Wednesday, December 12, 2007
पाऊस एकदम पाऊस होतो
आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही!!
आणि मग एकदम लिहायची खुमखूमी आली ... पण मूड येत नव्हता ... तरीही काहीतरी खरडले ...
कळत नाही बऱ्याचदा ...
पाऊस आला की तू आठवतेस
की तू आठवलीस की पाऊस येतो
पण गाडी पुढे गेलीच नाही ...! तिथेच राहीलं सगळं ... ऊसनं दुखणं आणल्यासारखं वाटलं काहीतरी!
मधे कोणी म्हणाले - पाऊस सुरू झाला! पण लपून छपून कोणालातरी शोधल्यासारखा तोही रात्रीच येऊन जायचा ... जाताना आपण अलो असल्याच्या खुणा सोडून जायचा!
शेवटी काल आणि आज मस्त पाऊस झाला ... केल्वीन होब्स मधे होब्स अंगावर ऊड्या मारून येतो ... तसा! थंडीको मारो गोली म्हणत चक्क पावसात भिजत चालत ऑफिसमधे आलो.
परत काहीतरी खरडायचा मूडा आला ... आहे मुड तोवर लिहीतोय ... बाकी चुकभुल द्यावी घ्यावी :-)
रानात छंद मकरंद गातो
मनात मंद हळुवार राहतो
बघताच मागे वळूनी कधीही
असा बिलंदर कुठून येतो
कधी व्यस्त गाठतो
ओळखीचा एक गंध ठेवतो
मन खिन्न ऊदास असो कसेही
येऊन तसाही हात पकडतो
वाड्याच्या दगडावर झिरपतो
ओसाड टेकडीवरही घसरतो
मी परदेशी जाईन कुठेही
माझ्यासाठी तिथेही पोहोचतो
ऊनाड नाचतो ...
बेभान गातो ...
अल्लड हसतो ...
साक्षी राहतो ...
हलकेच स्पर्शतो ...
तुडूंब भिजतो ...
काही समजावतो ...
बरेच सुनवतो ...
पाण्यासाठी स्वरूप होतो
ऊन्हासाठी ओलावा बनतो
समोर येईल जेव्हा कधीही
पाऊस एकदम पाऊस होतो!
Saturday, November 17, 2007
प्रेमाचे आयसोटोप
तर प्रेम ... प्रेम विषय होता. तसे हेही सुरू करून महिना आरामात उलटला असेल - पण होय ... प्रेम हाच विषय होता ... किंवा तसा विषय काहीच नव्हता ... पण प्रेमापासून विषय सुरू झाले सगळे ... अपुर्ण ब्लॉगच्या कचऱ्यामधून ...
श्रृंगार रस बीभत्स नाही होणार याचे भान असलेले लोक म्हणून गदीमा, बाबूजी पेंढारकर आणि लावणी यांच्या बद्दल काहीतरी लिहायच्या विचारात होतो. सुरूवात चक्राला ती तिथून झाली. प्रेम प्रेम प्रेम ... सिनेमे ... पवसातली गाणी ... शाहरुखचे डायलॉग (तसे बॉलीवूडचे डायलॉग म्हणायचे होते ... पण तिकडे प्रेम या विषयावर शाहरूखची monopoly आहे ना .. म्हणून शाहरुख) ... या पलीकडे फार कमीवेळा गेलोय मी. मधे मधे प्रेम म्हणजे काय 'तसलेच' प्रेम कशाला हवेय म्हणून डीबेट वगैरे पण केलेली पण त्या नंतर परत प्रेम या शब्दाला ठरलेल्या चाकोरीच्या बाहेर काही नाही येवू दिले.
गेले दोन - चार दिवस मराठीमय दिवस होते ... मराठी नाटके ... सिनेमे बघणे कार्यक्रम सुरू होता. 'सातच्या आत घरात','श्रीमंत दामोदर पंत' आणि आज 'कार्टी काळजात घुसली'. सगळे एकदम वेगवेगळे विषय. सगळयांचा प्रेक्षकवर्ग वेगळा. पण कुठेतरी एक गोष्ट समान होती. प्रेम.
"असेल दामू थोडा वेडा... पण आमचे आयुष्य आता तोच आहे" असे म्हणणारा 'श्रीमंत दामोदर पंत' मधला दामूचा बाप ... किंवा "भडकलेले, चिडलेले कसेही पण बाबा तुम्ही मला खूप आवडलात." म्हणणारी ती 'कार्टी काळजात घुसली' मधली कार्टी! काहीतरी जुनेच पण नव्याने बघीतल्याचे जाणवले. काहीतरी हरवलेले परत मिळाल्यासारखे वाटले.
म्हणजे बघा ... एक मुलगी ... तब्बल १६ वर्षाने बापाला भेटते. बायको पोरीला टाकून गेलेला बाप - मोहन जोशी. त्याची त्याच्याएवढीच सडेतोड बोलणारी मुलगी. अगदी बापाच्या मैत्रीणीला "आत्या तुम्हाला म्हणता येणार नाही, आणि मावशी म्हणलेले मला चालणार नाही!" म्हणणारी! १६ वर्षानंतर फक्त बापने मायेने डोक्यावरून हात फिरवावा म्हणून आलेली ही मुलगी असो ... किंवा आपला वेडा दामूच आपले आयुष्य आहे मानणारे 'श्रीमंत दामोदर पंत' मधले आई वडील असोत. सारे बरेच काही बोलून जाते. प्रेमाच्या या छटा नवीन जरी नसल्या तरी ऊगाचच वेगळ्या वाटल्या खऱ्या.
एका भलत्याच संस्कृतीच्या कचाट्यात सापडल्याचा भास होतो हल्ली. आजूबाजूला बघावे तर एकदम Individualistic अशी अमेरीकन संस्कृती. स्वातंत्र्य अजीर्ण व्हावे अशी दृश्यं. आणि त्यात वावगं काहीच न वाटणारे लोक. मी पण कदाचीत. कारण स्वातंत्र्य ना! तुला नाही बरोबर वाटत, तर तू नको करू ना - ऊगाच बाकीच्याना काय सांगतो.
"प्रेम - प्रेम काय रे ... some times it works, sometimes it doesn't. If it does, it does. If it doesn't then wait a while, it will happen to you again"
असे म्हणणारे मीत्र आणि मग
"ईन्सान एक बार जीता है, एक बार मरता है। प्यारभी एकही बार करता है।"
म्हणणारा शाहरुख - एकमेकांशी वाद घालतात असे वाटू लागते.
किंवा अगदीच काही नाही तर - "साले ... तू कहा दुधका धुला है?" पण खरं बघावं तर विषय याही पलीकडचा आहे पण अलीकडच अडकून पडलाय.
कदाचीत म्हणूनच प्रेम ही कल्पना ठरावीक चाकोरीच्या बाहेर नाही जात. आयुष्याच्या आणाभाका देऊन प्रेमकथा संपत नाही ... तर सुरू होते. झाली तरी पाहीजे. आजूबाजूला बघावे तर पुढच्या पायरीपर्यंत कोणाला जायचेच नाहीए. कुठेतरी प्रेम लुप्त होताना दिसतेय. किंवा प्रेमाचा एकच आयसोटोप बाकी राहतोय आणि बाकी अंतर्धान पावतायत असे वाटतय. गेले सोळा वर्ष बाप असताना आम्ही पोरकी झालो म्हणताना रडणारी मुलगी आणि बापाने नकळत मायेने डोक्यावर हात ठेवल्यावर स्वर्ग मिळाल्यासारखे भाव दाखवणारी तीच मुलगी ... सोळा वर्षाने आपल्या मुलाशी फोनवार बोलणारा बाप ... सगळे चित्रच वेगळे. म्हणजे ती तगमग - ती अगतीकता - विरह - हर्ष - सर्व काही होते पण जसे काही वेगळ्याच कपड्यात. पण हे सगळे बघताना नवल का वाटावे ...? की या सगळ्या भावनांची ... सवय गेलेली? काहीतरी माझ्यामधेच मिसींग असल्यागत वाटतय. प्रेम हे फक्त ऊदाहरण आहे ... पण तशा कितीतरी गोष्टींमधे भलतीच सवय लागून गेलीये ...!
म्हणजे हे असेही असते. कदाचीत होतेच आधीपासून. पण बघतो कोण? त्यात स्पाईस नाही ना?! कदाचीत त्यामुळे. काय बघावे हे ही आपणच ठरवणार ... आणि काय नाही बघावे हे ही आपणच ठरवणार. प्रेमाबद्दलच बोलायचे तर ... ते ही प्रेम ... हे ही प्रेम. त्यात तुलना करणे योग्य नाही पण एकाकडे कानाडोळा आणि एकाकडे टकमक नजर! म्हणजे अगदी फक्त क्रिकेटचेच लाड आणि बाकी खेळांना सावत्र भावंडाप्रमाणे वागवल्यासारखे!
यातले काहीच नवे नव्हते. माहीत नव्हते असेही नव्हते. पण कदाचीत विसर पडला होता. किंवा नजरेला झापड लागलेली. रसायन शस्त्रामधे जसे पदार्थांच्या (की मूलद्रव्यांच्या ... आठले सर माफ करा, खरच शब्द आठवत नाहीए!) रुपाना आयसोटोप म्हणायचो तसे हे सारे प्रेमाचे आयसोटोप आहेत. काही नाहीसे होताना तर काहीना खास फुटेज खाताना. काहीना लुप्त होताना तर काहीना larger than life होताना. सगळे आपणच करतोय ... आपणस बघतोय. (परत 'आपण'! ...)
का कोणास ठाऊक ... नाटक बघून बरेच दिवस गेले ... पण हे विषय मनातून जात नाहीएत. कदाचीत कुठे तरी अनोळखी ठिकाणी चाललोय असे वाटतेय. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमधे आपण सहभागी जरी होत नसलो तरो कुठेतरी त्यांचा अतीरेक आपल्याला त्या सगळ्या गोष्टींना ईम्युन बनवतो! या ईम्युनीटीची हल्ली भीती वाटतीये!! ही ईम्युनीटी आपल्यात ऊतरणार नाही ना - याची भीती! प्रेम हे खरच फक्त ऊदाहरण आहे ... अशा बऱ्याच गोष्टी आता नव्याने दिसतायत. थोडे मान ऊंचावून मागे वळून बघीतले तर कळेल.
