Tuesday, July 17, 2018

The First Wingman

wingman | wɪŋmən | noun


- a man who helps or supports another man; a friend or close associate.
- a pilot whose aircraft is positioned behind and outside the leading aircraft in a formation.


मैत्रेयच्या डेकेअर मध्ये दहा बारा नुकतीच चालायला शिकलेली पोरं आहेत. दिवसाचे काही तास एकत्र घालवतात, मजा करतात, and then their mums come and take them home. That's it. As simple as that. तिथली लॉरिन म्हणाली मला की ती आता मुलाचे प्रोग्रेस रिपोर्ट पाठवणार. दर महिन्याला असेसमेंट करणार. त्यात माईलस्टोन दाखवणार. उदाहरणार्थ, आज एकावर एक ब्लॉक ठेवला. मग पुढचा टप्पा म्हणजे असे ७ - ८ ब्लॉक ठेवायला येणे. वगैरे वगैरे. And I was like, ठीके बे. Whatever works for you guys. तसंही प्रत्येक पोरांचं एवढं लक्ष देऊन बघायचं आणि ट्रॅक करायचं म्हणजे इथेच आधी कौतुक आहे. बाकी, I'm sure, kids will figure out even if you don't monitor. लॉरिन बाई म्हणाल्या, बेटा, दो हफ्ता रुक. तू खुद आयेगा मुझे पूछने की, what we are doing with your kid! मग तेव्हा आम्हाला काहीतर मोजमाप हवं की. हे असले किस्से आजकाल बरेच सुरू असतात. आणि त्यातच अधेमधे मला माझ्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवतात. मी लहान असताना सगळं याहून खूपच वेगळं जरी असलं तरी आता आपण बापाच्या character मध्ये घुसलेलो असल्यानं, नाही म्हणलं तरी जरा वेगळा point of view आलायच की. आणि मग म्हणून उजळणी. किंवा कदाचित far fetched analogy.


शाळेमध्ये क्लूलेस असण्याबद्दल क्लूलेस असल्यापासून ते कॉलेजमध्ये क्लूलेस असण्याचाच माज करेपर्यंतचा सुमारे १५-१६ वर्षाचा हा काळ. याला तूरतास लहानपण म्हणू. या काळात एक गोष्ट कायम व्हायची. आमचे पिताश्री मध्येच कुठूनही प्रकट व्हायचे आणि माझ्याबद्दल एखादा मुद्दा आला की लोकांना बेधडक सांगायचे, की करणार की माझा मुलगा. अगदीच. त्याला आवडतच हो. त्याला सवय आहे मेहनत करायची. वगैरे वगैरे. त्यांचे मित्र असोत. माझे मित्र असोत. शाळा कॉलेज असो. किंवा काहीवेळा दुकानचं गिऱ्हाईक असो. माझा विषय निघाला, की हा माणूस सुरूच व्हायचा. And I was like, what is he talking about? Is he really talking about me? आपण कसे आहोत हे मला झेपायच्या आधीपासून या माणसाला झेपलेलं. And unapologetically, he was playing it everywhere. त्यामुळं कुठंही गेलो की आपली आधीपासून हवा असायची. स्टेज तयार. And I was figuring out whether to enjoy the attention I got or to be worried about it.


हा जो काय त्यांचा विश्वास होता, तो कुठून आला, त्याचं आत्ता खूपच कौतुक वाटतंय ब्वा. मला नाही वाटत, की बाप म्हणून हे सगळं मी करू शकेन माझ्या पोराबद्दल. Maybe I've grown more cynical or critical or obsessed with political correctness of language. किंवा एकूणच कदाचित जरा आळशी बाप असेन मी. आमची जनरेशनच म्हणायचं होतं. पण उगाच बाकीच्या बापलोकाना कशाला ओढा? तसं तुमचं अमाचं सेमच असणार असतं पण तरी कशाला? तरीही तसं आढळल्यास सत्य घटनांवर आधारित आहे लेख, असं म्हणू नंतर. तर असो.


