्ये. माणसं कामाला लागल्येत कसून!

http://blogs.disney.com/oh-my-disney/2015/02/25/this-is-not-a-drill-were-getting-new-ducktales-in-2017/

आणि आता मला अचानक त्या वॉरफिल्मच आणि एकूणच सगळंच एकदम फ्रेश वाटायला लागलंय!

कारण विचाराल तर ... सोप्पंय...

जिंदगी तुफानी है ... जहा है ... डकबर्ग!
गडिया लेजर हवाई जहाज... ये है .........

No comments: