Thursday, May 03, 2007

पाच उत्तरे ... न मिळालेली

कथेचा पुर्वार्ध - कहाणी साठा उत्तराची


नेहमीसारखाच मी आजही ओरडत होतो!!
'Kill me damn it!! Hit me!!'
"हो करू ते ... पण का?"

"तिला नाही म्हणाला तो हरामखोर! म्हणणारच होता ... पण 'रंग दे बसंती' मधल्या त्या होम मिनीस्टर सारखे झाले. त्याला मारले पण सरकार भारत रत्न द्यायला निघालेले त्याला! ईथेही तेच झाले ... ही मैत्रीण माझी - माझेच सांत्वन करतेय! म्हणे त्याने त्याच्या घरी विचारले तरी!!"

"काय? च्यायला उपकार केला काय? विचारले म्हणे! प्रेमात काय घरी विचारून पडलेला काय? झाला की मोठा आता!"
"exactly ... मलाही हेच म्हणायचेय! म्हणून त्रागा होतोय"
"पण ठीक आहे ना ... संपले की सगळे आता! तुला हेच पाहिजे होते ना ... आहे की सुखरुप तुझी छावी!"
"छावी म्हणू नको रे तीला..."
"बर ... पण संपले ना सगळे आता?"
"हो रे... पण अस्वस्थ होतेय मला ... हरल्यासारखे वाटतय. Insulting वाटतय!! तिला एकदा पटूदे .. की त्या भंपक माणसाचे चुकले!! बास ... मला बरे वाटेल! आत्मा थंड होईल. सांत्वन काय करते माझे!?"
"हे अती होतेय रोह्या ... ! जे पाहिजे होते ते झाले ना. आता उगाच जास्ती क्लिष्ट करू नको. ती कशी आहे?"

आमच्या या अशा गप्पांमधे बऱ्याच गोष्टी उलगडतात ... बऱ्याच गोष्टी निकालातही निघतात. तसेच ईथेही सुरू होते. पण कथा सगळ्या एकदम सुरळीत झाल्या असत्या तर काय मजा!? मी तिच्याशी फार फार बोलतो हल्ली. रात्र रात्र जागतो! मला झोप येत नाही. १-२ ला झोपून ५ ला उठतो.

"ईतका म्हणुन विचार केलाय तिच्याबद्दल की चुकून मीच आता प्रेमात वगैरे पडेन की काय ही भिती वाटते. पण भिती का? होय. भितीच. सगळे बदललेय. ती आठवली की मला चित्र-विचित्र कल्पना येतात या दोघांच्या affairs च्या. पुर्वीसारखे नाही राहीले काही. कदाचीत याचेही दुःख आहे. एक प्रेम कदाचीत सुरू होण्याच्या आधीच संपले.
असेही वाटते. ..... बापरे! प्रेम म्हणालो मी! म्हणालो ना ...? ईतका विचार केलाय मागचे सगळे दिवस की विचारू नको!"
"लेका ईतका विचार करतोस ... आणि अशा गोष्टीमधे सापडतोसच कसा? काय रडका राव झालायस ईतके दिवस! बघावं तेव्हा रडगाणे सुरूच!"

पण खरच. कथा संपतच नाहीए. मी तिला समजावतोय. तीही येडी नाही विचारत की माझा का हा ईतका अट्टाहास हे समजावण्याचा! ऐकते सगळे माझे! म्हणेल ना - none of my business - पण नाही! म्हणते ...
'रोहित, तो माझ्यासाठी मित्रापेक्षा बराच जास्ती आहे! आणि त्याला परत मित्र म्हणुन बघणे मला शक्य नाही!'
'हे बघ, मी आधी पण बोललोय, आत्तापण सांगतो, एवढे सगळे झाल्यावर त्याने घरी जाऊन सांगायला हवे होते. विचारले म्हणुन काय सांगतोय... साला!? आई नाही म्हणाली काय कारण होऊ शकते काय?'
'थोडा तरी respect दाखव त्याच्याबद्दल. at least माझ्या choice बद्दलतरी. किती ...'
'हं. Sorry'
'Sorry नको म्हणू.'
'नाही होत control मला! मला दिसतय स्पष्ट आणि सुम्मडीमे मजा मारके भाग रहा है साला! आणि तुलाही कळत नाही काही! जाऊदे ... सगळे झालेय बोलून आपले. बऱ्याच वेळा. त्रास होतोय मला! बाकी तुझी मर्जी. जे सांगायचे होते ते सांगीतले. तू काहीही ठरव. मी तुझ्या बरोबर असेन. मला पटो किंवा ना पटो.'
'माहित आहे ते मला'
माझ्या स्वार्थी विचाराचा कहर होतो कधी कधी. सहन करतेय ती आणि मी म्हणतोय आता बास ... मला त्रास होतो!! पण ती यावर पण ओरडत नाही मला!

चर्चा वाढत गेल्या. पण काहीच उत्पत्ती नाही! ती अजुनही त्याच्याबरोबर फिरते. पण तिलाही कळून चुकलेय ... की पुढे काहीही भविष्य नाहीए. पण लांबही न जाण्याचा निर्णय घेतलाय तीने.

कोणी म्हणायचे मला की ... 'वेळ लागतो रीलेशन मधून बाहेर यायला. तिला वेळ दे'
पण खरे सांगायचे तर दुसरे काही हातातपण नाही माझ्या.

आमच्या पुर्वीच्या आठवणी जाग्या होतात बऱ्याचदा. दिवसभर काम झाल्यानंतर, कितीही थकलेले असो ... पण संध्याकळी टेरेस वरची भेट. कॉफी. भरपूर गप्पा. समोरच्या अपार्टमेंट मधले काका काय करतायत याचे केलेले धावते वर्णन. ईमारतीवरून उडी मारायची सुप्त ईच्छा! त्यावर उगाचच लावलेल्या पैजा! रात्री १०-११ वाजेपर्यंत बसायचो आम्ही टेरेस वर ... भंकस करत. बिचारा गार्ड येवून जायचा दहादा.

"सहाजीक आहे रे ... ईतका विचार केलास येड्यागत तर आठवणी येणारच की! तू याचे अर्थ लावत बसू नको!"
"अरे मी तिलाही बोललो एकदा ... असेच ... बोलण्याच्या नादात"
"मग?"
"मग काय? तिने विचारले ... you miss me ना?"

बरेच विचार येऊन गेले ... अगदी क्षणार्धात. ती विचारायची मी ईथे आल्यावर
'हे काय आहे स्टेटस मेसेज मधे? कोणाला मिस्‍ करतोस काय?'
प्रश्नाचा रोख कळायचा मला!
'हो ... आपल्या system administrators ना! माझे मशीन गंडलेय' मी द्यायचो बगल विषयाला ... लावायचो सुरुंग!
स्पष्ट दिसायचे मला कोण कोणाला किती मिस करतय!

या सगळ्या आठवणीमधुन जागा होता होता ... मी बोलून गेलो ...
'हो ... मिस्‍ करतोय तुला ... big time!'

ती काही बोलली नाही. काय बोलेल बिचारी. एका रीलेशन मधून बाहेर येता येता दुसरी कडे भरकटली होती. तिथे तोंडावर अशी पडली की हिलाच कळाले नाही. या रीलेशन मधून बाहेर पडणे जड जातेय तोवर मी भरकटल्यागत बोलत होतो!