म्हणजे अगदी ... तुम्ही ऊभ्या आयुष्यात दारूला स्पर्शही कलेला नसेल हो ... पण ईतका सर्वाना दारू पीताना पाहीला असाल ... की ऊद्या तुमचा मुलगा जरी प्यायला लागला तरी त्याचा कान धरायच्या आधी स्वतःच बरोबर करतोय की नाही याचा विचार कराल! प्रश्न बापलेकाचा नाही ... प्रश्न सवयीचा आहे. वावग्या गोष्टीमधे वावगे बघण्याचा आहे. एकदम अचुक शब्दात मांडता येत नाहीए ही अस्वस्थता ... पण ... काहीतरी घोटाळतेय मनात हे बाकी खरं.
अगदी असे नाही ... पण बरेचसे असेच विचार येवून गेले ... तसाही या ब्लॉगवर एकदम पहीला पोस्ट टाकला तोही बऱ्याच अनुत्तरीत प्रश्नाचा!! तिच श्रृंखला अजून सुरू आहे ... हे सारे नवीन प्रश्न ... एवढेच
मेरे मन ये बता दे तू ... किस ओर चला है तू!! क्या पाया नही तूने ... क्या ढुंढ रहा है तू!?
(मी असे काही नाटक बघीतले हे तसे कोणाला सांगून पटणार नाही - म्हणून ईतके सगळे लिहून काढले!)
Friday, October 26, 2007
A 'Happy' Birthday
From: Stranger
To: Her
Why can't those folks come back again? Why don't you get them every time you want them around you?
Keep the evening free ... 17th evening :-) San Jose Time :)
दिवस सुरू ... एकदम नेहमी सारखा ... म्हणजे ... सकाळी सकाळी कळावे की मोबाईलची बॅटरी संपत आलीये... (हे गुढ काही कळत नाही ... हा मोबाईल नेमका सकाळीच ओरडतो "बॅटरी लो" म्हणून ... रात्री वगैरे कसे काय सुचत नाही देव जाणे) ... तोंडी लावल्यासारखे मग त्याला ऊगाच चार्जर चाखवावा अर्धा एक तास ... अगदी अर्ध्या तासात एकदम सग्गळे आवरून बस स्टॉपवर हजर व्हावे! आणि मग नेहमीसारखेच आठवावे ... की चार्जर घरीच विसरलाय! असो ... तर तसाच आणखी एक दिवस ...
कॅमेरा घेतला ... फोटोची ऑर्डर पुर्ण झाली ते नेटवर नक्की बघीतले ... आणि मग पुर्णपणे कल्पनाकी ऊडान घेत ऑफीसकडे कूच केले... लहान मुल बागडावे तसं सकाळी विचार ऊड्या मारत असतात. प्लान मनामधे तयार झाला ... दुपारी डॉक्टर ... मग फोटो ऊचला ... फ्रेम घ्या ... संध्याकाळी बस ... पुढे ट्रेन ... केक ... गिफ्ट ... मग वापस ... काम सुरू ... ९ ला कॉन्फरन्स कॉल ...! परफेक्ट. स्मूथ.
------------------------------------------------------------------
From: her
To: Stranger
thanks for those wishes!!
From: Stranger
To: Her
Dil se yaad karo to log pohoch jate hai ... (ya fir pohochaye jate hai!)
Tomorrow evening ... you choose the place ...
will make sure to make the evening memorable ...
------------------------------------------------------------------
From: Her
To: Stranger
सब चिजे पिलान के मुताबीक होतात की नाहीत बघायची ज्या ज्या वेळेला लहर येते ... नेमके त्या त्या वेळेला लफडी कशी होतात देव जाणे!! दिवस सुरूच झाला होता तोवर फोटोवाल्याने सांगीतला फोटो झालेच नाहीत. म्हणे संध्याकाळी घेऊन जा. नाही त्या वेळी कसे काय या लोकाना वेळेचे महत्व कळत नाही देव जाणे. आता संध्याकाळी फोटो आणायचे ... मग बस ... मग ट्रेन ... मग केक ... मग ... मग ... बागडणे सुरूच तरीही.
हे असे unwanted characters येऊन कथेमधे लुडबुड करतात तेव्हा ऊगाच काहीतरी राडा करतात. असो ...
------------------------------------------------------------------
From: Stranger
To: Her
achche to sab hai ...
I am enjoying this "guess who" game. :-) though I did not start it. Here is a suggestion ... keep this game aside for a while and answer this question ... 7.30 pm near light rail station?
------------------------------------------------------------------
From: Her
To: Stranger
see...
if u dont tell me who are u then there is a heavy possiblity that we dont meet :)
And if YOU are Vasu...then be sure that i'm going to kill you!!
From: Stranger
To: Her
Vasu!!! That's it? Make an impossible wish buddy... It might come true. Vasu ka kya hai? Wo to aisehi ayega santa clara se!!
Let your mind think out of santa clara!!! Anyways ... Do not disappoint a good bunch of people and of course the cake!
It is good to keep surprises at times ... What do you think? If traffic doesn't go ugly, then let the surprise catch you at arnd 7.30 pm near the light rail station...
------------------------------------------------------------------
अनोळखी कलाकार ... अनोळखी कलाकार ... !! याना माझीच कथा बरी मिळते ...!? विचार चक्र अखंड सुरूच. संध्याकाळी कधी निघावे ... कधी पोचणार ... वीकेंडला काय ... (वीकेंडचे वेध लागायला तसा काही वेळ काळ नसतोच म्हणा!)
फोटोचे बारा वाजणार वाटू लागले. काय मस्त कल्पना होती गिफ्ट म्हणून फोटो द्यायची. आता तेच नाही मिळाले तर शिट्ट्या! बॅक-अप प्लानचा विचार करावा तर तितका वेळही नव्हता. रामभरोसे.
साहेब युरोपाला जाणार ...! त्यानाही तहान लागलेली. तसे जाणार होते २ दिवसानी पण सगळे आजच तयार पाहीजे...
तसेही आपण सोडून सगळ्या जगाला त्यांचे त्यांचे खेळ मांडायला अगदी पुरेसा वेळ कायम असतो! असेच वेळेचे महत्व त्या फोटोवाल्याला असते तर ... ह ... मग कदाचीत तो माझा बॉस असता! झाले भरकटले मन ... फोटोवाला बॉस झाला तर काय ... यावर एक-पाच मिनीटं गेली.
मी डेंटीस्टकडे जायच्या वेळेकडे लक्ष ठेवून काम आवरत होतो.
------------------------------------------------------------------
From: Her
To: Stranger
because if u r NOT vasu then let me tell u ke mujhe Vasu ko bhi milana hai....
From: Stranger
To: Her
Now your imagination is flying ...! :-)
lage raho ... let us see how long it can go ...!
Let's plan anyway ... i am talking about the light rail station near to your place ... or suggest me another place ... or we can go somewhere for dinner ... call up Vasu there ...
BTW do people surprise you .... or their actions ? :)
------------------------------------------------------------------
"जबड्याचे ९ एक्स-रे!! मी ऊभ्या आयुष्यात कधी ९ एक्स-रे काढले नसतील!"
एखादा गरजू होतकरू तरूण (आता ही कॉलेजची सवय जात नाही ... तरूण म्हणले की तो गरजू आणि होतकरू असलाच पाहीजे ... भले त्याच्या गरजा भन्नाट आणि हेतू विचित्र असेल!) कामातून सवड काढून दवाखान्यात आला तर त्याला ईतके घाबरवू नये अशी भूतदया वगैरे डॉक्टर या जमातीला नसते.
"आप बाप बननेवाले हो" या अविर्भावात डॉक्टरने सांगीतले ... "नवीन अक्कल दाढ येतेय".
पुढे म्हणते की ... "But ... There are complications!"
काय हा दिवस!? ईकडे अकलेचे दिवे पाझळणे सुरू असताना ... तिकडे अक्कल दाढ डोके बाहेर काढत होती! डॉक्टर म्हणाली काढून टाका दाढ. अगदी मनात आलेले ... की सांगावे अहो नको हो ... राहु देत माझे ३२ दात ... का माझे अकलेचे तारे तोडताय! मी खरं म्हणजे अगदी खर कोणाला त्रास देणार नाही!!
पण दुसऱ्या क्षणाला म्हणालो ... "ओके ... काढू दाढ ...
...
पण आज नको."
------------------------------------------------------------------
To: Stranger
ok Mr. Stranger..
now here is the problem..
I need to meet u ( or u PEOPLE??) at 7:30 PM
I need to meet Vasu at around 6:30- 7:00
And my room-mate's friend is leaving tomorrow so they are having the farewell party at 7:15 PM..
But then..i dont know. So..help me decide..what shall I do??
From: Stranger
To: Her
Stranger ... hmmm now this is a good word ...!
I wonder how would it help you if I say ... dude hey ... i am ... say Sangram ...! how would this name 'Sangram' help you decide?
Interesting question though here is the interesting Answer ... BDay or Farewell ...? You decide ...
It won't take much time ... even an hour should be ok ... say ... 7 to 8 ... (all depends upon your appetite though!) will cut the story short :) can only assure you one thing ... would be a pleasant experience for you :)
Where would you be at around 7 BTW? In worst case ... weekend ... but really would like to cut the cake today ... akhir BDay ka bhi kucH maan rakhana chahiye na!
------------------------------------------------------------------
फोटोवाल्याचा फोन. म्हणाला एकदाचा ऑर्डर रेडी!! झाला खेळ सुरू! दाढ वगैरे दुखायचीपण आपसूक बंद झाली.
काढले मॅप्स ... ऑफीस ते फोटोवाला ... फोटोवाला ते बस ... मग ट्रेन ... मग केक ... मग ... मग ...
एकदम क्लीअर. no confusion. Perfect. ९ पर्यंत घरी परत येणार ... मग काम. conference call सुरू... Cooking ... जेवण ... ऊद्याची तयारी... विचार करता करता मी कधीच रात्री घरी येऊन काम वगैरे करेपर्यंत पोचलो.
पायाला भिंगरी ... मनाला पंख! पुढे मात्र भलतेच काय काय वाढून ठेवलेले.
------------------------------------------------------------------
From: Her
To: Stranger
I am going out with Vasu..he was like telling me since y'day...that we should go somewhere..
Whoever u r I m really sorry to u...
U might have done a bit of preparation and all that ..but cant do anything..
And dont think i m lying to u..to know the truth..
Till the last moment i was cofused...but i dont really have much choice...
------------------------------------------------------------------
To: Stranger
Mr. Stranger...
I will be going out with Vasu but only for a while..so now tell me the time and place to meet...
From: Stranger
To: Her
:-) I am a gigantic, ugly, dark, monstrous terrorist ... who is now very upset by your decision !!
