Sunday, August 08, 2010

A lot can happen over a coffee




वाटेत आलेल्या सर्व गोष्टींचं काहीना काहीतरी एक लॉजीक असलं पाहिजे. नसेल सापडत तर शोधलं पाहिजे. स्वतःला पटल्याशिवाय काहीच करू नये. पण स्वतःला पटलय तेच बरोबर असही म्हणू नये. हे असले सगळे ठोकताळे तिने एकदम शाळेपासून बांधलेले. मुलींच्यात फारशी ती कधी रमलीच नाही. किंवा तिच्यासारखं विचार करणाऱ्या मुली तिला कधी मिळाल्याच नाहीत. तिला स्वतःचे विचार इतके सोपे, सरळ वाटायचे की त्याचं कोणालातरी विश्लेषण वगैरे करावं किंवा ते कोणालातरी पटवून द्यावेत हे तिच्या ध्यानीही यायचं नाही. समोर दिसणारी प्रत्येक घटना "अहं, असं थोडीच असतं?" म्हणण्यापेक्षा "हं, असंपण असतं तर"  अशी बघायची. तिचं कोणाशी कधी काही बिनसलंच नाही. किंवा ती बिनसायच्या गावाला गेलीच नाही. समोरच्याचीपण काहीतरी बाजू असेल, आणि ती काय असेल याची तिला फार चटकन जाण यायची. आपली मुलगी भलतीच समजुतदार म्हणून आईला तर भारी कौतुक. आई लहानपणी तिला कायम सांगे, "तुझी मोठी बहिण आहे न ती? तिला कसं वाटेल याचा विचार नको करायला तू!" हे जरा विलक्षणपणे तुच्यात भिनलेलं. सगळ्यावेळा ती तू असाच विचार करत बसे. कदाचीत म्हणून तिला कधी कोणाला समजून घ्यायला जड गेलेच नाही. आईला भरून यायचं तिचा समजुतदारपणा बघून. पण मुलगी स्वतःच्या विचारांची जरा जास्तीच पक्की आहे हे नंतर जाणवू लागल्यानंतर उगाच तात्विक खटके उडायचे. "मुलींनी असंच करायचं असतं" किंवा "मुली असंच करतात" म्हणून तिनं पण काही काही करावं (किंवा नाही करावं) ही आईचं मतं तिला कधीच पटायचं नाही. काहीही लादलं की ते चांगलं असो किंवा वाईट, तिच्यातला रीबेल जागा व्हायचा. आणि मग प्रचंड हेका - ते न करण्याचा! गोष्टी सापेक्ष असतात. आणि हे ज्याना पटत नाही त्यांच्याशी तीचं कधीच फारसं पटलं नाही. एखाद्याला चांगली किंवा वाईट वाटलेली गोष्ट तिला वेगळी वाटूच शकते, या मताची ती. त्याच्या उलटही सत्य होतं. तिला आवडणाऱ्या किंवा नावडणाऱ्या ईतराना आवडाव्यात यावरही तिचा आग्रह नसे. या अशा सगळ्या प्रकारामुळं तिच्या मैत्रीणी कमी होत्या, आणि मित्र जास्ती. किंवा असं म्हणू, की तिच्या मैत्रिणींना तिच्या वागण्याला whimsicality वगैरे लेबलं लावण्यात जास्ती ईंटरेस्ट होता पण मित्रांमधे कधीच कोणाला अशा लेबलांची गरज पडली नाही. "मी काय टिप्पीकल मुलगी नाहीए" असं ठसक्यात आणि अभिमानानं सांगणाऱ्यांतलीही ती नव्हती. आपलं वेगळेपण तिला माहित होतं आणि ती ते जपून होती. मुलांच्यात तिला कोणी प्रश्न नाही केले, किंवा अमुक अमुकच कर वगैरे तत्वं पण ऐकावी लागली नाहीत. मित्रांच्या कोंडाळ्यात बऱ्याचदा ती एकटीच मुलगी असल्यानं तिचं बऱ्याचदा ऐकलंही जायचं. हे सर्व काहीही असलं तरी बाकीच्या असंख्य मुलींसारखी आपल्या आईबाबांच्या फार जवळ होती. एकदम पारदर्शी. अगदी सग्गळंच्या सग्गळं सांगायची. ते घरी पटलं जरी नाही तरी कोणी घरातून तिच्यावर बंधनं नव्हती. तात्विक खटके वगैरे वेगळी बात पण त्यांचा अतिरेक कधीच झाला नाही. 

रिया. तिला कधी काय ट्राय करावंसं वाटेल हे कधीच कोणाला झेपलं नाही. मग ते खाणं पिणं असो, काही अयुष्यातले डिसिजन असो किंवा कपडे वपडे असो. एकदम डगळा ग्रे कलरचा टी शर्ट, आणि ब्लॅक कलरची ट्राउजर. कानात हेडफोन्स, आणि दंडाला स्ट्राईपमधे बांधलेला आयपॉड. अशा प्रकारचे तिच्याकडे कमीतकमी ७-८ सेट असावेत असा सगळ्यांचा संशय. कोणी उगाच ह्याव घाल किंवा त्याव मेक अप कर म्हणंलं की तू चिडून असंलं काहीतरी घालून यायची. मग ते ट्रेकींग असो, किंवा कोणाला भेटायचं असो. ती तशी त्यातही सुरेख दिसायचीच. पण कदाचीत ते तिच्या लाईवली वागण्या, बोलण्यामुळं असेल. तिचं आजूबाजूला असणं कधीच लपून राहिलं नाही. १० मिटरच्या परिघामधे ती आहे, तर तिच्याकडं दुर्लक्ष करणं कोणालाही अशक्य. मग ते त्या डगळ्या टी शर्ट मधे का असेना? हिच रिया बऱ्याचदा चकितही करायची. गडद पिंक कलरचा गळ्यापाशी चुण्या असलेला वी शेपचा सिल्की टॉप, खांद्यापर्यंत पोचता पोचता राहिलेले सिल्वर कलरचे थोडेसे लांबसे पण तिच्या उभट शेहऱ्याला शोभणारे कानातले. वर रे बॅनचा ब्राऊन शेडचा गॉगल किंवा नाहीतर डोळ्यात हलकंसं काजळ. केस खांद्यावरून नदीसारखे वळून पुढे आलेले. तेही असे की त्यामुळं ना तिचे कानतले दडायचे ना डाव्या गालावरची खळी. डाव्या हाता स्पोर्ट्स लूक वालं, मोठ्या पण फॅंसी डायलचं घड्याळ. उजव्या हाता एक किंवा जास्तीत जास्ती २ कडी. खाली काळा स्कर्ट, आणि हाय हिल्स. आणि स्कर्ट असेल तरच दिसणारे डाव्या पायावर तळाकडच्या बाजूला केलेला सुर्याच्या चित्राचा काळा गडद टॅटू. रिया एक संपुर्ण पॅकेज होती. काहीनी तिला व्हिमजिकल म्हणलं, काहीनी मुडी, काहीनी बेब तर काहीना असलं काही लेबल लावायची कधीच गरज वाटली नाही. रिया त्यांच्यात विरघळून जायची. या शेवटच्या कॅटेगरीतल्या लोकांच्यात ती सहसा फार रमे.

---------------------------------------------------------------------------------------

त्याची गणितं फार सोपी होती. टेढं मेढं आयुष्य असलं की गणितं आपोआप सोपी होतात. घरातल्या भावंडांपैकी हा सर्वात शांत. कोणाच्या ना अध्यात ना मध्यात. पण आई वडिलांच्या तू तू मै मै नं वीटलेला. घरच्या एकुणच भाईबंदकीनं वीटलेला. कसा काय शाळेमधे वगैरे नंबरात आला हे घरच्यानापण कोडं. एकदम शिंपल्यामधे रहाणारा जरी असला, तरी कधी एकदा घराबाहेर पडतो याची घाई असलेला. त्याच्या घराबद्दल, त्याच्या गावाबद्दल, त्याच्या माणसांबद्दल कधी फारसं आकर्षण त्याला कधीच नव्हतं. तसा द्वेषही नव्हता. पण एकुणच स्वतःच असं आयुष्य घडवण्याचा किडा फार लहानपणापासूनचा. घरच्या कटकटीमुळं असो किंवा कशामुळंही, पण त्याला बाहेर पडायची विलक्षण ओढ. कॉलेजसाठी म्हणून जेव्हा गाव सोडायची पाळी आली तेव्हा त्यालाही पंख फुटायला सुरू झाले. आता आई बाबांची झिगझिग नाही. भावंडांशी तुलना नाही. आरडा ओरडा नाही. मुलगा कुठल्यातरी चांगल्या कॉलेजात शिकतो आणि त्याला कशाची ददात नाहीये, हे घरच्यांसाठी पुरे होतं. घरच्यानी याहून जास्ती त्यात पडू नये हे त्यालाही हवं होतं. सगळी कामं आपल्याआपण चुपचाप करायची सवय लहानपणापासूनच. त्यामुळं हळू हळू त्याच्या कामात कोणी नाक खुपसलेलं त्याला कमी जमायचं. त्याची सगळी स्वतः बनवलेली तत्वज्ञानं. स्वतःला खपतील तशी. काही चुकलं, दुखलं, की तो एकटाच बसून राही. मग स्वतःचीच काहीतरी थेअरी बनवे की जी थेअरी त्याला परत नॉर्मलला आणे. ज्याना कोणाला याच्या थेअऱ्या मान्य नसायच्या, ते सगळे याच्या लेखी हिप्पोक्राईट होते. कॉलेजमधे हवी तितकी ऐश केली. काही करायचे की नाही वगैरे असले विचार त्याच्या मनात कधीच आले नाहीत. जे जे मनात कधी न कधी आलेलं ते ते सर्व करून घेतलं. बाईक्स फिरवणं सुरू झालं. डिस्क, ड्रिंक्स वगैरे सर्वांवर हात मारून झाला. त्याला व्यसन कधीच कशाचं नव्हतं. पण साधू संतांसारखा अलिप्त तो मुळिच नाही राहिला. बिचकत बिचकत डेटींगही सुरू झालं. पण त्याच्या असल्या मुडीपणाला सांभाळेल अशी मुलगी कुठे कोण भेटेल. आणि यालाही ते नखरे सांभाळणं कधी जमलं नाही. बघता बघता कॉलेज संपलं. जॉब सुरू झाला. नोकरी बरोबर शेवटी छोकरीही मिळाली. तसंही रीलेशनशीप्स बद्दल कुतुहल असतच. यानी ठरवून पाय घसरवला. पुढे त्यावरही थेअरी केली - "मी उघडपणे तरी करतोय, उगाच वर वर फिलॉसॉफ्या मांडून लपून छपून तरी कोणावर मरत नाही! हिप्पोक्राईट साला, मला सांगतोय!? Idealism is bull shit!". काही दिवसात फेसबूक, ऑर्कूटवर कमिटेड स्टेटस झळकला. "You look great together", "Cute Couple", "Made for each other" असल्या कमेंट्सचा भडीमार सुरू झाला. छोकरी पुढे गेली ऑस्ट्रेलिया. फोनवरचं प्रेम ते! किती काळ टिकणार? शेवटी त्यानं सांगून टाकला की बाई आपलं तसंही आता बरचसं आयुष्य वेगळं झालय. मी काय ऑस्ट्रेलियाला येणार नाही आणि तुही भारतामधे येशिल असं काही नाही. उगाच काय अडकायचं. लव आज कल सारखं, किस्सा बंद केला. "We had a steady relationship but then we mutually broke up. No hard feelings". अशा लेबलनं सही सलामत त्यातून बाहेर. थोडंफार वाईट काय ते वाटलं. ईतक्या वर्षाचं नातं. पण आयुष्याला एकदा का वेग आला की असल्या तात्पुरत्या भावनांना वेळ नसतो. एक मुलगी गेली पुढची तयार. त्याची पर्सनॅलीटी तशीही जबरदस्त. दिसायला नेटका, ब्रॅंडेड जॅकेटस, शर्टस, ट्राउसर्स. स्वतः कमवायचा, स्वतः ऊडवायचा. त्यात बारा गावचं पाणी पिलेला. आदर्श वगैरे जरी नसला तरी फारसं वावगे आणि विचित्र विचार नसलेला. कोणीही सहज ईंप्रेस होईल असा. नाही म्हणता म्हणता असेच ३-४ अफ़ेअर्स खटा खट झाले. एकदा मोठ्या भावाने प्रेमाने भेटून सांगीतले की बाबा रिलेशन म्हणजे काय चिरमुरे फुटाणे आहे का? थोडं चित्त थाऱ्यावर ठेवा. कधी ही तर कधी ती! हे काय जगणं का काय? घरच्यांशी नाही पण त्याच्या मोठ्या भावाला याच्या बऱ्याच करतूता माहीत होत्या. दोघांच्या पहिल्या गर्ल फ्रेंडचं नाव वैष्णवी. कायच्या काय मजा यायची त्याला बोलताना "तुझीवाली नाही रे माझीवाली वैष्णवी". फरक एवढाच मोठ्या भावानं त्याच्यावाल्या वैष्णवीशी लग्न केलं. यांचा mutual agreement वाला ब्रेक अप झाला. तसंही उपदेशांचा कोटा आणि सिजन असायचा. तो संपल्यावर भाऊही खुश आणि हाही खुश. आयुष्याला आलेल्या वेगाची त्याला झिंग चढलेली. झालेल्या प्रत्येक गोष्टी तशाच घडण्यामागं काहीतरी कारण होतं आणि आपण तेव्हा जे वागलो ते बरोबरच वागलो अशा स्वरुपाची तत्वं तो जाता जाता तयार करून स्वतःच्याच मनाला गप करायचा. नव नवं काम, नव नवे लोक यांच्या गर्दीत इतका रमून गेलेला की कधी २ घटका बसून आपण काय करतोय, कुठं जातोय याचा विचार बिचार कधीच नाही करायचा. झपाझप कामातही वर चढत गेला. हळहळत बसणे वगैरे कधीच केलं नाही. प्रत्येक वेळी त्याच्याकडे आणखी दहा गोष्टी तयार असायच्या करण्यासाठी. एक नाही झाली तर पुढची. 

स्वानंद या नावाचे बरेच चाहते, तर बरेच द्वेष्टे तयार झालेले. त्याला त्याचं काहीही नव्हतं. आयुष्य असंच जगायचं असतं यावर त्याचं आजिबात दुमत नव्हतं. आणि ज्यांचं होतं ते त्याच्यासाठी हिप्पोक्राईट होते! काळ लोटत गेला, हळू हळू सगळे आजूबाजूचे त्याचे मित्र मैत्रीणी लग्नं वगैरे करून आपापल्या व्यापात अडकू लागले. आता काहीही प्लान केला की सगळे पुर्वी सारखेच एक्साईट व्हायचे पण मग थोड्या वेळानं कन्फर्म करतो असं सांगून तासानी फोन करायचे की अरे ते अमुक अमुक काम आलय रे, यावेळी जमणार नाही. स्वानंदलाही कल्पना यायचीत की घरी जाऊन बायकोची परवानगी नाही मिळाली म्हणून डिच मारतोय साला. जॉबच्या लगेचचे २-४ वर्षात जी काय घनीष्ट मैत्री झालेली लोकांबरोबर, जे काही प्रकार केलेले, त्यापुढं त्यानंतरच सगळंच फिकं होतं. थोडंफार एकटं पडणं सुरू झालेलं. पण ते उघडपणे मान्य करेल तर तो स्वानंद कसला. त्याच्या थेअऱ्या तोकड्या पडत चाललेल्या, पण काहीतरी नक्कीच नवा एपीसोड सुरू होईल याची खात्री होती त्याला. असंच एकदा अनपेक्षीतरित्या मित्राच्या सीसीडीतल्या पार्टीमधे एका एकदम अनईंटरेस्टींग कपड्यातल्या पण अशक्य active, आणि impossible to ignore अशा मुलीची गाठ पडली. एकमेकाची खेचताना म्हणा, किंवा एकमेकाला टोमणे मरताना म्हणा, दोघानीपण तमाम जनतेला सही एंटरटेन केलं. डगळ्या टी शर्टमधल्या रियाची आणि स्मार्ट, हॅंडसम स्वानंदची ती पहिली भेट.

Tuesday, March 23, 2010

Shift of Origin

ईश्कीया बघून सकाळी ११ला कोथरूडच्या सिटी प्राईडमधून बाहेर पडलो. पार्कींगचे ५-१० रुपये वाचावे म्हणुन गाडी थिएटरच्या शेजारच्या बिग बझारच्या पार्कींगमधे लावलेली. थिएटर आणि बिग बझारच्या मधला रस्ता दुसऱ्या बाजुला बंद. म्हणुन वर्दळ कमीच. पार्किंगकडे जाणारेच कोणी असेल तर तेवढेच. बरोबरच्या लोकाना टाटा बाय बाय करत करत त्याच रस्त्यावरून मी गाडीपर्यंत आलो. पुढचे कार्यक्रम ठरवण्यासाठी फोनाफोनी सुरू झाली. येरझाऱ्या घालायला खुल्या पार्किंगपेक्षा सुंदर आणि कुठली जागा? त्यातही सकाळची वेळ म्हणुन रस्ताही अगदीच मोकळा मोकळा आणि लख्ख! गाड्या काढणारे आणि लावणारे सोडले तर आणखी कोणी नाही. थिएटर मधून बाहेर पडून पार्कींगपर्यंत आलो. येताना त्या रस्त्यावर नजरेत येतील असे चाळे करणारी टोळी दिसलेली. साधारण अकरावी-बारावीतली मुलं असावीत. एका स्कूटीसारख्या गाडीवर बसलेली मुलगी, समोर तिच्या दोन मैत्रीणी, आणि तिला जवळ जवळ मिठी मारून बाजुला ऊभा असलेला तिचा मित्र. मिठीही अशी मारला होता की जसं काही गाडी आपोआप सुरू होऊन त्या मुलीला घेऊन गेली तर काय घ्या! त्यांचे हास्यविनोद सुरू होतेच, थोड्या वेळात रोमान्सपण सुरू झाला. समोरच्या मैत्रीणींचे खिदळणेपण त्यातलाच एक भाग होता.

माझ्या येरेझाऱ्या सुरू झाल्या. अधेमधे डोळ्याच्या कोपऱ्यातून या चौकडीच्या कलांकडे पण नजर होतीच. फोनवर बोलत बोलत, या टोकापासून त्या टोकापर्यंत फेरी मारायचो. मग पलटी मारताना या चौकडीकडे नजर जायची. परत दुसऱ्या टोकाकडे जायचो. परत पलटी. परत नजर. असला प्रकार करत फोनवर बोलणं सुरू होतं माझं. आधी वाटलं मला की आता हे लोक तसेही गायब होतील, थोडं फार माझ्यामुळं अवघडल्यासारखं वाटेलच ना? या लोकाना माझ्यामुळं ऑकवर्ड वाटेल या कल्पनेनंच मनातल्या मनात मलाही मजा येत होती. कॉलेजमधे कसं मुद्दामहून कबाबमे हड्डी बनून लोकाना त्रास देताना मजा येते तशी. आसुरी आनंदाची मजा! पण कुठचे काय? समोरचे प्रकरण लाजणारं आजिबात नव्हतं. बरोबरच्या दोन मैत्रीणीनी पण या दोघाना नाही लाजवलं तर मी कशाला लाजवेन? मधेच गाडीवरची मुलगी खाली ऊतरली. मुलाने लगबगीने परत दुसऱ्या बाजुला जाऊन तिला हात दिला. "उतर सिंडरेला, तुला पायात सॅंडल देतो की आणि कुठे काय देतो!" अशा अविर्भावात. ती लाजतेय का रडतेय काही कळत नव्हते पण मुलगा तिला कंफर्टेबल करायच्या प्रयत्नात मनापासून दंग होता. ती लाजत नक्कीच नसावी! (उगाच मलापण काहीबाही अपेक्षा!) समोर येरझाऱ्या घालणारा मी अनकंफर्टेबल होतो की नाही होतो याची कोणाला तमा? त्या मुलाला तर मिसुरडंपण फुटलं नसेल. साधारण अकरावी बारावीचीच जनता असावी. पण फुलऑन रस्त्यावर चुम्माचाटी सुरू होती! ईश्कीया बघून आल्या आल्या मला रस्त्यावर लाईव ईश्क वगैरेचा डेमो सुरू होता. थोड्या वेळाने तो मुलगा निघून गेला. दमला असावा किंवा त्या मुलीनच सांगीतलं असावं की आता बास, बाकी उद्या! तिन्ही मुली परत खिदळत पार्किंगकडं आल्या. माझ्याच जरा बाजुला त्यांच्या गाड्या होत्या. त्यावर यांचं बस्तान बसलं. तेवढ्यात दुसरा एक मुलगा त्यांच्यामागून आला, आणि त्यांच्यातल्याच दुसऱ्या मुलीला पकडला. आता यांचा रोमान्स सुरू झाला! आता मलापण बाल्कनीपेक्षा स्टॉलचा अनुभव होता! पहिल्या रांगेत बसून क्रिकेटच्या मॅचची रंगत जास्ती असते म्हणतात. तशी रोमॅंटीक सिनेमाची रंगतपण पहिल्या रांगेतून जास्ती येते हे ज्ञान तेव्हा झालं. आता मगासचा आसूरी आनंद वगैरे सगळं मावळून मलाच तिकडून काढता पाय घ्यायची पाळी आलेली. माझे फोनही सगळे संपले. मी ही निघालो.

पण हा सिनेमाबाहेरचा सिनेमा ऊगाच डोळ्यांच्या कोपऱ्यात अजुन स्पष्ट-अस्पष्ट चालू होताच. ही ११ वी, १२ वीची मुलं, आणि कायच्या काय प्रकार!? आधी मला कळेना, मला राग आलाय की नुसतंच द्वंद्व सुरू आहे. राग वगैरे काही खरच नव्हता, पण काहीतरी आतल्या आत सुरू नक्की होतं. मला नवल (किंवा जेलसी?) कशाचं वाटतय हे मी शोधत होतो. म्हणजे ११ वी १२ वीच्या मुलांनी "हा असला"  प्रकार करावा? की "११ वी १२ वीच्या" मुलांनी हा असला प्रकार करावा? माझा आक्षेप त्या प्रकाराला होता की त्या वयोगटातल्या मुलाना यावर मीच अडखळलो. म्हणजे हे ऊद्या जर माझ्या वयाच्या कोणी केलं तर मी ईतकाच विचार केला असता की विनासायास accept केलं असतं? तसं, माझ्या वयाच्या बऱ्याच जोड्या ठरलेल्या स्पॉटवर हमखास आपली प्रेमप्रकरणं भेळ वाटल्यासारखी दाखवत उभी असतातच. खोटं का बोला? जागाही वेगळ्या सांगायला नकोतच. पण मी कितीवेळा इतकावेळ त्याचा विचार केलाय? म्हणजे ज्या त्या वेळी काहीतरी चेष्टा म्हणा, किंवा काहीतरी तात्विक म्हणा, ज्या ज्या मुडप्रमाणे कमेंट टाकलेच असतील. मतं व्यक्त केलीच असतील. पण विषय तिथल्या तिथेच बंद व्हायचा. असा रेंगाळत नाही रहायचा. आज जरा जास्तीच तरूण जनता दिसल्यानं मलापण जरा अजोबापण चढलं असावं! पण अस्वस्थ नक्कीच झालं होतं. त्याना अनकंफर्टेबल करण्याच्या प्रकारामधे, मीच अनकंफर्टेबल झालेलो.

Out of the numerous things that typically excite or impress teen age, perhaps romance is one of the most easily accessible thing! When we were at that age, perhaps, we always had someone, may it be parents or siblings, accompanying us. They probably were always helping us make sense out of whatever we saw, we experienced. I don't remember as many incidents when I selected what I wanted to watch and what not, this decision was always in safe hands; someone always did that for me. I was not driven by someone. I always had my own freedom to make choices, but I was never left alone to interpret things that I was seeing around me. Someone always had time for me. I think, early independence is something to think about for these kids. फार लवकर त्याना स्वतःच्या स्वतःच्या जग बघायला सोडलय आपण. या सगळ्यात जर कोणी अशा सहज सुलभ प्रलोभनाना बळी गेला तर त्याची काय चुक? बळी वगैरे पडत नाही घ्या कोणी. जे येइल भोगासी, त्यातून काहीतरी बनवत जातातच लोक. पण तरीही.

मी त्याना का दोष देऊ? "समोर जे काही पाहिले ते जर माझ्या वयातल्या कोणी केलं असतं तर मी कदाचीत accept केलंही असतं" या विचाराचं postmortem माझ्या मनात सुरू होतं! कदाचीत कुठेतरी मी आधीच हे accept केलय. आता त्याला वयाचं बंधन घालून कदाचीत मी माझ्याच ईगोचे लाड पुरवतोय. किंवा खरच काहीतरी चुकल्याचं खोलवर सलतय. जे झालं, जे दिसलं, त्याला लाख नावं ठेवून नव्या पिढीच्या नावानं दंगा करणं फार सोपं आहे. त्यामधे मलापण काही सलणार नाही. पण एखादा प्रश्न परत परत बोलून दाखवला म्हणजे सुटत नाही. तो आहे हे मान्य केलं तरीही तो सुटत नाही. त्याला कोण जबाबदार आहे हे हिरीरीनं सिद्ध जरी केलं तरी सुटत नाही! हे सगळे स्वतःला समाधान देणारे सोपे पण एकदम निरर्थक मार्ग आहेत.

कदाचीत माझ्या लहानपणी मी या गोष्टी निषिद्ध म्हणुन पाहिल्या, म्हणुन आज मला त्या चुक वाटत असाव्यात. या मुलानी तशा नाही पाहिल्या. भुमितीमधे "Shift of Origin" ची एक फार सुरेख कल्पना असते. अक्षावरती किंवा रेषेवरती, शुन्याच्या उजवीकडच्या सगळ्या जागा "धन (+)" आणि डावीकडच्या म्हणजे "ऋण (-)". शुन्य म्हणजे ओरीगीन, उगम, केंद्र. त्याच्या जागेवरून ठरणार की बाकी गोष्टींच्या जागा धन की ऋण ते! आता हाच शुन्य जर थोडा डावीकडं हलला, तर मग पुर्वी ऋण (-) असलेल्या जागा आता धन (+) होणार. शुन्याची जागा जशी हलेल, तशा इतर जागांशी निगडीत असलेली चिन्हं बदलतात. यालाच "Shift of Origin" म्हणतात. एकदम सरळ आणि सोपी संकल्पना. आपण लहानपणी जे बघतो ते शुन्य. एकदम निर्विवाद मान्य केलेलं सत्य. तो आपला ओरीगीन, उगम, केंद्र. त्यावरून धन आणि ऋण गोष्टी ठरणार. त्याला चांगल्या आणि वाईट म्हणू. माझ्या पुढची पिढी त्यांच्या लहानपणी जे बघेल ते वेगळे असेल. कदाचीत डावीकडं सरकलं असेल, तर माझ्यासाठी ऋण (-) असलेल्या जागा त्यांच्या साठी आपसूक धन (+) झालेल्या असतील! नाही का?

आता हे "shift of origin" त्यांच्यासाठी कोणी केलं? त्यानी नक्कीच नाही केलं! हे आपणच केलं. पिढ्यानी पिढ्या हा ओरीगीन, हा शुन्य, हलत आलाय. आता तो मुळात कुठं होता कोणालाच माहित नाही. जे आज समाजाला चुक वाटतय, ते उद्या बरोबर वाटेल, परवा परत चुक वाटेल. हे सगळ सरळ करायला मला हा शुन्य उजवीकडं न्यायचाय की डावीकडं मला काहीच माहीत नाहिए. जे आत्ता चांगलं वाटतय, ते सत्य, आणि तेच बरोबर. या एवढ्याच तत्वावर बाकीचं माझं ज्ञान आधारीत आहे. बाकी सगळं मिथ्या! हे बरोबर की चुक? मला नाही माहित. पण हे अस्वस्थ करणारं नक्कीच आहे.

