Monday, March 23, 2015

Change The World... the poor world!

I visited the science museum yesterday, they had a section that said, Things That Changed The World! Almost everyone who did something significant in the field of science so far was there.

While I enjoyed my time there, on my way back, I found it a little amusing to see our infatuation to Change The World! The World seems like an IT job that everyone wants to change, every time they got hang of it! At times we almost treat The World like a dirty pair of pants, everyone seems to be in a hurry to change!

Aren't we too harsh on this poor World? No matter what this poor guy does, people are desperately after changing him! His quest to be better is like our endless chase to the good appraisal!


It has become so obvious that when you type in "Change The " in Google then even Google also suggests to Change The World before anything else! You turn on the TV, read the news paper or go to social media - people are either talking about the people or the new projects coming up to Change The World or the old ones that already Changed The World - almost at the same time! And nobody seems to see the contradiction!

With this rush, I am sure this poor World must have gone through identity crisis for a thousand times every year! Hoping at least this time, people would stop and say this is the final change! It's like that client who tricked you into a fixed price project and now submitting change requests after change requests, keeping everyone wondering, when is the final release!

I have also heard that the schools and colleges welcome the new students, giving them a hope that they would change The World some time and Then the institute would be so proud!
Seriously?
Isn't it like taking The Mess a little too much for granted?
I mean, it's like turning schools into a machine to produce people hoping for or hoping to Change The World!

At times, I feel, if someone announces that, The World is Perfect, half the population would go out of job or under depression!

Wonder if there was a place that taught how to be part of The World instead.
Now that will surely Change The World!

Tuesday, March 17, 2015

आयुष्यावर बोलू काही...

एक म्हातारा दिसला मला कॅफे मध्ये आज. जरा त्रस्तच होता. त्याच्या बोलण्यावरून तसं जाणवत होतं. माझ्याहून दूर बसलेला. काय बोलतोय ते ऐकू येत नसलं तरी तावातावाने जे हातवारे करत होता ते नजरेतनं सुटणं अशक्य होतं. राहून राहून त्याच्याकडे नजर जात होती. कॅफेमध्ये जे Jazz म्युजीक सुरु होतं त्याच्या तालावर या म्हाताऱ्याने कोणालातरी फैलावर घेतलेलं!

म्हाताऱ्याचे कपडे मळलेले. खूप दिवस कपडे धुण्या बिण्याच्या भानगडीत पडलाच नसावा. किंवा इथं येऊन बोलत बसण्यासाठी कपड्या बिपड्याचं भान सोडून आला असावा. दर दोन मिनिटाला भुवया वर खाली करत होत्या. घडी घडी हातोप्यातून बाहेर येऊन, त्याची बोटं कधी समोरच्याच्या तर कधी बाजुच्याच्या नाकावर वार करत असल्यासारखी वाटत होती! सरल्या आयुष्यातल्या घडल्या गोष्टींचा हिशोब मांडल्यासारख्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या!

डिस्टर्ब करणारा भाग वेगळाच होता. हा म्हातारा एकटाच बसला होता. त्याच्या ना पुढे कोणी होतं की ना बाजूला!

सुमारे १५-२० मिनीटे त्याचा हा सगळा प्रकार सुरु होता! त्यानंतर म्हातारा निघायला उठला. कदाचित त्याला जे बोलून टाकायचं होतं, ते एकदाचं झालं असावं. केव्हाचं उरलेलं, पदरात साचलेलं, निचरा करायचं राहून गेलेलं, त्यातलं थोडसं का होईना त्या कॅफेमध्ये सांडून झालं असावं.

किंवा कॉफीचा कप रिकामा झाला असावा आणि आता दुसरा घ्यायला खिशामध्ये काही उरलं नसावं.

तो उठला आणि तसाच तंतरत निघून गेला. थोड्या वेळाने त्याच्या जागी आणखी कोणी येऊन बसलं. आणि त्यांच्या गप्पा रंगल्या. गप्पा होण्यासाठी तर असतात कॅफे! नाही?


कॅफे मध्ये अजूनही jazz म्युजीक सुरु होतं. मी ज्यांची वाट बघत होतो ते दोघेही येऊन पोचले होते. त्यांचं बाळ आता ६ महिन्याचं झालेलं. बोलायला काहीही येत नसलं तरी आपल्या आई बाबांनी आपलं ऐकावं असं त्याचं म्हणणं होतं. दर पाच मिनिटांनी त्याचा बाबा त्याच्याकडे बघून "हो क्का? बर हं!" अशी मान हलवायचा. त्या बाळासाठी तेवढी acknowledgement पुरेशी होती.

थोड्या फार गप्पा मारून आम्ही तिथून निघालो. मी मझ्या ट्रेन मध्ये बसलो. डोळे बंद केले. डोकं मागे टेकलं.

आयुष्याच्या अगदी दोन भिन्न टोकांवर उभ्या असलेल्या या दोन जीवांच्या बोलण्याच्या, व्यक्त होण्याच्या, या desperation ला पाहून, थोडा वेळ का होईना मलाच निःशब्द व्हायला झालं.

Sunday, March 08, 2015

Happy Woman's Day च्या निमित्तानं

(जरा फुरसातीमध्ये वाचण्यासाठी आणि बघण्यासाठी. म्हणजे आपण एक सिनेमा किंवा नाटक बघायला कसा वेळ काढून जातो? तसं. हे बघायला सुमारे ७० मिनिटाच्यावर वेळ लागायचा नाही. त्याहून कमी वेळात संपवूही नये ही विनंती. मला जे काय काय दिसलं, ते सगळं समोर ठेवतोय. त्यातून तुम्हाला काही वेगळं दिसलं तर जरूर सांगा. बाकी मी या विषयामधला पंडित नव्हे. म्हणून काही चुकलं असेल तर तेही सुधारून खाली लिहून पाठवा.)

महर्षी कर्वे जेव्हा शाळेच्या पुस्तकामध्ये आले, तेव्हा प्रथम झलक मिळाली "स्त्री" या प्रकारची. समाजातला शोषित, पिडीत आणि दुबळा घटक असं शाळेत सांगितलं. आपण ताबडतोब पडताळून बघितलं. वर्गातल्या मुली तर अजिबात गरीब वाटल्या नाहीत. घरी बहिण तर प्रसंगी बेदम मारायलापण मागं पुढं पहायची नाही. त्यामुळे तिनं दुबळं असायचा प्रश्नच नव्हता. या पलीकडे मुलगी कोणाला माहिती? पण परीक्षेत मार्क्स मिळवायचे होते. मग जे पुस्तकात वाढलंय ते मुकाट्याने गिळून आम्ही पुढे गेलो. आता ती तेव्हा झालेली ओळख, खरी समजायला बरीच वर्षं उलटायला लागली.

या दरम्यानच्या काळात हा शोषित, पिडीत विषय वेगवेगळ्या प्राकारे पण तितक्याच प्रखरतेनं पुढे आला. आणि जसा पुढे आणण्यात आला, तसा आम्ही गिळत आलो. जे म्हणाल ते सही. जे दाखवाल ते सही. पण मग शेवटी एका टप्प्यावर आल्यावर कळलं की हे दिलेलं मुकाट्यानं गिळायचं थांबवलं नाही तर भलतंच काहीतरी गणित चुकणारे.

आपाल्याला स्त्रियांच्या वरचा अन्याय कळला. त्यावर काम करणारे लोक समजले. आपण काय करावं, काय नाही करावं हे समजलं. आपल्याबरोबर बाकीच्यांना कसं शहाणं करायचंय तेही कळलं. हे सुरु असताना, आम्ही ज्यांच्याकडून पेपर/टीवीवरुन मतं उसनी घ्यायचो, त्यांच्यापैकी काही लोकांना क्रांतिकारी व्हायची घाई झाली. आणि आमचा स्वतः विचार करण्याचा आळस उघड्यावर पडला. मुख्य मुद्दा सोडून आपण भलतीकडेच शिरा ताणून भांडतोय हे लक्षात येऊ लागलं. थोडंफार ठेचकाळत, थोडं फार धडपडत मग अक्कल आली. कोणाचं ऐकायचं. किती ऐकायचं. काय ऐकायचं. याचं भान येऊ लागलं.