Do not think about getting you wrong ... त्या लेवलपर्यंत विचार आपले जात नाहीत :) anything before 7 pm would be like miracle for me ... since it is already 6 now ...
I shall be near Mont Station at around 7 ... unless you mail otherwise ... and Thanks for being so kind and considerate (thought these words would suit the situation)
------------------------------------------------------------------
From: Her
To: Stranger
and definitely want meet u..as I m very sure u look like somebody who i know for quite some time..but i m not able to make out..
I will be there at Mont station at 7!!.. But dont go on the train platform just wait at the entrance!!
m leaving now..
looking forward to meet the GIGANTIC , UGLY, DARK, MONSTROUS TERRORIST :)
Gigantic, Ugly, Dark, Monstrous Terrorist!! हा हा ... सगळे खेळ एकदम रंगात आले. तिकडे कोणीतरी वाट बघणार आणि ईकडे वेगळेच काही वाढलेले. आता एकीची बळ शिकावे तर संकटांकडून. कशी आली की सगळी नेहमी एकत्र येतात! फोटो ऊशिरा ... मधेच दाढेची एंट्री आणि ताबडतोब एक्झीटची तयारीपण ... संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या अस्तित्वावरच गदा... युरोपची टूर ... तिकडे आधी तो वासू ... आता ते फेअरवेल! कुठे तरी आतमधे मात्र मजा येत होती ... एकदम living on the edge सारखे सुरू होते. प्रत्येक पुढचा क्षण काहीतरी नवीन दाखवायचा. प्रत्येक वेळेला मनामधेच प्लान आपोआप रीअलाईन व्हायचे.
हम चाहते जैसा जैसा ... सब वैसा वैसा होता ... गर ... सोचो तो ऐसा होता तो कैसा होता!? :-)
खेळ बदलायला कधीच सुरू झालेला, आता हाताबाहेर जायला सुरू होणार होता.
------------------------------------------------------------------
"DUDE ... Help me! I am at this Bus stop and there is no clue of bus here!! Tell me when is the next bus?"
"How did you miss the bus?"
कधी कोणाला काय ऐकायची लहर येईल काय सांगा!
"DUDE!!!! Please ...!"
"कुठे जाणार आहेस? तसेही पण ईंटरनेट स्लो झालेय रे आजच!"
...
and there I was standing on that bald street with no trace of human species around ... with bunch of photos in hand ... a nice cake ... n an office bag ... with no clue of what happened to that Bus and with the friend on phone who had slow internet connection!! It was already past 7:30 pm.
------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------
INTERVAL ----------------------------- मध्यांतर
------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------
"Hmm ... ट्रेन मधे बसून मीटींगची तयारी करत होतो ... आणि काय?"
"WHAT? मग ट्रेन बंद पडली!? ... Wow... Finally you got on to next train ...! आणि ती ट्रेन बंद पडली!!? हा हा हा हा!! You are happening yaar!"
"Thanks हा...! What a friend I have!!"
"तू चाललायस कुठे? ८ वाजले की भावा!"
"लंबा स्टोरी है... फिर कभी ..."
एका दिवसात किती गोष्टी घडू शकतात त्याचा ऊच्चांक गाठायचा पण केलेला कदाचीत. ट्रेन बंद पडली ती पडलीच. पुढे बस आणली कोणीतरी. अमेरिकेत भरगच्च बसमधून ऊभे राहून प्रवास करायचे भाग्य लाभाले! देवाला गैरसमज वगैरे झाला असावा की त्याचा हा लेक कॉलेजमधे नाही म्हणजे कॉलेजच्या सवयी गेल्या असतील. संध्याकाळी बाहेर पडताना बसचा रूट बघणे ऑप्शनला टाकलेले आणि त्याने नेमके आता तेच नशिबी द्यावे?
समोर आता ९ चा कॉल दिसू लागला. कुठला केक आणि कुठले काय? केवळ नावतले साधर्म्य म्हणून एका स्टेशनवर ऊतरलो. तिथून खडाजंगी कॉल घेतला. आ हा हा ... काय सीन! कंपनीच्या बजेटविषयी चर्चा ... जेवढी बाहेरची थंडी जोरात ... तेवढेच सगळे जोमात. एक (गरजू होतकरू) तरूण... त्याचाही सहभाग ... रात्रीचे ९ ... एक निर्मनुष्य स्टेशन ...! कधी स्वप्नातपण विचार केला नसेल की असे कुठे बसून कॉल घ्यावा लगणार. पटापट कॉलचे मिनीट्स वगैरे लिहीले... ऍक्शन आयटम्स तयार केले ...! हुश्श.. संपला कॉल. मान वर केली तर काय? परत स्टेशनवर अडाकलेला (गरजू होतकरू) तरूण आहेच.
------------------------------------------------------------------
"Hello... रोह्या... तू कॉल करणार होतास!"
"होय काय? ही ही ... ईथे जरा मजा झालीये."
"भेटलास काय तिला?"
"अरे तुला तिची काय काळजी! मी ईथे भरकटलोय. आणि ती बाई गेलीये तिच्या मैत्रीणीच्या फेअरवेलला"
"तुला काय माहीत?"
"तू ईमेल चेक नाही केलास म्हणजे!"
"काय झाले?"
"ही ही ... ती वेगळी मजा आहे ... सध्या तरी situation is ... I have no clue where I am and as soon as I know where I am, I shall see her."
"जास्ती ऊशीर करू नको. ती नसेल तर दारात वगैरे ठेवून तू निघ."
लोक कधी काय सल्ला देतील काय सांगा. एकार्थाने बरोबर होता म्हणा पण आता कुठे काय कधी अर्थ वगैरे बघायची सवय? ईथे स्वारी अजून घरापर्यंत पोचायचीये ... आणि हा दाराबहेर ठेवून जाण्यापर्यंत पोचला. आणि तोही केक!! मधेच वाटून गेले ... माझ्या अपार्टमेंट मधे कोणाला असे दारात केक वगैरे ठेवायची बुद्धी होत नसेल? चालायचेच ... याची मैत्रीण ... याच्या शुभेच्छा ... मी फक्त डिलीवरी बॉय ज्याने फक्त खेळ मांडलेला ...! वेळ आली तर केकपण ठेवू दारात अशी मनाची तयारी केली पण आधी दार तरी सापडो! एवढ्यात मोबाईलला समजले की त्याची बॅटरी संपतेय!! ओरडला लेकाचा. (का म्हणून सकाळी वाटले असेल की ही बॅटरी रात्री का संपत नाही!! हा देवपण नाही त्या ईच्छा पुर्ण करतो!).
एकदम गुरूमधला अभीषेक बच्चन आठवला ... शेवटच्या सीनमधे लेक्चर मारणयासाठी शब्द वाचवून ठेवतो तसा. गुरू संचारला आता. फोन बंद. एकदम मोजकीच चर्चा करायची आता मोबाईलवर. मोजून मापून. (हे कळायला वेळ लागला की जर मोबाईल पुर्णपणे बंद पडला तर तिथून पुढे अक्षरशः काहीच करायचा स्कोप नाहीये. ना कॉल ना मेल ना घर ना दार!). या प्रगत देशाचे कोपरे मात्र अप्रगत आणि पोकळ असतात. कोणीच पानवाला बसत नाही तिथे. कुठे जायचे वगैरे सोडाच पण मी सध्या कुठे आहे हे सांगायलापण कोणी नव्हते!
------------------------------------------------------------------
"Hello TJ ... यार आपकी कॅब चाहीये!"
"कहा सर?"
हा हा ... आता हे जर माहीत असते तर कॅब कशाला मागवली असती!? पण त्याचेही बरोबर ... कुठे ये म्हणून सांगायचे त्याला. बरेच प्रयत्न केले ... हा असा असा स्टॉप ... याच्या नंतरचा ... याच्या आधीचा ... या हाय वे वरचा ... शेवटी म्हणाला मुलाला पाठवतो! अमेरीकेत पण युवा रक्ताला वाव दिल्याशिवाय पान हलत नाही!
हा युवा मी सांगीतलेल्या वर्णनावरून माझ्यापर्यंत पोचू शकेल हे खरच अवघड वाटत होते. काहीतरी होईलच याची खात्री होती पण काय होईल याची आजीबात कल्पना करणे शक्य नव्हते. तेवढ्यात आठवले - बराच वेळ ईमेल नाही गेले ... ऊगाच वेळ कसा घालवून चालेल? या मुलीचा आणि कुठला तरी प्लान वगैरे ठरला तर डाव ढीस! सगळे जवान जागीच शहीद! एव्हाना रात्रीचे साडे दहा वाजून गेलेले.
------------------------------------------------------------------
From: Stranger
To: Her
Thank god I did not bring the bouquet otherwise it would have died
here at capitol station!!
Are you home by any chance?
------------------------------------------------------------------
To: Stranger
hey..
But are u ever going to meet me or tell me who are you?
From: Stranger
To: Her
Call me at 4083911967
Can you come here by any chance
शेवटी आलाच फोन... पहीला प्रश्न - तू कोण? ओळखतोस मला?
बापरे ... किती ते प्रश्न? लोक हिंदी सिनेमे कमी बघतात. नाहीतर पहीला प्रश्न विचारला असता ... "तुम्हे किसने भेजा है?" ... खेळ तिथेच संपला असता. पण तिनेही नाही विचारले. मीही नाही सांगीतले. (याला म्हणतात निव्वळ माज - ईथे मोबाईल मरायच्या घातीला ... रस्त्यावर कोणी नाही. कुठे आहे याचा पत्ता नाही तरी नाव काही तोंडून बाहेर पडेना.) ही म्हणते पत्ता नाही सांगणार. पण मी तरी कुठे विचारत होतो पत्ता वगैरे. न विचारलेल्या प्रश्नांची ऊत्तरे माझी बॅटरी संपवत होती! त्रयस्थ म्हणून बघावे तर एक पुर्णपणे अनोळखी मुलगा ... या मुलीला आख्खादिवस ईमेल करतोय आणि आता घरापर्यंत पोचायच्या मार्गावर आहे. आणि मनापासून ईच्छा करतोय की ही मुलगी पण अगदी विनासायास पत्ता वगैरे सांगेल किंवा याला घ्यायला येईल ... तेही रात्री ११ वाजता ... एका परक्या देशात! पण आता काय करू ... वाटायला काय? वाटले खरे असे होईल म्हणून!
तेवढ्यात गाडी आली. रामाला लंकेचा सेतू बांधून झाला म्हणून ऐकल्याबर जेवढा आनंद झाला असेल तेवढा आनंद झाला. फोनवर ती काहीतरी विचारत होती ... म्हणालो - तू घरी आलीस तेवढेच नक्की करायचे होते. आलोच.
कट.
------------------------------------------------------------------
From: Rohit
To: Her
I am standing outside in white shirt ...
Won't kill you
Don't worry
तिने फोन ऊचलणे बंद केलेले. रात्री १२ च्या सुमारास कोण ऊगाच ईतकी बडबड करेल? मधेच एक- दोन वेळा अर्धवट संवाद झाले. पण निर्णयाप्रत नाही. तसा परीसर मस्त होता. भरपूर सारे विला. मस्त थंड हवा. एकदम सुनसान रस्ता. हातात पर्सल घेऊन मी भटकत होतो. फोन बिचारा प्रयत्न करत होता. ती ऊचलत नव्हती. तिच्या अपार्टमेंट कॉंप्ले़क्स पर्यंत येऊन आता मोहिम फत्ते न करता जाण्याचा आजीबात विचार नव्हता. झालेच तर ईथेच दारात तंबू ठोकेन - सकाळी तरी बाहेर पडेलच की! असा काही विचार येवून गेला.
पाणी नाकापर्यंत आलेले. मी हत्यारं टाकायच्या तयारीपर्यंत पोचलेलो.
नाव पाहीजे तर नाव घे ... पण आता कुठले दार वाजवू ते सांग ! तेवढ्यात तिचे ऊत्तर आले.
------------------------------------------------------------------
From: Her
To: Stranger
Villa 4 105
------------------------------------------------------------------
मान वर केली ... मीही त्याच अपार्टमेंटच्या दारात ऊभा होतो.
कहानी एकदम climax पर्यंत आली! आता केक बेकार जाणार नाही याची खात्री झाली! ऊगाच केकला काही झाले तर वाईट वाटायचे! केक दारात ठेवायचा नाही म्हणूनतर ईतके सगळे केले!
दरवाज्यासमोर गेलो तर वेगळाच खेळ. कोणी दारच ऊघडेना! माझ्याकडे बघीतल्यावर भीती वगैरे वाटावी असा तर मी नक्कीच नाही! प्रेमाने विचारले ... दार ऊघडता की ईथेच ठेवून जाऊ. तसेही परवानगी होतीच दारात ठेवून जायची! आणि जरा ऊशिरा का होईना ... मोहीमपण फत्ते झालेली.
शेवटी तिने विचारले ... कोण पाठवलेय तुला?
ह ... झाले ... विचरले शेवटी!!! सांगीतले ... तुझा हा अमुक अमुक मीत्र ... त्याला दुर्बुद्धी झाली मला सांगायची ... तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायची ईच्छा होती फक्त ... जरा थ्रील आणण्याचा प्रयत्न केला ... तो कदाचीत जास्त झाला.
दार तरीही ऊघडेना कोणी! पोलीस वगैरे बोलावायचे प्लान्स सुरू आतमधे! मधेच या अमुक अमुक मीत्राला फोन करायची अक्कल सुचली एकीला. तसा पोलिस नावाच्या प्राण्याशी जुने नाते... ईथे आल्यापासून भेट झाली नव्हती ... आणि तीही आज होते की काय वाटू लागलेले पण यांचा फोन लागला त्या मीत्राला!
एव्हाना मी जातो म्हणून दारासमोरून बाजूला झालेलो.
गडाचे दार उघडावे तसे हळूच दार ऊघडले. हिरकणी कानाला फोन लावून बाहेर आली. मी बाजूलाच ऊभा होतो.
"आहे आहे तो ईथच!! कित्त्ती अरे ... सॉरी रे ... पण सांगायचे की!" मुली या अशा प्रसंगी एका श्वासात ईतके काही बोलून जातात की ते लिहीणे तर राहूच द्या पण लक्षात राहणेही अवघड.
तू आधी विचारले असतेस तर सांगीतले असते की ... असे म्हणायची लहर आलेली ... पण आतमधल्या प्रत्येकीचे चेहरे बघून काही चर्चा केल्यास जीवास धोका असल्याचे लक्षात आले. वर ... ईतके सगळे किडे करून स्वतःच सॉरी वगैरे म्हणून घ्यायचे भाग्य कशाला सोडू? गिफ्टवाला फोटो बघून कदाचीत खरोखरच बरे वाटले असावे. नाहीतर 'डोके वगैरे आहे का नाही ' असले काही विचारले असते.
त्या थोड्याशा वेळामधे ... Thanks आणि Sorry चा वर्षाव सुरू होता. पैकी तिची एक रूममेट मला खाऊ की गिळू अशा नजरेने बघत मात्र होती. कदाचीत तिचेच फेअरवेल असावे की ज्याचा मूड मी खराब केलेला. बिचारीने एक दोनदा समजावायचा प्रयत्न केला की माझे काय चुकले! मीही सगळ्याला हो हो म्हणालो. पानीमे मछलीसे बैर कौन ले!? आणि ते ही रात्री १-२ ला ... दुसऱ्या दिवशी ऑफीस असताना ... आणि घरापासून १५-२० मैल लांब! माज असेल ... पण ईतका येडा नक्कीच नाही.
Turned back ... n said ...
"Wish You a Very Happy Birthday ... Belated Birthday ... it's past 1 now!"
संपला खेळ ...
Filmfare award घेऊन बाहेर पडवा तसे (गरजू होतकरू) तरूण बाहेर पडला ...
तेवढ्यात पलीकडून चार पाच हट्टीकट्टी पोरं पळत आली ... मला काही समजायच्या आत ... कोणीतरी सांगीतले त्याना ... काही नाही ... कुछ नही हुआ!
Friday, August 31, 2007
लौटके तू आयेगा रे शर्त लगाले!
बरेच दिवस ब्लॉगकडे वळायला वेळच मिळत नव्हता ... आज धुळ झटकावीच म्हणून बसलोय! कितीही नाही म्हणा... पण या काही गष्टींकडे मन वळतेच. :-) कदाचीत धुळ माझ्यावर बसलेली.
सॅन फ्रांसिस्को मधे परत येऊन तसे ८-९ दिवसच झाले असावेत ... पण ऊसंत नावाचा प्रकार नाहीए. मनात एक नविन ताजगी का काय म्हणतात ते आहे. कालच एका बीच वर जाऊन आलो ... रॉक अवे बीच. शेवटपर्यंत वाटत होते की रन-अवे बीच ... हे गोरे लोक ऊच्चारच असा विचित्र करतात ... की काय सांगावे. याला रन अवे का म्हणत असावे याचा बराच विचार केलेला ... पण शेवटी ते रॉक अवे नाव बघीतल्यावर जरा हिरमोड झाला. चालायचेच. कोणी कोणाचे काय नाव ठेवावे यावर कोण काय म्हणो...
बऱ्याच गोष्टी एकदम झाल्या. ईथे आल्यानंतर पहील्यांदा pacific ocean मधे पाय ठेवला ... परत एकदा मला समुद्राने आपल्या संमोहनात अडकवले ... परत एकदा तो अजस्त्र जलाशय काही बोलला मझ्याशी ... आणि परत एकदा तीव्र ईच्छा झाली काही लिहायची!
पाण्याशी खरच काहीतरी नाते आहे! की पाणी सगळ्यांशीच बोलतो की काय ... देव जाणे. पण काहीतरी वेगळेपण नक्की आहे त्यात. पाऊस म्हणा ... समुद्र म्हणा. हे ऊगाचच जवळचे वाटतात. आपसूकच. समुद्राच्या बाजूला एखादा कडा किंवा टेकडी असावी म्हणजे पर्वणीच. मागे bigsur ला गेलेलो तसे. ईथेही तसेच होते. मोठी च्या मोठी टेकडी समुद्राला लागून. असंख्य लाटा धडका मारताना खाली पायाशी आणि दिमाखात ऊभी ती टेकडी. त्याच्या एकदम टोकावर जाण्याची ईच्छा न व्हावी तर नवल!
कोणी बरोबर यायला तयार होईना ... पण या अशावेळी थांबतो कोण? अरे कुठे ती ऊंच टेकडी, ते पाणी आणि त्यासमोर ... "फार ऊंच आहे", "वेळ होइल", "वर काय असेल काय माहीत!", "ईथेच बरे वाटतय" ही कारणे! फारच तोकडी! या अशा काही वेळा खरच पुण्याची आठवण येते ... कोणत्याही क्षणी कुठेही यायला तयार असलेले मीत्र मैत्रीणी आठवतात. एका सकाळी वेड्यासारखे ऑफिसमधून निघून बावधानच्या मागे टेकडीवर गेलेलो. त्याही आधी NDA च्या ईथे पावसात टेकडी चढलेली! ईथे असे काही होणे म्हणजे स्वप्नवतच. पण असो. आई म्हणते ... काय 'आहे' ते बघा, ऊगाच 'नाही' त्यावर किती चर्चा! ईथे या अशा वेळी i-pod आपला सखा. घाला कानात डूल ... आणि व्हा सुरू. मनात तसूभरही नाही आले की पायात शूज नाही चप्पल आहे! पण आले जरी असते तरी फार काही बिघडले नसते. असे होते की जसे काही वर कोणीतरी बोलावत होते आणि जाणे अपरीहार्य आहे. नाही गेलो तर त्या टेकडीचा अपमान.
गाणे सुरू ...music वर पाय ही हलू लागले! केके नेही साथ दिली ... "तुमही तुम हो ... जो राहो मे, तुम ही तुम हो ... निगाहो मे" भन्नाट संगीत. याआधी हे गाणे ईतके आवडले नव्हते ... पण त्या वातावरणात मस्त जमून गेले ...! थोडे वर गेल्यावर कळाले की हा अजून शेवट नाही. अजूनही वरती आहे ... पावले आणि पढे सरसावली. केके बापडा गात होता ... "अब चाहे जो भी हो ... तुम हा या ना कहो!!" आणखी उंच ... आणखी ऊंच ...! ईतके की त्याच्या वरती काहीच असू नये. दरवेळी काहीतरी दिसायचेच ... शेवटी एका ठीकाणी पोचलो जिथून पलीकडे ऊतरण सुरू होणार होती. पलीकडचा दुसरा बीच पण दिसू लागला. खालून दिसत होते, त्याहून बरीच मोठी होती टेकडी. थोडावेळ थांबलो ... समोरच्या सगळ्या पाण्यच्या पसाऱयाकडे बघीतले. ऊगाचच वाटून गेले ... हे जे काही समोर दिसतय ... जिथेपर्यंत दिसतय. सगळे आपलेच आहे!
"केसरीया ... बालम ... आओ ... पधारो ... म्हारे देस ..." पुढचे गाणे! God Bless iPod. समोरच्या समुद्रातून येणारे सुसाट वारे सोडून आणखी कोणी येण्याचा काही चान्स नव्हता तरी ... come what may ... अगदी matrix मधल्या शेवटच्या मारामारीमधे neo ऊभारतो तसा त्या वाऱ्याला तोंड देत ऊगाच एकदम पराक्रमी वीराच्या आविर्भावात ऊभारलो. पण कोणी कशाला येईल? गाण्यात बिचारी बालम ला बोलावतेय आणि मी लढायला ऊभा. काही जमेना. क्षणात आमचा निओ पण समोर ट्रिनीटी दिसावी तसा पाघळला. बसला खाली! सुरेख गाणे! संपूच नये असे. मस्त जोर जोरात आवाज चढवून मीही साथ दिली! एक बाकी असते. एकटे असताना काय वाट्टेल ते करू हा वाला जोश पटकन येतो. तसा अमेरीकेत रस्त्यावर पण मोठ्याने गाणे म्हणालो असतो तरी काही बिघडले नसते म्हणा. तरी असो ... बाथरूमच्या बाहेर कुठेही गाणे म्हणणे म्हणजे थोडेसे धाडसच की!
वेळ कसा गेला कळालेच नाही! बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी झर्रकन डोळ्यासमोरून सरकल्या! अंतर्मुख होणे यालाच म्हणतात की काय माहीत नाही! पण बरे वाटले. धावपळ. अनिश्चितता. कुतुहल. चुका. अगाऊपणा. हाव. मत्सर. पाऊस. प्रेम. लोभ. माया. आणि या सगळ्यामधे असलेला मी आणि माझेच सगे सोयरे. आजू बाजूला तसे कोणीच नव्हते. पण त्या सगळ्यांच्या अस्तित्वाची जाणीव होत होती. वेळ तसाच आणखी मागे गेला. कॉलेज आठवले ... तिथल्या लोकांचा विश्वास आठवला. ऊगाचच वाटले ... ताडून तरी बघावे की मी अत्ता कुठे आहे आणि त्यानी मला कुठे पहीले होते. Newton बाबाने सांगीतलेय. आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा force तुमच्यावर operate होत असतो. मधे हेच ऊदाहरण घेऊन मी कोणालातरी बोललेलो ... "तुझे आयुष्य केवळ तुझे नाहीए. आजू बाजूच्या सगळ्यांचे काहीतरी देणे लागतो आपण." पण या सगळ्या गावाला शहाणपणा शिकवण्याच्या नादात कधी स्वतःला तोलले नाव्हते. तसे सर्वांसारखी माझ्यापण आयुष्यावर बऱ्याच जणांची छाप आहे. मग त्याची परतफेड किंवा त्यांच्या अपेक्षांची परतफेड केली की नाही हेही बघीतलेच पाहीजे की! परतफेड म्हणता येणार नाही पण त्या दर्जापर्यंत तरी गेलो की नाही बघायला काय हरकत!?
ऊगाचच वाटले की या ज्या भावना, अगतीकता जे काही होते किंवा आहे ... ते सगळे आधी कुठे होते? ते आधी नव्हते तेव्हाचा 'मी' हा खरा 'मी' होतो की यांच्यासकट जो 'मी' बनलो तो खरा 'मी' आहे. गोची आहे राव! यात हे बाकीचे लोक कुठून आले. त्यांचा का म्हणून देणेकरी!? लोकाना सांगताना बरे असते - बस ग्यान बाटो. तसे आपण खरच शिकतोही आजूबाजूच्या लोकांकडून. चिकाटी ... जिद्द ... या गोष्टी मी माझ्या मित्रांच्यात फार प्रकर्षाने बघीतल्या. मग एके दिवशी त्याना follow करणे सुरू केले. मौज मजा आणि एकूणच येणाऱ्या घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोन हाही कॉलेजमधेच अंगीकारला. एकूण काय गावभरच्या भरपूर गोष्टी आपल्यात आणायचा प्रयत्न. या सगळ्या लोकानी दरवेळी विश्वास दाखवलेला ... एकदम रंग दे बसंती मधल्या डायलॉग सारखा - "कुछ करके दिखायेगा डिज्जे!". पण ईथे डीज्जेने काय केले? बसलाय टेकडावर समूद्राचे ऐकत. पण मजा ईथे आहे. अजस्त्र समूद्र. विराट जलसमूह. आणि या सगळ्याने आलेला आत्मविश्वास. ईथे कोणीही शेर बनेल. कदाचीत म्हणूनच देवाने या अशा जागा ईतक्या ऊंचावर तयार केलेल्या असाव्यात. पण असो ... परत तोच जोश आला ... सगळे करू. सब कुछ. आहे काय त्यात. काय होईल... कसे होईल ... वगैरे विचार कधीच आले नव्हते आधी. मग आतातरी का यावेत? कदाचीत यामधे खरा 'मी' आहे. दररोजचे रुटीन होणारे दिवस. एकदम साच्यातून कढल्यासारखे. कोणी दुसऱ्याने दाखवलेली किंवा बघीतलेली स्वप्नं. त्यासाठी झटणारे तिसरे लोक ... आणि केवळ विचार करायला वेळ नाही म्हणून सर्वांमागे पळणारे आपण. स्वप्नं बदलतात. आवडी निवडी बदलतात. कशामागे धावतोय तेही त्याचाही काही वेळा विसर पडतो. मग कहीतरी माफक खुशी देणारी स्वप्न बघायची. तिच पुर्ण करायची. आपणच खुश व्हायचे. आणि मग असे कधीतरी पुर्वीचे दिवस आठवले की वाटते की काहीतरी खरच मागे सोडून अलो आपण. हे विचार एरवी येणे तसे शक्यच नाही ... जरी आले तरी "जाऊ दे ... निरर्थक आहे" म्हणुन पण सोडून देऊ. पण या अशा वेळी आले की एकदम भलतीच energy! आणि असे विचार अशा वेळीच यावे rather! कारण मग वाटते ...
"लौटके तू आयेगा रे ... शर्त लगा ले!"
खरं तर 'चक दे' बघायचे भाग्य अजून काही लाभलेले नाही. हे गाणेही बघायचा योग आला नाही. पण मला आपले असे दिसले हे गाणे. समुद्राच्या बाजूला ऊंच कड्यावर ऊभे राहून विजयी मुद्रेने (की आत्मविश्वासाने) समोर बघत रहावे जसे काही कोणी energy pump-in करतोय. सगळे साठवून घ्यावे. गाडीत पेट्रोल भरल्या सारखे. आणि माहित असावे ... कुठे जायचेय ते! rather कुठे यायचेय परतून ते.
गाणी सुरू होतीच ...
"मेरे मन ये बता दे तू ... किस ओर चला है तू ... क्या पाया नही तुने ... क्या ढूंड रहा है तू!"
अचानक कळाले ... की बघता बघता मी खाली येऊन पोचलोय. समोर लोक ओरडतायत की किती वेळ लावला म्हणून. पण who cares!
म्हणालो डीज्जेको पेट्रोल भरना था! ;-)
Thursday, August 09, 2007
Wish You a Happy Journey
My every journey had some or the other story to tell … Each of the VISA stamp on the passport has a story attached. May it be haunted apartment in Seoul, may it be a real tiger sitting on my lap in Jakarta, may it be me delaying the international flight, may it be Amitabh Bachchan in Bangkok or may it be lost laptop at Singapore. Every time, it was happening. This was the first time, things happened in Pune and not abroad.
Not sure where to start from, however if I decide to restrict this to the journey only then it would start from Saturday Morning. My mom discovered that my passport and other documents were wet … badly. And it was equally surprise to me! But soon realized how all that might have happened. What else one can expect after spending almost 6-7 hours in heavy rain. It could be another interesting topic to write about those 6-7 hours. But anyway … VISA was big concern that time. Damn! Even that photograph on the VISA stamp was half wet and the colours were like about to fed. Someone scared me saying, they might send you back from SFO airport if the VISA thing becomes an issue. I had and I have no wish to come back again! At least not that immediately.
This was the beginning of journey. Though I explained my mom the whole story (which again was not very pleasant for her) how the passport got wet, it was not going to help the passport! It was the slight hint towards the happening journey ahead.
With all the herculean efforts, finally we managed to settle (cool!) down all the docs, passport everything and with the fingers crossed, I started the journey to Mumbai airport. This time there were bunch of 14 people with me traveling to the airport in that mini bus. There was some missing link … and it was making me restless. I requested the driver to stop the bus at one place …
"Dude, where are you? I have stopped the bus near your home… want to give you something."
"I am not home, am near Bonsai!! Should I come back?"
"No … go ahead … enjoy! Can't wait that long … "
Honestly I was big time angry, pissed off, frustrated and lot more things at the same time … for various reasons! But realized soon, have no time for that, also have no time to go back home n sit n relax to come back to normal.
I called her back. She said immediately.
"Where should I come?"
"… would stop near the signal at the chowk … be there in 30 minutes, might not be able to hold the bus for long!"
"Ok."
"Bhaiyya, want to give something to a person near the signal at chowk … would you stop there for a while?"
"Girl friend hai?"
I wonder, why the heck it was his problem! Why do I have to explain this relation to each and everyone every time? But as always, had no time to sort out his queries. He had already done a favor to me by stopping there.
"Can you stop or not?"
"Yeah …"
"Thanks … and yeah … she is girlfriend … but not mine! (happy??)"
Well … he did not look happy with the way I answered.
Things started happening pretty fast … It was a small thing. Had we not gotten chance to meet that time, perhaps it would have always made a mark in my mind. What did we do after meeting? - nothing! But still wanted to do that. The Bus stopped at a place hardly 5 minutes away from that chowk. The driver had suddenly remembered something, perhaps. I saw an ATM center there and got down to withdraw some cash. Driver knew about it. I was thinking about that 5 minute meeting at the chowk. With these thoughts I entered the ATM center … got some cash … came out … and boom!!
The Bus was not at all there!! Vanished!!
Boy!! For a moment I thought, if I was in dreams. I asked a fellow there and he said …
"it went straight just now."
"How can it go that direction?? Rather … how can it go anywhere?"
That fellow smiled and I also was not expecting him to answer anyway. :)
I was totally clueless and with no luggage. Hand went in to pockets automatically but there was no mobile phone. Useless pocket!! You are truly disconnected when you are with no mobile and no internet! (reminded me of all those events when I used to comment on someone's affection towards mobile!). I had no contact numbers of that driver, their travel agency and neither my company travel desk person. Everything was stored either in my mobile or laptop and neither of which I had that time.
These moments teach you a lot. I mean, we do nothing but start realizing some big time gyan which generally is of no use that time to help us out. I did learn something … mobile, laptop etc all these gadgets make you big time handicapped! Ok … ! Nothing great. I was still in bad fix. But next fact rather than gyan was even more interesting. How was I supposed to reach airport and even if I reach how do I get my luggage?! And again that wet passport/VISA was another concern anyway. I tried to call mom so that she could find the numbers from my cell phone but in vain. I knew my cell was too complex for her to handle. Same was the case with dad. I soon remembered that I had asked someone to wait near chowk for me! Damn! I again spoiled her plans. I do it every time. Now even if we meet … I had nothing to give since everything was gone with the luggage. I called her up anyway, asked to come as soon as possible where I was standing. I really wonder why every time 'something' has to happen when we decide to meet! Maybe we realized that late that we were not meant to meet at all.
I was back on the road with mischievous smile on face. Life was thrilling, happening and painfully kool for last several weeks. The trend was not over. And I was happy about it. I suddenly saw the bus! Alas …! They came back … perhaps they realized something had spilt out of there bus. Whatever! I was about to go to the bus but then again, there was another mess … I had asked her to come to that place. I called her back … she had reached already. I ran into the bus … the driver tried to start some argument - "where had you gone" n all … but I was in no mood to listen, I pulled out some stuff from my bag … n told him to wait and I'll come back in 2 minutes n then we can finish that argument at length. He again did not look very happy at my gesture. But really had no other option. There was someone more than that driver, bus, ATM, argument standing outside with no hint of what is going on.
She was standing there on the other side of the road, perhaps with no clue what had happened in last 5 minutes. I gave her what I wanted to give, she had also something for me. She said, "Happy Friendship Day". That's it. Few more words here n there and we were done. Not even 2 minutes. I ran back to the bus and was all happy. Perhaps she was too. Journey continued towards Mumbai … and it started raining again. Well, this time, these stupid rains missed the drama by just few minutes. My leg had one open wound. It had started paining, but who cares. All those rain droplets, that open wound, my thoughts and lots of memories - everything was forming a beautiful rhythm, music … Guru ka music!
Journey was still happening, heavy rain on the express highway, land slide and then a big time traffic jam. Somehow reached the airport in time though it took 2 hours more than usual. Every new such obstacle was making me more n more happy … life was still happening. Nothing had ended. There was another surprise waiting for me at the airport though.
HRITIK ROSHAN!
Damn … I saw him there. Just few meters away. Why the heck all these stars come across me when I am in no good mood. But one thing for sure … boss … what a personality!
Happening Journey, it was. It was just the beginning. I was perhaps back to Good'ol messy days.
Before leaving home, I had an intuition, instinct that I might forget my jacket somewhere. All the while when I was enjoying the time convincing myself that I am back in those Good'ol days, I realized that I actually did not take my jacket back from baggage checking. I was literally waiting at the gate for an hour and when final boarding announcement was made, it struck to me that I forgot the jacket way back at the baggage checking! Thrill continued … I ran back again to the counter. I got the jacket back … reached back and got the privilege again to be the last person to enter the flight. :-)
Somehow God made sure that my mind is always occupied by something or the other and the journey becomes happening. Otherwise … empty mind is always devil's home. Perhaps God was either fed up or scared of my Davil's home.
The new journey has started but in a same old happening way. Maybe somewhere in my mind there is a desire of doing something good for a change for someone somehow. Maybe it is a feeling of compensating for something wrong, I might have done in past to someone. This is the spice of life … you find things in a way you want them to be. Now when I look at it, it is actually about what you want to feel rather than what you feel. And today I want to feel it in this way. Things always happen in a way you want them to see. Is it really about the wet passport, missed bus, traffic jam or that jacket mess that made the journey happening? Perhaps not. Things might anyway had happened in the same way. But today the way I am reacting to them is what I have decided for myself.
Things might just go off if we react by saying what a mess! Wet passport! But perhaps today I have decided to enjoy each n every bit of it. Someone has taught me to live the life as if it is the last day. You never know if you would get chance to react to such scene again. So react in a best possible way - we are actually on the spree of creating memories. These are the things, we might remember a few years down the line. Why spoil them now?
At times nature throws some very interesting riddles which when you solve, you realize in very straight and hard way that even you are human and no great. More you struggle to digest this fact, more ordinary you become.
Yes … journey has started …! Someone once said to me … "I am done with my life" and I had hated that sentence a lot! Somehow it is still there in my mind. And not I am just making sure that nobody would say that ever again after meeting me.
Saturday, June 09, 2007
तन्वी ...
"नायक आणि त्याची प्रेयसी."
"ओये हिरो … ये किस्से सभीको सुनाते नही है. मगर दोस्तोसे छुपाते नही है. सांग पटकन"
"अरे कोणी नाही रे. असेच सुचले आणि लिहीले"
बऱ्याच जणानी विचारले या 'भानगडी'बद्दल. काय ताप आहे खरच. कोणाला काही असेच नाही काय वाटू शकत? कोणीतरी मुर्तरूप पाहीजेच कल्पनेला असा का अट्टाहास? मी तर म्हणेन, जे खरोखर लफड्यात असतील ते असे काही लिहणे शक्यच नाही. साधे लॉजीक आहे, पोरीला फिरवतील की ब्लॉग लिहीत बसतील? तसे चोर सगळेच पण हे आमच्या सारखे संधी न मिळालेले चोर असतात ते ब्लॉग मधे प्रेम वगैरे करतात. मग उगाच लोकात हव्वा! चर्चा. किसका फाट्या, किसका तुट्या? परत फ्रीडम आहेच की!
तर मुद्दा असा, की माझ्याही त्या कवितेला कोणी मुर्त अशी प्रेरणा नाही. म्हणजे आमच्या कॉलेजच्या भाषेत सांगायचे झाले तर प्रेरणा भोसले नाही. पण हो कोणीतरी आहे. मुर्त नसेल म्हणून काय! कल्पना आहे
तन्वी.
(समस्त ऊपस्थीतांच्या विनंतीला मान देऊन, तन्वी बद्दल काहीतरी लिहायचेच होते. आणि आता या Newark airport वर करायलापण काही नाही. म्हणून लेखक परत जागा झालाय. थोडेसे विस्कळीत आहे लिखाण पण जसे मनात येईल तसे लिहीतोय. चूकभूल द्यावी घ्यावी. चुक असेल तर तो स्टारबक्स कॉफीचा परीणाम आणि भूल असेल तर तो घरी जातोय त्या खुशीचा परीणाम)
तर तन्वी - या नावाची उत्पत्ती हा जरा संशोधनाचा विषय आहे. पण सुरूवात 'तनू'पासून झाली. सुमारे ३-४ वर्षापुर्वी. नाशिकमधे असताना. माझे एकटेपण - ही बाकी गोची मला अद्यापही उलगडली नाहीए - मला जिथे कुठेही पाठवतात किंवा जावे लागते तिथे एकटेच का जावे लागते कळत नाही. म्हणजे दरवेळी नवा गडी नवे राज्य. आणि राज्य बसले की झाले - राजाला धाडतात आणखी कुठेतरी… असो - म्हणजेच तनहाई, आणि या शब्दाचे तनू या नावाशी साधर्म्य या सगळ्यातून तनू उगवली. मै और मेरी तनहाई म्हणताना उगाचच मग मी आणि माझी प्रेयसी म्हणल्याचा भास होऊ लागला. आणि मग ही तनू किती दिवस तनू राहणार? मग तिला नावपण दिले. तन्वी.
त्यापुढे, कधीही एकटे वगैरे पाडले कोणी की ताबडतोब तन्वीला हाक आणि लेखक जागृत. पुर्वी फारसा लिहायचो नाही, हे भूत अत्ताचेच पण विचार करायला कोण बंदी घालतो. एकदम कोल्हापुरी भाषेत सांगायचे तर, घुमीव गाडी, रचीव किस्सा! सध्या फक्त हे किस्से ब्लॉगमधे उतरतायत एवढेच.
जे काही आवडेल, ते सगळे तन्वीचे गुण. कधी हवे तेव्हा बोलवा कधी हवे तेव्हा विसरून जावा. कधी काही ऐकायची हौस असेल तर तेही तिच्या तोंडी द्या. तसेच आली लहर समुद्राकाठी फिरायची. आता एकटा कशाला फिरू. म्हणून आणले तिला बरोबर. केली कविता … लिहीला ब्लॉग. आणि मग झाली हव्वा. काही दुर्भागी लोक असे असतात की याच्या अफेअर बद्दल तमाम जनतेला कायम उत्सुकता लागून असते. नुसतीच हव्वा. यांचे कुठे ना कुठे तरी काही भानगड असणारच अशी मुलीना मनापासून खात्री. म्हणून कोणी मुलगी यांच्या वाट्याला जात नाही. बाकीच्यानाही हीचखात्री. म्हणून तेही जासूसी करायचेही सोडत नाही. अशतलाच मी एक आहे. :-) आणि बिचारी तन्वी या सगळ्याला साक्षीदार.
तशी ती बऱ्याच गोष्टीना साक्षीदार आहे. ईथे जेव्हा कॉर्नफ्लेक्स मधे दुधाऐवजी ताक घातले तेव्हा वेड्यासारखे एकटेच हसताना ती होती. साठा उत्तराची कहाणी असो किंवा त्याची न मिळालेली पाच उत्तरे असो - हे सगळे लिहून झाल्यावर हिरमुसून गेलेल्या लेखकाबरोबर ती होती. एवढेच काय? तर मागच्या वर्षी बॅंगकॉक च्या टर्मीनल वर अमिताभ बच्चन शेजारून गेला तरी मागे पळत जाऊ नको अधाशासारखे सांगताना पण ती होती. पुढे अरे वेड्या जायचास की हात तरी मिळवायला असे ओरडतानाही ती होती. जकर्तामधे ईंटरनॅशनल फ्लाईट डीले केल्यावर उगाचच विजयी मुद्रेने हसणाऱ्या माझ्याकडे 'आता शांत व्हा राजे, फार काही मोठे दिवे नाही लावलेले' हे हसत सांगतानाही ती होती. पुण्याच्या ई-स्क्वेअर मधून फिरताना, भाव खात ऍटिट्यूड दाखवणारीपण तीच होती. एवढेच काय तर त्या पोरीबरोबर फिरू नको, तू आणि ती दोघेही पस्तावाल असे सांगतानापण ती होती. आणि पुढे तसेच झाल्यावर आता ऊठ आणि परत लढ म्हणून सांगताना पण तीच होती.