Thursday, March 18, 2010

पावसावर आणखी एक कविता

मागच्या आठवड्यात अचानक संध्याकाळी इथे पुण्यात फार  जोरात पाउस आला. तेव्हा अदिती बरोबर गप्पा मरताना जमुन गेलेल्या काही ओळी (म्हणजे तिनंच जमवलेल्या!).


काय मस्त वाटतं ना? पाऊस भारी असतो अरे
दर सकाळी यावा, तुफान एकदम, वारा सुटून वगैरे

धूळच धूळ सगळीकडे, श्वास कोंडेल असा वारा
दोन मिनिट सुद्धा बाहेर गेलं तर आंघोळ होईल असा

काम सोडून दिसेल तिथून त्याच्याकडे बघत राहावे
गाणी येतात कोणाला! पण उगीचच काहीतरी गुणगुणावे

उगीचच काढून कारण काहीतरी जागेवरून उठायचे
गरम चहा कॉफी आणि गप्पा यातच ऑफीसचे तास संपायचे

जबरदस्त, सॉलिड, जन्नत वगैरे काहीही विशेषणे त्याच्या नावावर खपतात
तंबुस केशरी संध्याकाळीवर त्याचा सडा आणि मग मातीचा वास घेऊन तासचे तास निघतात

Saturday, February 06, 2010

पुढच्यावेळी जरा जपून ...


… and you always feel that you have plenty of time in hand!



मला अजुनही आठवत नाहीए आम्ही काय बोलत होतो. कदाचीत खरच असावं आई म्हणायची तसं. माझं लक्षच नसतं तिच्या बोलण्याकडं. गाडी चालवताना थोडंसं मागं झुकून आई काय बोलते वगैरे प्रकार जरी सुरू असले तरी मधेच वाऱ्यामुळं तिचं ऐकू यायचं बंद व्हायचं. पण मग अंदाजानं आमची गाडी सुरू असायची. म्हणजे असायची तरी. अधे मधे माझं कसं लक्ष नाही बोलण्याकडं याबद्दलही चार शब्द व्हायचे. म्हणजे आईचा एक, आणि माझे सफाईचे तीन! पण खरच माझं लक्ष नसावं! आणि आज सफाई द्यायची संधी पण नव्हती!

विशूच्या घरी जायचं म्हणून निघालेलो आम्ही. भारूमावशीकडून संध्याकाळी सात-आठच्या सुमारास निघतानाची चर्चा लक्षात आहे. येतानाचा जरग नगरकडचा रस्ता खराब आहे म्हणून सुभाष नगरकडून जायचं ठरत होतं. ईतपत लक्षात आहे. आश्याला विशूकडं ये म्हणून सांगून आम्ही निघालो. ऍक्टीवावर ढांग टाकून बसलो. आईनं काहीतरी सीटखालच्या डीक्कीत ठेवलं. माझा नेहमीसारखा सीटवरून ऊठायचा आळस, पण तशीच सीट वर करून काहीतरी ठेवलेलं. पण खरच आठवत नाहीए की काय बोलत होतो. की गप्पच होतो कोण जाणे! पण नेहमीसारखा थोडंसं मागं झुकून आई काय बोलतीये याकडं लक्ष द्यायचा प्रकार सुरू होता. थोडासाच रस्ता पार केला असेल, आणि आमची गाडी लडबडली.

"खटॅक्क्‍ खड्‍" असा आवाज करून गाडीनं जोरात आपली नाखुशी दाखवली. माझ्या हातातलं हँडल एकदम चुंबकाकडं खेचलं जावं असं खाली गेलं! मी काही सावरेन ईतक्यात ते तेवढ्याच स्पीडनं वरही आलं. खांद्याना झटका लागला. "अरे अरे" असं म्हणायचं संपायच्या आत गाडीचा आणि आईचा संबंध तुटला. मी आपण कसे चतूर या नादात कदाचीत स्वतःला संभाळलं. किंवा संभाळायचा प्रयत्न केला. परत एकदा "काय ते खड्डे!", "मी अजुनही कसे बेसावध चालवतो?", किंवा "रस्त्यावरचे लाईट्स", "ट्रॅफिक" अशा असंख्य गोष्टींवर उखडण्याच्या मूडमधे जाण्याच्या आधीच गाडीवर आई नाही हे लक्षात आलेलं. एका क्षणाचे ईतके काही भाग असतात याचा आलेला तो एक भयाण अनुभव होता. गाडीचा ब्रेक कच्चकरून दाबला. दुपारच्या टळटळीत उन्हामधे चालताना जशी कोरड पडते, तशी घशाला कोरड पडलेली. मागे वळलो रस्त्याच्या बाजूला एक बाई पडलेल्या. पालथ्या. चेहराही जमीनीशीच खिळलेला. तेवढंच काय ते दिसलं. बाकीचं तिथं होतं की नव्हतं मला अजुनही आठवत नाहीए. तिच माझी आई होती. गाडी तशीच साईड स्टॅंडवर सोडून मी मागे पळालो. की चालत गेलो? माहीत नाही. पण मागे गेलो. समोर फक्त तिलाच बघत. गाडी सुरूच होती मागे. पहीली अपेक्षा की मी तिच्यापर्यंत ती थोडीशी कण्हत ऊठावी! नंतर वाटलं चेहरा तरी ऊचलावा तिनं मदत मागण्यासाठी. हात, पाय, काहीतरी हलावेत. दुखलं वगैरे असेलच की. शेवटी वाटलं की कमीत कमी वाऱ्यानंतरी हालचाल व्हावी! मी जवळ जात होतो तसा तिचा निश्चलपणा जास्तीच भडक वाटू लागला. काही मोठसं आपल्याला कधीच होणार नाही, असं का कोणास ठाऊक मला बऱ्याचदा वाटायचं. ते तेव्हाही आठवत होतं. पण ती अजीबातच हलत नव्हती! Parents category is always special. They should always be in commanding position. You always want to see them stronger and stronger. Last thing you would expect is to see them helpless. Disable. Someone, you always drive energy from. You don't want them to be so unable. That's perhaps the most uncomfortable moment. Helpless moment. I realized it hard way. I realized it when I was in no position to even acknowledge.

जवळ गेलो, वाटलं, मी ऊचलायचा प्रयत्न केला की तीही ऊठून बसेल. असच बसतात ना फिल्म वगैरे मधेही. तिनं तसलंही काही केलं नाही. डोळे भिरभिरवले ईकडून तिकडे. मी जे ऊचलतोय ते शरीर तिचंच आहे याचं भान तिला नव्हतं. तिच्या शरीरालाही नव्हतं. जसं की आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टींपैकी तीही एक अचल वस्तू बनली होती. केसं चेहऱ्यावर आलेले. भुवयांवर माती लागलेली की खरचटलेलं हे मला कळलं नाही. तिच्या काळ्या पांढऱ्या केसामागे चेहऱ्यावर एक मातीचाही तिसरा रंग आलेला. गालावर काहीतरी खरचटलेलं. थोडंसं रक्तही होतं. त्याचा चौथा रंग. मी बघीतलंही नसेल नीटसं. "आई, आई" असं एक दोनदा बोललो असेन, पण त्यामुळं तिच्या चेहऱ्यावर काहीही फरक पडला नाही. कसं बसं तिला अर्धवट ऊचलू शकलो असेन. अशा प्रसंगी किती जोर लावावा, किंवा किती पोटतिडकीनं जोर लावावा ही दोनही गणितं नविन होती. अर्धवट ऊठवल्यावर माझ्या छातीवर डोकं ठेवलं तिनं. रस्त्यावर आम्ही दोघेच फक्त नाही हे एव्हाना लक्षात आलं माझ्या. थोडी बोहोत गर्दीही चटकन जमलेली. हे जग म्हणजे एक प्रोजेक्ट आहे, आणि हे आपल्याला असाईन झालेलं टास्क आहे, असा काहीसा फिल आला. का कोणास ठाऊक? स्वतःची लाजही वाटली. ते ही का कोणास ठाऊक? देवाचा नेम चुकला कदाचीत. माझ्या ऐवजी त्यानं कमजोर प्लेअर निवडला. काय केला तोच जाणे. पण काहीतरी नवाच डाव मांडलेला.

