Saturday, August 20, 2016

पॉर्न खाये सैय्या हमारो

पॉर्न या विषयावरती कोणाला सखोल चर्चा करायची आहे का? लगेच "वर ती" आणि "खोल" यांच्याकडे लक्ष देऊ नका. "चर्चा" हा मुद्दा आहे.
आमच्याकडे आत्ता रिसेन्टली झालेली आहे अशी चर्चा. आणि त्याचे हे मिनिट्स ऑफ द मिटींग. जनहितार्थ प्रस्तुत.
(अशा रोकठोक मतांसाठी समाज अजूनही तयार नसल्याने मिटिंगमधल्या सर्व सहभाग्यांनी आपापली नावं गुप्त ठेवून भूमिगत राहणं पसंत केलेलं आहे. आणि मला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर नाहीए)


पॉर्न हा उगाचच अस्पृश्य बनवलेला विषय आहे! आमिरखानला तुषार कपूर म्हणाल्यासारखं आहे. मी म्हणतो जर अवघे विश्वची माझं घर असेल तर या घराची संस्कृती म्हणजे पॉर्न! पण व्यथा अशी की, जरी पॉर्नचं ध्रुव ताऱ्यासारखं अढळ स्थान असलं तरी नशिबी प्रेम नाही. तुमच्या सिनेमाला शंभर वर्षं झाल्यावर इतका प्रेक्षकवर्ग मिळाला. तेही जिवाच्या आकांतानं मार्केटिंग करून. आत्ताकुठं खंडीभर लोकं फिल्म बनवायला लागलेत. पण पॉर्नमध्ये हे कधीपासून सुरु आहे. (हे म्हणजे भारताला शून्य लय आधीपासून माहिती होता अशा टेचात सांगता येण्यासारखं आहे). वर जगभर प्रसिद्धी. वर पायरसी फ्रेंडली. कोणी निंदा कोणी वंदा. शंका असेल तर आज इंटरनेटवर सर्वात पॉप्युलर काय आहे पहा. पॉर्न. इंटरनेट सुरूच आहे पॉर्न मुळं. पॉर्न हा सिनेमाचा जॉनर वगैरे नाही. There is only one iPod. Rest are mp3 players. असं आहे ते.केवढं अफाट साहित्य तयार करून ठेवलंय लोकांनी!! त्याला काही परिसीमाच नाही. एवढं निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या या विषयाला अशी सावत्र वागणूक का? हेच बघा की. तमाम चाहत्यांना खुले आम आपल्याबद्दल बोलता येत नाहीये. गणपती, दही हंडीला चीफ गेस्ट म्हणून बोलावता येत नाहीये. ही चाहत्यांची कुचंबणा ओळखून सनी लिओनिनं चक्क पॉर्न सोडालं. आणि आता तिची सांस्कृतिक गाणी घेऊन आपण आपल्या पोरी बाळींना नाचावतो. हे असंय सगळं. पॉर्न आर्टिस्टमध्ये त्यागाची भावना असते. देऊन टाकायची भावना असते. (देगी क्या? या प्रश्नाचा उगम इथेच झाला असावा).


आपल्याला लाँचबॉक्ससारखी लव स्टोरी, थ्री इडियट सारखी कॉमेडी किंवा बाजीराव मस्तानी हे सुद्धा आवडतंच की! पण खूप शोधावं लागतं यार त्यासाठी. वाट बघावी लागते. त्याच्यासाठी आधी दहा प्रेम अगन आणि आप के सुरुर बघावे लागतात!! या शोषणाचं काय? पॉर्नचं तसं नाही. हवं असलं की लगेच. त्यामध्ये दर्जा बिर्जा असला भेदभाव नसतोच. ५ सेकंदात सापडतं. Instant Results! पॉर्नसारखं प्रगल्भ आणखी काहीच नाही. एकदम close to roots! आणि to the point. फाफट पसारा लावणं हे काम तुमच्या ताकाचं भांडं लापावणाऱ्यांचं. कहानी की डिमांड वगैरे भानगडी नसतातच पॉर्न मध्ये. कहानीच पूर्ण अशी असते. या परदर्शीतेमुळेच कदाचित आज पॉर्न टिकून आहे.


जनतेसाठी परत ऑप्शन केवढे? जी हवी ती गोष्ट. जो हवा तो प्रकार. जी हवी जागा, देश प्रदेश. सगळं सापडतं. लग्गेच. एवढा वेल सॉर्टड डाटाबेस उपलब्ध असणं म्हणजे चेष्टा नाही!! म्हणून तर हीच आपली संस्कृती. इंड्यानं कामसूत्र लिहून काय दिवे लावले? घंटा!! पॉर्ननं ते घरोघरी पोचवलं. इलेक्ट्रिसिटी शोधली म्हणून सांगू नका. ज्यानं दिवे लावले तोच खरा! पॉर्नला रंग नाही. जात नाही. सीमा नाहीत. आकार नाही. तरी सर्वत्र आहे. हॉस्टेलच्या शेअर्ड हार्ड डिस्क पहाल तर त्यामध्ये मराठी आणि गुजराती पॉर्न पण सापडेल. तेही विंडोजच्या सिस्टीम फोल्डर मध्ये! म्हणजे इतकं कानाकोपऱ्यात पोचलंय पॉर्न. सर्वाना समजेल असं. समजेल अशा पद्धतीत. प्रत्येकानं आपापल्या परीनं त्यातून आपापल्यासाठी स्ट्रेच गोल्स निवडावे असं. समजा आजच्या आज सगळी मनुष्य जात नष्ट झाली तर भविष्यात उत्खाननामध्ये लोकांना जे काही मुबलक सापडेल ते पॉर्न असेल!


आणि या पॉर्नच्या बीभत्स विळख्या मध्ये आपल्या पुढच्या पिढीला अडकू द्यायचं नसेल तर शालेय अभ्यासक्रमात रीतसर सेक्स एजुकेशनचा समावेश झाला पाहिजे. म्हणजे मग आंब्याला आंबा आणि गजाराला गाजर म्हणायला शिकतील मुलं.


(हे आपलं उगाच शेवटी सामाजिक संदेश म्हणून. आमच्यातल्या एकाला वाटलं की पॉर्न सारखं हेही कोणीतरी बॅन केलं तर... म्हणून)