हे सुरु असताना. एकदा वाटलं की आपल्यापेक्षा प्रगत असे खूप देश आहेत. तिकडं काय सुरु असेल? त्यांनी सोडवले असतील हे प्रश्न? त्यांच्याकडंही त्यांचे लोक त्यांच्या देशाला नावं ठेवत असतील? त्यांच्याकडून आपल्याला काही शिकण्यासारखं आहे का? हे सगळं बघता बघता जे जे समोर आलं त्यामध्ये काही वेगळे विषय कळले. काही सुरेख काम करणारी माणसं, संस्था समजल्या. आणि आपल्याला अजून खूप काही अभ्यास करावा लागेल हेही समजलं.

असो, आता नमनाला घडाभर तेल घालत बसत नाही. सुरु करतो या दोन संस्थांपासून.

आपल्याकडं सडक-सख्याहरी असतात न. तशा लोकांना ताळ्यावर आणायला www.stopstreetharassment.org, www.ihollaback.org सारख्या संस्था अमेरिकेत काम करतायत. त्यांनी मध्यंतरी एक विडीओ बनवला - एक मुलगी न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून दहा तास चालत गेली तेव्हा अशा या सडक सख्याहरीनी काय काय कॉमेंट पास केले ते रेकॉर्ड करत.


एकानी हे असं बनवलं.
Things men say to women

हे थांबवण्यासाठी बऱ्याच संस्था आता कार्यरत आहेत. त्यापैकीच एकानी हे बनवलंय.



लोकांना हे सांगणं, शिकवणं, याला पर्याय नाही.

थोडक्यात "Let's make our streets safer!" ही थीम थोड्याफार फरकाने जगभरामध्ये आहे. याचा इलाज आपल्या सगळ्यांनाच शोधायचाय. हा प्रश्न सोडवणाऱ्या लोकांची खूप माहिती या दोन संस्थांच्या वेबसाईट वर आहे.

स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय यावर खूप वेगळे वेगळे विचार आहेत. म्हणजे समजा एखादी स्त्री पोलीस बनून सिंघम सारखी गुंडांना हाणायला लागली, की तिने पुरुषाची बरोबरी केली, असं म्हणू का? आणि हे म्हणणं जितकं चुकीचं आहे तितक्याच चुकीच्या कल्पना घेऊन काही लोक फिरताना बऱ्याच ठिकाणी आढळतात.

मुलगी म्हणजे काय आणि मुलगा म्हणजे काय, यावर आपण पुढे येउच. पण तुरतास हा एक थोडा डीटूर घेऊ, जॉन ऑलिवरच्या या विडीओ मध्ये.


ही एक मजा आहे. आपण software अपडेट केलं की त्यातले bugs अपडेट होतात यातला थोडासा प्रकार असल्यासारखं वाटतं मला थोडसं.

खरं तर स्त्री-पुरुष समानता हा इतका अवघड विषय नाहीये. पण आता बनलाय तो. याची करणं बरीच असावीत. त्यापैकी एका बहुचर्चित कारणाबद्दल काम करणारा हा एक प्रोजेक्ट www.therepresentationproject.org.

यांनी आधी एक छोटी फिल्म बनवलेली. आणि मग त्याला खूपच प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी संस्थाच स्थापन केली. आज त्यांचा एक curriculum पण आहे.

त्यांच्या सर्वात पहिल्या फिल्मचा हा (जरा मोठा असला तरी) छोटा ट्रेलर.

Mis(s)Representation.

४ वर्षं झाली आता या ग्रुपला अस्तित्वात येऊन. काही गोष्टी बदलल्या. काही अजून बदलायचेत. मिडियामधून मुलींना कसं दाखवलं जातं आणि त्याचे काळात किंवा नकळत कुठवर परिणाम होऊ शकतात याबद्दल यांचं काम सुरुये.

मुलगी असणं म्हणजे अमुक अमुक. आणि मुलगा असणं म्हणजे अमुक अमुक. हे जे वेगवेगळ्या मध्यमातून दिसतं आणि जे बऱ्याचदा चूक असतं, त्याबद्दल यांचं काम सुरुये.

एका मुलीने केलेली एक कविता आठवली मला. खूप साऱ्या brands च्या खाली, खूप साऱ्या अलिखित पण "करायलाच" हव्यात अशा आजकालच्या गोष्टींच्या खाली दबलेला एक आवाज बाहेर काढतानाचा कविता.