"आजी पाणी पाहिजे का" वगैरे म्हणत कोणी पुढं आलं. माझी आई, काकू वरून आजी कधी झाली कळालंच नाही मला. वाटलेलं अजुन बराच अवकाश आहे त्याला. कदाचीत मीही एव्हाना मुलावरून प्रौढ वगैरे होणं अपेक्षीत असावं – आजूबाजूच्या माणसांच ऐकत - त्याना वेळ देत. एवढ्यात कोणीतरी पाणी आणलं. आईला पाणी देण्याईतपतच काहीतरी करू शकलो, पण ती पीत होती की नव्हती माहीत नाही. भारू मावशीला फोन केला, "आईचा छोटासा ऍक्सीडेंट झालाय, सुभाष नगरच्या रस्त्यावर, तू येणार काय?" ती आलेच वगैरे काही म्हणाली. "रिक्षात घालू चला" असंही कोणी म्हणालं. "माझी मावशी येईल गाडी घेऊन." या वाक्यावर मी तिथंच बसून होतो. आई अजुन तशीच निश्चल, माझ्या कुशीत होती. एक कारवाला थांबला. म्हणाला, माझी कार आहे, चला चटकन हलवूया. रिक्षापेक्षा हा पर्याय बरा होता. एक दोघानी हात दिला. मी खांद्यातून पकडलं, कोणी हात धरले. कसं बसं ऊभी राहीली आई. आधी मी गाडीत शिरलो, मग आईला आत घातलं. त्या कारवाल्यानं त्याच्या घरच्याना रस्त्यावर ऊभं केलं. आणि आम्ही निघालो. कोणालातरी गाडीची चावी आणायला सांगीतली. भारूमावशीच्या घराजवळ आलोच होतो, तेवढ्यात आई बोलायला लागली.

"काय झालय मला?", "आपण कुठं निघालोय?", "हे कसं झालं?", "माझा डावा खांदा का दुखतोय?", आणि मग परत "काय झालय मला?". सगळी ऊत्तरं दिली. आणि मग परत पुढचा प्रश्न "काय झालय मला?" भारूमावशीच्या घरापर्यंत जाईपर्यंत या सगळ्या प्रश्नांचं किमान दहावेळा पारायण झालं. मी दाहीवेळा ऊत्तरं दिली. या चालू प्रकाराचा निष्कर्ष लावायचं धाडस आणि वेळ दोनही गोष्टी नव्हत्या. पुढच्या तासाभरात, किंवा त्याहून कमीच वेळात, गाडीच्या प्रत्येक पुढच्या स्टॉपवर एक-दोन नातलग वाढत गेले. आधार नर्सिंग होम पर्यंत पोहोचेतो सगळे जमले. तसं वेगळं काहीच झालं नाही. ऊपचारतर सुरूही झाले नव्हते. आईचा त्याच त्याच प्रश्नांचा रतिब सुरूच होता, पुढचे प्रश्न माहीत असल्यानं आमची ऊत्तरंही वेगात सुरू होती. पण आता सगळे घरचे चेहरे परत बघून आपल्याला काही होऊ शकत नाहीचा फिल परत एकदा आला. काहीतरी होईलच.

कोण डॉक्टर, काय टेस्ट, कुठले रिपोर्ट्स अशा बऱ्याच गोष्टीनी आता डोक्याचा ताबा घेतला. ईथवर येताना जेव्हा जेव्हा आईच्या खांद्याला हात लागेल, तेव्हा तेव्हा ती खूप ओरडायची. फार असह्य वेदना व्हायच्या तिला. मला फार वाटत होतं, मला परीस्थीतीचं गांभिर्य अजुनही कळत नाहीए असं का कोणास ठाऊक सारखं वाटत होतं. बऱ्याच गोष्टी जशा आत्तापर्यंत "का कोणास ठाऊक" वर सोडलेल्या, तशी ही पण एक सोडली. ओर्थोचे डॉक्टर येईपर्यंत ३ वेगवेगळ्या डॉक्टरनी तपासण्या सुरू ठेवल्या. आईच्या त्याच त्याच प्रश्नांच्या सरबत्तीला बघून CT Scan करायचंही ठरलं. डावा डोळ्याच्या वरचा भाग बऱ्यापैकी सुजून फुगला होता. आता आणखी सुजला की बघवणार नाही ईतका. पण डॉक्टरनी तो दुसऱ्या दिवशी वाढेल असं सांगून आधीच चेतावनी दिली. खरचटलेल्या जखमा स्वच्छ झालेल्या. X-ray काढून झाले. Fracture होतं. डाव्या खांद्याचा Joint शाबूत होता, पण त्यापसून काही सेंटीमीटरवर Fracture होतं. X-ray मधे दोन तुकडे दिसत होते, त्यांच्यामागे तिसराही असेल, असं डॉक्टरनी सांगीतलं. Admit करायला लागणार हे कळालं. आईचे प्रश्न सुरूच होते. "काय झालय मला?", "आपण कुठं निघालोय?", "हे कसं झालं?", "माझा डावा खांदा का दुखतोय? "मोडलाय?" तिच्या प्रश्नांची शंभरी होत आलेली. पण हे ऐकायला मी एकटा नव्हतो. आता आपली अशी बरीच माणसं होती आजूबाजूला. माझ्या महिनोन्महिने अदृश्य होण्याला "त्याला काम असतं" या कारणाखाली स्वतःच लपवून अविरत प्रेम करणारी. आपण एकटे नाही याची जशी जाणीव झाली त्यापुढं सगळ्या प्रकारात मी नव्हतोच अशी नवी जाणीव व्हायला लागली. कोणी लिफ्ट दिली. कोणी गाडीतून घालून आणलं. कोणी हॉस्पीटल हुडकलं. या सगळ्या प्रकारत मी केवळ ऊपस्थीत होतो पण अलिप्त होतो. कधी कधी आपण स्वतःवर जरा जास्तीच क्रिटीकल होतो, त्यातला प्रकार. पण "तू करतोस, तुला कळत नाही" असं म्हणायला आई आज भानावर नव्हती. कधीतरी "हो बाई, खरय तुझं" असलं काही कधीतरी म्हणायचं राहूनच गेल्यासारखं वाटलं.

एकुणच या सगळ्यामधल्या माझ्या अनुपस्थीच्या फिलींगमधे मला ईन्शुरन्सची आठवण झाली. ती का झाली कोणास ठाऊक? आत सगळा गोतावळा सोडून मी बाहेर आलो. धिरजनं फोनवर प्रोसीजर सांगीतली. अंकितनं ऑफिसमधल्या या संबंधी काम करणाऱ्या माणसाला जोडून दिलं. त्यानं पटकन ईंशुरन्सचा आयडी दिला. एक बाजू सुरक्षीत झाली. मी आत आलो. CT Scan ला कधी जायचं याची वाट बघत बसलो.

अधेमधे ऑपरेशन थिएटरमधे जाऊन डॉक्टरबरोबर प्रश्नोत्तरं झाली. ऑपरेट काहीच करायचं नव्हतं, तरीही ती OT मधेच होती. प्रत्येकवेळी तिच्या डाव्या डोळ्यावरचा भाग अधिकाधिक सुजलेला वाटला. आणि त्या त्या प्रत्येक वेळी ती माझ्यासमोर रस्त्यावर निपचीत पडलेली आठवायची. बिन हलता! आणि मला माझ्याच बेजबाबदारीची जाणिव व्हायची. तरीही मी आत जायचो. तरीही मी तिच्या समोर ऊभा होतो. कारण मी कदाचीत तिथं नव्हतोच. तिच्या जखमा आता ऊठून दिसत होत्या. तिचे तेच तेच प्रश्न आता जास्ती रास्त वाटत होते. मलाही तेच प्रश्न पडत होते. "हे तिलाच का झालं?", "कुठच्या कुठं जात होतो आपण?". तिनं शंभरदा ऐकलेलं पण अजुनही तिला माहितच नव्हतं तिला काय झालय ते. भुवयांच्यामधे नाकावरच्या जखमेवर थोडंसं रक्त होतं. खाली खरचटलेला भाग तपकीरी पडत चाललेला. भंडारा ओढतात कपाळावर तसं तिथेही खरचटलेलं. ओठावर, हनुवटीखाली खरचटलेलं तो भाग आता निळा दिसत होता. मुका मार लागलेला. हाताचे कोपरे, गुडघे, त्यांचीही तिच अवस्था. प्रत्येक जखम आपाअपलं अस्तित्व पाळीपाळीनं दाखवून देत होता. त्यांच्या विरुद्ध पेनकिलर असा लढा आई लढत होती. अशा माझ्या कितीतरी जखमा आजवर तिनं घालवलेल्या. ती म्हणायची "पुढच्यावेळी तरी जरा जपून". तिच्या या वाक्यातला कळवळा हा असा कळावा? ईथे मला हे तिचं वाक्य परत म्हणायचीही संधी नव्हती. तिची थोडीच काही चुक होती? पुढच्यावेळी मलाच जरा जपून वागायचं होतं. पण आज ती सांगायच्या भानावर नव्हती. तिची प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. "काय झालय मला?", "आपण कुठं आहोत?", "हे कसं का झालं?", "माझा डावा खांदा का दुखतोय?", "मला गुडघ्याला का चरचरतय?". CT Scan च्या वेळी ते मशीन बघून क्षणभर भारावून गेली. "असं सिनेमामधे असतं तेच का हे?" हे ही विचारली. विषय नकळत बदलला म्हणून का काय कोण जाणे पण क्षणार्धात झोपली. मशीन सुरू झालं. अंगाई वगैरेसारखा त्याचा आवाज मुळीच नव्हता, पण तिला झोप आली.