"अती विचाराचा परीणाम आहे हा ... ईथे तुला बाकीचे विषय नाहीत म्हणुन बसलायस चघळत एकच कथा!"
"असेल कदाचीत. पण एक सांग ... मी चुकतोय काय? एक तर मला पटवून दे की मी जे करतोय ते एकदम चुकीचे आहे ... किंवा अशक्य आहे नाहीतर मदत कर मला."
"भाऊ .. मला ओढू नको. हे सगळे नाही झेपणार मला."
"तू कसा रे ... नाही त्या वेळेला शेपुट घालतो!?"
"शेपुट नाही घालत ... पण तुला encourage करत नाहीए .. एवढेच. तू धड तिच्या प्रेमात नाहीस ... आणि त्यातून बाहेर पण नाहीस! ती कसे काय तुला झेलते रे? हे सगळे तिला बोल ना कधीतरी. टाक संपवून"
"संदीप खरेंच्या कवितेसारखे आहे ... कशीही अवस्था ... कुणाला कळावी ... कुणाला पुसावी ... कुणी उत्तरावी!
पण हो. हे सगळे तिच्याबरोबर बोलून झालेय माझे... सगळे! बऱ्याचदा, ईवन परवाच ... तिचा विचार केला जरा. तिला काय वाटत असेल ... का करतोय मी हे सगळे? वाटले सांगावे सगळे सरळ सरळ. उगाच आणखी गैरसमज नकोत.

---------------------------------------------
"तुला एक सांगू ... तू रागावणार नाहीसच, पण न सांगता मलाही चैन पडणार नाही"
"सांग. मी तुला कधी नको म्हणालेय काय?"
"उगाच काही अर्धवट राहू नये म्हणुन. न बोललेल्या गोष्टींचे उद्या आपणच काही बाही अर्थ लावू"
"बोल ना ... काय सांगायचंय!"
"आठवतय जेव्हा मी तुला म्हणालो move on ... खरं सांगू, प्रचंड वाईट वाटलेलं. असंख्य नजरा माझ्याकडे रोखून बघतायत असे काहीतरी वाटले. पण काही कारणे होती त्याला."
"काय कारणे?"
"सोपे नाहीए गं सगळं! आपण बोललोय बऱ्याचदा, तुला माहितही आहे. आपण वेगळे आहोत. भिन्न आहोत ... My social life ... personal life ... professional life ... is all complex. या सगळ्यात बराच गुंता आहे! मला कधीच माझे काहीही सुरळीत वाटले नाही. त्यात वर तुझ्या आयुष्यात पण कशाला गुंता करू? तुला काहीच माहीत नव्हते माझ्याबद्दल. किंवा नाहीए माहित अजुनही ... I know ... मी विचित्र आहे, आणि या सगळ्यात मला तुलाही ओढायचे नव्हते. कदाचीत तसा विचार कधी आलाही नव्हता. आपण बोललेलो या बद्दल ... आठवतय?
तू हसताना खुप छान वाटतेस, या माझ्या सगळ्या माझ्या चित्रामधे तू आणि तुझे हासू कुठेच बसत नव्हते. खरे सांगतो ... तुला move on म्हणाल्यावर एकदा असा पण विचार येऊनही गेला होता की तुला कोणीतरी चांगला मिळेल म्हणतो तर मग तो 'चांगला' मीच का होत नाही? पण नाही जमले ... हे सगळे एकत्र काहीतरी विचित्र दिसत होते. काही नव्हतेच मुळात ........... उगाच काहीतरी बनवून आणल्यासारखे वाटायचे. शेवटी तुलाही त्रास आणि मलाही! जो कदचीत अत्तापण होतोय
... कदाचीत उशीरही झालेला.
पण म्हणुन तुझा विचार करणे नाही सुटले. आपण मित्र आहोतच की. आणि राहूच. नाही बघवले तुला कोणीतरी फसवताना. आणि यामुळे मागचे हे ईतके दिवस ..."
"रोहित. मला कोणी फसवलेले नाही. आणि एक लक्षात ठेव. कोणी जेव्हा तुला आयुष्यभर बरोबर रहाण्यासाठी विचारते ना ... त्याचा अर्थच असा असतो की काही वाट्टेल ते झाले तरी आणि जसे आहे तसे किंवा जे होईल तशात. तेवढा विचार केल्यशिवाय कोणी नाही विचारत! No one is perfect but together you become.
असो. तू कधीतरी ... थोडासा का होईना ... मझ्याबद्दल विचार केलास हे ऐकून बरं वाटलं. खरच सांगते. खुप बरे वाटले. पण आपण बरेच पुढे आलोय आता. या ईथून जर मी मागे वळले तुझ्याकडे तर कितपत sensible होईल माहीत नाही पण तू म्हणतोस तसे आपण फार वेगवेगळ्या रस्त्यावर आहोत आत्ता. एकमेकाला बघू शकतोय पण हात धरू शकत नाही!"