तर या सगळ्या भुलभुलैय्या मधून थोडा तरी बाहेर यायचा मार्ग दिसावं म्हणून मागच्या वर्षी Truth in Ads Act ची मागणी झाली होती.


हा इतका मोठा प्रश्न असेल असं वाटलंच नव्हतं.

मी एकदा या सगळ्यांच्या बद्दल एका मित्राशी बोललो. तो म्हणाला की हे सगळं म्हणजे घराचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं असंय. आपल्याकडचे प्रश्न कमी आहेत काय की इकडे बघायचं आता? तसंही हे खरे प्रश्न नाहीचेत. The First World Problems! आपल्याकडचे प्रश्न जास्ती गंभीर आहेत. ते सोडवावे आधी!

मलाही हे थोडेसे प्रगत देशातले प्रगत प्रोब्लेम्स वाटले. पण मला हे आपल्याकडच्या प्रश्नांशी निगडीतपण वाटले. अगदीच. देश प्रगत झाला की प्रश्न मिटतात. हे असं नसतं हे कळायला लागलं, हेही नसे थोडके. प्रश्न डावलले आणि भलतीकडेच बोटं करण्यात वेळ घालवला की काय होऊ शकेल याची झलक वाटली. आपण प्रागत झाल्यावर आपल्यालाही हे प्रॉब्लेम दिसायला लागले तर मात्र वाईट वाटेल. आत्ताही थोड्या प्रमाणात आपण हे आपल्याकडंही बघतोच की. उगाच नसेल रेनीने ही कविता बनवलेली.


असो.

"सिर्फ हंगामा खडा करना मेरा मक्सद नही. मेरी कोशिश है की ये सुरत बदलनी चाहिये." हे आठवतंय दर रविवारी ऐकलेलं? हे खूप पटलंय आपल्याला. आता सुरुवात म्हणून कमीत कमी ते लक्षात ठेवू.

आता परत त्या मगासच्या विडोओ कडे येऊ. मिडिया हा एक कारणीभूत घटक जरी असला. तरी सगळं खापर त्यावरच फोडणं बरोबर नाही.

What Katie Couric said in the video can be and must be extended to larger population. What applies to media is what applies to every influential being. Isn't it?

So who are these Influential Beings

The influential people in the world.

The influential people in the country,

in the corporate world,

in the cities,

in the towns,

in our neighborhood,

on our lunch tables,

in the dinner parties and

of course in our homes.

Isn't it? You see? It comes back to us. And it has to. We can either maintain the status quo and reflect the views of the society or we become the change and act on it.

लहान मुलांना आपण मोठं करताना त्यांना काय आणि कसं बाळकडू देतो यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. नाही? तसच त्यांच्या मनात काय काय भरवतो तेही तितकंच महत्वाचं की.



सोप्या गोष्टी अवघड केल्यासारखं नाही वाटत आता हे सगळं बघितल्यावर. "असं काय रडतोस बाई सारखं?" हे म्हणणं जितकं चूक आहे, तितकंच "तू मुलगी आहेस, तुला छान दिसत राहिलं पाहिजे!" हेही चुकीचं आहे. आणि हे एका जातीने, धर्माने, देशाने, किंवा फक्त पुरुषांनी किंवा स्त्रियांनी केलं असं नाहीये. हे आपण सगळ्यांनी मिळून केलंय. आता प्रत्येक देशात, भागात, याचे वेगवेगळे परिणाम झालेत. पण त्यांचं मूळ हे कुठून तरी येऊन या upbringing आणि education वर येऊन थबकतंय. त्यांच्याकडेही आणि आपल्याकडेही.

मगासच्या कवितेमाधला हनी सिंग हा चर्चेचा विषय अजिबात नाहीये. पण ती मुलगी शेवटी जे म्हणाली न ते खूप आवडलं. You are not just a masterpiece, but a painter too!

हे सांगण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे. मला वाटतं की बऱ्याच मुलींना पण हे सांगावं लागतं. या validation बद्दल पण आणि masterpiece असण्याबद्दल पण. इतकं hammering झालंय आपल्यावर! पण चांगली गोष्ट ही आहे की हे सांगण्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. आपल्याला फक्त त्या त्या वाहत्या पाण्यात हात धुवायचेत.

आता हा पिच्चर संपवताना एक पेशल विडीओ.

तुम्हाला हे माहिती आहे का? की प्रत्येक मुलामध्ये थोडीशी मुलगी असते आणि प्रत्येक मुलीमध्ये थोडासा मुलगा असतो? तुम्हाला हे माहिती आहे का, काही क्षमता, काही गुण masculine असतात. आणि काही feminine आसतात. यामध्ये कोण सरस हा विषय करायचा नसतो पण यांचं असणं acknowledge करणं महत्वाचं असतं. मला वाटायचं की मला माहितीये हे पण मग हा विडीओ पहिला आणि मग वाटलं की जरा चुकलंच सगळं. पुसा पाटी आणि परत काढा अक्षरं.


असो. थोडा वेळ घेऊ. समजू. उमगू. जे काम करतायत त्यांना साथ देऊ. नुसता हल्ला करण्यात काय अर्थ?

Hope we understand, respect and embrace the differences, may those be between cultures, religions or ... between genders!

Happy Women's Day!

Monday, March 02, 2015

What The Duck!

आपल्या आपल्या perspective ची गोष्ट आहे.
एक वॉरफिल्म बघून बाहेर आलो आत्ता. संपता संपता जरा डोकं जडच झालं. आता ज्यांना आवाडत असेल वॉरफिल्म त्यांच्यासाठी खूपच सही बनवला होता सिनेमा. आता जे खरंय तेच तर दाखवलेला. कोणी का तक्रार करा? पण आपल्याला जरा जड गेलाच किस्सा सगळा. आपल्यासाठी नाही ब्वा युद्ध मारामाऱ्या वगैरे असं वाटत असतानाच, कारण नसताना दिमाग जरा tangent मध्ये गेला.

आपल्या लहानपणीचा एक शो आठवला. एकदम उलट effect होता पण त्याचा.
अभ्यास करावा. बाहेर खेळ खेळावे. ते सोडून टीवीला काय चिकटून बसलाय? वगैरे सगळ्या प्रकारचं रागावणं खाऊनही मी तो शो बघायचो. त्यामध्ये असायचा पण खूप सारा दंगा! खूप सारे पैसे, मग त्या मागे चोर उचक्के, मग पळापळी, धडपड, एकमेकावर कुरघोडी, मग मधेच कधी कधी काला जादू, भूतं, आणि पुराणातली रहस्यं वगैरे! आणि कधी कधी एकदम सायन्स, gadgets, आणि रोबॉट वगैरे!

तेव्हा त्या शो मध्ये आवडायचं ब्वा आपल्याला हे सगळं. कसं का असेना? डोकं बिकं जड बीड नाही व्हायचं. आणि तेव्हाच का? आत्ता पण.

आता म्हणाल तर हा सगळा गोंधळ. नाही तर काहीच नव्हतं.
एकदम सोपा, सरळ, आणि सहज शो वाटायचा.
त्यातले सगळे लोक आपलेच असायचे.
म्हणजे शहाणे वाले पण! आणि वेडे वाले पण.
आपल्याला दोघांचं पण कौतुक.
ह्ये मोठमोठाले प्रश्न असायचे कधी कधी त्यात. म्हणजे आता जगाचं काय होणार वगैरे. अशा लेवलचेही.
आणि मग चला बाजारातून चार काकड्या आणतो अशा सहजतेने ते सोडवले पण जायचे.
आणि ते सगळं चालायचं आपल्याला.
सोपंच तर असायचं असतं की सगळ्यांनी.
माणसांनी आणि प्रश्नांनी. दोघांनीही.

असो.

सांगायचा मुद्दा काय. तर आपल्याला लयी आवडायचा हा असला शो. आणि आत्ता असंच वाचता वाचता असं वाचलं की हा आपला असा शो आता परत येणारे म्हणे. २०१७ मध्ये. माणसं कामाला लागल्येत कसून!

http://blogs.disney.com/oh-my-disney/2015/02/25/this-is-not-a-drill-were-getting-new-ducktales-in-2017/

आणि आता मला अचानक त्या वॉरफिल्मच आणि एकूणच सगळंच एकदम फ्रेश वाटायला लागलंय!

कारण विचाराल तर ... सोप्पंय...

जिंदगी तुफानी है ... जहा है ... डकबर्ग!
गडिया लेजर हवाई जहाज... ये है .........