मला उगाचच गोष्टी त्रयस्थपणे कशा दिसतात बघायची सवय आहे. आणि कदाचीत या त्रयस्थपणाला माझ्यालेखी नाव आहे - तन्वी. आयुष्याची ही मजा आहे. माझ्याच बाबतीत म्हणायचे झाले तर, मी जसा नाही तसा ईतराना हमखास भासतो. म्हणजे मी शारीरीक आणि मानसीक दोनही बाबतीत कमजोर आहे. पण हे कधी कोणाला पटतच नाही. माझा अगाऊपणा असेल कदाचीत. आले मनात की मार ऊडी बाकीचे निस्तरू नंतर - हा ऍटीट्युड असेल. फुकट सल्ले लोकाना देऊ करण्यात एकदम पटाईत. घडल्या गोष्टी की मग बघत बसतो त्याच्याकडे. मग स्वतःचीच समीक्षा. आणि स्वतःचीच टीका. आणि तन्वी. काहीतरी असते प्रत्येकाच्या मनात जे कायम सांगते की "थांबलास की संपलास" "कीप गोईंग" "लढ" "तू करू शकशील, नाही तर निस्तरू की नंतर"- कदाचीत एक चेतना - माझ्यासाठी तन्वी.
काही लोकांशिवाय मी आजीबात राहू शकत नाही. आणि मी त्यानाच दरवेळी दुखावतो. मला पश्चाताप आवडत नाही पण दरवेळी तोच वाट्याला येतो. मला एकटे रहायला आवडत नाही पण अनेक वेळा माझी पुढची पायरी कुठेतरी नव्या ठीकाणी नेवून टाकते. परत आलो की पुन्हा ये रे माझ्या मागल्या. तन्वी आणि तिच्या बरोबरच्या या सगळ्या कथा, या अश्यातून तयार झालेत. प्रचंड आनंदी आणि भरपूर मित्रांच्यात असलो की ही कधीही येत नाही. किंवा माझा स्वर्थ असेल हा तिला न आणण्यात. पण गरज पडली की मात्र हमखास येते.
आता आजही या टर्मीनलवर ६ तासाचा ब्रेक आहे. उगाच काही न करता बसलो तर परत विचार चक्र सुरू होईल. नाही ते भरकटलेले विचार. मग बोलावले तिला. म्हणालो बस माझ्या समोर. तुझ्याबद्दल लिहायचेय. ती कधीही त्रस्त असत नाही. ती कधीही लाचार दिसत नाही. ती कधी नाही म्हणत नाही. पण ती कशी आहे विचाराल तर सांगताही येत नाही.
I can't describe her, but I can feel her. हे असले वाक्य कोणाला पटायची अपेक्षा करत नाही पण काही अंशी खरच खरे आहे ते. बऱ्याचदा वाटते की आपल्या आयुष्यावर आपला ताबा नाहीए. वादळात गळून पडलेल्या पानासारखे आहे. जिथे नेईल वारा तिकडे जाईल. आता कदाचीत ही आई बाबांची पुण्याई असेल की हे वादळ मला कधी चुकीच्या ठिकाणी घेऊन नाही गेले. पण म्हणूनच माझ्या तन्वीकडे मी जबरदस्त महत्वाकांक्षा पाहतो. काहीतरी लक्ष्य पाहतो. ते मिळवण्यासाठी काहीही करायची जिगर पाहतो. आपल्याला कधी कुठे काय करायचेय हे तिला अचूक माहीत आहे. माझ्यासारखी भरकटलेली नाही ती. जे काही मला माझ्यात नाही असे वाटते ते तिच्यात घालून मोकळा होतो.
शाहरूख खान साहेबानी आयष्य बरच सोपे केलेय. सगळ्याप्रकारच्या भावनासाठी काही ना काही डायलॉग आहेच.
मै आंखे बंद करता हू, तो तुम्हे देखता हू
आंखे खोलता हू, तो तुम्हे देखना चाहता हू,
जब तुम साथ नही होती
तब तुम्हे अपने चारो तरफ मेहसूस करता हू,
अब ईसे प्यार कहो, पागलपन या मेरे दिलकी धडकन,
एकही बात है.
एकदम सगळे असेच नाही पण चारो तरफ मेहसूस वगैरे करणे या भनगडी होतात - पण जेव्हा गरज असते तेव्हा! आणि मग ईसे प्यार, पागलपन वगैरे नावे देण्याचा अट्टाहास मात्र होत नाही. नाहीतर उगाच केमीकल लोचा वगैरे व्हायचा.
असो … फ्लाईटची वेळ होतीये आणि मी कारण नसताना कनेक्टींग फ्लाईट असतानाही टर्मीनल सोडून बाहेर आलोय. उगाचच हसू येतेय … आता पुढे काय काय होणार आहे याची कल्पना करताना.
आणि हा … पुढच्या नाट्याला तिही असेलच साक्षीदार.
Sunday, May 27, 2007
Drive to Bigsur
घरी जायच्या आधीचा शेवटचा वीकेंड… म्हणून कुठे ना कुठेतरी जायचेच होते. थोड्या फार चर्चेनंतर बिग्-सर नावाच्या एका ठीकाणी जायचे ठरले. अभिजीत, संदीप, राहूल आणि मी. करायचे काय याचा काही खास प्लान नव्हता पण एक छान ड्राईव्ह आहे एवढेच माहीत होते. आणि तेही बे च्या बाजूने. या गोष्टी बहुधा अमेरीकेतच करायचे सुचते. कधी पुण्यात असताना ड्राईव्हला वगैरे जायच्या चैन्या सुचायच्या नाहीत. चैन्या म्हणता येणार नाही खरं. पण एकूणच असे कधी केल्याचे स्मरत नाही. रवीवार संध्याकाळी काम सुरू होते म्हणून शनीवार नक्की झाला. सकाळी ९ वाजता. तसे शनीवारी सकाळी ९ ला उठणे हे आधीच जरा धाडसी होते. पण प्लान करताना एकंदर सगळ्यांचा उत्साह असतोच जोरावर. ठरले मग … सकाळी ९ वाजता निघायचे. सांताक्रूझ ला धडक मारून पुढे बिग्-सरला जायचे ठरले.
माझी सकाळ झाली ८ ला. नेहमी प्रमाणे उठेपर्यंत साडे आठ वाजलेच. ईथे आल्यापासून फक्त दोनदाच घरी असताना आत्तापर्यंत शनीवारी ईतक्या लवकर उठलो असेन. एक - एकदम पहिल्या दिवशी - जेव्हा अलेलो ईथे तेव्हा. आणि दुसरे आज. सगळे प्रातर्वीधी उरके पर्यंत ९ वाजून गेले. लॅपटॉप असल्याचा हा असा फायदा होतो. कुठेही असा. काहीही करा - always connected. कमोडवर किंवा जेवणाच्या टेबलवर, त्या लॅपटॉपला कशाचा काही फरक पडत नाही. आपण कशाला मग भेदभाव करा. एकूण सगळे सुरू असताना ५-६ जणाशी चॅट करून झाले. साडे नऊला अभिजीतचा फोन. फोन घेताच मी म्हणालो, "अरे कुठे आहात तुम्ही? मी ५ मिनीटमधे तयार होतोय". ५ मिनीटात तयार कोणी होत नाही हे जरी माहीत असले तरी ही अशी आता पद्धत झालीये बोलायची. जो पहिल्यांदा बोलेल त्याला advantage. उगाच वेळेचे महत्व असल्याचे बिरूद घेऊन मिरवता येते. असो … अभिजीत कडून कळाले की संदीपचा काहीच पत्ता नाहीए. फोन पण उचलत नाहीए. झाले. ९ चा धाडसी "प्लान" आता साडे नऊ झाले तरी प्रत्यक्षात येईल असे काही दिसेना. पुढे साडे दहा पर्यंत प्रयत्न झाले, संदीपला संपर्क करायचे. आवरण्यात पण एक शिथीलता आली. ऊशीर झालेलाच आहे आणि आपल्यामुळे नाही झालेला ही कल्पनाच ईतकी सुखावणारी होती की ही शिथीलता आपोआपच आली.
मधेच संदीपला सोडून जायची आयडीआ आली. ईतक्यात संदीपचाच फोन. "अरे आज जाना नही है क्या? मै कबसे वेट कर रहा हू!?" बाकी पुढचे प्रेमळ संवाद काही लिहायची गरज नाही. शेवटी साडे बाराला "प्लान" प्रमाणे प्रवास सुरू झाला.
मेमोरीयल डे सोमवारी. (हा शब्द मला कोथरूड डेपो जवळच्या चहावाल्याची आठवण करून देतो. त्याने लिहीलेय - बाहेरीयल पदार्थ खाण्यास मनाई आहे! असो, आता कुठी काय आठवावे याला काय बंधन). तर मेमोरीयल डे. तो आहे सोमवारी. अजून कोणी मला समजेल असे उत्तर नाही दिलेले की काय असतो हा डे. पण त्यामुळे लॉंग वीकेंड मिळालाय. रस्त्यावर त्यामुळे गर्दी होती. जणू सगळेच त्या बिग्-सर कडे निघालेले. बसल्या बसल्या उगाच प्रयत्न केला, काहीतरी नॉस्टाल्जीक वगैरे वाटून घ्यायचा. दोन दिवसात परत जाणार मी म्हणून. पण काही केल्या जमेना. परत तेच. कधी काय वाटावे त्यावर काय बंधन?
शेवटी ड्राईव्ह साठी आलेलो … त्याचीतरी मजा घ्यावी असे ठरवले. बाहेर खरच सुंदर दृश्य होते. बे च्या बाजूने रस्ता होता. अलीकडे उंच कडा. काही ठिकाणी वस्ती पण. आणि दुसरी कडे समुद्र… बीच … वाळू. मधेच मला माझी कवीता आठवली. पण बाहेरचे सगळे जरा जास्तीच छान होते. कविता वगैरे कधी विसरली कळालेच नाही. परत त्या पाण्यात … त्या कड्यात … त्या नागमोडी वळणात … खिडकी उघडल्यावर कानापाशी येऊन ओरडणाऱ्या त्या वऱ्यात … एकुणच त्या निसर्गात बुडून जावे वाटत होते. पोटभर श्वास घेण्यात काय मजा आहे हे या अशा वेळी कळते. किती श्वास घेऊ तितके कमीच. पोट भरतच नाही. प्रत्येक श्वासागणीक मन अधीकाधीक ताजं होत जातं. ताशी ६० च्या वेगाने जाताना मात्र हे वारे बाकी लोकाना त्रास देऊ लागले. नाईलाजाने खिडकी बंद करावी लागली आणि त्या आळणी ए.सी. ला शरण गेलो.
