तो आजकाल माझ्यासोबत वेळ घालवायचा प्रयत्न करतो. स्वतःहून येतो. बसतो. फोन सायलेंट वर टाकतो. कधी कधी फोन न घेता येतो. बहुतेक वेळा आम्ही एकमेकांसोबत "क्वालिटी टाईम" घालवतो. पण दरवेळी जमतंच असं नाही. कधी कधी आमच्यात ऑकवर्ड सायलेन्स असतो. कधी विषय सुचत नाहीत. कधी चटकन निघायची घाई असते. "बाहेरच्या जगातलं काहीही तुझ्याईतकं महत्त्वाचं नाही" असं म्हणतो खरं. आणि काही क्षणात बाहेरच्या जगात विलीन व्हायला निघून पण जातो. कधी कधी स्वतःच्या अशा वागण्यावर खट्टू होतो. पण सॉरी म्हणायच्या भानगडीत पडत नाही. तसा रीवज नाही आमच्यात. "माझा हट्ट नाही आहे. जमेल तसं ये. नाही जमलं तर राहू दे. त्रास करून यायचं असेल तर it defeats the purpose. नाही का?" असं सांगितलं तरी पुरत नाही. "It's not always about you... It's for me." असं त्याचं उत्तर तयार असतं. कधी कधी बरेच दिवस आमची गाठ पडत नाही. अशा बऱ्याच काळानंतर एकदा आला की मग उधारीच्या गील्टचा निचरा करण्यात वेळ घालवतो आणि मोकळा होऊन परत जातो.
.
.
तो जसा होता तसाच unpredictable आहे. बाहेरच्या जगात असला काय नी माझ्यासोबत असला काय. आला की बहुदा खुश असतो. माहिती होतं कसं यायचं ते, पण तरीही वेळ लागला, म्हणतो. मग "इथेच का राहत नाहीस?" विचारलं तर त्याला उत्तरही सापडत नाही. म्हणतो की "बाहेरच्या जगाचं व्यसन लागलंय. सोडायचंय पण सुटत नाही." आज काल आला की स्वतःबद्दल खूप काही सांगत बसतो. मोठ्या मोठ्या गोष्टींचा निचरा बाहेर होत असेल. छोट्यातल्या छोट्या गोष्टी घेऊन माझ्याकडे येतो. फलाटावर दिसलेल्या जाहिराती, स्टेशनची मजेशीर नावं, कारण नसताना सुचलेले पुचाट विनोद, डोक्यात अडकलेलं गाणं, शंतीत सुचलेले क्रांतिकारी विचार, जमलेल्या न जमलेल्या गोष्टी, आळस, आठवणी, साठवणी असं सगळं गाठोडं, हळू हळू उघडं करतो. तसाच पसारा ठेवून निघून जातो. जेव्हा परत येतो तेव्हा चाचपून बघतो की मागच्या वेळी सांडलेलं अजून काही राहिलंय का?
.
आम्ही सहसा घरीच भेटतो. पण कधी बस मध्ये, ट्रेन मध्ये सुद्धा भेटतो. आम्ही ग्रीस मध्ये भेटलोय, जर्मनी मध्ये भेटलोय, इंग्लंड मध्ये भेटलोय, आणि भारतात तर भेटलोच भेटलोय. हर ठिकाणची भेट वेगवेगळी. वेगवेगळ्या काळानुसार, वेगवेगळ्या वळणांची. मी कायम इथेच आहे. तो मात्र कधी येतो, कधी येत नाही. आपले आपले ठोकताळे लावतो. कुठे पडला, कुठं लागलं, कोणी कौतुक केलं, कोणी बक्षीस दिलं, सगळं सांगतो. "असच बाहेर पण घडाघडा बोलत जा म्हणजे साचून राहणार नाही!" असं म्हणलं तर मला उलट म्हणतो की, "मन नाही करत बाहेर. बाहेर सांगितलं तर कदाचित समोरच्याच्या प्रतिक्रियेचं मिंधं राहावं लागेल. आणि एखाद्या आवडीच्या कोणी हवी ती प्रतिक्रिया नाही दिली तर? त्यापेक्षा इथं मला तुझ्याकडून गॅरंटी आहे. इथे सेफ वाटतं."
.