क्षणभर कोण बोलतेय कळालेच नाही! मी काय ...? सांगायला गेलो एक ... आणि बोललो एक असे होऊन बसलेलो. पण खरच वाटत होते की ती पहील्यांदाच बोलतीये ... कदाचीत मी कधी विचारलेच नाही तिला की 'तिला' काय वाटतेय? ती पुढे म्हणाली,
"जे झाले ते चुक झालेही असेल कदाचीत. पण मी ईथून मागे नाही येऊ शकत. माफ कर मला. जास्त विचार करू नको की माझे काय होईल. जे व्हायचे ते होईल, काही खराब होणार नाही. चुक माझी होती... त्याची शिक्षा भोगल्याशिवाय मलाही बरे वाटणार नाही. तू म्हणायचास तशी मी खरच भटकती आत्मा आहे! तू सांगायचास ना ... जिम्मेदारी लो ... जिम्मेदारी लो. मी घेतली आहे जिम्मेदारी. आता मला मागे यायला सांगू नको. जोवर होईल तोवर करेन, थकले की थांबेन. अर्थ बदललेत आता. कंटाळा आलाय आयुष्याचा. पण आपण अजुनही एकत्र आहोत. हे जे हसू आहे ... ते आता फक्त यामुळेच टिकून आहे. आपल्या नात्याला नाव पाहिजेच असे नाही. हे नाव शोधण्यापेक्षाही आणि बरेच काही आहे. राहूदे हे जसे आहे तसे. बस आपण एकत्र राहू. बाकी मी बघून घेईन. वेळ जाईल तसे बरे होईल. राहता राहीला विषय या मित्राचा ... त्याला माझ्या आयुष्यातून जायचेच होते ... जाईल तो. माहीत होते मला आधीपासून. मी तरीही अजुन त्याच्या बरोबर आहे. कारण काही संपलेलेच नाहीए अजुनही आमच्यातले. चिडू नकोस. माहीत आहे. तुझ्या logical reasoning मधे हे कदाचीत बसणार नाही. पण मी accept केलेय हे. आयुष्य परत परत सुरू करता येत नाही!

आणि हो ... मी होईन बरी. माहीत आहे मला. Don't worry."
---------------------------------------------