मला आठवतंय, मला गणित आवडतं हे कदाचित मला माझ्या बाबांकडून कळलं असावं. मग लगेच गणिताचे वेगवेगळे शिक्षक शोधणं, त्यांच्याकडून वारंवार फीडबॅक घेत राहायचं, हे त्यांचं सुरूच असायचं. आत्ता मी विचार केला तर वाटतं की कोल्हापूर सारख्या छोट्या शहरात कितीसे आणि काय पर्याय असणार होते? आत्ताच्या मला त्यांच्या जागी ठेवलं तर कदाचित या इथंच विषय संपवला असता मी. चौथी पाचवीच्या मुलाच्या बाबतीत काय फीडबॅक घ्यायचा? असं म्हणून. पण त्यांनी शोधले ब्वा कोण कोण लोक त्या त्या वेळी. Somehow त्यांचं हे अविरत सुरूच होतं. मध्येच मला त्यांच्याकडून कळलं की मला खगोलशास्त्र पण आवडतं. आणि आम्ही मग थेट शिवाजी विद्यापीठात दुर्बीण लाऊन धूमकेतू बघायला पोचलेलो. कधी नक्षत्र बघितली. कधी तारे हुडकले. कधी थेट जयंत नारळीकरांना पण जाऊन भेटून आलो. हे सगळं मी इंजिनिअर होईपर्यंत अजिबात मंदावलं नही. And to my surprise, I really had a liking towards maths n astronomy. Or maybe I developed it. But whatever it was, I find myself cherishing it today as well. आता शास्त्रज्ञ का नाही झाला आणि इंजिनीयरच का? हा वेगळा विषय.


तसंही मेरा बेटा इंजिनिअर होगा - असं नव्हतं हे. म्हणजे असं मला आत्ता तरी वाटतंय. कारण मी पुस्तकं वाचावी, इंग्रजी वर्तमान पत्र वाचावी, हे त्यांचे प्रयत्न मी माझ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कधीच धाब्यावर बसवलेले. आणि नंतर त्यांनीही त्याचा कधी हट्ट करण्यात फार एनर्जी नाही घालवली. वाचन आणि माझं जे काय वाकडं होतं ते इंजिनिअरिंग होईपर्यंत काय सरळ नाही झालं. पण बाबांना गणित वगैरे सारख्या ज्या काही माझ्या नसा सापडलेल्या त्या काही त्यांनी अजिबात सोडल्या नाहीत. मी विसरलो असेन एखाद वेळेस, पण त्यांची बॅटिंग सुरूच असायची.


मला आत्ता असं वाटतं की खूप वेळा, किंवा almost सगळ्याच वेळा, उलट व्हायचं. त्यांच्या कॉन्फिडन्स मुळे मला कॉन्फिडन्स आलेला असायचा. इतकं आता म्हणातोच आहे हा माणूस तर मग जमणारच असेल की आपल्याला. कधी कधी वाटतं की त्यामुळंच पण जमलं असेल. काय घ्या. आणि जमलं नाही तरी फारसं वाईट नाही वाटायचं कारण मग नंतर जमेलच हे असं कुठेतरी मनात असायचंच. कारण नाही जमणार असं नव्हतंच न ठरलेलं.


आत्ता नुकतीच पस्तिशी पार केली. आणि अचानक य प्रश्न पडले. उगाचच मिड लाईफ क्रायसिसच्या नावानं किरकिर. आता काय करायचं पुढे? करू शकू का आपण? आपण खरंच भारी आहोत का? कोणाला विचारायचं का? की नाहीच कोण विचारायला? लहानमोठं काहीही करताना जो उत्साह पूर्वी असायचा, त्याच्या जागी आता इतक्या शंका कुठून आल्या? काहीही झालं तरी जमणार की आपल्याला, फार फार तर आज नाही तर उद्या. हा वाला कंफर्ट झोन कुठं हरवला? मग वाटतं की, What's changed? I'm still the same guy. मग?
आणि मग वाटतं की maybe my wingman moved on, and I never did.
Maybe being clueless was far better than getting a clue about it. And that's not the best feeling at all.