आमच्यातल्या संवाद जोर धरू लागला की त्याला फोनची, लॅपटॉपची, स्पीकरची, हेडफोन्सची, सगळ्याची अडचण व्हायला लागते. दर वेळी आम्ही बोलातोच असं नाही. पण आम्ही असतो. काही न बोलताही. किंवा काहीतरी बोलत. मग कधी राजकारण काढतो, कधी विज्ञान काढतो, कधी इतिहास काढतो. एकूण काय तर खयाली पक्वांनांची रेलचेल सुरू ठेवतो. आम्ही एकत्र असताना केवढे केवढे सीन माझ्यासमोर जिवंत घडवलेत की काय सांगावं? ते सगळे सीन, त्याच्या सगळ्या सग्या सोयाऱ्यांच्या बरोबर खरोखर घडले, बिघडले किंवा नाही जरी घडले तरी आता काही हरकत नाही अशा तत्वावर येतो. कधी कधी स्वतःच किती बोअरींग आहे पासून, स्वतःच किती रॉकस्टार आहे पर्यंत सहज उडी मारतो. आम्ही एकत्र असलो की ना उंचीची भीती. ना खोलीची. कुठेही वाहवत गेला तरी स्थिर असतो.
.
आमचं नातं कायम असं कधीच नव्हतं. आम्ही असायचो एकमेकाच्या आजूबाजूला पण एकमेकाची दखल घ्यायला खूपच उशीर झाला. गरज नव्हती कदाचित. आम्ही आहोत आजूबाजूला, हे एवढं त्याच्यासाठी काफी था... आता तसं राहिलं नाही. मला वाटतंय, खूप लहान असताना आपण कळत नकळत सगळ्यांवर प्रेम करतो. मोठं झालं की चॉईस येतात, जजमेंट येतात. मग आहे ते नकोय, आणि नकोय ते हवंय हा प्रकार सुरू होतो. त्याने शाळा कॉलेजमधून साठवलेल्या आठवणी आणि जमवलेले लोक पुष्कळ होते. त्याला माझी काय गरज? किंबहुना या सगळ्या पसाऱ्यात मी म्हणजे distraction च न? आमच्यात संवाद खूप उशिरा घडला. आपण एकमेकाच्या सोबत असणार आहोत हे समजायला वेळ गेला. आता कसं एकमेकांसोबत वावरायचं हे एवढंच फिगर आऊट करणं सुरू आहे.
.
नाव काय देशील आपल्याबद्दल लिहिलंस तर? यावर त्याचं सध्याचं लेटेस्ट म्हणणं आहे...
"There's nothing like doing nothing with you"
************
.
Epilogue:
माझ्यासाठी मेडीटेशन हा जरा भारी पण न जमलेला प्रकार आहे. पण आज जरा पेशल आहे म्हणून हे सारं. मेडीटेशनमध्ये किंवा मेडीटेशनमुळे एक्झॅक्टली काय होतं? याचा शोध किंवा याचा खुलासा असं दोन्हीही इथे करायचं नाही आहे. पण मेडीटेशन करताना मला कसे अनुभव आले हे लिहायची जोरात खुमखुमी आलीय. म्हणजे ही खुमखुमी खूपच वर्षांपासून आहे पण धाडस झालेलं नव्हतं. आधी जमायचं नाही म्हणून आणि मग थोडाफारच जमतंय म्हणून. नंतर खूप भारी आणि हुकुमी जमायला लागलं तर मग याबद्दल लिहिण्याची इच्छा निघून जाईल. म्हणजे ते असं होतं न की तुम्हाला वाटतं की अरे केवढी व्याप्ती आहे या विषयाची आणि मग आपल्या इवलूशा लिखाणात कुठे जमायचं काही?
सो...
सध्या एक छान मध्यंतर आहे... की जिथे माझ्या या उथळ पाण्याचा भारी खळखळाट सुरू आहे. मग मौका है... दस्तूर है... म्हणून हा घाट. अजून एक दोन सुद्धा लिहीन. पण तूर्तास हा पहिला भाग.
.
डोक्यातला चॅटर... सततची बडबड... स्वतःसोबत आणि जगासोबत सुरू असलेली झटापट यातून वाट काढता काढता मेडीटेशन हा प्रकार सापडला. बघता बघता त्यातून स्वतःबरोबर एक संवाद सुरू झाला. एक ओळखीचा व्यक्ती जो अनोळखी झालेला तो परत भेटला. असं काहीतरी. त्या व्यक्तीबरोबर आज सलग २ तासाहून जास्ती काळ काढला... हे आपलं सध्यापर्यंतचं पर्सनल बेस्ट टायमिंग आहे. म्हणजे १५ मिनिटं ते ३५ मिनिटं आपण नेकी मध्ये बऱ्याचदा केलेलं. पण काही दिवसांपासून जरा जास्ती होऊ शकेल असं वाटत होतं. आज फ्लाईट मध्ये ... चार चाँद लावूनच टाकले.
I don't know what it means. But I'm sure it is definitely worth exploring further. And I am sure it might still be insignificant also. कारण मुद्दा कायम वेगळाच असतो. नई का?

No comments:
Post a Comment