"म्हणजे ती अजून त्याच्याबरोबरच राहील. तोही अरामात नामा निराळा होणार ... उघड्या डोळ्यानी पाहणार मी त्याना एकत्र, त्याचा शेवट माहीत असतानाही! मी काहीच करू शकलो नाही ही पराभवाची भावना ... परत अनुत्तरीत कहाण्या ... पण हे मला काही नविन नाहीत. फक्त हे सगळे हल्ली जास्ती घातक होत चाललय याचीच भीती वाटते. माझ्या बरोबर बाकी लोकही गुंततायत यात! The game has become more Fatal. Destiny - may be. And I used to love fighting with it. असो ... थोडासा सीन उलट पलट झाला त्यावेळी. पण झाले हे असे झाले."
"काय सांगतोस! म्हणजे तीच तुला नाही म्हणाली आता?"
"तू अजून 'हो' आणि 'नाही' मधेच होय? नाही वगैरे नाही रे ... पण म्हणाली की आता परत फिरणे अवघड आहे. हे सगळे आता हो आणि नाही म्हणायच्या बरेच पुढे गेलेय. आम्ही फार पुढे निघून आलोय ... आणि मीही नाही म्हणत की तीने परत यावे. पण जिथे रहावे तिथे खुश रहावे."
"रोहित ... एक मीनीट थांब. तू काही खेळ तर खेळत नाहीस ना? Are you playing game?"
चेहऱ्यावर एक उगाच स्मीत येऊन गेलं - "नाही ... काय खेळ?"
"हे सगळं होऊन गेलेय आधी! तुला माहीत होतं सगळं! होय ना?"
"कदाचीत हो ... कदाचीत नो!"
"चेष्टा करतोयस काय? की तू सगळं घडवून आणलास? खरे सांग? कशासाठी?"
"काय सांग!? उगाच काहीतरी बरळू नको रे"
"मला थोडी थोडी लिंक लागतीये ... तो विद्वान ... त्याची GF पळवली! तू ... तुझीही GF पळवली!"
"Now you are thinking too much! Who said she was my GF?"
"In fact, now I am thinking. तू नाही म्हणून काय होतेय? होतीच ती तुझी GF."
"If you say so!"
"दोघे जण प्रेमात पडले ... पण कधी समजू शकले नाहीत. तुम्ही दोघेही नाही समजू शकला ...! किती काळ ओळख होती ...? तुमची तरी किती जुनी ओळख होती? एक या गावात, दुसरी त्या गावात ... तू ईथे ... आणि ती तिकडे भारतात! हे सगळे असेच झालेले की आधी? तू आधीच सांगीतलेलास!"
"Give up dude ... Don't think much. It's my World!"
"थांब ... जाऊ नको. तू म्हणालेलास ... दुःख होतेच, पण enlarge केले! तुमचेही हेच झाले! तुम्ही पाठ फिरवलेली ... आधीच. पण या सगळ्या घटनांनतर आता उघड्या डोळ्यानी तू हे पाहाणार. तिलाही शेवट माहीत असताना ती गुंतणार. म्हणजे enlarge च केला की!! तुला माहीत होते सगळे? होय ना?"
"ऐक ... जास्ती विचार करू नको. काही कहाण्या अर्धवट सोडलेल्या ... त्याच नव्याने समोर आल्या! Repeat Telecast types! साठा उत्तराच्या प्रत्येक कहाणीची पाच उत्तरे आहेत असे मला कायम वाटते, फक्त ती मिळत नाहीत एवढेच. सोड ... या पुढेही काय होणार हे माहीत आहे मला. फक्त जेव्हा घडेल तेव्हा थोडा त्रास होणारच की. कोणी सुई टोचणार माहीत असले तरी दुखायचे काय कमी होते काय? जास्तीच दुखते! टोचायच्या आधी ५ मिनीटापासून ते टोचल्यानंतर ५ मिनीटापर्यंत. झटक्यात होऊन गेले असते तर काही जाणवलेही नसते!
कल्पना ... अस्तित्व ... कथा आणि भविष्य सगळेच एकमेकात गुंतलेय. काही भोग भोगायचे असतात असे म्हणते माझी आई. कदाचीत हा त्यातला भाग आहे. समजून न उमगलेले भोग! न मिळालेल्या पाच उत्तरांचे भोग."

"You must be kidding me. I just can't believe this. सगळेच complex केलायस. कळतय काही वाटले तोवर परत भेळ केलास!"

बराच वेळ कोणीच काही बोललो नाही!!

"... पण ... पण ते बकवास मेल ... त्याचा काय संबंध? तू त्याबद्दल पण बोलला होतास."
हातातली भेळ संपली ... पण आमचे विषय सुरूच ...
"You don't know how our so called love story started ... do you?"

[कंपनी मधे रात्री १०-११ पर्यंत टेरेस वर खरोखर बसू देत नाहीत. जास्ती मनावर घेऊ नये! :)]
Post a Comment