मजा अशी आहे की मला आठवतच नाही की माझे आईबाबा पण कधीतरी तिशीत किंवा चाळिशीत होते. I'm sure the kind of nonsense that bothers me, must have bothered them also. But as a child, I never saw it in them. लहान पोरं असतातच स्वतःमध्ये गुंग. I'm sure मी जरा जास्तीच असेन. तरीही थोड्याशा पुसट आठवणी आहेत. अगदीच नाही असं नाही. मला दहावीत ७८ पॉइंट काहीतरी टक्के पडलेले. माझ्या लेखी ते कमी किंवा जास्त असे व्हायचे होते. पण बाबांच्या मनाला आधीच खूप लागलेले. आणि हे का? ते मला तेव्हा अजिबात झेपलं नव्हतं. अदल्या दिवशी जाऊन निकाल बघून यायची एक काय ती अगाऊ प्रथा तेव्हा असायची. त्यांनी तसाच अगोदर निकाल काढून आणलेला. वाड्याच्या चौकात खाली आम्ही दोघेच पायरीवर बसलेलो तेव्हा त्यांनी मला सांगितला. म्हणाले, की आपण रिवेरिफिकेशनला तर टाकूच पण बाकी लोकांना सांगू की आपल्याला ८५% पडलेत! आता इथं बऱ्याच गोष्टी एकत्र होत होत्या. एकतर नको म्हणालो असताना माझा निकाल आधी का काढला, या विषयावर उगाच ड्रामा करायचा माझा पवित्रा होता. पण कहानी का ये ८५% वाला ट्विस्ट खूपच नया था. मुद्दलात मला ७८% मध्ये असं काय वाईट आहे हे कळलं नव्हतं. रिवेरिफिकेशन मुळे त्यात फारसा काही फरक पडेल असंही वाटत नव्हतं. आपल्याला आपली लेवल असते की माहीत. तसंही इतिहास भूगोल जीवशास्त्र वगैरे प्रकरणं झेपायचा स्कोपच नव्हता. आणि नेहमी सारखं यावेळी नाही तर परत बारावीत पडणारच होते मार्क, हे होतंच. पण इथं काहीतरी वेगळंच बिनसलेलं. आणि ते झेपायला मी खूपच लहान होतो. आपल्या या ७८ टक्क्यांनी बाबांना काहीतरी unusual झालंय याचं वाईट वाटलेलं हे नक्की. Like it's not the same man. Or maybe he's changing. असं काहीतरी. आता म्हणून पुढं एकदम त्वेषानं अभ्यास केला इतकं काही melodramatic झालं नाही. पण तरी मनात राहिलं ते. इतिहास भूगोल नावाची भुतं गायब झाली आणि बारावीला थेट बोर्डातच नंबर लागल्यावर अमाचे पिताश्री परत फॉर्मात आले. पण दहावीच्या वेळेपासूनच कदाचित त्यांची wingman च्या character मधून स्लोली एक्झिट सुरू झालेली. किंवा Wingman ची स्वतःची ह्युमन बाजू बाहेर येत होती.


पुढं कॉलेज, इंजिनिअरिंग, जॉब वगैरे झालं. आणि आमचे रोल बदलले. म्हणजे बदलणं अपेक्षित होतं. मला वाटतं मोठं होण्याचा आळस करत करत मी इथवर ताणलं. पण आता स्वतः बाप झाल्यावर हे अजून कसं टाळू हा पण प्रश्न अलाच की. तसं सवयीप्रमाणं आतमधून येणारा पहिला आवाज हाच आहे की, करणार की आपण. आज धडपडलो तर उद्या करूच. जमणार तर आहेच. आवाज क्षीण वाटतो पण आजकाल एवढंच.


पण मग there's a fresh new leaf on the block now. And there are plenty of stories to be told. आमच्या काळी असं नव्हतं वाला angle असला, तरी आपल्या काळासारखं भारी कसं असावं हे आपल्याच हातात आहे हे दुर्लक्षित करायचा स्कोप पण नाहीये. त्यामुळं काहीतरी शक्कल लढवतच राहू. तब तक this one is for the old time sake. This one is to the first wingman, we all ever had.


Happy Father's Day. (म्हणजे कधीतरी असेलच की, त्याला in advance असं म्हणू)



PS: By the way, आता मी बाप आहे म्हणून बापाबद्दल हे सगळं. आई झालो असतो तर आईबद्दल लिहिलं असतं. तेही इक्वेशन जरा नव्यानं कळलंय. पण आईला तसंही जास्ती भाव मिळतोच, म्हणून ते फिर कभी.

No comments: