Sunday, December 27, 2009

Illusions

बऱ्याच दिवसानी पुण्यात आल्यावर जसं सगळं जुनंच नव्यानं दिसायला लागलं तसं बरेचसे जुने अदृश्य झालेले मित्र वगैरेपण परत भेटायला लागले. नव्यानं बघताना नकळत आपण "किती बदललायस तू?" किंवा "काहीच बदलला नाहीस यार तू!" या वाक्याना जागा शोधत असतो. मला वाटतं प्रत्येकजण ही वाक्यं तरी फेकत असेलच. नाहीतर आपणतरी समोरच्याला "ईतक्या दिवसानी आलायस असं वाटतच नाही" या वाक्याला जागा करून देतो. पण कमीत कमी या वाक्यांची देवाण घेवाण झाल्याशिवाय आठवणी सुरूच होत नाहीत. पुर्वीच्या थेअऱ्या, लोजीकंच काय तर अगदी ठरलेले पीजे पण परत निघतात. जुन्या विश्वात घेऊन जातात या गोष्टी. परत सगळं तस्सच्या तस्स वाटतं. बऱ्याचदा असं होतं की आपण बरच पुढं आलेलो असतो. पुर्वीचे आपलेच विचार आपल्याला भोळसट वगैरे वाटत असतात. आपल्याच विचारांची ही दशा तर दुसऱ्यांच्या थेऱ्यांची तर आणखीच वाईट अवस्था असते. पण परत तेच दुसरे तस्सेच परत भेटले आणि बोलू लागले तर थोडावेळ का होईना आपण परत तेच सगळं अनुभवतो.

-------------------------------------------
"I think, I still live in illusions. मला अजुनही असच आवडतं रहायला. ज्याला जे चांगलं करता येतं त्यानं ते करावं. मला हे असं रहायला जमतं, मी असा राहतो."

हा असाच एक अनुभव परत जुन्या कॉलेजच्या वयातल्या गप्पांची आठवण देऊन गेला. अशावेळी जनरली मी गप्पच बसतो तसा यावेळीही गप्प ऐकत होतो.

"एखादी गोष्ट, एखादा प्रसंग, वेगवेगळ्या लोकाना वेगवेगळा वाटतो. वेगवेगळ्या लोकांनाच कशाला? माझं मलाच एखादं वागणं कधी असह्य वाटतं तर कधी सुसह्य! म्हणजे असं काहीतरी रसायन नक्की आहे आपल्यामधेच एका असह्य गोष्टीला सुसह्य बनवणारं? असं आहे काहीतरी आपल्यामधे की ज्यानं आपल्याला, सहसा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीपण सहज शक्य होतात. ‘मी अमुक अमुक केल्याशिवाय राहूच शकत नाही’ हे प्रकार मला खरच हस्यास्पद वाटतात. म्हणजे एखादी गोष्ट आवडणे, नावडणे, कोणावर राग, किंवा प्रेम वाटणं हा सगळा किती विचित्र आणि अशाश्वत प्रकार आहे! हे सगळं कंट्रोल करता आलं पाहिजे. म्हणजे जर का ही रसायनं कंट्रोल करता आली पाहिजेत. मग स्वतःच स्वतःचा डाव दिग्दर्शीत करायचा. विचार केला जरा तर फारसं अवघडही काय त्यात? ईतकी वर्षं स्वतःबरोबर राहील्यानंतर ईतकं तरी कळालं पाहीजे ना, की काय केल्यावर कधी कसं वाटतं! आणि तसं वाटवून घ्यायचं"

गडी बदलला नसला तरी सुधारीत अवृत्ती नक्कीच झालेला. मी आपलं मधेच पिल्लू सोडलं, "Are you talking about manipulating yourself? Is it a manipulation?"

समोरच्यानं प्रश्न वगैरे विचारले (फुटकळ किंवा असंबद्ध जरी असले तरी) अशावेळी बोलणाऱ्याला मस्त किक बसते. "असेलही. I don't care. Why should I care anyway? सत् चित् आनंद! गीतेमधे सांगीतलय भावा! आणि नसतंही सांगीतलं तरी काय!"

ईथं गीतेमधे exactly काय सांगीतलय याचा संदर्भ मला अजुनही आजीबात कळालेला नाही. पण कदाचीत त्यानंही चान्स मारून गीतेचं ज्ञान खपवलं असेल असं म्हणून मीही पुढे आपलं श्रोत्याचं काम सुरू ठेवलं.

"म्हणजे कसं स्वतःचच आयुष्य नाटक लिहील्यासारखं लिहायचं. आता बघ. सारखंच काय एकाच मूडमधे राहायचं? मधे मधे चिडायचा मूड आला, की पुढे घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी तशाही माहीत असतात. त्यातली एखादी निवडायची आणि त्यावेळी सगळी चिडायची खाज भागवायची. बरं ना. आपण म्हणजे चिडायचं तेही आपल्यासाठी. परत कोणावर डुख धरून बसायचं कारण नाही. कधी चिडायचा मूड नसेल आणि कोणी अगाऊपणा करत असेल तर मग केवळ हे आपण Orchestrate केलेलं नाही म्हणून निघून जायचं. माझ्या कथेमधे हे नाही म्हणून कानाडोळा करायचा. म्हणजे तेही पथ्यावर. म्हणजे डोकंही वापरायचं पुढच्या घटनांचा बरोब्बर वापर करण्यासाठी. कधी खुश तर कधी ट्रान्समधे. जेव्हा जसे हवे तसे. तेही संपुर्ण कथेचा तोल सांभाळत. एकदम लाईव ड्रामा. रन टाईमला स्क्रिप्ट तयार करत जायची. What say? Logical?"

मीही हळू हळू मूडात येत होतो. "तुला अजुनही लोक येडा म्हणत असतील ना?"

"सोड रे. त्याना झेपत नाहीत या गोष्टी. असंख्य लोकानी केलेल्या अगणित गोष्टींच्या परणामानं ज्यांचं आयुष्य पुढं सरकतं त्याना माझ्या या थेअरीची मजा काय कळणार?"

"I know. So much." मी हसलो. पण त्याचा मुद्दा ध्यानात येत होता माझ्याही.

"कथा एवढीच नाही. त्याच्याही पुढं जाऊन लोकांच्या नजरेत आपण कसं दिसावं हेही आपण ठरवावं. म्हणजे जर आपण आपल्या कथेमधले कलाकार असलो तर त्या कलाकाराच्या कुठे कुठे आणि कशा कशा एंट्र्या व्हाव्या, आणि कशी ईंप्रेशन्स पडावीत, हे जसं आपण ठरवायचं तसं. आणि मग पुढचा खेळ रचायचा. शेवटी आपण तसेच दिसलो की नाही समोरच्याला हेही चाचपायचं. यातलं बरचसं आपण सर्वच करतो. पण एका ठरावीक मर्यादेपर्यंतच. म्हणजे. कसं वागावं, बोलावं हे तर आपण सगळेच काळजीपुर्वक ठरवतो. पण काही नियम पाळून. एका सुसुत्र कथेमधे याचा काय परीणाम होणार या विचारानं नाही. बऱ्याचदा हे करता करता बऱ्याच लोकांसमोर बरेच चेहरे तयार होतात. पण कधीतरी यानाही एकत्र आणून नव्या कथा जमवाव्या लागतात. सगळे आपल्याच मनात. पण real time. बाकीच्यांच्यासाठी काय ते माहित नाही पण आपल्यासाठी आपलीच कथा पुढे सरकवायची. कधी कुठे काही चुक झालीच तर ती कथेची मागणी होती म्हणून स्वतःलाच पान पुसायचं. कथा पुढे बदलायचा मार्ग आहेच."

मीही जरा गाडं पुढं सरकवलं. "तुला ऊगाच वाटतं हे वेगळं आहे. कदाचीत त्या त्या वयात होतं ठीक. पण डोळे ऊघडून बघ लेका. By and large सगळे असेच जगतात. थोडे फार मागे पुढे."

"Approach महत्वाचा भाऊ. मी औषध म्हणून खाल्लेला आंबा वेगळा (म्हणजे कोणी देत असतील तर...) आणि मला आंबा आवडतो म्हणून खाल्लेला वेगळा. काय? वेगळा की नाही? माझ्या दृष्टीनं मी माझी कथा पुढं सरकवतो की जी नंतर वेगळ्याच पातळीवर जाईल. तेव्हा मला त्या त्या अवस्थेतली कारणं या आजच्या मी तयार केलेल्या सीनमधे मिळतील. पण बाकीच्यांच्याकडं केवळ ‘ते असच असतं’ किंवा ‘सगळे असेच करतात’ असली सच्यातून काढल्यासारखी ऊत्तरं असतील."

"आणि तुझ्याकडं काय असेल?"

"Of course I will have a better answers. ‘Because I have scripted my life in this way.’ मला असं जगायला आवडतं. मी रंगवलेलं चित्र. जसं आहे तसं. पण माझं आहे. त्यातला मी, खरा मी आहे की नाही वगैरे असले पुस्तकी प्रश्न नाही पडत मला. कधी कधी चित्र रात्रीसारखं गडद काळं होतं. कधी कधी सकाळसारखं तेजस्वी. मला काळं झाल्याचंही आजकाल दुःख वाटेनासं झालय. तेजस्वी झाल्याचा अभिमानही वाटेनासा झालाय. पण माझं मी रंगवतोय यात मात्र मजा येतेय. समोर जे काही आहे, परीस्थीती असो, किंवा कोणी व्यक्ती असो. माझा मूड, माझं वागणं किंवा प्रतिक्रिया ठरवायचा हक्क मी आणि कोणाला का देऊ? त्यानं परीस्थीती बदलणार नाहीए. न का बदलेना! बरी किंवा वाईट. कशीही असो. बरी असेल तर तसाही प्रश्न नाही. वाईट असेल तर तसंही सामोरं जाताना जरा थोडंसं सोपं तरी जाईल. कारण जशी कशीपण असेल, माझ्या कथेसाठी ती फक्त एक परीस्थीती आहे, शेवट नाही. माझ्या थेअरीचं हे मुलभूत तत्व आहे. बाकीच्याना युगं लागतील हे शिकायला. अचानक गोष्टी माझ्याकडंही घडतात. अगदी काहीही न ठरवता मीही प्रतीक्रिया देतो. पण नंतर त्याही कथेमधे बरोबर गुंफतो. ऊगाच सगळंच ठरवून होतय असं वाटायला नको. तसं मला जमतही नाही आणि गरजही नाही कदाचीत.

तुम्ही पेपरमधे दंगा मारामारी वाचता, हवालदिल होता. मी असेन चिडायच्या मूड्मधे तर घालीन चार शिव्या आणि मोकळा होईन ..."

"नाहीतर?"

"... नाहीतर मी त्यामधेही काहीतरी वेगळं बघेन. मला नसेल मूड खराब करायचा तर मी कदाचीत तसल्या बातमीमधे कोण काय ऍक्शन घेतायत ते बघेन. जनतेला काय अवाहन केलेय ते बघेन आणि मीही तेच करतोय का ते बघून खुश होऊन पुढे निघेन. तसं प्रत्यक्ष जाऊन मी कूठेही काही दिवे लावणार नाहीए. पण ईथे जे काही आहे त्याला काहीतरी बेस देऊन पुढे जाईन. परत माझ्या पात्राला असल्या situation ची गरज पडली तर रेफरन्स तयार.

हे असं स्वतःसाठी illusions करणं म्हणजे स्वप्नात वगैरे राहणं नाही. फक्त स्वतःच्या वागण्या बोलण्याचा, क्रिया प्रतिक्रियेचा ताबा स्वतःकडे ठेवणं आहे. केवळ ताबाच नाही. आपल्याला हवं तसं ते ठरवणंही आहे. यामधे प्युरीटी नाही किंवा हे आर्टिफिशिअल आहे वगैरे भानगडी ऐकलेत मी. पण जरा विचार करू - आजूबाजूच्या कोणी काही म्हणावं किंवा करावं, काही व्हावं किंवा नाही व्हावं याला हजार गोष्टी कारणीभूत असतील. या सगळ्यानी जर मी माझा मूड बदलवणार असेन तर काय मजा? म्हणजे आख्ख्या जगानं ठरवलं मला कसं वाटायचय ते तर ते चालतं पण स्वतः असं काहीतरी ठरवलं की मग का artificial? ज्याना कथा रचता येत नाहीत त्यानी या भनगडीमधे पडलं तर artificial, नाहीतर कुठलं काय artificial!?

आपण मोठे लोक वगैरे बघतो. सचिन तेंडुलकर घे. नाहीतर अंबानी घे. नाहीतर तुझा ऑफिसमधला बॉस घे (म्हणजे जर बॉसला आदर्श म्हणून वगैरे बघत असशील तर). बऱ्याचदा आपण नाही त्यांची स्टाईल कॉपी करायचा प्रयत्न करत? ते दररोज खिशाला कोणा अमुक अमुक कंपनीचं पेन लावून येतात, म्हणून आपणही लावतो. ते एका ठरावीक स्टाईलनं बोलतात म्हणून आपणही बोलतो. पण मी जेव्हा यासगळ्याना बघतो तेव्हा मी ऊलटा विचार करतो. यांच्या आयुष्यात कसे कसे सीन घडले असतील की ज्याचा परीपाक म्हणून ही माणसं अशी झाली. आणि मी सीनच्या सीन ऊचलतो. माझा सीन थोडाफार तसाच बनवायचा प्रयत्न करतो. कुठल्या सीनचं पुढे काय होणार आहे अशी सांगड घालत बसतो. कुठले सीन माझ्या कथेमधे येणार आणि कुठले येणार नाहीत यांची पकड ठेवायला जमणं सोपं नाही मित्रा. मलाही जमतं असं नाही. पण तिकडच वाटचाल सुरू आहे. तुम्ही दृश्य गोष्टींचं अनुकरण करताना जितकी कमीटमेंट दाखवता तितकी मी त्यांच्या कथेमधले मागचे सीन्सचा विचार करण्यात घालवतो. स्टाईल माझ्यापण तयार होतील. पण जसं आज आपण याना बघतो, तसं उद्या आपल्याला कोणी बघावं असा सीन लिहायचा प्रयत्न करतो. आज लहान सहान गोष्टी करत असेन मी याचा. पण भाऊ कधीतरी या लेवलवर नक्की पोहोचेन तेव्हा बघशील."

खरं सांगायचं तर एकेकाळी मीही या सगळ्याना भारावून गेलेलो. कोणाला मी असं बोललोही असेन की I live in illusions (म्हणजे याच्या थेअरीप्रमाणं याची फक्त स्टाईल कॉपी करून!), पण ईतका सहजी त्याचा विसर पडेल असंही वाटलं नव्हतं. कधीकाळी भारावून टाकणाऱ्या गोष्टी खरच भारावून जायच्या लायकीच्या असतात की आपण ते भारावून जाणं वगैरे सगळं खरच प्रासंगिक असतं? एखाद्या गोष्टीवर फार ऊशिरा किंवा क्वचितच मत व्यक्त करतो असं म्हणाल्यावर ‘माझ्या कथेमधलं स्थान हुडकत होतो’ असं मला हळूच सांगणाऱ्या या मित्राबद्दलच कुतुहलात्मक आकर्षण अजुनही कायम आहे. कदाचीत बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडतील की ज्या ठरवतील की मी याला आणि याच्या थेअरीला लक्षात ठेवायचं की नाही ते. नाहीच राहीलं लक्षात तर परत बाकीच्या असंख्य गोष्टी ठरवतील की आम्ही परत भेटू की नाही ते. आणि मग परत या सगळ्यांची आठवण होईल.

किंवा तो ठरवेल की त्याच्या कथेमधे आम्ही परत भेटणं आवश्यक आहे की नाही ते. जर असेल तर तो भेटेलच.

Tuesday, September 08, 2009

We moved on and we met us

(ट्युलीपच्या वीकेंडच्या पोस्टमधले ’तो’ आणि ’ती’ भलतेच आवडले. तसा त्या पोस्टशी याचा काहीही संबंध नाही. पण ते पोस्ट वाचताना सुचलं हे सगळं.
अदितीचेही आणि नॅनीचेही आभार - मझ्या फंड्यांवर वरताण फंडे मारून मदत केल्याबद्दल!)



तो त्याच्या मनाची विषण्णता त्याच्या नाटकातून मांडे. तिला त्याची नाटकं आणि त्यामागचं प्रेम कधीही फारसं आवडलं नाही. समोर बोलता न येणाऱ्या स्वतःच्या चौकटीमधल्या रास्त गोष्टी तो नाटकामधून मोकळं करायचा. आणि त्याला मोकळं व्हायला नाटक लागतं हा त्याला आधारही होता आणि त्याला लसणारं सत्यही होतं. आपलं नातं आपल्याबरोबर खुलावं असं त्याला वाटायचं. आणि तिच्या स्वप्नात जसं नातं खुललं होतं तसं आपलं नातं बनवावं हे तिचं स्वप्न होतं. ती बऱ्याचदा त्याला ओरडायची की कसं त्याला रोमॅंटीक होता येत नाही. तिला ख्रिश्चन लग्नामधे घालतात तसल्या पांढरा शुभ्र पेहरावाचं भारी आकर्षण. पण तिचे ते बोलणे आठवणीत साठवताना तो तिला प्रतिसाद द्यायला नेहमी विसरायचा! तो तिच्यासाठी तितकाच गुढ होता जितकी ती त्याच्यासाठी अनाकलनीय!

एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला की जीव नकोसा करून टाकायची. त्याला ती तशीही आवडायची. तिलाही तिचे सर्वकाही ऐकणारा तो आवडायचा. आणि मग यांची गाडी घसरायची. तिचा हट्ट संपायचं नाव न घेईना झाला की तोही अस्वस्थ व्हायचा. तो कशा कशा काय काय गोष्टी कधीच करत नाही याची यादी तिच्याकडे तयार असायची. त्या गोष्टींशिवाय प्रेमात मजाच नाही अशा तिच्या समजाविषयी त्याचा आकस. पण ती चर्चा कधी होऊ न शकलेली. त्याने काही बोलला की तिच्या धर्मग्रंथाला धक्का लागल्यासारखं बाघायची! तिच्या मनातल्या गोष्टी फार काही मोठ्याही नसायच्या. पण त्याशिवाय काही असूच शकत नाही यावर त्याच्यामधल्या ईंजीनिअरचं लॉजिकल थिंकींग बंड करायचं. "एवढ्या लहान लहान साध्या गोष्टींसाठी किती माथेफोड करायला लावतोस? सागळी मजाच निघून जाते" म्हणत तिही हतबल व्हायची. "तुझ्यासाठी लहान असली तरी माझ्यासाठी मोठी आहे. आणि तुझ्या या अशाच वागण्यानं, माहितीये, मी फ्रीली विचारच करू शकत नाही! किती छान छान गोष्टी असतात. पण मला आपलं तुला कसं वाटेल आणि काय वाटेल मधेच मारामारी होते!" तिचे हे पद सुरू झालं की त्याला धडकी भरायची. "अगदी ट्रिवीअल गोष्टी आहेत यार! करू की! मी कधी कुठे काय म्हणालो!? आपण बोललोय ना यार यावर!" हे असले सगळं तो एका क्षणात मनामधे म्हणायचा. तसंही बरचसं मनातल्या मनातच म्हणायचा तो. आणि मग पुढच्या एपीसोडला तयार व्हायचा.

तो जसा आहे तसा आवडण्यासारखं बरचसं त्याच्यामधे होतं. पण त्याला आहे तसा स्विकारणं तितकंच अवघड. हे त्याचं मत स्वतःबद्दलच. हे दरवेळी वाद करताना सांगण्याचा त्याचा आग्रह तिला आजिबात आवडायचा नाही. तिचं फायरींग सुरू झालं की त्याला उगाचच राहून राहून बरं वाटायचं की त्याचे विचार किती लॉजिकल आहेत! तिला मात्र फायरींगनंतर फार वाईट वाटायचं. आपल्याला क्षुल्लक गोष्टीबद्दलपण ओरडावं लागतं.

"कसं होणार आपलं भविष्य" यावर ती मधेच अस्वस्थ होई.
तो म्हणे की, "वेडे आपण ईतकी वर्ष एकत्र होतोच ना. आता काय वेगळं आहे त्याहून? फक्त एक मॅरीडचा टॅग लागेल, एवढच" त्याच्या मनामधेपण तोच प्रश्न घर करून जरी असला, तरी तिला समजावताना तो भलताच कॉंफीडंट व्हायचा.
"लहान लहान गोष्टींबद्दल ईतके काही बोलावं लागतं मला. तुला नको असताना मझ्यासाठी फोर्स करतेय मी असं वाटतं. या गोष्टी नॅचरली आल्या पाहिजेत अरे! ईतके सांगावं लागलं तर मग काय मजा राहीली?" ती लगेच तिची अस्वस्थता बोलून दाखवायची.

त्याला खुप आवडे जेव्हा ती असले काही मनचे बोले तेव्हा. ती म्हणायची, "I am sorry if I am hurting you". तो म्हणायचा, "If that's what it takes to make you speak your mind, then that's what it is!" कधी कधी हे अति व्हायचं. ती भलतंच पुश करायला लागली की मग त्याचापण तोल जाऊ लागायचा. तो ऊखडायचा, "कंटाळा आलाय मला याचा! किती वेळा म्हणू की हे करेन आणि ते करेन! आता मी आहे तो असाच आहे बघ. तुला माहिती आहे. नाही झेपत तुझ्या रोमान्सच्या गोष्टी मला तर नाही झेपत. विचार कर यार तूच. मला नाही बरं वाटत सारखं तुला तेच तेच आश्वासन द्यायला. जर नसतील मझ्याकडे काही गोष्टी, किंवा तुला दिसत असतील शंभर सुधारणा तर कदाचीत आपण नसूच योग्य एकमेकांसाठी! कशाला एकमेकाला ढकला यामधे!?"

पुढंचं सगळं तो मनामधेच म्हणे. तिच्याकडे ईतक्या रोमान्सच्या कल्पना असतील तर स्वतः का करत नाही काही, असे वाटे त्याला! आता कॅंडल लाईट डिनर त्यानेच कशाला प्लान करायला पाहिजे, तीही करू शकतेच ना असं त्याचं लॉजिकल मन म्हणायचं. जसं तिला चांगलं वाटतं तसं त्यालाही चांगलं वाटेलच ना! तो विचार करे की सगळं जगानच का करावं तिच्यासाठी? तिनेही एक पाउल पुढे यावं हे कसं नाही समजत तिला? त्याला स्ट्रेच मारायचा आणि काय आवश्यक असतं म्हणून काय सांगते? तो काही बोलत नाही म्हणून पुश करते ईतकी असे वाटू लागायचं. तो तिच्यासाठी हक्काचा आहे हे मात्र अशावेळी त्याच्या लॉजीकल मनात नाही यायचं. हे असं सगळं द्वंद्व मनात झाल्यावर, तोच मग शब्द फिरवी. तिच्यामधे काहीतरी कमी आहे किंवा ती चुकतीये असे बोलायला त्याला कायमच जड जायचं. मग तो बऱ्याचदा सोडून द्यायचा. पण त्याला भिती असायची की हे सगळं मनामधेच दबून राहीलं आणि कधी एकदम अचानक बाहेर आलं तरं? सगळंच उध्वस्त होईल. त्याला स्वतःची भिती जास्ती वाटायची. रागारागात सगळं सजवलेलं नातंच तो तोडून टाकेल असंही वाटायचं. तिच्या दृष्टीनं त्याल तिच्या मनातलं कळत नाही हा अचंभा होता, तर त्याच्या मनातली भिती तिला का कळत नाही याचा त्याला राग आणि तितकच आश्चर्यही.

तो फार कमी वेळा अशा आक्रमक पवित्र्यात जाई. पण जेव्हा जाई तेव्हा तिला दुखावून जाई. ती मग त्याला सांभाळून घेई. म्हणे, "असं नाही यार करायचं. मी जरा आहे डिमांडींग, पण म्हणून तू घ्यायचं ना समजून. तू व्हायचं ना मोठं! I am your child. असं कोणी करतं का आपल्या मुलाला की बाबा बघ मीच तुझ्यासाठी योग्य नाही!" ती असलं काही बोलायला लागली की ओठ एकदम बदकासारखे बाहेर यायचे. त्याच्याकडं बघता बघता तो विषयच विसरायचा. त्याला वाटायचं, "काय उगाच ओरडलो! ती असेल एकवेळ थीरथीरी! मी तरी सांभाळून घ्यायचं ना!" तो काहीच बोलायचा नाही आणि नुसता हलकेच हसायचा. मग ती म्हणायची, "मी फार लहान आहे. कदाचीत मला नाही येत तुझ्यासारखं विचार करायला. स्वार्थी पण आहे. सगळं माझ्यासाठी मागते. सारखं तुलाच म्हणते की तू हे कर आणि ते कर!" एवढं सगळं बोलल्यावर त्यालाही बरं न वाटून तोही बोलून जायचा,
"तसं काही नाहीए रे. मी म्हणालो ना, मला खरच आवडतं तू असं मनातलं बोलल्यावर. असं राहूच नये मनामधे काही.टाकवं बोलून."
"No! Then I hurt you."
"नाही रे. सांगीतलं ना. मला आवडतं तू मन मोकळं केलस तर. हे बघ, माझ्या मनातपण तुझ्यासारखेच विचार येतात. पण everyone has to take own bets! I have taken mine. You should take yours. आपल्याला बोलायला वेळ आहे म्हणून प्रत्येक लहान सहान गोष्टीबद्दल एकमेकाला कोर्टामधे नाही उभं करायचं ना! काही गोष्टी आत्ता होत नाहीएत. तर नंतर होतील ना. नाही वाटेल खात्री आत्ता, पण तीच तर bet घ्यायचीये. मोठ्ठा डिसीजन घेतोय आपण. आपण राहतो आहोतच एकत्र ईतके वर्ष तसे पुढेही राहू. त्यात काहीच बदलणार नाहीए. बाकीच्या लहान सहान गोष्टी हॅंडल करू आपण रे. आपण एकत्र असणं महत्वाचं आहे. नाही का?"

हे बोलताना त्याने दोनवेळा तिच्या अपेक्षाना परत लहान सहान म्हणल्याचं ती नोटिस करायची पण एकुणच रावरंग पाहता विषयाला बगल देऊन सगळाच नूर बदलायची. त्याला हे ही फार आवडायचं. पण हे जसं शेवटी त्याने मनातलं बोलायचं मनामधे ठेवलेलं - तसं ईथे तिचंही काही आतल्या आतच रहायचं. एकमेकाना खुश कसं करायचं यामधे जरी मार खात असले तरी दोघाना एकमेकाना कसं दुःख नाही द्यायचं हे पक्कं माहित होतं. सुखाबद्दल भरपूर झटून झालेलं त्यांचं. कदाचीत आपापल्या गतायुष्यामधे. कुठेतरी नकळत दोघेही त्याच आयुष्याची मोजपट्टी वापरायचे. त्याच्या गतायुष्यामधे कदाचीत तो जसा होता तसा स्विकारणारं कोणीतरी होतं. तिला समजून घेणारं कोणीतरी तिच्याकडंही होतं. ती जेव्हा त्याच्यामधे सुधारणा सांगे, किंवा तो जेव्हा तिच्या छोट्या मोठ्या रोमान्सच्या कल्पनाना प्रतिसाद देत नसे, तेव्हा पुर्णपणे नकळत दोघानाही आपल्या भूतकाळामधल्या तुटलेल्या झोपाळ्यावरचं वारं झोंबायचं. पण नंतर ऊब मिळवायला दोघेही आपापल्या हक्काच्या ठिकाणीच जायचे. एकमेकाजवळ.
--------------------------------------

बऱ्याच वर्षानं भेटलेल्या मित्रासमोर तो आपली कहाणी सांगत होता. ही कहाणी जिव्हाळ्याची. त्याचा हुरूप बघण्यासारखा असे. फार कमी वेळा तो या कहाणीबद्दल बोले. कुठेतरी मागे सोडून आलेल्या कहाणीबद्दल.

"हे सगळं हे असं होतं बघा. कोणासोबतही जितका वेळ नाही काढला ईतका सहवास आम्हा दोघाना एकमेकांचा होता. जेव्हा निर्णयाची वेळ आली तेव्हा देवानं थोडा वेळही देऊ केला आम्हाला. पण आम्ही विचार करत करत त्याचा दुरुपयोग केला. शेवटी एकमेकाना ईतके अनकंफर्टेबल केले की ...
आणि मग ही आली"

ती हसली. त्याला मधेच थांबवून म्हणाली, "हं. माणसाचं मन क्रुर आहे. एखाद्या गोष्टीबद्दल कमालीची आपुलकी की किंवा प्रेम वाटण्यासाठी ती गोष्ट गमवावी लागते! आणि अशा गमावलेल्या गोष्टीना कळत नकळत कुरवाळत, हे मन आजच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतं."

त्याचा बोलायचा जोश अजुन कायम होता. "पुढचा डाव खेळताना कळात जातं की काय काय करता आले असते पण तेव्हा ऊशिर झालेला असतो. अशा हरलेल्या डावांच्या ओझ्याखाली आजचा डाव खलास होतो. काही कालावधीनंतर ईगो तयार होतात. टॉलरन्स लेवल कमी होतात. जेवढी मुभा एखाद्या अनभीज्ञ व्यक्तीला सहज देतो, तेवढीही एकमेकाला देताना ऊपकार केल्यासारखं वाटतं. एखाद्या नव्या नत्यामधे गुंतण्यासाठी मन सैरभैर होतं. नाहीच तर जुन्या नात्याचं अजीर्ण झालेलं वस्त्र तरी दूर करायची घाई होते. ते वस्त्र शिवून ठिक करण्यापेक्षा नागवं फिरणं जास्ती बरं वाटतं."

"त्यानंतर कदाचीत नव्या नात्याची सुरूवात जेव्हा होते, जेव्हा केव्हाही, तेव्हा सावध होते. ईच्छा अपेक्षांवरचे मुखवटे ऊडून गेलेले असतात. एकमेकाना समजून घेण्याच्या उपर आणि कशातच सुख राहत नाही. एकमेकांसाठी केलेल्या गोष्टीमधे तडजोड किंवा कॉंप्रमाईज ऊरत नाहीत, त्या उत्स्फुर्त वाटतात."

"एक क्षण वाटतं, किंवा वाटलं तरी पाहिजे, की अशीच सुरूवात मी मागच्या नात्याची केली असती तर? मला समज ऊशिरा आली यावर त्या नत्याचा बळी का चढवावा? नातं गमावल्याशिवाय समज नाही! आणि समज नसेल तर ते नातं नाही. कसं होतं ना की नात्याच्या गुंत्यामधे कधीतरी एक्सपायरी डेट येतेच. तारीख रीन्यू करावी लागते. नाहीतर आहे ते बिघडून जातं."

"आम्ही मग आमचं नातं सोडलं. खुप रडलो." तिनं त्याचा हात पकडला, पुढे बोलली, "आणि मग आठवड्याने त्याने एक ईमेल केलं. म्हणाला की मला आवडणार नाही पण त्यालाही असह्य झालं म्हणून त्यानं त्याच्या मनातलं सगळं परत त्याच्या नाटकातल्या नायकासाठी लिहिलं! त्याचा प्रयोग आहे. आणि येशील का विचारलं. मी काही ऊत्तर दिलं काही. त्याला अपेक्षीतच असावं कदाचीत. त्या दिवशी मग मुद्दामहून चुकून भेटलो. मी माझी ओळख करून दिली." बोलता बोलता तिचीही कळी खुलली. "जसं काही प्रथमच भेटतोय. तोही हसला आणि त्याने त्याचीही ओळख करून दिली. म्हणाला अवांतर वेळेत नाटकं बनवतो. बघायला बोलावला. मी म्हणाले, तू मन लावून नाटक बनवला असणार पण माझ्या निरसपणाला बघून ऊदास होशील. मला बोलायला आवडतं तू नाटक संपवून ये. मग आपण तुझ्या नाटकाबद्दल बोलत रात्र काढू. मी वाट बघेन. नाटक संपलं. येताना त्याने प्रथमच न विसरता बुके आणला. सोबत कॅंडल्सही आणल्या. शाळेत पहिला नंबर आलेला सांगायला जसं पळत यावं ना, तसा पळत आला. म्हणाला फक्कड झालं नाटक. मी हातामधल्या फुलांकडे बघत होते. नकळत ते बघायला एक अश्रूही डोकावला. त्याच्यामधला परत तोच खट्याळ भाव दिसला. तो म्हणाला, तुम्हाला आजच भेटलो. पण राहवलं नाही म्हणून फुलं वगैरे आणली. अगदी तुमच्यासाठीच आहेत असं वाटलं. एवढच. तुम्हाला आवडलं नसेल तर खरच राहू देत. माफ करा मला."

पुढे सांगायला तो सरसावला. "मी जेवण मांडेपर्यंत हिने गाणी लावली. म्हणाली माझ्याकडं बघून मला ईंग्लीश आवडत नाहीत असं वाटतं. म्हणून सुरूवात हिंदीनं करेल - दिल ही दिलमे हमको मारे, दिल दुखाना आपका सुरू झालं. चक्क तिने आज क्यू लगे दुनियाकी पेहली सुबहा फिरसे होगी पर्यंत तिनं तेच सुरू ठेवलं. तिला एव्हान माझ्या बॅगमधे एक नवी सीडी दिसली. माझ्याकडच्या सीडींवर बहुधा तिचंच राज्य असायचं म्हणून नवी सीडी तिला लगेच ओळखली. त्यावरच्या नावांवरून सरसर नजर सरकवत होती ती. Bryan Adams, Savage Garden, As long as you love me, Right here waiting ... वगैरे बरीच ओळखीची नावं दिसली. दिलही दिलमे ला मिळालेला वेळ तसाही माझ्यासाठी बराच होता. तिकडे माझ्या कॅंडल्स सेट झालेल्या, आणि ईकडे पहिले गाणं सुरू झालं - Nothing gonna change my love for you. एक नव्यानं ओळख झाली आमची. We moved on and we met us."

Friday, August 28, 2009

मराठी विरुद्ध मराठी

सकाळी सकाळी रस्त्यावर एक पोस्टर पाहिले ... जमलं तर त्याचा फोटोपण लावेन. त्यावर लिहिले होते - "अजुन लाज वाटते मराठीची?" का असेच काहीतरी. चित्रामधे ईंग्रजीमधले साइनबोर्ड्स होते. बऱ्याच दिवसापासून मनामधे आहे या विषयी लिहायचं. आजकाल एकदम नाजुकपण झालाय हा मराठीकरणाचा विषय! पण कोणी केले नाजुक त्याला? गरज होती का? बरेच मोठे मोठे लोक आता यावर वक्तव्य करतात. याबद्दल काही कळत नसताना याविषयी अधिकारवाणीने बोलायला जेवढी लोक आहेत तेवढीच याबद्दल समजून उमगून या वादापासून लांब राहणारीही लोक आहेत. दोघेही तितकेच घातकी.

खरं सांगायचं तर मलाही कळत नाही बऱ्याचदा की कसं हाताळायचं या मराठीकरणाच्या वादाला. कधी निर्णयाप्रत पोहोचूच शकलो नाही मी. मला मराठी लिहायला आवडते. मला मराठी बोलायलाही आवडते. म्हणून मी उटसूट सगळ्यांच्याबरोबर मराठी बोलायचच याचा आग्रह धरत नाही पण जिथे शक्य तिथे मात्र भरपूर वापरतो. मला कोल्हापुरी मराठी आणि तिथले खास असे शब्द आवडतात. ते कुठेही आणि कुठल्याही भाषेमधे चपखल बसतात आणि मी बसवतो. समोरचापण तितक्याच खिलाडू वृत्तीने ते ऐकूनही घेतो. प्रसंगी वापरतोही. पण हे सगळे केवळ मराठी आहे म्हणून नाकं मुरडणारे मराठी लोकही माझ्याकडे आहेत. त्याना भाषेमधे एखादा स्पॅनीश शब्द चालेल. एखादा हिंदीही कदाचीत चालेल. पण मराठी दिसला की मात्र नाकं मुरडतील. हे असं का? असं कसं झालं असावं? एकीकडे मी मराठी वश्विक पातळीवर नेणाऱ्या विश्व मराठी सम्मेलनामधे मदत करतो. दुसरीकडे "आतातरी मराठीचा आग्रह सोडा" म्हणणाऱ्या माझ्याच मराठी लोकांबरोबर वाद घालत फिरतो. एखादी भाषा जन्मजात मोठी नसतेच. कोणतीही नसेल. पण ती मोठी नाही म्हणुन कोणी तिचा हात सोडून दुसरीकडे जात नाही. तिला ऊच्च पातळीवर पोहोचवावे लागते.

आता शेजाऱ्याच्या घरतलं काहीतरी चांगलं वाटलं म्हणून आपण शेजाऱ्याकडंच जाऊन थोडीच राहतो? जे काही चांगलं आहे ते आपल्या घरातही करायचा प्रयत्न करतोच ना! शेजारच्या काकू जेवणामधे काहीतरी चांगलं बनवत असतील तर मी एक-दोनदा त्यांच्याकडे जावून जेवेनही. पण तिकडेच मुक्काम करणार नाही! माझ्या घरच्या जेवणावर अचानक आळणीचा शिक्का मारणार नाही. कदाचीत माझ्या घरीही तसच काहीतरी बनवायचा प्रयत्न करेन. नाही का? एखाद्या वेळेस ईदची बिर्याणी खायला दरवेळी करीमकडेच जाइन. त्यासमोर माझ्या पुलावचं कौतुक करणार नाही. पण तसेच मझ्या घरचे खाताना मला कमीपणाचेही वाटणार नाही. तेच भाषेबद्दल का नाही? माझ्याकडचं चांगलं तुम्ही घ्या, मला तुमच्याकडचं चांगलं घेऊ द्या. यात वावगं काय आहे? हातचं सोडून पळत्याच्या मागं लगल्यानं मी माझं असं जे होतं तेच सोडतोय, हे बघायला नको का? दुसऱ्याचच चांगभलं करता करता मीच अनाथ होत चाललोय. मला सगळं दुसऱ्यांचच आवडतं. आवडावंही जर चांगलं असेल तर. पण मग मी माझं का विसरावं? त्याची का लाज वाटावी? तेही तसच सुंदर करायला हातभार का नाही लावावा? पुढे पुढे याची ईतकी सवय होते की जे कोणी हातभार लावत असतील, त्यानाही तुच्छनजरेने बघतो. म्हणतो लेकहो आता तरी हे सोडा आणि बाहेर पडा जरा बाहेरचं जग बघा. ओपन माईंड ठेवा.

हा ओपन माईंड पाहिजे म्हणून शंख करताना मी बऱ्याच लोकाना ऐकलय. स्वतःच्या घरातून बाहेर या, बघा बाहेर काय सुरू आहे, ते स्विकारायचा प्रयत्न करा. हे सगळंही ऐकलय. मान्यही आहे मला. पण आजकाल एवढी वाक्यच मागे राहीलीयेत मागे. त्यामागचा हेतू अदृश्य झालाय. हे ओपन माईंड करताना, का म्हणून मी मराठीकडे क्लोज्ड माईंडने बघावं. केवळ मराठी आहे म्हणून गाणी वाईट. चित्रपट टाकाऊ. ईंग्रजी काहीही असेल तर आम्ही काही पूर्वग्रह न ठेवता बघून येणार. पण ही संधी मराठीला का नाही? काही लोकाना हा आकस मराठी बद्दल असतो. काहीना कुठल्याही ईंग्रजेतर भाषेबद्दल असतो. ओपन माईंडच असेल तर मग मराठीकडेच का नाही बघायचं ओपन माईंडनं? तिथं का लाज? केवळ आपलं ते कसं काय चांगलं असू शकेल या विचारामुळं?

भयंकर राग येतो अशावेळी. पण या सगळ्याला दुसरी बाजूपण आहे. माझे असेही लोक आहेत की जे मराठीचा अनावश्यक आणि अती आग्रह धरतात. वेळी संस्कृत शब्द वापरतील पण ईंग्रजी किंवा हिंदी नाही वापरणार. यांचे ओपन माईंड कदाचीत संस्कृतकडे. संस्कृतची मालमत्ता आपल्याच आज्ज्याची म्हणून ती मराठीच्या नावावर खपावायची आणि वर बाकीच्याना आग्रह धरून बसायचा की बाबानो तुम्हीही हेच केले पाहिजे. प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीमधे मराठी पाहिजेच म्हणून मागं लागायचं! हा अत्याचार का? जसे बीन बुडाचा विरोध नको तसाच अतिरेकी आग्रहही नको! समोरच्याला मराठी येते नसेल तर मुद्दामहून त्याच्याशी मराठी बोलणारे लोक काही कमी आहेत? का समोरच्याच्या मनात तिटकारा निर्माण नाही होणार? आणि तो आपणच निर्माण करायचा? समोरच्यालाच काय ईतर मराठी लोकानाही लाज वाटेल याची. म्हणजे आपण मदत करतोय मराठीला की आणि काही? पुढे याचं बिल भाषेवर कोणी फाडलं तर आणि हळू हळू नकळत त्या भाषेपासूनच दुरावलं तर कोणाला दोषी पकडावं? ज्यानी भाषेचं नाव खराब केलं त्याना की जे भाषेपासून दुरावले त्याना? आपलेच दात आणि आपलेच ओठ. लहानपणापासून मराठीपेक्षा ईंग्रजी शब्द वापरले की कौतुक कराणारे पालक जबाबदार की त्या पालकाना ईंग्रजीकडे ड्राईव करणारी आपणच केलेली कटथ्रोट स्पर्धा?

एकीकडे मला जसा मराठीला सावत्र वागणूक देणाऱ्यांचा राग येतो तसाच मी या अशा मराठीचे नाव बिघडवणाऱ्यांसमोरही हतबल होतो. मराठीच काय तर कुठल्याही भाषेमधे अशा प्रवृत्ती नसाव्यात. हे ३ गट आहेत - एक अतिरेकी लोकांचा, दुसरा विरोधकांचा आणि तिसरा राहिलेला समुहाचा ज्याला फक्त कोणाच्यातरी मागे जायचे माहित आहे. हा तिसरा गट बहुमताकडे पळतो. वरकरणी चलती असलेल्या किंवा सेक्सी गोष्टींच्या मागे जातो. या विरोधकाना काही बोलावे तर वाटते की कोणी मला अतिरेकी समजू नये. आणि या अतिरेकी लोकाना बोलावे तर वाटते कोणी मला विरोधकांमधे मोडू नये. आणि असे करत मीही समुहाचा एक भाग बनतो. आणि जिकडे ओघोळ जाईल तिकडे जातो. हाताशपणे. सगळे समजून ऊमगून, न समजलेल्यांच्या मागे. लोक असा बीन बुडाचा विरोध करायला लागले म्हणून या अशा अतिरेकी लोकांची गरज तयार झाली की असे अतिरेकी होतेच म्हणून विरोधक तयार झाले? कोंबडी आणि अंड्याचा वाद आहे हा. विरोधक असोत किंवा अतिरेकी, दोघेही टोकाच्या भुमिकेमधे! ही कट्टरता आता तर आणखीच तीव्र होत चाललीये. पण या सगळ्यामधे भाषा होरपळून निघतीये.

हे विरोधकही माझेच, हे अतिरेकीही माझेच. माझ्याच भाषेवर हल्ला करताहेत. मलाच सहन करायचेय. हा प्रश्न तसा नविन नाही. माहित होताच. पण मला अजुनही उत्तर मिळत नाहीए. काय प्रतिक्रिया द्यायची ते कळत नाहीए. मी कशी मदत करायची ते कळत नाहीए. ईच्छा आहे पण मार्ग दिसत नाहीए. दरवेळी असे रस्त्यावरचे काहीतरी पोस्टर किंवा टिवीवर एखादी बातमी बघून अशी अस्वस्थता जागी होते. पण ...

Saturday, May 23, 2009

Emotionally Challenged!

बऱ्याचदा मी या अशा चर्चेमधे अडकतो. काहीतरी सांगायला जावं आणि त्यातून एकदम डिबेट्सच सुरू व्हाव्यात. म्हणजे एखाद्या नविन कन्सेप्टबद्दल वाचावं. एकदम ईंप्रेस होऊन कोणालातरी सांगावं आणि त्यानं आपल्यावरच हल्ला चढवावा की किती फालतू, युजलेस कन्सेप्ट आहे किंवा एकदम अशक्य म्हणून पकाऊ आहे. मग आपणच एकदम जसे काही स्वतःचच काहीतरी खोटं पडतय अशा भावानं बाजीप्रभू व्हायचं. मग अगदी शिरा ताणून चर्चा. शेवटी मग थकून भागून चर्चेचा सामना अनिर्णित जाहीर करणे. कोणच कसं काय आपल्यासारखं पाहू शकत नाही - हा आणि एक नंतरचा अचंभा - कदाचीत आपण काहीतरी स्पेशल आहे असे स्वतःला वाटून घेण्यासाठी. याचसारखा दुसरा प्रकार म्हणजे एखादी घटना सांगताना कोणीतरी मधेच असिंप्टोटीक शेरा मारावा. आपण त्याची नोंद म्हणून काहीतरी म्हणावं आणि पुढं जावं आणि मग त्यावरच परत आपल्याला सगळ्यानी मागे ओढावं. आणि सुरू लढाई!

"तू वाचली का बातमी? ईथल्या कोणाची कोण पोर, भारतातमधे अपघातात सापडली. पोलिसानी आत्महत्या म्हणून बंद केली केस!"
"नाही गं वाचली." माझं ड्राईवींग सुरू होतं.
"तसंही या लोकाना काम करायला नको. त्यात आणि या मुलीचे आई वडिल देशाबाहेर ... कोणाचा बाप विचारतोय याना केस दाबली तर!!"
"असं नाही व्हायला पाहिजे. आज लोक येतात आपल्या देशात. आपण काळजी नाही केली त्याची तर बंद करतील लोक यायचे."
"अरे... टुरीस्ट लोकाना तर कसलं लुबाडतात माहीत आहे ना? दसपट भाव लावतात! कश्शातही"
"हं."
"आमच्या ऑफीसमधल्या कोण अमुक अमुक गेलेला ताज बघायला. सगळं आवडलं वगैरे त्याला. पण लोक उल्लू बनवतात म्हणून कडवट तोंड करून सांगत होता!"
"हा हा. बिचारा. मेरेको उल्लू बनाया! म्हणून रडत होता काय?"
"नाहीतर काय अरे. पण आपलच नाव खराब करतो यार आपण!"

खरतर मला असली क्रिबींग सेशन्स आवडत नाहीत. म्हणजे त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. फक्त आपल्या आतमधली अस्वस्थता बाहेर निघते. यामुळं कोणाचं काहीच होत नाही. फक्त स्वतःच स्वतःला समाधान देतो आपण. की बाबा, आपण बेधडक बोललो तरी. बोलल्यानंतर बरंही वाटतं. किंवा म्हणू अस्वस्थता कमी होते. पण सगळं आपल्याच विश्वामधे. असो. भारतामधले पर्यटक आणि त्यांच्या भोवतालचं जग बरच बरं होत चाललय. माझ्या ऑफिसमधला ऑस्ट्रेलिअन ब्रॅड पुण्यात मस्त ८-१० दिवस जाऊन खुश होऊन आला. पलीकडच्या राज्यात फेरफटका मारून यावा तसा. फार मोठी अचिवमेंट आहे यार. People are no more afraid of India, Crowd, and what not. पण हे मला तेव्हा नाही आठवले! मला वेगळाच प्रसंग आठवला. आणि दुर्दैवाने मीही क्रिब सेशनमधे हातभार लावला.

"अगं मीही मागे एकदा एक डिबेट बघत होतो. कोणा रशीयन का ब्रिटीश मुलीवर गोव्यामधे कोणीतरी अतीप्रसंग केला. डिबेट होती नॅशनल न्युज चॅनलवर. मुलीची आईपण तिथे. गोव्यातले लोकल रहिवासीपण उपस्थीत. मुद्दा काय तर, मुलगी ती तशीपण कमी कपडे घालून फिरायची, मुलांशी लगट करायची का असेच काहीतरी. तिच्यावरच संस्कारच नव्हते. आमच्याकडे कोणी करत नाही असे. and blah blah. I mean what the heck yaar! Does that give you right to do anything? डीबेट संस्कार या विषयावर की घडलेल्या घटनेवर? Talk about bloody संस्कार later yaar. तोंड वर करून बोलतात तरी कसे देव जाणे?"
"ओह. तिला वापरू देत ना कपडे कसलेही. Freedom आहे यार. ती तिच्या कल्चरने किंवा सवयीप्रमाणे वापरेल. म्हणून काहीपण कराल काय? तिला असतील ३-४ मित्र तिच्या देशात. म्हणून बोलली असेल गोव्यातही ३-४ मुलांशी. लगेच लगट काय? हे लोक तसेही वसवसलेले. हरकून गेले असतील मागे तिच्या. का म्हणून आपले कल्चर फोर्स करा तिच्यावर?"

विषय भरकटला हे ध्यानी येण्याच्य़ा आधीच माझीही वाट चुकली.
"That was not the time to discuss all that. जिथे जाऊ तिथल्या पद्धती, प्रपंच तिने बघीतले नाहीत. खरय. याबद्दल बोलू नंतर. मला या विषयाकडं जायचच नाहीए. कारण घडलेली घटना त्याच्याही पलीकडली आहे. बलात्कार हा गुन्हा आहे. आणि आहेच."
"हो रे. तसेही पद्धती नाही बघितल्या म्हणजे काय? आपण अमेरीकेत राहतो पण ईथे कोण आपल्याला फोर्स करते की त्यांच्यासारखे वागायला? आपण आपल्या रिवाजाप्रमाणे राहतोच ना?"
"आपण कोणच्याही रिवाजाला धक्का तर लावत नाहीए ना. हा प्रकार वेगळा आहे. आता जपानी कंपनीबरोबर व्यवहार करताना. त्यांच्या ग्रीटींग वगैरे करायच्या वेगळ्या पद्धती वगैरे नाही शिकत आपण? You should know how things will be received at new place, new cities, new country! आपलेच घोडे दामटा पुढं काय?"
"ते बिझनेस एटीकेटस. त्याचा काय संबंध ईथं? आणि असं कसं? आपल्या लोकाना काय म्हणे हौस लगेच मागे मागे जायची. झूमधले प्राणी आहेत काय पर्यटक? त्यांच्या वेगळ्या रीती तसे करत असतील. तुम्हाला काय लगेच सावज मिळाल्यासारखं त्याना पकडायचय? आपले रिवाज शिकवायला? काम नाहीए लोकाना! काहीतरी खुसपट काढून आपलं अस्तित्व दाखवायचय."

सहसा, यावर म्हणलं असतं की सगळ्या पुढारी लोकना, आपल्यासारख्या टाईमशीट्स भरायला लावल्या पाहिजेत! काम नाहीए त्याना! पण गाडी आधीच भरकटलेली. कुठेतरी कळत होतं की आपला मुद्दा सुटलाय आणि आपण दुसऱ्याच लाईनवर खर्ची पडतोय. पण ती एक भावना असते ना की समोरच्याला आपण काय म्हणतोय ते समजलच नाहीए! त्या तसल्या भावनेने आणखी शिरा ताणून मुद्दा मांडण्याचा जोश चढलेला. मुद्द्यवर येऊ रे नंतर.

"वेगासला गेलो. रोमचा गेटअप बघून लगेच म्हणालो आपण, In Rome, do as Romans do! तेव्हा का बरं नाही तुम्हाला हवं तसं केला? का म्हणून अट्टाहास रोमन व्हायचा? मला त्याविरुद्ध नाही बोलायचय. पण तसच, In India, do as Indians do का नाही? जास्ती restrictions आहेत म्हणून? ऊद्या माझ्या कोल्हापुरात कोणी आला. ऊघडा वागडा महाद्वार रोड वर फिरायला आला, छान ऊन पडलय म्हणून. लोक काय वेलकम करणार काय? शक्यच नाही. असशील तुझ्या देशामधे असं फिरत. पण दुसऱ्याकडं आलोय तर जरा त्यांच्या दमानं घ्यावं ना? मला हे म्हणायचय. दुसऱ्याच्या पद्धतींना, दुसऱ्याच्या रीवाजाला का धक्का लावा?"

"मग कसलं स्वातंत्र्य रे? ईथे मी मला हवं तसं करू शकते. वागू शकते. कोणी काही भुवया ऊंचावत नाही. सुरक्षीत वाटतं म्हणून. असं कुठं असतं काय? की स्वतंत्र आहात पण हे, हे आणि हे करायचं नाही. हे, हे आणि हे बघायचं नाही. हे, हे आणि हे बोलायचं नाही! आणि हे जर मोडलं तर मग जे होईल त्याला आणि कोणी जबाबदार नाही!"
"हे बघ. जे झालं मी त्याला डीफेंड करतच नाहीए. पण ..."
"नाहीतर काय? एवढे freedom पाहिजेच की!"
"अरे यार ... हक्क आणि कर्तव्य वगैरे काही शिकलोय की नाही शाळेत? फक्त "हक्क आहे, हक्क आहे!" म्हणून काय ऊड्या मारायच्या? तुमचे काही कर्तव्यपण आहे म्हणलं की मग तत्वज्ञान सुचतं होय? पण सोड मला बोलायचच नाहीए या विषयी. आपण भरकटतोय."
"मला फक्त एवढच सांगायचय ..."
"नको. मला ऐकायचच नाहीए. खूनकी नदिया बेह जाएंगी. जंग छीड जायेगी."

एव्हाना माझं ऑफिस आलं! गाडीमधून हकालपट्टी झाली. दोघानी एकमेकाची शक्ती बहुतांशी खाऊन झालेली. मनात चीडचीड होती. मुद्दा सोडून नाही त्या विषयावर बाजीप्रभू झाल्याबद्दल. जे घडले त्याबद्दलचा राग, अस्वस्थता दुसऱ्या विषयावर निघाली. तो विषय कदाचीत रास्त होताही. पण ...? माहित नाही यार. काही गोष्टी मनामधे एकदम स्पष्ट असतात. एखादी गोष्ट चूक, बरोबर, रास्त, खराब आह. आणि आहे म्हणजे आहे. Last thing, you want is to discuss, argue and proive it!! वाद करू पण. मग शेवटी हकनाक एनर्जी वाया घालवली असं वाटतं. आपल्या मनाविरुद्ध कोणीतरी आपली एनर्जी वापरून टाकली आणि आपण काहीच करू शकलो नाही!! असे काहीतरी. Talk about conclusions. Talk about actionables. Spend hours for that. Why the heck do we spend hours and hours to talk about our feelings and emotions? I feel so much emotionally challenged at these times! अर्धवट विषयांच बॅगेज, आणि स्वतःच्या कल्पना, आणि सिद्धांत अभेद्य नाहीत ही अशी भावना. या अशा तिटक्या विटांचं काय बनणार जर दररोज कोणी येऊन त्यांच्यावर वार करणार असेल तर. आणि तसेही कोणी पुर्णतः वेगळं म्हणत नाही. पण कदाचीत आपण आपले मुद्दे सिद्ध करण्याऐवजी आपले मुद्दे सिद्ध करण्यासाठी खपतो. आणि दुसऱ्याच्या विटाना नकळत भगदाडं पाडतो.

Whatever. वेळ कोणाला आहे ईथं! मी समोर बघून स्वतःशीच म्हणालो, "च्यायला, अजुन अख्खा दिवस आहे!!"

Saturday, May 02, 2009

बिंब

(स्फुर्ती: नुपुरची कविता)


असं होतं खरं मधेच ... अनोळखी वाटणं.
कधी ... हे आपणच का? ... असं होणं.
आरशात बघून विचारावं,
की नातं काय आपलं?
जे काल बिंब दिसलं
ते आज कुठं गेलं?
काही माझं हरवलं?
की मी कशात हरवलो?
मग दररोज आरशात बघणं
आणि आपल्याच बिंबाशी हितगुज करणं,
जुन्या बिंबाचं काय झालं,
आणि हे नवं कुठून तयार झालं
सगळं जरी आपलं असलं
तरी उगाच अनभीज्ञपणे वागणं
लाख यत्नानं ओळख पटवणं
आणि मग दुसऱ्या दिवशी परत कोणी वेगळच दिसणं!

Friday, February 27, 2009

मंदाकिनी

पाऊस आला पाहिला,
ना पाहिला मी सोहळा,
मृद्गंध सारा लोटला,
तोही असे ना वेगळा

शब्दास आली ही कळा,
दूरस्थ भासे भावना,
अल्हाद ना दे मानसी,
जैशी सुखाची शर्तशी

संगीत माया धुंदशी,
बेधुंद काया गुंगशी,
ना गंध वाटे त्यातही,
ना मग्न झाले आजही

झाले कसे वेडेपिसे,
हे अंतरीचे गूढसे,
कोणी असे का दूरचे,
लावी मनाला ओढसे




खरं सांगतो, हा वर जो काही प्रकार तयार झालाय, तो लिहिताना नाकी नऊ आले. बऱ्याच ब्लॉगवर मध्यंतरी कविता कविता पाहिल्या. मधे कुठेतरी वृत्तं वगैरेपण वाचली. मनोगत.कॉम ला धन्यवाद. तिथुनच हा किडा घुसला मनात. (मधेच सगळी वृत्तं, यमक वगैरेची बंधनं झुगाडून प्रसून जोशी सारखा धडा लिहायचा विचार आलेला पण त्याच्यासारखे आपल्याकडे शब्दभांडारही नाही आणि परत त्याला संगित लावून पावन करायला रेहमानही नाही). असो. मंदाकिनी मधे लिहायचा केलेला पहिला प्रयत्न आहे (म्हणून नाव पण तेच आहे. काही दुसरं सुचवलं कोणी तरी चालेल). समस्त कवीवर्गास अर्पण. आणि खरच, हे जो लोक वृत्तात वगैरे बसवून कविता लिहितात त्याना मनापासून सलाम. लयी महान आहात राव आपण! मलाही मजा आली आणि तेवढीच तारांबळही उडाली. :)

Tuesday, February 17, 2009

नॅनी

nani is offline. Messages you send will be delivered when nani comes online.
मी: Hey ... you there?

.
.
.
.
नॅनी: तू हल्ली ईतका बिजी कसा?
Sent at 11:16 AM on Monday
.
.

मी: सध्या जरा सिन्सिअर व्हायचे भूत चढलय ... मे बी त्याच्यामुळे
नॅनी: ईतका की ब्लॉगवर पण काही टाकला नाहीस. कित्येक वर्षात! १०० वर्ष झाली असतील!!!
मी: जखमेवर बोट!! :(
नॅनी: बिजी ऑफिसमधे. घरी काय बिजी ठेवतात तुला हे विचारतीये!
मी: कॉल्स असतात यार पुण्यामधे.
नॅनी: ऑफिसमधे प्युन तुझ्यापेक्षा जास्ती बिजी असेल.
मी: ;)
नॅनी: का काय झालं?
मी: आजतक मै तुमसे झूठ बोल रहा था. मै प्युन हू. हा ... मै प्युनही हू.
नॅनी: तुझी कंपनी भारी आहे बाबा. प्युनला अमेरीकेत ट्रान्सफर करतात!
मी: ईथे महाग असतात बाबा प्युन.
नॅनी: :) असो. पण ब्लॉगपासून दुरी का?
मी: परत जखमेवर बोट!
नॅनी: जखमच का खरं?
मी: नाहीतर काय? सप्टेंबर पासून नवा पोस्ट नाही. मग जखमच की!
नॅनी: तेच तर म्हणतीये.
मी: ११ अनपब्लीश्ड पोस्ट आहेत यार. सगळे अर्धवट राहिलेत. च्यायला मन पुढे सरकले की परत मागच्या विषयावर येतच नाही.
असो.
बघू.
होयेगा.
कुछ तो होयेगा.
हा वीकेंड.
गच्चीसाठी खच्ची!
नॅनी: चलो ... झोपायला जाते.
मी: बाय.
नॅनी: बाय. आणि लिही काहीतरी. तुझे पोस्ट्स खरच मिस् करते मी.
मी: आई शप्पथ! लेखक पेटला आता. लेखकाला माहितच नव्हते की त्याला कोणी मिस् करते. आता बासच.
हर हर महादेव.
नॅनी: :)
मी: झोप तू आता. सोक्ष मोक्ष लावतोच मी आता ईकडे.
नॅनी: पेटते रहो.

nani is offline. Messages you send will be delivered when nani comes online.

.
.
.
.
.
.

कोणाशी कधी कसे सुत जमावं याचा काही नेम नाही. एकदम अनपेक्षीत प्रकारे, काहीही कारण नसताना, किंबहुना चुकूनच आमची गाठभेट झाली. सुमारे ३ वर्ष झाली आता या ओळखीला. हा अनपेक्षीत प्रकार म्हणजे एक ईमेल होते की जे चुकुन मला आलेले.

आपल्या पुढची जनरेशन जशी नेहमी एकदम पांडू वाटते तशी नॅनीपण जरा पाकाऊ होती. चॅटमधे भरपूर "?" आणि "!"! शेवटचे अक्षर अगदी ओळभरेपर्यंत टाईप करणे हे असले प्रकार ठासून भरलेले. ईंटरनेट, ईमेल्स आणि चॅटचे पहिले नऊ दिवस सुरू असल्याने तेच तेच जुने झालेले फॉरवर्ड ईमेल्स पाठवायची. आठवड्याला "Must See...", "don't ignore", "toooooo good" या असल्या ईमेल्सचा रतिब टाकायची. आपण पाठवतो त्या ईमेल मधे काय आहे हे बघायच्या आधीच, माहित असल्या नसल्यांच्या ईनबॉक्समधे ते ईमेल पोहोचवणे म्हणजे आपले परमकर्तव्य आहे असे मानणाऱ्या लोकांपैकी एक होती ती. सुत जुळावे असे आणखी काहीच आमच्यात नव्हते - फक्त डेस्टीनी. माझ्या लेखी सर्वार्थाने निरर्थक प्रकारामधे मोडणारे सगळे गूण तिच्यात. आणि रूड हा शिक्का माझ्यावर आधीपासूनच. एकमेकाशी बोलण्याचे - बोलत राहण्याचे आम्हाला काहीच कारण नव्हते. कोणत्याही क्षणी, कोणत्याही दिवशी, "चल जा गेलास ऊडत" असे झाले असते तरी कोणालही नवल वाटले नसते. पण असे झाले नाही. उलट जास्तीच ट्युनींग जमत गेलं.

एकमेकांकडून काडीचीही अपेक्षा नाही आणि काही गमावण्याचे भय नाही. कदाचीत अशी एक बाजू कदाचीत प्रत्येकाला असते. आहेत त्या सर्व नात्यांना समांतर. आणि ती तशीच रहावी म्हणून मूक धडपडही सुरू असते. एकमेकापासून अनभीज्ञ असण्यामुळे आमच्यातल्या बोलण्यावर आमच्या आजूबाजूच्या तत्कालीक गोष्टींचा फारसा प्रभाव पडलाच नाही. एकमेकाचे मूड्स वगैरे प्रकार फारसे मधे आलेच नाहीत. नॅनी ऊगाच शंभर प्रश्न विचारायची. "काय संबंध हिचा?" हा विचार येण्यापेक्षा "काय फरक पडणार आहे?" हा विचार डोक्यात यायचा. खरं म्हणजे तर आजीबाईसारखे ईतके प्रश्न विचारते म्हणून नॅनी नाव पडलेले. आज जेव्हा असे कधी कधी निवांत बसतो तेव्हा वाटते, यार ... ३ वर्ष! केवढे काही झाले यात. मीही कुठच्या कुठे आलो आणि ती ही! जिथे आमच्या बोलण्यात "हू केअरस्?" भाव असायचा, तिथे बरेच दिवस कोणी पींग नाही केले की त्याचीही नोंद असायची. आणि हे असेच तब्बल ३ वर्ष सुरू आहे. मित्र व्हायला प्रत्यक्ष भेटायला थोडीच लागतं? बरेच किस्से ऐकलेले असे पेन फ्रेंड्स वगैरेचे. नॅनीमुळे मलाही असा एक अनुभव आला.

पण जरा विचार केला की वाटते की यात माझाच स्वार्थ होता. म्हणजे ते असे की कुठेतरी या मागच्या ईतक्या वर्षात हळू हळू मी स्वतःच गढूळ होत गेल्याची भावना येत होती. हाताकड बघीतलं की वाटायचं की यार ३-४ च तर रेघा आहेत. त्याही आखल्यासारख्या. असं कसं काय गिजमीट झाल्यासारखं वाटतय सगळं? बऱ्याच गोष्टी, बरेच विचार आतल्या आतच रहायचे. बोलतो कशाला? उगाच वाटायचे की आधी स्वतःकडे बघा - असले काहीतरी मीच स्वतःला म्हणून गप्प व्हायचो. आपलं अक्षर जरी चांगलं असलं तरी आपली पाटीच कोरी नसेल तर वाचणार तरी कोण? कधी काळी यावर असेही म्हणलो असतो, मी कसा का असेना म्हणून मी काय म्हणतो त्याचे महत्व आणि त्याचा दर्जा कमी थोडाच होतो? पण हळू हळू हे ऊत्तर पटेनासे झाले. आजुबाजूच्या बऱ्याच गोष्टींसाठी मी एक मूक प्रेक्षक व्हायचो. आणि आपण मूकपणे बघतो, म्हणून शब्द आणखीच रसातळाला जायचे. पण या सगळ्या गढूळपणात मग एक असेही अंग पुढे यायचे की जे एकदम पारदर्शक, एकदम स्वच्छ असायचं. अर्थाअर्थी काही संबंध नसताना, केवळ यात काही अशुद्ध नाही म्हणून बरं वाटायचं. त्याच्या टिकण्यानं किंवा न टिकण्यानं कोणालाही काही फरक पडणार नसायचा. पण तरीही त्याचं अस्तित्व ऊगाचच निरागस वाटायचं. त्यात कशाचं भय नाही. त्यामधे अजुनही खुली किताब आहोत आपण असे वाटायचं. यातून तयार होणारा नॉस्टॅल्जीयाच मग पुढे ते टिकवायला भाग पाडायचा. नॅनीबरोबरचं नातं कदाचीत माझ्यासाठी असं होत गेलं. आणि ते असच ठेवलं यामागं हा ईतका सगळा स्वार्थ! पण ... हे असं सगळं मला हल्ली वाटतं. म्हणजे आफ्टरमॅथ.

आपण टप्प्या टप्प्यानं मोठं होतो. प्रत्येक टप्प्यावर आपण वेगळे. बेटा बेटावरून पुढे जातो. प्रत्येक बेटावर कोणाकोणाला भेटतो. बऱ्याच कला दाखवतो. त्याची कदरही होते. त्यातून निर्माण झालेल्या अपेक्षांचे मुठभर मास चढवून मग पुढच्या बेटावर जातो. पण मग त्याच कला कलेकलेने मारूनही टाकतो. एक वेगळंच रुप घेतो. नव्या बेटावरच्या नव्या कला. चक्र सुरू. आणि मग परत एकदा या जुन्या बेटावरच्या सवंगड्यांची भेट झाली की मग मुखवटा पांघरतो. जसे काही आपण अजुन तसेच आहोत. पण मुखवट्यावीना होती ती मजा त्यात राहत नाही. कदाचीत समोरच्याला तिच मजा येतही असेल पण ते श्रेय कदाचीत मुखवट्याला आहे. बरीच बेटं पार केल्यावर, बरेच मुखवटे जमतात. आणि मग अचानक कुठेतरी एक जागा मिळते जिथे मुखवट्याची गरजच लागत नाही. कारण सगळंच अनोळखी. दरवेळी तितकंच नवं. मुखवट्यावीना स्वतःला बघणेही तितकेच रंजक. पुर्वी पुण्यात असताना दर वीकेंडला आश्रमातल्या मुलाना भेटायला जायचो. दरवेळी प्रचंड ताजंतवानं वाटायचं. त्या लहान लहान मुलांचा ऊत्साह बघून स्फुरण चढायचं. पण गेली २ वर्ष आता तो आश्रमही नाही आणि ती मुलंही नाहीत. अगदी तेवढं नाही, पण त्याची आठवण करून देणारं असं काहीतरी आहे हे बिना मुखवट्याचं वावरण्यात. नॅनी आणि माझी बडबड प्रसंगी अगदी निरर्थकही असली तरी यात अशी गोडी आहे. एकमेकाला चुकायचा स्कोपही आम्ही देत नाही आणि बरोबर चुक मोजतही नाही. एकदम काहीच्या काही बडबडत राहाणं आणि काहीच मनाला लावून न घेणं.

गेले ३ वर्ष ईतके काही झाले न भेटता. पुढेही कधी भेटू याची खात्री नाही. Thanks to Globalization. नॅनीचे लग्नही आहे आता थोड्या दिवसात. तिचे करीअरही सुरू होईल. एकामागून एक नव्या जबाबदाऱ्या खांद्यावरती घेईल. माझ्याही ऑफिसमधे माझ्या पुढच्या रोलची धडपड सुरू होईल. पायातली भिंगरी आणखी कुठेतरी घेऊन जाईल. आणखी एखादे बेट येईल. नवे लोक, नव्या कला, नवे मुखवटे. पण परत ती क्षणिक गडबड सरली की मेसेंजरवर एकमेकाला पिंग मारू ...

Hey ... you there?

Sunday, September 28, 2008

Am I doing it right?

This is amazing how we come up with innovative ways of Discriminating. आणि परत आपणच काही काळानंतर कोणालातरी नेताही बनवतो हा भेदभाव ऊखडून काढायला. Maybe this is what we call "Creating Opportunities"!

हिंदू मुस्लीम होते ... कदाचीत कमी पडले म्हणून आपण मराठा आणि ब्राह्मण आणि बरेच काही पण वापरले एकमेकांच्यात फरक करायला. तिथेही नाही भागले म्हणून पोटजातीही वापरल्या. हेही कमी पडले म्हणून आता प्रांत - म्हणे ऊत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय. Narayan Murthy had said once - We could be the only country where we love to get discriminated.

While we know that Discrimination is the PROBLEM, we still innovate and make efforts to have this problem last forever. Why do our "thoughtful" solutions again have discrimination involved. How could they be solutions then!?

आज सकाळी एक प्रेजेंटेशन पाहिले. म्हणे मराठी लोकाना आरक्षण द्या. मराठी माणूस कुठेच नाही. दहा बारा ऊदाहरणे. एकदम रीअल. कसे सगळीकडे ऊत्तर भारतीय आहेत आणि मराठी माणसाला स्थानच नाही! शेवट काय? तर म्हणे मराठी माणसालापण जागा करू. ऊत्तर भारतीयाना दाखवून देऊ आणि भैय्याना दाखवून देऊ त्यांची जागा काय ते!! मधेच दक्षिण भारतीयानापण टोले मारले होते! अंबेडकर, फुले वगैरेंची ऊदाहरणे दिलेली. या "आपल्या" माणसानी भेदभाव केला नाही पण आता "आपल्या" विरुद्ध होतोय! आणि असे बरेच काही.

अंबेडकर, फुले वगैरेंची ऊदाहरणे देऊन सांगायचे की तुम्ही आता फक्त मराठी लोकांच्या भल्यासाठी झटा! लाज कशी नाही वाटत या लोकांची नावं घ्यायला - देव जाणे? हीच शिकवण घेतली काय आम्ही? खरच थक्क व्हायला होतं. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी हालत आहे. रोग काय? त्याचा ईलाज काय? काहीतरी ताळमेळ हवा ना. या प्रकाराचे पुढच्या ५-६ वर्षामधे काय काय परीणाम होतील याची सुक्ष्म तरी कल्पना आहे का? आपला आवाज ऐकवायचा हा सर्वात सोपा मार्ग आहे - आजीबात दुमत नाही आणि आपण करतोही असे - एकदम अभिमानाने. हे अंगाला लागलेले वळण आहे आणखी काही नाही. याहून दुसरा मार्ग माहित नाही, पण कोणीतरी काहीतरी धडपड करतय म्हणून काहीच नाही तर आपला पाठींबा तरी व्यक्त करावा म्हणून केलेला आपलाही माफक यत्न. मी स्वतः काही करत नाही म्हणून मी स्वतःला आणखी कोण काय करतो त्यावर टिप्पणी करू देत नाही. शाळेतली सवय ना - स्वतः काही करायचे नाही तर जो करतोय त्याला का त्रास देतो? अजुनही कानात आहे हेच. कदाचीत म्हणून बरोबर चुक वगैरे तुलना होतच नाही.

मला या सगळ्याचा अंत माहीत नाही. मला ऊत्तरं माहीत नाहीत कारण मला प्रश्नच माहीत नाहीए. सर्वत्र मराठी लोक नसणं हा वादाचा मुद्दा आहे की कुठल्याही कारणाने भेदभाव होणं हा आहे? कदाचीत मी सर्वत्र मराठी माणसाना आणेनही. मग मी त्यात आडनावं बघून हिंदू किती, मुस्लीम किती, मराठा किती, ब्राह्मण किती हे बघेन! त्याही ऊपर आणि जाती - पोट जाती बघेन. कधी ऊठलाच किडा तर त्याविरुद्ध आवाज ऊठवेन. We will do it, not because it is right ... but because we are good at it and that is easiest.

कधीतरी आपण थांबले पाहीजे. किती काळ असेच मेसेजेस फॉरवर्ड करत राहणार? कधी विचार करणार? We have all the knowledge, we have brains, we know how to apply. Let's think. I do not know what to do and what will work but now, for sure, I know, this is not what I want to do.

Nothing against any individual - please do not take me wrong but really thought I should vent my thoughts somewhere and hence used the forum. I want this to be a better place for our next generations to come. Let them not fight the same battle. Battle against Discrimination.

का नाही मी विचार करत की कसे सुंदर बनवता येईल जग आपल्या पुढच्या पिढीसाठी? का त्यानीही त्यांचे आयुष्य घालवायचे अशाच गोष्टीसाठी. आज्जा लढला काळा गोरा साठी ... बाबा लढला हिंदू मुस्लीमसाठी आणि पोरगा लढतोय ऊत्तर - दक्षिण भारतीयांसाठी! कदाचीत नातू मोठा होईपर्यंत आम्ही आणि काहीतरी ईनोवेटीव भेद तयार करू! लढेल तोही. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही करयचा हे माझ्या मुलाला शिकवताना मी का म्हणून अशा ऊत्तराना पाठींबा देऊ की जी ऊत्तरे भेदभावाच्याच पायावर ऊभी आहेत?

पुढच्या पिढीला शिकवायचे काम मी सुरू केलेय. पण सध्याच्या पिढीला कोण सांभाळेल? प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचा आजिबात विचार नाहीए. एखादा मनुष्य त्याच्याच प्रांताच्या लोकाना पुढे आणताना बाकीच्यांची गळचेपी करतोय तर आहेच चुकीचे ते!! का नाही मी त्याला तिथेच बंद पाडत? का नाही त्याचाच निषेध करत? "तू तसे केलास तर मीही तसेच करेन ..." अरे... हे तर आपण शाळेत भांडताना करायचो. नाही काय? ही मधली ईतकी वर्षे शिकून काय प्रगती केली मग?

सगळं अनुत्तरीत आहे. म्हणून बाहेर काढायचं धाडस होत नव्हतं. आज आलं बाहेर. कोणाला यातून दुखावलं असेल तर मनापासून माफी मागतो. पण हे जग जितकं आपलं आहे तितकेच आपल्या पुढच्या पिढीचेही आहे. थोडी शक्ती हे सारे सुंदर बनवायला खर्च करू. ते नसेल तर कमीत कमी खराब करायला तरी नको खर्चूया.

Saturday, August 23, 2008

Life meri Blackberry

This is not the first time I am blogging during the journey, but this is different - thanks to American Airlines' "GoGo" - wifi with wings - which did not work but left the temptation that made me write all these things on my blackberry! Now this is quite interesting. You are in flight - several thousand fts above the ground, you make all the plans to write things, you pull out your bag n take out the laptop, start it and see that last 15 mins of battery are remaining, you still hurry n check the wireless, connect to it, see it connecting, by this time make even more plans like to email folks n all, and boom .... That bugger internet page takes you to a place that, with awesomely fresh look, asks you to pay first!! Ha ha, and then you think - "were you really expecting it to be free? This is US of A boss - nothing is free here."

Well not a very good start though, but not bad also. My earlier plans to catch a nap to remain fresh for next day were already in soup. I was up and in full mood of writing (though, do not know what) But then, as always, life meri blackberry! Pulled it out and here I am. Blogging - from mobile - flying - and smiling with no reason. This air hostess looks smarter - after seeing me pulling out the laptop n putting it back there in less than 10 mins with some restless gestures - she offerred me a different seat - where I am sitting now like a king with both the seats near to me empty, with my shoes off, n this blackberry in my hands n two tiny kids from next seat staring at me as if I am playing some kool game that their mom hasn't allowed them to touch in the flight.

Hmmmm ... Now this makes me feel better. Not sure if it is because I am doing this mobile blogging or because of these small things happening - but yeah, who cares?

Quite happening month it was - 4 more days to go - it could have been no larger than this - my parents came to US - or rather outside maharashtra for the first time n that too for more than a month which happens to be the longest period they have ever stayed away from home n home town in last more than 25 years! It was huge. While I am writing this, they are in another flight - on their way back. Things change so fast and that too upside down. You totally get to see what you never thought would happen but always hoped for. for example, my mom always dreamt about a cosy small home that she'll get to setup n manage of her own - I always wanted to see my dad taking a real long break from his daily routine. But even till couple months back, none of us knew it would happen in USA. That's God's way of telling - dude, just stay tuned - anything may come true!! God has his own tricks. You just need to know how to enjoy them. Expected/unexpected or good/ bad is a different ball game. Somehow I do not want to get into all that but have really want to continue enjoying it. This has developed a funny habit - I am actually trying find out some story, some meaning, some clue, some link or some interpretation in any of the happenings around me that could really make it worth living, remembering again, learning or something like that. It's fun.

This airhostess has come again, who seemed well n nice, now is offering me an apple juice and then chips with a real nice n wide smile saying, "only $3 for chips, sir". No wonders they hire more cute n smart n ... n ... girls in this industry. I just can't imagine a boy showing his teeth (or muscles?!) n selling some stupid chips or cookies and the passenger also buying it what he never wanted and that too with equally wide "thank you"! Only girls can make it happen. But maybe this time my blackberry was more powerful - my wide "thank you" didn't buy anything in reply to her offer. Said to her in my mind - "I just gave you a role in my first ever mobile blog! God bless your teeth!"

May be I am running all over the place now - not sure at the same time if this blackberry is going to save everything or not. This is high time my fingers should get off these tiny keyboard n sleep! After all how long can you write something descrete, perhaps disconnected, long enough? :) Those kids also have stopped stairing at me - making it less fun!

(Also high time - this blackberry should start supporting devnagari script - so that I can finish my other incomplete blogs - sometimes it feels like homework due or pending medicine that' s necessary to keep you alive!)

Good night.

Regards,

Rohit Bhosale -----------------------------------------------------------------------------------------

Sent from my Wireless Blackberry device.

Tuesday, February 19, 2008

कारण मला ऊशीरा पोहोचायचे नाही

एक मुलगा भेटायचा मला - २६ नंबरच्या बस स्टॉपवर. डगळ्या पायजम्यामधे असायचा कायम. ऑफीस, घर, पार्टी कुठेही काही भेदभाव नाही - सगळीकडे तसाच पेहराव! बघूनच मजेशीर वाटायचा गडी. बस स्टॉप नामक प्रकारावर नाहीतरी आपल्याला कंठ फुटतोच तसा याच्या बरोबरही फुटायचा. हा अवलीयाही तमाम जनतेप्रमाणे सॉफ्टवेअर कंपनीमधे. डोळ्याला चष्मा पण म्हणे बीना नंबरचा - स्मार्ट वाटावे म्हणून लावलेला. हसतमुख. सदैव चौकड्याचा शर्ट किंवा टीशर्ट मधे. ऊभ्या ऊभ्या बऱ्याच गप्पा व्हायच्या. हा अवलीया तंद्री लागली की मात्र एकदम हसत असा काही क्रीप्टीक बोलायचा की ऐकता ऐकता एकदम फ्युज ऊडाल्यागम वाटायचे.

हल्ली कार घेतल्यापासून बस स्टॉपवर जाणे कमी झाले - पण परवा अचानक जावे लागले आणि योगायोगाने हाही भेटला. अगदी तसाच, जसा पुर्वी असायचा. म्हणाला प्रोजेक्ट बदलतोय. लंडनकडे कूच करायच्या तयारीमधे होता. पोस्ट वगैरे पण भलतीच बदलली होती. गडी अजून तसाच होता मात्र. म्हणाला या बेटावरून पुढच्या बेटावर निघालो. याची बेटही कन्सेप्ट मला आधीपासून माहीत होती. एकदम सरळ बोलणारा माणूस मधेच भडकायचा पण. काही गोष्टी असा काही बोलून जायचा की ऐकणाऱ्याला काय प्रतीक्रीया देऊ हा प्रश्न पडावा! काहीही म्हणजे काहीच्या काही बोलायचा हा गडी - तेही हसत. आणि पुढच्या क्षणी विषय एकदम निराळा!
"You know what? She is not vergin! And I can bet on that. It is just that I do not want to talk about it. That doesn't mean that she should assume I know nothing! बात करती है! तुला सांगतो ... पोरीना नको त्या ठीकाणी माज ... आणि नको त्या ठीकाणी लाज वाटते!"
एक ना दोन. बरेचसे असे त्याचे कमेंट हळू हळू आठवू लागले. पुढच्या बेटावरचा प्रवास सुखाचा जावो म्हणून मी निघालो. एकूणच एक वेगळ्याच दृष्टीकोन असलेला हा गडी फक्त बस स्टॉपवरच्या ओळखीमधे बरेच काही नवल बोलून गेला. त्याची बेटाची कन्सेप्ट, हा गेल्यावर जास्ती आठवते हल्ली.
.
.
.
.

एका दुसऱ्याच जगामधे आलोय मी. मी स्वतः आणलेय मला ईथे. अगदी जाणून बुजून! ठरवून वगैरे नाही पण एकदमच अनभीज्ञ होतो यापासून असेही नाही - अगदी पुरेपूर कल्पना होती आपण कुठे जातोय याची. ऐलतीर पैलतीर करत करत आपला तीर कधीच मागे सोडलाय मी. कोणा अनोळखी बेटावरून फिरतोय. हा बेट माझा नाही पण या बेटाबद्दल कुतूहल नेहमीच होते मला. ईथे यायची अफाट ईच्छा पण होती. मी आलोय त्या बेटावर पण त्यासाठी स्वतःचा गाव सोडावा लगेल याची जाणीव ऊशीरा झाली. जसे एकदा बाटला की बाटला! परत मागे फिरतो वगैरे प्रकरण चालत नाही तिथे! दोनही गोष्टी एकदम नाही होत. आता ईथून मला माझा गाव दुरवर अंधूक दिसतो. त्या गावामधे आता मी पाहूणा असेन. कारण या बेटावरची धुळ मला चिकटलीये. या बेटावरचा मीठ मझ्या रक्तात गेलेय.

ईथे सगळीच नवलाई. मान, अपमान, स्वाभीमान किंवा आत्मविश्वासाचे कपडे काय तर अगदी लाज, शरम, आब्रू आणि मैत्रीचेही बुरखेही वेगळे. कोणी नवे म्हणेल तर कोणी वेगळे! पण माझ्या गावासारखे नक्कीच नाहीत. हे सर्व कुतुहलाने बघता बघता कधी स्वतःवर पांघरले कोणास ठाऊक? मी या लोकांच्यातलाच एक वाटतो माझा मला! कधीकधी बेटाच्या ऊंच टोकावर चढून बसून मी माझा गाव पाहतो. तिथे नसलेला मी पाहतो. कधी नोंद न केलेली मर्यादा पाहतो. ईथे सगळेच स्वतःसाठी आदर्श. मी माझ्या गावातले बुजुर्ग आठवतो. मला आदर्श म्हणणाऱ्यांपासून पळून येताना मागे सोडलेला माझा आदर्श पाहतो.

परतीचा रस्ता दरवेळी मिळेलच असे नाही, पण परत जाण्याची ईच्छा करून कोणी लक्ष्य गाठायला निघत नाही. अशी बरीच बेटं लागतील, बरेच किनारे सोडावे लागतील. कुठवर जाऊ शकतो आपण हे मापायला मी नक्कीच निघालो नव्हतो. कुठे पोचायचेय नसेल माहीत तर ईंधन वाया घालवायची काय गरज? आणि जर माहीत असेल तर दिरंगाई कशाची? हिशोब एकदम सरळ आणि सोपा - समजायला आणि बोलायला. निघालो तर आहे, पण माझ्यामधला मला आवडणारा "मी" मागे सोडत. आणि कदाचीत हाच प्रश्न आहे - ज्याला मागे सोडतोय, त्यालाच अंतिम लक्ष्यापर्यंत पोचवायचे होते - तोच नाही राहीला तर पुढचा प्रवास काय कामाचा?

ईथे लोक मर्यादा ओलांडतील आणि मग शांतपण एक वेगळेच नाव देऊन नामानिराळे होतील. ईंपल्स होती ती म्हणून बऱ्याच गोष्टी खपवतील. स्वतःलाच शहाणपणाचे धडे शिकवतील. एकदम कमीत कमी प्रश्न पडावेत असे सोयीस्करपणे आपलेच एक वेगळे तत्वज्ञान बनवतील. ना प्रश्न, ना ऊत्तरे या अशा अवस्थेमधे आपण किती खुश आहोत हे बघून समाधानी होतील. हे एकदम अचाट! अगदी अनाकलनीय पण वरकरणी एकदम चौकटीबद्ध. काहीच पंगा नाही. "चुका होऊ शकतात" हे माझ्या गावामधे सहानुभूती देताना वापरायचे वाक्य होते - या बेटावर ते ब्रीद भासते. लांबून चकाकत होते ते सोने होते की वाळू हे समजायच्या आत किंवा समजून घेण्याच्या आत, मीही चमकू लागतो. एकदम लख्ख! आणि मग कधी बेटाच्या किनाऱ्यावरून आपल्या गावाकडे बघणाऱ्यांच्या भाऊगर्दीमधे जाऊन मीही सामील होतो. हे बेट या अशांच्याच गर्दीमुळे मग दुरून ऊजळून निघत असावे!

ईथे थांबायचे कोणालाच नाहीए. मलाही नाहीए. पण जाऊ त्या बेटावर, त्या बेटाचा रंग पांघरू, हे प्रवासाच्या सुरूवातीला माहीत नव्हते. आणि ही मिळालेली समज एक तगमग जागी करते. मी पुढे पुढे चाललोय यावर समाधान मानायचे की मी परतीचा रस्ता मिटवतोय याचे दुःख? मी आणि माझे लक्ष्य यातले अंतर कमी करतोय कि त्या लक्ष्या पर्यंत ज्याला पोहोचवायचे होते त्याला मागे सोडतोय याचे दुःख. तसे मलाही माहीत होते की बऱ्या़च बेटांवरून जाणार आहे, पण प्रत्येक बेटाचा रंग लागत जाईल हे जरा निराळेच. रंग लागू नये म्हणून की प्रयत्न केला नाही - पण रंग लागल्यावर, आपण परत बाटलो असे काही मात्र वाटून गेले - दरवेळी.

सुख दुःखाच्या गोष्टी केल्या की ऊगाच जरा भावनीक झाल्यासारखे वाटते. हे बेट हा एक टप्पा आहे, प्रत्येक जण येतो या टप्प्यावर. या टप्प्यावर कोणीच थांबायचे म्हणून येत नाही. पण काही थकून तर काही समाधान मानून ईथेच नांगर टकतात. बकीचे पुढे जातात. थांबले ते बरोबर? की पुढे निघाले ते बरोबर? हे असले हिशोब मांडायचा माझा मानस नाही. तसे जरी समाधान आपले ईतके स्वस्त नाही की या टप्प्यावरच हत्यारं ठेवावी, पण कुठेतरी धुसर भीतीही वाटते - ऊद्या तसेच झाले तर ...? मी ईथेच अडकून पडलो तर...? किंवा ईथेच मलाही समधान गवसले तर...? हा आत्मविश्वासाचा कमकुवतपणा की या बेटावरच्या कपड्यांचा परीणाम? मला या प्रश्नाचे ऊत्तरही शोधायचाही विचार नाही, कारण मला विषयच बदलायचा नाही. पुढे एक दुसरे बेट वाट बघत असेल, मला तिथे ऊशिरा पोहोचायचे नाही.

Wednesday, December 12, 2007

पाऊस एकदम पाऊस होतो

संदिप खरेच्या या ओळी ऐकल्या ...

आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही!!

आणि मग एकदम लिहायची खुमखूमी आली ... पण मूड येत नव्हता ... तरीही काहीतरी खरडले ...

कळत नाही बऱ्याचदा ...
पाऊस आला की तू आठवतेस
की तू आठवलीस की पाऊस येतो

पण गाडी पुढे गेलीच नाही ...! तिथेच राहीलं सगळं ... ऊसनं दुखणं आणल्यासारखं वाटलं काहीतरी!
मधे कोणी म्हणाले - पाऊस सुरू झाला! पण लपून छपून कोणालातरी शोधल्यासारखा तोही रात्रीच येऊन जायचा ... जाताना आपण अलो असल्याच्या खुणा सोडून जायचा!

शेवटी काल आणि आज मस्त पाऊस झाला ... केल्वीन होब्स मधे होब्स अंगावर ऊड्या मारून येतो ... तसा! थंडीको मारो गोली म्हणत चक्क पावसात भिजत चालत ऑफिसमधे आलो.

परत काहीतरी खरडायचा मूडा आला ... आहे मुड तोवर लिहीतोय ... बाकी चुकभुल द्यावी घ्यावी :-)


रानात छंद मकरंद गातो
मनात मंद हळुवार राहतो
बघताच मागे वळूनी कधीही
असा बिलंदर कुठून येतो

कधी व्यस्त गाठतो
ओळखीचा एक गंध ठेवतो
मन खिन्न ऊदास असो
कसेही
येऊन तसाही हात पकडतो

वाड्याच्या दगडावर झिरपतो
ओसाड टेकडीवरही घसरतो
मी परदेशी जाईन कुठेही
माझ्यासाठी तिथेही पोहोचतो

ऊनाड नाचतो ...
बेभान गातो ...
अल्लड हसतो ...
साक्षी राहतो ...
हलकेच स्पर्शतो ...
तुडूंब भिजतो ...
काही समजावतो ...
बरेच सुनवतो ...

पाण्यासाठी स्वरूप होतो
न्हासाठी ओलावा बनतो
मोर येईल जेव्हा कधीही

पाऊस एकदम पाऊस होतो!

Saturday, November 17, 2007

प्रेमाचे आयसोटोप

कितीतरी गोष्टी समोर असतात बऱ्याचदा पण कधी बघण्याचा त्रास घेत नाही आपण. "आपण" कशाला म्हणू? म्हणजे ऊगाच स्वतः बद्दलचे शहाणपण जगाला चिकटवून सगळेच एक सारखे असल्याचे समधान. पण - मी - माझे - असे लिहीले तर परत वाचताना किती आत्म-केंद्रीत लिहीतो आपण असे वाटते! परत 'आपण'! असो. विषय वेगळाच आहे. तशी मधे ३-४ पोस्ट अशीच लिहून अर्धवट राहीलेली. गणेशोत्सव मधले 'कथा गदिमांच्या' असो किंवा 'मुलखावेगळी माणसं' असो किंवा 'रात चांद और गुलजार' कार्यक्रम असो. सगळे ड्राफ्ट मधेच राहीले. बऱ्याचदा एकदम जोशमे लिहीणे सुरू होते काहीतरी ... आणि पब्लीश करेपर्यंत नाहीच राहत. चालायचच.

तर प्रेम ... प्रेम विषय होता. तसे हेही सुरू करून महिना आरामात उलटला असेल - पण होय ... प्रेम हाच विषय होता ... किंवा तसा विषय काहीच नव्हता ... पण प्रेमापासून विषय सुरू झाले सगळे ... अपुर्ण ब्लॉगच्या कचऱ्यामधून ...

श्रृंगार रस बीभत्स नाही होणार याचे भान असलेले लोक म्हणून गदीमा, बाबूजी पेंढारकर आणि लावणी यांच्या बद्दल काहीतरी लिहायच्या विचारात होतो. सुरूवात चक्राला ती तिथून झाली. प्रेम प्रेम प्रेम ... सिनेमे ... पवसातली गाणी ... शाहरुखचे डायलॉग (तसे बॉलीवूडचे डायलॉग म्हणायचे होते ... पण तिकडे प्रेम या विषयावर शाहरूखची monopoly आहे ना .. म्हणून शाहरुख) ... या पलीकडे फार कमीवेळा गेलोय मी. मधे मधे प्रेम म्हणजे काय 'तसलेच' प्रेम कशाला हवेय म्हणून डीबेट वगैरे पण केलेली पण त्या नंतर परत प्रेम या शब्दाला ठरलेल्या चाकोरीच्या बाहेर काही नाही येवू दिले.

गेले दोन - चार दिवस मराठीमय दिवस होते ... मराठी नाटके ... सिनेमे बघणे कार्यक्रम सुरू होता. 'सातच्या आत घरात','श्रीमंत दामोदर पंत' आणि आज 'कार्टी काळजात घुसली'. सगळे एकदम वेगवेगळे विषय. सगळयांचा प्रेक्षकवर्ग वेगळा. पण कुठेतरी एक गोष्ट समान होती. प्रेम.

"असेल दामू थोडा वेडा... पण आमचे आयुष्य आता तोच आहे" असे म्हणणारा 'श्रीमंत दामोदर पंत' मधला दामूचा बाप ... किंवा "भडकलेले, चिडलेले कसेही पण बाबा तुम्ही मला खूप आवडलात." म्हणणारी ती 'कार्टी काळजात घुसली' मधली कार्टी! काहीतरी जुनेच पण नव्याने बघीतल्याचे जाणवले. काहीतरी हरवलेले परत मिळाल्यासारखे वाटले.

म्हणजे बघा ... एक मुलगी ... तब्बल १६ वर्षाने बापाला भेटते. बायको पोरीला टाकून गेलेला बाप - मोहन जोशी. त्याची त्याच्याएवढीच सडेतोड बोलणारी मुलगी. अगदी बापाच्या मैत्रीणीला "आत्या तुम्हाला म्हणता येणार नाही, आणि मावशी म्हणलेले मला चालणार नाही!" म्हणणारी! १६ वर्षानंतर फक्त बापने मायेने डोक्यावरून हात फिरवावा म्हणून आलेली ही मुलगी असो ... किंवा आपला वेडा दामूच आपले आयुष्य आहे मानणारे 'श्रीमंत दामोदर पंत' मधले आई वडील असोत. सारे बरेच काही बोलून जाते. प्रेमाच्या या छटा नवीन जरी नसल्या तरी ऊगाचच वेगळ्या वाटल्या खऱ्या.

एका भलत्याच संस्कृतीच्या कचाट्यात सापडल्याचा भास होतो हल्ली. आजूबाजूला बघावे तर एकदम Individualistic अशी अमेरीकन संस्कृती. स्वातंत्र्य अजीर्ण व्हावे अशी दृश्यं. आणि त्यात वावगं काहीच न वाटणारे लोक. मी पण कदाचीत. कारण स्वातंत्र्य ना! तुला नाही बरोबर वाटत, तर तू नको करू ना - ऊगाच बाकीच्याना काय सांगतो.

"प्रेम - प्रेम काय रे ... some times it works, sometimes it doesn't. If it does, it does. If it doesn't then wait a while, it will happen to you again"
असे म्हणणारे मीत्र आणि मग
"ईन्सान एक बार जीता है, एक बार मरता है। प्यारभी एकही बार करता है।"
म्हणणारा शाहरुख - एकमेकांशी वाद घालतात असे वाटू लागते.
किंवा अगदीच काही नाही तर - "साले ... तू कहा दुधका धुला है?" पण खरं बघावं तर विषय याही पलीकडचा आहे पण अलीकडच अडकून पडलाय.

कदाचीत म्हणूनच प्रेम ही कल्पना ठरावीक चाकोरीच्या बाहेर नाही जात. आयुष्याच्या आणाभाका देऊन प्रेमकथा संपत नाही ... तर सुरू होते. झाली तरी पाहीजे. आजूबाजूला बघावे तर पुढच्या पायरीपर्यंत कोणाला जायचेच नाहीए. कुठेतरी प्रेम लुप्त होताना दिसतेय. किंवा प्रेमाचा एकच आयसोटोप बाकी राहतोय आणि बाकी अंतर्धान पावतायत असे वाटतय. गेले सोळा वर्ष बाप असताना आम्ही पोरकी झालो म्हणताना रडणारी मुलगी आणि बापाने नकळत मायेने डोक्यावर हात ठेवल्यावर स्वर्ग मिळाल्यासारखे भाव दाखवणारी तीच मुलगी ... सोळा वर्षाने आपल्या मुलाशी फोनवार बोलणारा बाप ... सगळे चित्रच वेगळे. म्हणजे ती तगमग - ती अगतीकता - विरह - हर्ष - सर्व काही होते पण जसे काही वेगळ्याच कपड्यात. पण हे सगळे बघताना नवल का वाटावे ...? की या सगळ्या भावनांची ... सवय गेलेली? काहीतरी माझ्यामधेच मिसींग असल्यागत वाटतय. प्रेम हे फक्त ऊदाहरण आहे ... पण तशा कितीतरी गोष्टींमधे भलतीच सवय लागून गेलीये ...!

म्हणजे हे असेही असते. कदाचीत होतेच आधीपासून. पण बघतो कोण? त्यात स्पाईस नाही ना?! कदाचीत त्यामुळे. काय बघावे हे ही आपणच ठरवणार ... आणि काय नाही बघावे हे ही आपणच ठरवणार. प्रेमाबद्दलच बोलायचे तर ... ते ही प्रेम ... हे ही प्रेम. त्यात तुलना करणे योग्य नाही पण एकाकडे कानाडोळा आणि एकाकडे टकमक नजर! म्हणजे अगदी फक्त क्रिकेटचेच लाड आणि बाकी खेळांना सावत्र भावंडाप्रमाणे वागवल्यासारखे!

यातले काहीच नवे नव्हते. माहीत नव्हते असेही नव्हते. पण कदाचीत विसर पडला होता. किंवा नजरेला झापड लागलेली. रसायन शस्त्रामधे जसे पदार्थांच्या (की मूलद्रव्यांच्या ... आठले सर माफ करा, खरच शब्द आठवत नाहीए!) रुपाना आयसोटोप म्हणायचो तसे हे सारे प्रेमाचे आयसोटोप आहेत. काही नाहीसे होताना तर काहीना खास फुटेज खाताना. काहीना लुप्त होताना तर काहीना larger than life होताना. सगळे आपणच करतोय ... आपणस बघतोय. (परत 'आपण'! ...)

का कोणास ठाऊक ... नाटक बघून बरेच दिवस गेले ... पण हे विषय मनातून जात नाहीएत. कदाचीत कुठे तरी अनोळखी ठिकाणी चाललोय असे वाटतेय. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमधे आपण सहभागी जरी होत नसलो तरो कुठेतरी त्यांचा अतीरेक आपल्याला त्या सगळ्या गोष्टींना ईम्युन बनवतो! या ईम्युनीटीची हल्ली भीती वाटतीये!! ही ईम्युनीटी आपल्यात ऊतरणार नाही ना - याची भीती! प्रेम हे खरच फक्त ऊदाहरण आहे ... अशा बऱ्याच गोष्टी आता नव्याने दिसतायत. थोडे मान ऊंचावून मागे वळून बघीतले तर कळेल.

म्हणजे अगदी ... तुम्ही ऊभ्या आयुष्यात दारूला स्पर्शही कलेला नसेल हो ... पण ईतका सर्वाना दारू पीताना पाहीला असाल ... की ऊद्या तुमचा मुलगा जरी प्यायला लागला तरी त्याचा कान धरायच्या आधी स्वतःच बरोबर करतोय की नाही याचा विचार कराल! प्रश्न बापलेकाचा नाही ... प्रश्न सवयीचा आहे. वावग्या गोष्टीमधे वावगे बघण्याचा आहे. एकदम अचुक शब्दात मांडता येत नाहीए ही अस्वस्थता ... पण ... काहीतरी घोटाळतेय मनात हे बाकी खरं.

अगदी असे नाही ... पण बरेचसे असेच विचार येवून गेले ... तसाही या ब्लॉगवर एकदम पहीला पोस्ट टाकला तोही बऱ्याच अनुत्तरीत प्रश्नाचा!! तिच श्रृंखला अजून सुरू आहे ... हे सारे नवीन प्रश्न ... एवढेच

मेरे मन ये बता दे तू ... किस ओर चला है तू!! क्या पाया नही तूने ... क्या ढुंढ रहा है तू!?

(मी असे काही नाटक बघीतले हे तसे कोणाला सांगून पटणार नाही - म्हणून ईतके सगळे लिहून काढले!)

Friday, October 26, 2007

A 'Happy' Birthday

------------------------------------------------------------------
From: Stranger
To: Her

Birthdays come and Birthdays go.
Every time you find a new bunch of people to celebrate with. Every next time you miss this 'new' bunch of people while enjoying with new 'new' bunch of people!

Why can't those folks come back again? Why don't you get them every time you want them around you?
Life is on the wheels … So are you ... and wish you always would be ...
attempting to catch you for a while ...
people who enjoyed birthday once ... want you to enjoy with them again.

Keep the evening free ... 17th evening :-) San Jose Time :)
:-)
With a bright morning of 17th in India ... Wishing You a Very Cheerful Birthday in advance ...
See you soon ...
------------------------------------------------------------------

दिवस सुरू ... एकदम नेहमी सारखा ... म्हणजे ... सकाळी सकाळी कळावे की मोबाईलची बॅटरी संपत आलीये... (हे गुढ काही कळत नाही ... हा मोबाईल नेमका सकाळीच ओरडतो "बॅटरी लो" म्हणून ... रात्री वगैरे कसे काय सुचत नाही देव जाणे) ... तोंडी लावल्यासारखे मग त्याला ऊगाच चार्जर चाखवावा अर्धा एक तास ... अगदी अर्ध्या तासात एकदम सग्गळे आवरून बस स्टॉपवर हजर व्हावे! आणि मग नेहमीसारखेच आठवावे ... की चार्जर घरीच विसरलाय! असो ... तर तसाच आणखी एक दिवस ...

कॅमेरा घेतला ... फोटोची ऑर्डर पुर्ण झाली ते नेटवर नक्की बघीतले ... आणि मग पुर्णपणे कल्पनाकी ऊडान घेत ऑफीसकडे कूच केले... लहान मुल बागडावे तसं सकाळी विचार ऊड्या मारत असतात. प्लान मनामधे तयार झाला ... दुपारी डॉक्टर ... मग फोटो ऊचला ... फ्रेम घ्या ... संध्याकाळी बस ... पुढे ट्रेन ... केक ... गिफ्ट ... मग वापस ... काम सुरू ... ९ ला कॉन्फरन्स कॉल ...! परफेक्ट. स्मूथ.

------------------------------------------------------------------
From: her
To:
Stranger

thanks for those wishes!!
But who are u? U surely are not in India...:)
Itana to guess kar hi sakati hoo...;)
------------------------------------------------------------------
From: Stranger
To: Her

Dil se yaad karo to log pohoch jate hai ... (ya fir pohochaye jate hai!)

Tomorrow evening ... you choose the place ...

will make sure to make the evening memorable ...

------------------------------------------------------------------
From: Her
To:
Stranger

hey Vasu...
surprise accha hai ...:) aur mail bhi !!
------------------------------------------------------------------

सब चिजे पिलान के मुताबीक होतात की नाहीत बघायची ज्या ज्या वेळेला लहर येते ... नेमके त्या त्या वेळेला लफडी कशी होतात देव जाणे!! दिवस सुरूच झाला होता तोवर फोटोवाल्याने सांगीतला फोटो झालेच नाहीत. म्हणे संध्याकाळी घेऊन जा. नाही त्या वेळी कसे काय या लोकाना वेळेचे महत्व कळत नाही देव जाणे. आता संध्याकाळी फोटो आणायचे ... मग बस ... मग ट्रेन ... मग केक ... मग ... मग ... बागडणे सुरूच तरीही.

हे असे unwanted characters येऊन कथेमधे लुडबुड करतात तेव्हा ऊगाच काहीतरी राडा करतात. असो ...

------------------------------------------------------------------
From: Stranger
To: Her

achche to sab hai ...


I am enjoying this "guess who" game. :-) though I did not start it.
Here is a suggestion ... keep this game aside for a while and answer this question ... 7.30 pm near light rail station?

------------------------------------------------------------------
From: Her
To:
Stranger

see...

if u dont tell me who are u then there is a heavy possiblity that we dont meet :)

And if YOU are Vasu...then be sure that i'm going to kill you!!
------------------------------------------------------------------
From: Stranger
To: Her

Vasu!!! That's it? Make an impossible wish buddy... It might come
true. Vasu ka kya hai? Wo to aisehi ayega santa clara se!!

Let your
mind think out of santa clara!!! Anyways ... Do not disappoint a good bunch of people and of course the cake!

It is good to keep surprises at times ... What do you think? If traffic doesn't go ugly, then let the surprise catch you at arnd 7.30 pm near the light rail station...

------------------------------------------------------------------

अनोळखी कलाकार ... अनोळखी कलाकार ... !! याना माझीच कथा बरी मिळते ...!? विचार चक्र अखंड सुरूच. संध्याकाळी कधी निघावे ... कधी पोचणार ... वीकेंडला काय ... (वीकेंडचे वेध लागायला तसा काही वेळ काळ नसतोच म्हणा!)

फोटोचे बारा वाजणार वाटू लागले. काय मस्त कल्पना होती गिफ्ट म्हणून फोटो द्यायची. आता तेच नाही मिळाले तर शिट्ट्या! बॅक-अप प्लानचा विचार करावा तर तितका वेळही नव्हता. रामभरोसे.

साहेब युरोपाला जाणार ...! त्यानाही तहान लागलेली. तसे जाणार होते २ दिवसानी पण सगळे आजच तयार पाहीजे...
तसेही आपण सोडून सगळ्या जगाला त्यांचे त्यांचे खेळ मांडायला अगदी पुरेसा वेळ कायम असतो! असेच वेळेचे महत्व त्या फोटोवाल्याला असते तर ... ह ... मग कदाचीत तो माझा बॉस असता! झाले भरकटले मन ... फोटोवाला बॉस झाला तर काय ... यावर एक-पाच मिनीटं गेली.

मी डेंटीस्टकडे जायच्या वेळेकडे लक्ष ठेवून काम आवरत होतो.

------------------------------------------------------------------
From: Her
To:
Stranger

ok...which light rail station??

because if u r NOT vasu then let me tell u ke mujhe Vasu ko bhi milana hai....

And by the way my last guess for u is - my college friend Aditya ..who is very much here in San Jose..now id its you Ady..then its surely gonna be surprise!!
------------------------------------------------------------------
From: Stranger
To: Her

Now your imagination is flying ...! :-)


lage raho ... let us see how long it can go ...!


Let's plan anyway ... i am talking about the light rail station near to your place ... or suggest me another place ... or we can go somewhere for dinner ... call up Vasu there ...

BTW do people surprise you .... or their actions ? :)

------------------------------------------------------------------

"जबड्याचे ९ एक्स-रे!! मी ऊभ्या आयुष्यात कधी ९ एक्स-रे काढले नसतील!"
एखादा गरजू होतकरू तरूण (आता ही कॉलेजची सवय जात नाही ... तरूण म्हणले की तो गरजू आणि होतकरू असलाच पाहीजे ... भले त्याच्या गरजा भन्नाट आणि हेतू विचित्र असेल!) कामातून सवड काढून दवाखान्यात आला तर त्याला ईतके घाबरवू नये अशी भूतदया वगैरे डॉक्टर या जमातीला नसते.
"आप बाप बननेवाले हो" या अविर्भावात डॉक्टरने सांगीतले ... "नवीन अक्कल दाढ येतेय".

पुढे म्हणते की ... "But ... There are complications!"

काय हा दिवस!? ईकडे अकलेचे दिवे पाझळणे सुरू असताना ... तिकडे अक्कल दाढ डोके बाहेर काढत होती! डॉक्टर म्हणाली काढून टाका दाढ. अगदी मनात आलेले ... की सांगावे अहो नको हो ... राहु देत माझे ३२ दात ... का माझे अकलेचे तारे तोडताय! मी खरं म्हणजे अगदी खर कोणाला त्रास देणार नाही!!

पण दुसऱ्या क्षणाला म्हणालो ... "ओके ... काढू दाढ ...
...
पण आज नको."

------------------------------------------------------------------
From: Her
To:
Stranger

ok Mr. Stranger..

now here is the problem..

I need to meet u ( or u PEOPLE??) at 7:30 PM

I need to meet Vasu at around 6:30- 7:00

And my room-mate's friend is leaving tomorrow so they are having the farewell party at 7:15 PM..
Problem is...i would have made this decision quickly..if i would have know..who are u...whether u r really here in San Jose..or if its some sort of joke...

But then..i dont know. So..help me decide..what shall I do??
------------------------------------------------------------------
From: Stranger
To: Her

Stranger ... hmmm now this is a good word ...!


I wonder how would it help you if I say ... dude hey ... i am ... say Sangram ...! how would this name 'Sangram' help you decide?

Interesting question though here is the interesting Answer ... BDay or Farewell ...? You decide ...

It won't take much time ... even an hour should be ok ... say ... 7 to 8 ... (all depends upon your appetite though!) will cut the story short :)
can only assure you one thing ... would be a pleasant experience for you :)

Where would you be at around 7 BTW?
In worst case ... weekend ... but really would like to cut the cake today ... akhir BDay ka bhi kucH maan rakhana chahiye na!

------------------------------------------------------------------

फोटोवाल्याचा फोन. म्हणाला एकदाचा ऑर्डर रेडी!! झाला खेळ सुरू! दाढ वगैरे दुखायचीपण आपसूक बंद झाली.

काढले मॅप्स ... ऑफीस ते फोटोवाला ... फोटोवाला ते बस ... मग ट्रेन ... मग केक ... मग ... मग ...

एकदम क्लीअर. no confusion. Perfect. ९ पर्यंत घरी परत येणार ... मग काम. conference call सुरू... Cooking ... जेवण ... ऊद्याची तयारी... विचार करता करता मी कधीच रात्री घरी येऊन काम वगैरे करेपर्यंत पोचलो.

पायाला भिंगरी ... मनाला पंख! पुढे मात्र भलतेच काय काय वाढून ठेवलेले.

------------------------------------------------------------------
From: Her
To:
Stranger

dont u understand its important for me to know who are u...
i need to make some decision about this...

I am sorry but I had to take some hard decision..

I am going out with Vasu..he was like telling me since y'day...that we should go somewhere..

Whoever u r I m really sorry to u...

U might have done a bit of preparation and all that ..but cant do anything..
U r not telling me who are u...from where u have come,,,anything.....
what to do..

And dont think i m lying to u..to know the truth..
then u have got me wrong.

Till the last moment i was cofused...but i dont really have much choice...
------------------------------------------------------------------
From: Her
To:
Stranger

Mr.
Stranger...

u have got a breather....:)

I will be going out with Vasu but only for a while..so now tell me the time and place to meet...
and please be quick as i need to leave by 5:45...
------------------------------------------------------------------
From: Stranger
To: Her

:-)
I am a gigantic, ugly, dark, monstrous terrorist ... who is now very upset by your decision !!

Do not think about getting you wrong ... त्या लेवलपर्यंत विचार आपले जात नाहीत :)
anything before 7 pm would be like miracle for me ... since it is already 6 now ...

I shall be near Mont Station at around 7 ... unless you mail otherwise ...
and Thanks for being so kind and considerate (thought these words would suit the situation)

------------------------------------------------------------------
From: Her
To:
Stranger

I told u ...I m sorry..

and definitely want meet u..as I m very sure u look like somebody who i know for quite some time..but i m not able to make out..

I will be there at Mont station at 7!!.. But dont go on the train platform just wait at the entrance!!
... ...

m leaving now..

looking forward to meet the GIGANTIC , UGLY, DARK, MONSTROUS TERRORIST :)

------------------------------------------------------------------

Gigantic, Ugly, Dark, Monstrous Terrorist!! हा हा ... सगळे खेळ एकदम रंगात आले. तिकडे कोणीतरी वाट बघणार आणि ईकडे वेगळेच काही वाढलेले. आता एकीची बळ शिकावे तर संकटांकडून. कशी आली की सगळी नेहमी एकत्र येतात! फोटो ऊशिरा ... मधेच दाढेची एंट्री आणि ताबडतोब एक्झीटची तयारीपण ... संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या अस्तित्वावरच गदा... युरोपची टूर ... तिकडे आधी तो वासू ... आता ते फेअरवेल! कुठे तरी आतमधे मात्र मजा येत होती ... एकदम living on the edge सारखे सुरू होते. प्रत्येक पुढचा क्षण काहीतरी नवीन दाखवायचा. प्रत्येक वेळेला मनामधेच प्लान आपोआप रीअलाईन व्हायचे.

हम चाहते जैसा जैसा ... सब वैसा वैसा होता ... गर ... सोचो तो ऐसा होता तो कैसा होता!? :-)

खेळ बदलायला कधीच सुरू झालेला, आता हाताबाहेर जायला सुरू होणार होता.
------------------------------------------------------------------

"DUDE ... Help me! I am at this Bus stop and there is no clue of bus here!! Tell me when is the next bus?"
"How did you miss the bus?"
कधी कोणाला काय ऐकायची लहर येईल काय सांगा!
"DUDE!!!! Please ...!"
"कुठे जाणार आहेस? तसेही पण ईंटरनेट स्लो झालेय रे आजच!"

...

and there I was standing on that bald street with no trace of human species around ... with bunch of photos in hand ... a nice cake ... n an office bag ... with no clue of what happened to that Bus and with the friend on phone who had slow internet connection!! It was already past 7:30 pm.

------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------
INTERVAL ----------------------------- मध्यांतर
------------------------------------------------------------------


------------------------------------------------------------------

"Hmm ... ट्रेन मधे बसून मीटींगची तयारी करत होतो ... आणि काय?"
"WHAT? मग ट्रेन बंद पडली!? ... Wow... Finally you got on to next train ...! आणि ती ट्रेन बंद पडली!!? हा हा हा हा!! You are happening yaar!"
"Thanks हा...! What a friend I have!!"
"तू चाललायस कुठे? ८ वाजले की भावा!"
"लंबा स्टोरी है... फिर कभी ..."

एका दिवसात किती गोष्टी घडू शकतात त्याचा ऊच्चांक गाठायचा पण केलेला कदाचीत. ट्रेन बंद पडली ती पडलीच. पुढे बस आणली कोणीतरी. अमेरिकेत भरगच्च बसमधून ऊभे राहून प्रवास करायचे भाग्य लाभाले! देवाला गैरसमज वगैरे झाला असावा की त्याचा हा लेक कॉलेजमधे नाही म्हणजे कॉलेजच्या सवयी गेल्या असतील. संध्याकाळी बाहेर पडताना बसचा रूट बघणे ऑप्शनला टाकलेले आणि त्याने नेमके आता तेच नशिबी द्यावे?

समोर आता ९ चा कॉल दिसू लागला. कुठला केक आणि कुठले काय? केवळ नावतले साधर्म्य म्हणून एका स्टेशनवर ऊतरलो. तिथून खडाजंगी कॉल घेतला. आ हा हा ... काय सीन! कंपनीच्या बजेटविषयी चर्चा ... जेवढी बाहेरची थंडी जोरात ... तेवढेच सगळे जोमात. एक (गरजू होतकरू) तरूण... त्याचाही सहभाग ... रात्रीचे ९ ... एक निर्मनुष्य स्टेशन ...! कधी स्वप्नातपण विचार केला नसेल की असे कुठे बसून कॉल घ्यावा लगणार. पटापट कॉलचे मिनीट्स वगैरे लिहीले... ऍक्शन आयटम्स तयार केले ...! हुश्श.. संपला कॉल. मान वर केली तर काय? परत स्टेशनवर अडाकलेला (गरजू होतकरू) तरूण आहेच.
------------------------------------------------------------------

"Hello... रोह्या... तू कॉल करणार होतास!"
"होय काय? ही ही ... ईथे जरा मजा झालीये."
"भेटलास काय तिला?"
"अरे तुला तिची काय काळजी! मी ईथे भरकटलोय. आणि ती बाई गेलीये तिच्या मैत्रीणीच्या फेअरवेलला"
"तुला काय माहीत?"
"तू ईमेल चेक नाही केलास म्हणजे!"
"काय झाले?"
"ही ही ... ती वेगळी मजा आहे ... सध्या तरी situation is ... I have no clue where I am and as soon as I know where I am, I shall see her."
"जास्ती ऊशीर करू नको. ती नसेल तर दारात वगैरे ठेवून तू निघ."

लोक कधी काय सल्ला देतील काय सांगा. एकार्थाने बरोबर होता म्हणा पण आता कुठे काय कधी अर्थ वगैरे बघायची सवय? ईथे स्वारी अजून घरापर्यंत पोचायचीये ... आणि हा दाराबहेर ठेवून जाण्यापर्यंत पोचला. आणि तोही केक!! मधेच वाटून गेले ... माझ्या अपार्टमेंट मधे कोणाला असे दारात केक वगैरे ठेवायची बुद्धी होत नसेल? चालायचेच ... याची मैत्रीण ... याच्या शुभेच्छा ... मी फक्त डिलीवरी बॉय ज्याने फक्त खेळ मांडलेला ...! वेळ आली तर केकपण ठेवू दारात अशी मनाची तयारी केली पण आधी दार तरी सापडो! एवढ्यात मोबाईलला समजले की त्याची बॅटरी संपतेय!! ओरडला लेकाचा. (का म्हणून सकाळी वाटले असेल की ही बॅटरी रात्री का संपत नाही!! हा देवपण नाही त्या ईच्छा पुर्ण करतो!).

एकदम गुरूमधला अभीषेक बच्चन आठवला ... शेवटच्या सीनमधे लेक्चर मारणयासाठी शब्द वाचवून ठेवतो तसा. गुरू संचारला आता. फोन बंद. एकदम मोजकीच चर्चा करायची आता मोबाईलवर. मोजून मापून. (हे कळायला वेळ लागला की जर मोबाईल पुर्णपणे बंद पडला तर तिथून पुढे अक्षरशः काहीच करायचा स्कोप नाहीये. ना कॉल ना मेल ना घर ना दार!). या प्रगत देशाचे कोपरे मात्र अप्रगत आणि पोकळ असतात. कोणीच पानवाला बसत नाही तिथे. कुठे जायचे वगैरे सोडाच पण मी सध्या कुठे आहे हे सांगायलापण कोणी नव्हते!

------------------------------------------------------------------
"Hello TJ ... यार आपकी कॅब चाहीये!"
"कहा सर?"

हा हा ... आता हे जर माहीत असते तर कॅब कशाला मागवली असती!? पण त्याचेही बरोबर ... कुठे ये म्हणून सांगायचे त्याला. बरेच प्रयत्न केले ... हा असा असा स्टॉप ... याच्या नंतरचा ... याच्या आधीचा ... या हाय वे वरचा ... शेवटी म्हणाला मुलाला पाठवतो! अमेरीकेत पण युवा रक्ताला वाव दिल्याशिवाय पान हलत नाही!

हा युवा मी सांगीतलेल्या वर्णनावरून माझ्यापर्यंत पोचू शकेल हे खरच अवघड वाटत होते. काहीतरी होईलच याची खात्री होती पण काय होईल याची आजीबात कल्पना करणे शक्य नव्हते. तेवढ्यात आठवले - बराच वेळ ईमेल नाही गेले ... ऊगाच वेळ कसा घालवून चालेल? या मुलीचा आणि कुठला तरी प्लान वगैरे ठरला तर डाव ढीस! सगळे जवान जागीच शहीद! एव्हाना रात्रीचे साडे दहा वाजून गेलेले.

------------------------------------------------------------------
From: Stranger
To: Her

Thank god I did not bring the bouquet otherwise it would have died
here at capitol station!!

Are you home by any chance?

------------------------------------------------------------------
From: Her
To: Stranger

hey..
I m very much at home!!

But are u ever going to meet me or tell me who are you?
------------------------------------------------------------------
From: Stranger
To: Her

I am freezing here at this capitol station!!!

Call me at 4083911967

Can you come here by any chance
------------------------------------------------------------------

शेवटी आलाच फोन... पहीला प्रश्न - तू कोण? ओळखतोस मला?
बापरे ... किती ते प्रश्न? लोक हिंदी सिनेमे कमी बघतात. नाहीतर पहीला प्रश्न विचारला असता ... "तुम्हे किसने भेजा है?" ... खेळ तिथेच संपला असता. पण तिनेही नाही विचारले. मीही नाही सांगीतले. (याला म्हणतात निव्वळ माज - ईथे मोबाईल मरायच्या घातीला ... रस्त्यावर कोणी नाही. कुठे आहे याचा पत्ता नाही तरी नाव काही तोंडून बाहेर पडेना.) ही म्हणते पत्ता नाही सांगणार. पण मी तरी कुठे विचारत होतो पत्ता वगैरे. न विचारलेल्या प्रश्नांची ऊत्तरे माझी बॅटरी संपवत होती! त्रयस्थ म्हणून बघावे तर एक पुर्णपणे अनोळखी मुलगा ... या मुलीला आख्खादिवस ईमेल करतोय आणि आता घरापर्यंत पोचायच्या मार्गावर आहे. आणि मनापासून ईच्छा करतोय की ही मुलगी पण अगदी विनासायास पत्ता वगैरे सांगेल किंवा याला घ्यायला येईल ... तेही रात्री ११ वाजता ... एका परक्या देशात! पण आता काय करू ... वाटायला काय? वाटले खरे असे होईल म्हणून!

तेवढ्यात गाडी आली. रामाला लंकेचा सेतू बांधून झाला म्हणून ऐकल्याबर जेवढा आनंद झाला असेल तेवढा आनंद झाला. फोनवर ती काहीतरी विचारत होती ... म्हणालो - तू घरी आलीस तेवढेच नक्की करायचे होते. आलोच.

कट.

------------------------------------------------------------------
From: Rohit
To: Her

Tell me your apt number

I am standing outside in white shirt ...

Won't kill you

Don't worry
------------------------------------------------------------------

तिने फोन ऊचलणे बंद केलेले. रात्री १२ च्या सुमारास कोण ऊगाच ईतकी बडबड करेल? मधेच एक- दोन वेळा अर्धवट संवाद झाले. पण निर्णयाप्रत नाही. तसा परीसर मस्त होता. भरपूर सारे विला. मस्त थंड हवा. एकदम सुनसान रस्ता. हातात पर्सल घेऊन मी भटकत होतो. फोन बिचारा प्रयत्न करत होता. ती ऊचलत नव्हती. तिच्या अपार्टमेंट कॉंप्ले़क्स पर्यंत येऊन आता मोहिम फत्ते न करता जाण्याचा आजीबात विचार नव्हता. झालेच तर ईथेच दारात तंबू ठोकेन - सकाळी तरी बाहेर पडेलच की! असा काही विचार येवून गेला.

पाणी नाकापर्यंत आलेले. मी हत्यारं टाकायच्या तयारीपर्यंत पोचलेलो.

नाव पाहीजे तर नाव घे ... पण आता कुठले दार वाजवू ते सांग ! तेवढ्यात तिचे ऊत्तर आले.

------------------------------------------------------------------
From: Her
To: Stranger

Villa 4 105
------------------------------------------------------------------

मान वर केली ... मीही त्याच अपार्टमेंटच्या दारात ऊभा होतो.

कहानी एकदम climax पर्यंत आली! आता केक बेकार जाणार नाही याची खात्री झाली! ऊगाच केकला काही झाले तर वाईट वाटायचे! केक दारात ठेवायचा नाही म्हणूनतर ईतके सगळे केले!

दरवाज्यासमोर गेलो तर वेगळाच खेळ. कोणी दारच ऊघडेना! माझ्याकडे बघीतल्यावर भीती वगैरे वाटावी असा तर मी नक्कीच नाही! प्रेमाने विचारले ... दार ऊघडता की ईथेच ठेवून जाऊ. तसेही परवानगी होतीच दारात ठेवून जायची! आणि जरा ऊशिरा का होईना ... मोहीमपण फत्ते झालेली.

शेवटी तिने विचारले ... कोण पाठवलेय तुला?
ह ... झाले ... विचरले शेवटी!!! सांगीतले ... तुझा हा अमुक अमुक मीत्र ... त्याला दुर्बुद्धी झाली मला सांगायची ... तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायची ईच्छा होती फक्त ... जरा थ्रील आणण्याचा प्रयत्न केला ... तो कदाचीत जास्त झाला.

दार तरीही ऊघडेना कोणी! पोलीस वगैरे बोलावायचे प्लान्स सुरू आतमधे! मधेच या अमुक अमुक मीत्राला फोन करायची अक्कल सुचली एकीला. तसा पोलिस नावाच्या प्राण्याशी जुने नाते... ईथे आल्यापासून भेट झाली नव्हती ... आणि तीही आज होते की काय वाटू लागलेले पण यांचा फोन लागला त्या मीत्राला!

एव्हाना मी जातो म्हणून दारासमोरून बाजूला झालेलो.

गडाचे दार उघडावे तसे हळूच दार ऊघडले. हिरकणी कानाला फोन लावून बाहेर आली. मी बाजूलाच ऊभा होतो.

"आहे आहे तो ईथच!! कित्त्ती अरे ... सॉरी रे ... पण सांगायचे की!" मुली या अशा प्रसंगी एका श्वासात ईतके काही बोलून जातात की ते लिहीणे तर राहूच द्या पण लक्षात राहणेही अवघड.

तू आधी विचारले असतेस तर सांगीतले असते की ... असे म्हणायची लहर आलेली ... पण आतमधल्या प्रत्येकीचे चेहरे बघून काही चर्चा केल्यास जीवास धोका असल्याचे लक्षात आले. वर ... ईतके सगळे किडे करून स्वतःच सॉरी वगैरे म्हणून घ्यायचे भाग्य कशाला सोडू? गिफ्टवाला फोटो बघून कदाचीत खरोखरच बरे वाटले असावे. नाहीतर 'डोके वगैरे आहे का नाही ' असले काही विचारले असते.

त्या थोड्याशा वेळामधे ... Thanks आणि Sorry चा वर्षाव सुरू होता. पैकी तिची एक रूममेट मला खाऊ की गिळू अशा नजरेने बघत मात्र होती. कदाचीत तिचेच फेअरवेल असावे की ज्याचा मूड मी खराब केलेला. बिचारीने एक दोनदा समजावायचा प्रयत्न केला की माझे काय चुकले! मीही सगळ्याला हो हो म्हणालो. पानीमे मछलीसे बैर कौन ले!? आणि ते ही रात्री १-२ ला ... दुसऱ्या दिवशी ऑफीस असताना ... आणि घरापासून १५-२० मैल लांब! माज असेल ... पण ईतका येडा नक्कीच नाही.

Turned back ... n said ...

"Wish You a Very Happy Birthday ... Belated Birthday ... it's past 1 now!"

संपला खेळ ...

Filmfare award घेऊन बाहेर पडवा तसे (गरजू होतकरू) तरूण बाहेर पडला ...

तेवढ्यात पलीकडून चार पाच हट्टीकट्टी पोरं पळत आली ... मला काही समजायच्या आत ... कोणीतरी सांगीतले त्याना ... काही नाही ... कुछ नही हुआ!