मधेच डाऊनटाऊनला थांबलो. थोडीशी पोटपूजा वगैरे उरकून पुढे बोर्डवॉकला गेलो. आपल्याकडची जत्रा असते तसे काहीतरी होते. पण बीच च्या बाजूला. ईकडे समुद्र आणि बाजूला जायंट व्हील. त्या मोठाल्या राईड्स. पाण्याचा आवाज आणि त्या राईडमधल्या लोकांचा आवाज एकमेकाला स्पर्धा करत होते. जत्रा तीच पण उगाचच यामुळे वेगळी वाटली. सध्या समर टाईम असल्याने काही फारशी मजा नाही बीचवर हे मत संदीपने एव्हाना दहावेळा सांगून झालेले. तशी खरच मजा वाटत नव्हती. सगळे जसे काही आपापले विश्व करून होते. कोणी दोघे डीस्क टाकून खेळत होते. कोणी आपल्या मुलाना घेऊन पाण्यात जात होता. कोणी वरती पुलावर उभा राहून सी लायन्स चा अवाज ऐकत होता. पुलाच्या … म्हणजे व्हार्फच्या टोकाला पाण्यात गळ टाकून बसलेले. कोणी गाडीची सगळी दारे खिडक्या उघडून, तिथेच बाहेर खुर्ची टाकून सह कुटुंब बसलेले. पण सगळे एकमेकापासून "सुरक्षीत अंतर ठेवा" अशी पाटी लावल्याप्रमाणे अलीप्त. काहीतरी वेगळे वाटले मात्र. कळाले नाही काय ते. पण काहीतरी वेगळे होते. तसे कशाला कोण दुसऱ्याच्यात लुडबुड करतो. पण तरीही. जरा जास्तीच अलीप्त होते सगळे. किंवा मीच अलीप्त होतो. या सगळ्यात मिसळत नव्हतो. काही नक्की कळाले नाही.
आम्ही पुढच्या ठिकाणी जायला निघालो.
बीना पार्कींगचे पैसे देता आलेलो. परत गेल्यावर तिकीट मिळाले असेल या विचारात आलो. ईथे ती एक मजा नाही. म्हणजे, पोलीसाने पकडावे, मग विचारावे, "काय रे? लायसन्स आहे काय?" पर्कींगचा पंगा असला तरी काय? पोलीस म्हणला की त्याने लायसन्स न विचारवे म्हणजे शान के खिलाफ! मग जरा घासाघीस. जरा ओळख पाळख. ईथे तसे काही नाही. सरळ तिकीट लावून पोलिस गायब. पुढे तुमची जबाबदारी पैसे भरायची. घासाघीस राहूच दे … पण बोलायची पण संधी नाही मिळत. पण सुदैवाने आम्हाला असे काही तिकीट वगैरे मिळाले नव्हते. कदाचीत कोणी पोलिसाने बघायच्या आधी आम्ही परत अलेलो. बरे झाले, उगाच बोलायची संधी नाही मिळाली म्हणून वाईट वाटायला नको!
गाडी परत सुरू. परत त्या बिग्-सर च्या ड्राईव्हवर. परत त्याच रस्त्यावर. बे च्या बाजुने. बीच बघत. परत कानात वारा. शेवटी एका ठिकाणी थांबलो … कॉफी साठी. "One café mocha, one hot chocolate, one cappuccino and one red wine". बरोबर चिकन वगैरे होतेच. शेजारी समुद्र. हलकासा वारा. गप्पा रंगल्या. चेष्टा मस्करी सुरू झाली. वेळ झटक्यात उडाला. या अशा हवेत, पाण्याजवळ वगैरे मस्त भजी किंवा मिसळ पाव खाण्याची काय मजा होती ते आठवले. रंकाळ्यावर फिरताना हातात भेळ खाताना कधी वाटले पण नव्हते की आपण हे मीस् करू. ईथे ते तपरीवर उभा राहून पाणी पुरी किंवा भेळ खाण्याचे सुख नाही. सुखाच्या कल्पना जिथल्या तिथल्या वेगवेगळ्या.
बसल्या बसल्या समोर एक लहानशी टेकडी दिसत होती. टेकडी नाही म्हणता येणार कदाचीत. समुद्रात सरळ उभा आणि उंच असा दगड. तिथे जायची एकदम लहर आली. एकदम उंच. त्याच्या टोकावर. सगळे बाहेर पडलो. निम्म्यापर्यंत सगळेच होतो, पण पुढे बाकी कोणी आले नाही. संध्याकाळपण झालेली. दिवसभर गाडीला भिंगरी लावल्यागत फिरत होतो, म्हणून जरा शीण आला होता. पण काही केल्या त्या टोकावर जाऊन १ सेकद तरी का होईना, ऊभे रहायची ईच्छा जाईना. परत तेच … आता कधी काय वाटावे यावर काय बंधन. बाकी कोण आले नाही, पण मी उगाच स्वतःचे समाधान करायला म्हणून गेलो पुढे.
झपा झप पावले ऊचलली. बघता बघता चढलो वरती. एकदम ऊंच. सुसाट वारे. एकदम बेभान होऊन वाहणारे. कसाबसा ऊभा राहीलो. समोरे अजस्र समुद्र. काय म्हणू त्याला? अथांग … प्रचंड … अजस्र … काहीच सुचेना. सगळे शब्दच तोकडे वाटत होते. कोणा एका विराट दैवी शक्तीला शरण गेल्यासारखे थोडा वेळ आहे तसाच स्तब्ध झालो. तो मोठाच्या मोठा जलाशय आणि मी. ऊगाचच काहीतरी बोलतोय असे वाटले. (परत तेच … कधी काय वाटवे!). मधेच खाली लक्ष गेले. मी अगदी टोकावर ऊभा होतो. एक पाऊल पुढे आणि खाली काहीच नाही. एकदम स्टीप का काय म्हणतात तसे. जोर जोरात लाटा धडका मारत होत्या खाली. चारीकडून त्यांचाच आवाज. एकच जल्लोष सुरू होता. ऊनाड नाचत होत्या. काही व्रात्य होत्या त्या ईथ खाली येऊन धडक मारत होत्या. जसे काही झाडावरून नारळ पाडायला हत्ती ढूशा मारतोय. अविरत. जसा काही तोच धर्म त्यांचा. मी ऊगाचच विजयी मुद्रेने बघीतले खाली. थोड्या वेळात परत नजर वर आली. आणि परत बुडून गेलो त्या निसर्गात. त्या वाऱ्यात. एकूणच सगळ्यात, फक्त त्या खाली धडक मारणाऱ्या लाटा सोडल्या तर बाकी सगळ्यात.
का कूणास ठाऊक, पण समुद्र, किंवा कुठलाही मोठा जलाशय किंवा जोराचा पाऊस आणि माझे काहीतरी नाते आहे. एक विलक्षण उत्साह देऊन जातात या गोष्टी. एकदम instant. सेल चार्ज व्हावा तसे. शवासन करताना एक सांगीतलेले कोणी, मन म्हणजे एक पोकळ नळी सारखे बनू द्या. जे विचार आत येतील त्याना येऊ द्या. जे जातील त्याना जाऊ द्या. कशावरही ताबा मिळवायचा प्रयत्न नको. कशातही गुंतू नका. हे कधी शवासन करताना जमले नाही. पण हे असे ईथे हे चटकन जमते. होऊनच जाते आपोआप. मन मुक्त झाल्यासारखे. समोरून येणारा तो सुसाट वारा जसा काही या नळीमधूनच आरपार होतो. झरझर बरेच विचार आले … अगदी काहीपण … निरर्थक … किंवा कसेही … पण मन कशातच गुंतले नाही. थोड्याच वेळात नळी पोकळ झाली. एकदम होलो. आणि मग ते पाणी आणि मी. त्या शक्तीला शरण गेलेला.
हे सगळे केवळ ५-१० मिनीट मधे घडले. पण बरेच काही घडून गेल्यासारखे भासले. मागे ऊभे असलेले माझे मित्र हाक मारत होते. मन नव्हते पण खरच जायची वेळ आलेली. मनातच विचारले मी त्या शक्तीला. काय देऊ मी तुला? कशी करू परतफेड? … पण देणार तरी काय? तिथून खाली उतरताना वाटत तर असे होते की मला सगळे तर ईथूनच मिळालेय. पुढे होईलच भेट परत. कुठेतरी. बघू हे उत्तर तेव्हा सपडते का.
जसा जसा खाली उतरलो, तस तसा मी परत माणसात येऊ लागलो. परत सगळे भरकटलेले विचार, कल्पना, परतीची फ्लाईट, पुण्यात जाऊन काय काय करायचे याची यादी, काम, प्लान्स, घर, मित्र, मैत्रीणी, लफडी, काम …. या अश्या बऱ्याच सगळ्याने मन चटकन व्यापून टाकले. अंधूकसा अजुनही मनात होता तो मगासचा अनुभव. काश … कॅमेरा असे अनुभव पण टिपत असता!
काहीतरी देण्याचा तो विचार … तोही होता मनात. पण आता खाली उतरलेलो. तशी विचाराचीपण पातळी खालावली. काहीच नाही तर ब्लॉग मधे जागा देऊ असे ठरवले.
राजा ऊदार झाला आणि …
आता मी पामर आणि देऊ तरी काय शकणार!
आता घरी येऊन ४-५ तास झालेत. रात्रीचे (किंवा पहाटेचे) ३ वाजलेत. मी अजुनही त्याच दगडाच्या टोकावर ऊभा असल्याचा भास होतोय. मन तिथून बाहेर येतच नाहीए. ती उतारावरची पिवळी, केशरी लहान लहान फुले अजुनही डोळ्यासमोर येताहेत. त्या खाली धडक मारणाऱ्या लाटांची दया येऊ लागलीये. उगाचच खुन्नस देत होतो त्याना. काय सांगावे, कदाचीत मला पाडायचा हेतू नसेलच त्यांचा. मांजर नाही पायात घुटमळत? ढुशा मारत? कदाचीत त्या लाटा पण तसेच काही करत असाव्यात. त्याना परत एकदा जाऊन हे सांगावे असेही वाटतय. हा हा … कधी काय वाटावे, काय नेम?
बाकी विचाराचा कचरा होताच मनात. शवासन करायचा प्रयत्न केला. कधी झोप लागली कळालेच नाही. पण रात्रभर मी त्या समुद्राच्या तिथेच होतो.