पुढे रीपोर्ट नॉर्मल आले. सुज आणि जखमा बऱ्या व्हायची वाट बघणं सुरू झालं. डोक्याला मार लागला म्हणून एक-दोन दिवस थांबून मग सर्जरी करायचं ठरलं. हात लटकवायची वगैरे गरज नव्हती. हातामधे प्लेट्स आणि स्क्रू लावायचं ठरलं. आजच्या शनीवार सकट दोन दिवस जाऊन सोमवारी सर्जरी करायची ठरली. हे दोन दिवस आईने पुर्ण आराम करावा यासाठी मी आणि माझी बहिण तैनात. कुठेही काही खुट्टसाही आवाज होणार नाही याची काळजी घेत. "तू झोप मी जागं राहणार" यावर भांडत. अगदी लहानपणी आई बाबा दुपारी झोपायचे तेव्हा आमची आभ्यासाची वेळ असायची किंवा आमचीही झोपायची वेळ असायची. एकत्र असताना बिना भांडण करता बसणं तसंही कठिण. तेही जमलं तरी हाताचे चाळे बंद असणं आणखी कठिण. "कुचकुच करू नका!" या आईबाबांच्या वाक्यावर आम्ही दोघेही मग शांत बसायचा प्रयत्न करायचो. असंख्य वेळा ओरडून घेतलं असावं या विषयावर. पण ते शांत बसून त्याना झोपू देणं आम्हाला कधीच जमलं नाही. आज ते जमवायची पाळी अशी विचित्र रित्या समोर आली. सर् सर्‍ असे बरेचसे प्रसंग डोळ्यासमोरून सरकत होते. काकूची आजी झालेल्या माझ्या आईला बघून, माझंही मुलाचं माणुस होणं सुरू होतं! I hope.


येत्या सोमवारी सर्जरी झाली की या सगळ्यावर पुर्णविराम लागणार होता. एक विनाकारण सुरू झालेलं पर्व संपणार होतं.

Sunday, January 24, 2010

स्वप्नातला राजा

(नटरंग सिनेमातले काही प्रसंग या पोस्टमधे वापरलेले आहेत. तसे फार काही सिनेमातलं गुपित ऊघडलय असं काही नाहीए, पण तरीही आपली एक सुचना.)

सिनेमा पहिल्या तासाभरातच अशा एका ठिकाणी येतो की, गुणाला जर तमशा टिकवायचा असेल तर नाच्या म्हणून स्वतःच ऊभं रहायची वेळ आलेली असते. त्यानं हे ठरवल्यानंतर एक सीन आहे, एक क्षणभर. तुफान पावसात, राजाच्या वेशामधे दगडावर ऊभा असलेला गुणा. अशक्य कन्विक्शन. नजर थेट समोर, क्षितिजाच्या थोडीशी वर. चेहऱ्यावर तेच राजाचे जबरदस्त भाव. पावसाच्या थेंबांचे असंख्य बाण थेट चेहऱ्यावर आपटून गलीतगात्र होऊन निखळून पडताना. तरीही नजर स्थिर.

कसं होतं ना, बऱ्याचदा कलेपेक्षा कलाकार मोठा होतो. आपल्या ध्येयापेक्षा कधी आपणही मोठे होतो. छोटेमोठे आपलेच नखरे ऍटीट्युड बनून आपल्यालाच कायमचे लटकू लागतात. वाट तिसरीच होते किंवा या लेबल्सच्या वजनानं आपण चालणंच बंद करतो. लेबल्स सांभाळू की चालत राहू. एखादं क्षणिक यश मिळवून देणारं लेबल आपल्याला आख्खं चालणंच विसरायला लावतं. जेव्हा जेव्हा मी कोणालातरी यासगळ्या चक्रावर मात करताना बघतो, मला भलतं भारावून जायला होतं. या सिनेमामधे, सुरुवातीला गुणा कायम राजाच्या पात्राची तालीम करताना दिसतो. राजाचं पात्र त्याच्या अगदी अंगात ऊतरल्यासारखं. पडद्यावर गुणा आला की आता "परदानजी" म्हणूनच आरोळी मारेल ईतपत. पण नंतर त्याचं स्वप्न, तमाशा टीकवायची वेळ आल्यावर त्याला या स्वप्नातल्या राजाची आहुती द्यावी लागते. आपलं स्वप्न तमाशा ऊभा करणं आहे, कला दाखवणं आहे, एक राजा साकार करणं एवढ्यावर सीमित नाही. हे गुढ ऊकलणं फार मोठी गोष्ट आहे. मला खरच असलं काहीतरी बघून फार विलक्षण काहीतरी वाटतं. आणि आदरही.

असं होतं ना बऱ्याचदा (कमीत कमी माझ्याबाबतीत तरी बऱ्याचदा होतं) की "मंजिलसे बेहतर लगने लगे है रास्ते!" आणि चक्क यात काहीच वाटत नाही. Royally given up! असं काहीतरी. कदाचीत बहुतंशी लोक असच करतात, किंवा करताना दिसतात. म्हणून आपलाही Tolerance आपसूकच वाढलेला असतो. आजुबाजूच्या घडणाऱ्या बह्वंशी गोष्टींसारखं काहीतरी केलं की आपण "फार काही" वावगं करत नाहीए आणि म्हणून बरोबर करतोय, ही भावना काय जोर करून बसलेली असते मनात! हे आजुबाजुला बघून अनुकरण आणि तुलना करायची जी आपली सवय आहे ना, कदाचीत सर्वात बेस्ट आणि वर्स्ट आहे! असुन अडचण, नसून खुळांबा!

पण असो. अधे मधे असं काही बघीतलं की मग परत सगळी जळमटं सरकवून परत आपल्याला खरं काय करायचं होतं आणि आपण आत्ता खरच ते करतोय की रस्त्यातल्या कशाच्या प्रेमात पडलोय, ही असली गणितं घालायला होतं.

प्रत्येकाकडं एखादं स्वप्न असतच. त्यात जो तो राजाही असतो. स्वप्नं घडवण्यासाठी राजेपणाला तिलांजली देण्याचा प्रसंग जेव्हा येतो, तेव्हा बरेच मोहरे गळतात. जे टिकतात तेच कदाचीत हिरे बनतात.

Sunday, December 27, 2009

Illusions

बऱ्याच दिवसानी पुण्यात आल्यावर जसं सगळं जुनंच नव्यानं दिसायला लागलं तसं बरेचसे जुने अदृश्य झालेले मित्र वगैरेपण परत भेटायला लागले. नव्यानं बघताना नकळत आपण "किती बदललायस तू?" किंवा "काहीच बदलला नाहीस यार तू!" या वाक्याना जागा शोधत असतो. मला वाटतं प्रत्येकजण ही वाक्यं तरी फेकत असेलच. नाहीतर आपणतरी समोरच्याला "ईतक्या दिवसानी आलायस असं वाटतच नाही" या वाक्याला जागा करून देतो. पण कमीत कमी या वाक्यांची देवाण घेवाण झाल्याशिवाय आठवणी सुरूच होत नाहीत. पुर्वीच्या थेअऱ्या, लोजीकंच काय तर अगदी ठरलेले पीजे पण परत निघतात. जुन्या विश्वात घेऊन जातात या गोष्टी. परत सगळं तस्सच्या तस्स वाटतं. बऱ्याचदा असं होतं की आपण बरच पुढं आलेलो असतो. पुर्वीचे आपलेच विचार आपल्याला भोळसट वगैरे वाटत असतात. आपल्याच विचारांची ही दशा तर दुसऱ्यांच्या थेऱ्यांची तर आणखीच वाईट अवस्था असते. पण परत तेच दुसरे तस्सेच परत भेटले आणि बोलू लागले तर थोडावेळ का होईना आपण परत तेच सगळं अनुभवतो.

-------------------------------------------
"I think, I still live in illusions. मला अजुनही असच आवडतं रहायला. ज्याला जे चांगलं करता येतं त्यानं ते करावं. मला हे असं रहायला जमतं, मी असा राहतो."

हा असाच एक अनुभव परत जुन्या कॉलेजच्या वयातल्या गप्पांची आठवण देऊन गेला. अशावेळी जनरली मी गप्पच बसतो तसा यावेळीही गप्प ऐकत होतो.

"एखादी गोष्ट, एखादा प्रसंग, वेगवेगळ्या लोकाना वेगवेगळा वाटतो. वेगवेगळ्या लोकांनाच कशाला? माझं मलाच एखादं वागणं कधी असह्य वाटतं तर कधी सुसह्य! म्हणजे असं काहीतरी रसायन नक्की आहे आपल्यामधेच एका असह्य गोष्टीला सुसह्य बनवणारं? असं आहे काहीतरी आपल्यामधे की ज्यानं आपल्याला, सहसा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीपण सहज शक्य होतात. ‘मी अमुक अमुक केल्याशिवाय राहूच शकत नाही’ हे प्रकार मला खरच हस्यास्पद वाटतात. म्हणजे एखादी गोष्ट आवडणे, नावडणे, कोणावर राग, किंवा प्रेम वाटणं हा सगळा किती विचित्र आणि अशाश्वत प्रकार आहे! हे सगळं कंट्रोल करता आलं पाहिजे. म्हणजे जर का ही रसायनं कंट्रोल करता आली पाहिजेत. मग स्वतःच स्वतःचा डाव दिग्दर्शीत करायचा. विचार केला जरा तर फारसं अवघडही काय त्यात? ईतकी वर्षं स्वतःबरोबर राहील्यानंतर ईतकं तरी कळालं पाहीजे ना, की काय केल्यावर कधी कसं वाटतं! आणि तसं वाटवून घ्यायचं"

गडी बदलला नसला तरी सुधारीत अवृत्ती नक्कीच झालेला. मी आपलं मधेच पिल्लू सोडलं, "Are you talking about manipulating yourself? Is it a manipulation?"

समोरच्यानं प्रश्न वगैरे विचारले (फुटकळ किंवा असंबद्ध जरी असले तरी) अशावेळी बोलणाऱ्याला मस्त किक बसते. "असेलही. I don't care. Why should I care anyway? सत् चित् आनंद! गीतेमधे सांगीतलय भावा! आणि नसतंही सांगीतलं तरी काय!"

ईथं गीतेमधे exactly काय सांगीतलय याचा संदर्भ मला अजुनही आजीबात कळालेला नाही. पण कदाचीत त्यानंही चान्स मारून गीतेचं ज्ञान खपवलं असेल असं म्हणून मीही पुढे आपलं श्रोत्याचं काम सुरू ठेवलं.

"म्हणजे कसं स्वतःचच आयुष्य नाटक लिहील्यासारखं लिहायचं. आता बघ. सारखंच काय एकाच मूडमधे राहायचं? मधे मधे चिडायचा मूड आला, की पुढे घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी तशाही माहीत असतात. त्यातली एखादी निवडायची आणि त्यावेळी सगळी चिडायची खाज भागवायची. बरं ना. आपण म्हणजे चिडायचं तेही आपल्यासाठी. परत कोणावर डुख धरून बसायचं कारण नाही. कधी चिडायचा मूड नसेल आणि कोणी अगाऊपणा करत असेल तर मग केवळ हे आपण Orchestrate केलेलं नाही म्हणून निघून जायचं. माझ्या कथेमधे हे नाही म्हणून कानाडोळा करायचा. म्हणजे तेही पथ्यावर. म्हणजे डोकंही वापरायचं पुढच्या घटनांचा बरोब्बर वापर करण्यासाठी. कधी खुश तर कधी ट्रान्समधे. जेव्हा जसे हवे तसे. तेही संपुर्ण कथेचा तोल सांभाळत. एकदम लाईव ड्रामा. रन टाईमला स्क्रिप्ट तयार करत जायची. What say? Logical?"

मीही हळू हळू मूडात येत होतो. "तुला अजुनही लोक येडा म्हणत असतील ना?"

"सोड रे. त्याना झेपत नाहीत या गोष्टी. असंख्य लोकानी केलेल्या अगणित गोष्टींच्या परणामानं ज्यांचं आयुष्य पुढं सरकतं त्याना माझ्या या थेअरीची मजा काय कळणार?"

"I know. So much." मी हसलो. पण त्याचा मुद्दा ध्यानात येत होता माझ्याही.

"कथा एवढीच नाही. त्याच्याही पुढं जाऊन लोकांच्या नजरेत आपण कसं दिसावं हेही आपण ठरवावं. म्हणजे जर आपण आपल्या कथेमधले कलाकार असलो तर त्या कलाकाराच्या कुठे कुठे आणि कशा कशा एंट्र्या व्हाव्या, आणि कशी ईंप्रेशन्स पडावीत, हे जसं आपण ठरवायचं तसं. आणि मग पुढचा खेळ रचायचा. शेवटी आपण तसेच दिसलो की नाही समोरच्याला हेही चाचपायचं. यातलं बरचसं आपण सर्वच करतो. पण एका ठरावीक मर्यादेपर्यंतच. म्हणजे. कसं वागावं, बोलावं हे तर आपण सगळेच काळजीपुर्वक ठरवतो. पण काही नियम पाळून. एका सुसुत्र कथेमधे याचा काय परीणाम होणार या विचारानं नाही. बऱ्याचदा हे करता करता बऱ्याच लोकांसमोर बरेच चेहरे तयार होतात. पण कधीतरी यानाही एकत्र आणून नव्या कथा जमवाव्या लागतात. सगळे आपल्याच मनात. पण real time. बाकीच्यांच्यासाठी काय ते माहित नाही पण आपल्यासाठी आपलीच कथा पुढे सरकवायची. कधी कुठे काही चुक झालीच तर ती कथेची मागणी होती म्हणून स्वतःलाच पान पुसायचं. कथा पुढे बदलायचा मार्ग आहेच."

मीही जरा गाडं पुढं सरकवलं. "तुला ऊगाच वाटतं हे वेगळं आहे. कदाचीत त्या त्या वयात होतं ठीक. पण डोळे ऊघडून बघ लेका. By and large सगळे असेच जगतात. थोडे फार मागे पुढे."

"Approach महत्वाचा भाऊ. मी औषध म्हणून खाल्लेला आंबा वेगळा (म्हणजे कोणी देत असतील तर...) आणि मला आंबा आवडतो म्हणून खाल्लेला वेगळा. काय? वेगळा की नाही? माझ्या दृष्टीनं मी माझी कथा पुढं सरकवतो की जी नंतर वेगळ्याच पातळीवर जाईल. तेव्हा मला त्या त्या अवस्थेतली कारणं या आजच्या मी तयार केलेल्या सीनमधे मिळतील. पण बाकीच्यांच्याकडं केवळ ‘ते असच असतं’ किंवा ‘सगळे असेच करतात’ असली सच्यातून काढल्यासारखी ऊत्तरं असतील."

"आणि तुझ्याकडं काय असेल?"

"Of course I will have a better answers. ‘Because I have scripted my life in this way.’ मला असं जगायला आवडतं. मी रंगवलेलं चित्र. जसं आहे तसं. पण माझं आहे. त्यातला मी, खरा मी आहे की नाही वगैरे असले पुस्तकी प्रश्न नाही पडत मला. कधी कधी चित्र रात्रीसारखं गडद काळं होतं. कधी कधी सकाळसारखं तेजस्वी. मला काळं झाल्याचंही आजकाल दुःख वाटेनासं झालय. तेजस्वी झाल्याचा अभिमानही वाटेनासा झालाय. पण माझं मी रंगवतोय यात मात्र मजा येतेय. समोर जे काही आहे, परीस्थीती असो, किंवा कोणी व्यक्ती असो. माझा मूड, माझं वागणं किंवा प्रतिक्रिया ठरवायचा हक्क मी आणि कोणाला का देऊ? त्यानं परीस्थीती बदलणार नाहीए. न का बदलेना! बरी किंवा वाईट. कशीही असो. बरी असेल तर तसाही प्रश्न नाही. वाईट असेल तर तसंही सामोरं जाताना जरा थोडंसं सोपं तरी जाईल. कारण जशी कशीपण असेल, माझ्या कथेसाठी ती फक्त एक परीस्थीती आहे, शेवट नाही. माझ्या थेअरीचं हे मुलभूत तत्व आहे. बाकीच्याना युगं लागतील हे शिकायला. अचानक गोष्टी माझ्याकडंही घडतात. अगदी काहीही न ठरवता मीही प्रतीक्रिया देतो. पण नंतर त्याही कथेमधे बरोबर गुंफतो. ऊगाच सगळंच ठरवून होतय असं वाटायला नको. तसं मला जमतही नाही आणि गरजही नाही कदाचीत.

तुम्ही पेपरमधे दंगा मारामारी वाचता, हवालदिल होता. मी असेन चिडायच्या मूड्मधे तर घालीन चार शिव्या आणि मोकळा होईन ..."

"नाहीतर?"

"... नाहीतर मी त्यामधेही काहीतरी वेगळं बघेन. मला नसेल मूड खराब करायचा तर मी कदाचीत तसल्या बातमीमधे कोण काय ऍक्शन घेतायत ते बघेन. जनतेला काय अवाहन केलेय ते बघेन आणि मीही तेच करतोय का ते बघून खुश होऊन पुढे निघेन. तसं प्रत्यक्ष जाऊन मी कूठेही काही दिवे लावणार नाहीए. पण ईथे जे काही आहे त्याला काहीतरी बेस देऊन पुढे जाईन. परत माझ्या पात्राला असल्या situation ची गरज पडली तर रेफरन्स तयार.

हे असं स्वतःसाठी illusions करणं म्हणजे स्वप्नात वगैरे राहणं नाही. फक्त स्वतःच्या वागण्या बोलण्याचा, क्रिया प्रतिक्रियेचा ताबा स्वतःकडे ठेवणं आहे. केवळ ताबाच नाही. आपल्याला हवं तसं ते ठरवणंही आहे. यामधे प्युरीटी नाही किंवा हे आर्टिफिशिअल आहे वगैरे भानगडी ऐकलेत मी. पण जरा विचार करू - आजूबाजूच्या कोणी काही म्हणावं किंवा करावं, काही व्हावं किंवा नाही व्हावं याला हजार गोष्टी कारणीभूत असतील. या सगळ्यानी जर मी माझा मूड बदलवणार असेन तर काय मजा? म्हणजे आख्ख्या जगानं ठरवलं मला कसं वाटायचय ते तर ते चालतं पण स्वतः असं काहीतरी ठरवलं की मग का artificial? ज्याना कथा रचता येत नाहीत त्यानी या भनगडीमधे पडलं तर artificial, नाहीतर कुठलं काय artificial!?

आपण मोठे लोक वगैरे बघतो. सचिन तेंडुलकर घे. नाहीतर अंबानी घे. नाहीतर तुझा ऑफिसमधला बॉस घे (म्हणजे जर बॉसला आदर्श म्हणून वगैरे बघत असशील तर). बऱ्याचदा आपण नाही त्यांची स्टाईल कॉपी करायचा प्रयत्न करत? ते दररोज खिशाला कोणा अमुक अमुक कंपनीचं पेन लावून येतात, म्हणून आपणही लावतो. ते एका ठरावीक स्टाईलनं बोलतात म्हणून आपणही बोलतो. पण मी जेव्हा यासगळ्याना बघतो तेव्हा मी ऊलटा विचार करतो. यांच्या आयुष्यात कसे कसे सीन घडले असतील की ज्याचा परीपाक म्हणून ही माणसं अशी झाली. आणि मी सीनच्या सीन ऊचलतो. माझा सीन थोडाफार तसाच बनवायचा प्रयत्न करतो. कुठल्या सीनचं पुढे काय होणार आहे अशी सांगड घालत बसतो. कुठले सीन माझ्या कथेमधे येणार आणि कुठले येणार नाहीत यांची पकड ठेवायला जमणं सोपं नाही मित्रा. मलाही जमतं असं नाही. पण तिकडच वाटचाल सुरू आहे. तुम्ही दृश्य गोष्टींचं अनुकरण करताना जितकी कमीटमेंट दाखवता तितकी मी त्यांच्या कथेमधले मागचे सीन्सचा विचार करण्यात घालवतो. स्टाईल माझ्यापण तयार होतील. पण जसं आज आपण याना बघतो, तसं उद्या आपल्याला कोणी बघावं असा सीन लिहायचा प्रयत्न करतो. आज लहान सहान गोष्टी करत असेन मी याचा. पण भाऊ कधीतरी या लेवलवर नक्की पोहोचेन तेव्हा बघशील."

खरं सांगायचं तर एकेकाळी मीही या सगळ्याना भारावून गेलेलो. कोणाला मी असं बोललोही असेन की I live in illusions (म्हणजे याच्या थेअरीप्रमाणं याची फक्त स्टाईल कॉपी करून!), पण ईतका सहजी त्याचा विसर पडेल असंही वाटलं नव्हतं. कधीकाळी भारावून टाकणाऱ्या गोष्टी खरच भारावून जायच्या लायकीच्या असतात की आपण ते भारावून जाणं वगैरे सगळं खरच प्रासंगिक असतं? एखाद्या गोष्टीवर फार ऊशिरा किंवा क्वचितच मत व्यक्त करतो असं म्हणाल्यावर ‘माझ्या कथेमधलं स्थान हुडकत होतो’ असं मला हळूच सांगणाऱ्या या मित्राबद्दलच कुतुहलात्मक आकर्षण अजुनही कायम आहे. कदाचीत बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडतील की ज्या ठरवतील की मी याला आणि याच्या थेअरीला लक्षात ठेवायचं की नाही ते. नाहीच राहीलं लक्षात तर परत बाकीच्या असंख्य गोष्टी ठरवतील की आम्ही परत भेटू की नाही ते. आणि मग परत या सगळ्यांची आठवण होईल.

किंवा तो ठरवेल की त्याच्या कथेमधे आम्ही परत भेटणं आवश्यक आहे की नाही ते. जर असेल तर तो भेटेलच.

Tuesday, September 08, 2009

We moved on and we met us

(ट्युलीपच्या वीकेंडच्या पोस्टमधले ’तो’ आणि ’ती’ भलतेच आवडले. तसा त्या पोस्टशी याचा काहीही संबंध नाही. पण ते पोस्ट वाचताना सुचलं हे सगळं.
अदितीचेही आणि नॅनीचेही आभार - मझ्या फंड्यांवर वरताण फंडे मारून मदत केल्याबद्दल!)



तो त्याच्या मनाची विषण्णता त्याच्या नाटकातून मांडे. तिला त्याची नाटकं आणि त्यामागचं प्रेम कधीही फारसं आवडलं नाही. समोर बोलता न येणाऱ्या स्वतःच्या चौकटीमधल्या रास्त गोष्टी तो नाटकामधून मोकळं करायचा. आणि त्याला मोकळं व्हायला नाटक लागतं हा त्याला आधारही होता आणि त्याला लसणारं सत्यही होतं. आपलं नातं आपल्याबरोबर खुलावं असं त्याला वाटायचं. आणि तिच्या स्वप्नात जसं नातं खुललं होतं तसं आपलं नातं बनवावं हे तिचं स्वप्न होतं. ती बऱ्याचदा त्याला ओरडायची की कसं त्याला रोमॅंटीक होता येत नाही. तिला ख्रिश्चन लग्नामधे घालतात तसल्या पांढरा शुभ्र पेहरावाचं भारी आकर्षण. पण तिचे ते बोलणे आठवणीत साठवताना तो तिला प्रतिसाद द्यायला नेहमी विसरायचा! तो तिच्यासाठी तितकाच गुढ होता जितकी ती त्याच्यासाठी अनाकलनीय!

एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला की जीव नकोसा करून टाकायची. त्याला ती तशीही आवडायची. तिलाही तिचे सर्वकाही ऐकणारा तो आवडायचा. आणि मग यांची गाडी घसरायची. तिचा हट्ट संपायचं नाव न घेईना झाला की तोही अस्वस्थ व्हायचा. तो कशा कशा काय काय गोष्टी कधीच करत नाही याची यादी तिच्याकडे तयार असायची. त्या गोष्टींशिवाय प्रेमात मजाच नाही अशा तिच्या समजाविषयी त्याचा आकस. पण ती चर्चा कधी होऊ न शकलेली. त्याने काही बोलला की तिच्या धर्मग्रंथाला धक्का लागल्यासारखं बाघायची! तिच्या मनातल्या गोष्टी फार काही मोठ्याही नसायच्या. पण त्याशिवाय काही असूच शकत नाही यावर त्याच्यामधल्या ईंजीनिअरचं लॉजिकल थिंकींग बंड करायचं. "एवढ्या लहान लहान साध्या गोष्टींसाठी किती माथेफोड करायला लावतोस? सागळी मजाच निघून जाते" म्हणत तिही हतबल व्हायची. "तुझ्यासाठी लहान असली तरी माझ्यासाठी मोठी आहे. आणि तुझ्या या अशाच वागण्यानं, माहितीये, मी फ्रीली विचारच करू शकत नाही! किती छान छान गोष्टी असतात. पण मला आपलं तुला कसं वाटेल आणि काय वाटेल मधेच मारामारी होते!" तिचे हे पद सुरू झालं की त्याला धडकी भरायची. "अगदी ट्रिवीअल गोष्टी आहेत यार! करू की! मी कधी कुठे काय म्हणालो!? आपण बोललोय ना यार यावर!" हे असले सगळं तो एका क्षणात मनामधे म्हणायचा. तसंही बरचसं मनातल्या मनातच म्हणायचा तो. आणि मग पुढच्या एपीसोडला तयार व्हायचा.

तो जसा आहे तसा आवडण्यासारखं बरचसं त्याच्यामधे होतं. पण त्याला आहे तसा स्विकारणं तितकंच अवघड. हे त्याचं मत स्वतःबद्दलच. हे दरवेळी वाद करताना सांगण्याचा त्याचा आग्रह तिला आजिबात आवडायचा नाही. तिचं फायरींग सुरू झालं की त्याला उगाचच राहून राहून बरं वाटायचं की त्याचे विचार किती लॉजिकल आहेत! तिला मात्र फायरींगनंतर फार वाईट वाटायचं. आपल्याला क्षुल्लक गोष्टीबद्दलपण ओरडावं लागतं.

"कसं होणार आपलं भविष्य" यावर ती मधेच अस्वस्थ होई.
तो म्हणे की, "वेडे आपण ईतकी वर्ष एकत्र होतोच ना. आता काय वेगळं आहे त्याहून? फक्त एक मॅरीडचा टॅग लागेल, एवढच" त्याच्या मनामधेपण तोच प्रश्न घर करून जरी असला, तरी तिला समजावताना तो भलताच कॉंफीडंट व्हायचा.
"लहान लहान गोष्टींबद्दल ईतके काही बोलावं लागतं मला. तुला नको असताना मझ्यासाठी फोर्स करतेय मी असं वाटतं. या गोष्टी नॅचरली आल्या पाहिजेत अरे! ईतके सांगावं लागलं तर मग काय मजा राहीली?" ती लगेच तिची अस्वस्थता बोलून दाखवायची.

त्याला खुप आवडे जेव्हा ती असले काही मनचे बोले तेव्हा. ती म्हणायची, "I am sorry if I am hurting you". तो म्हणायचा, "If that's what it takes to make you speak your mind, then that's what it is!" कधी कधी हे अति व्हायचं. ती भलतंच पुश करायला लागली की मग त्याचापण तोल जाऊ लागायचा. तो ऊखडायचा, "कंटाळा आलाय मला याचा! किती वेळा म्हणू की हे करेन आणि ते करेन! आता मी आहे तो असाच आहे बघ. तुला माहिती आहे. नाही झेपत तुझ्या रोमान्सच्या गोष्टी मला तर नाही झेपत. विचार कर यार तूच. मला नाही बरं वाटत सारखं तुला तेच तेच आश्वासन द्यायला. जर नसतील मझ्याकडे काही गोष्टी, किंवा तुला दिसत असतील शंभर सुधारणा तर कदाचीत आपण नसूच योग्य एकमेकांसाठी! कशाला एकमेकाला ढकला यामधे!?"

पुढंचं सगळं तो मनामधेच म्हणे. तिच्याकडे ईतक्या रोमान्सच्या कल्पना असतील तर स्वतः का करत नाही काही, असे वाटे त्याला! आता कॅंडल लाईट डिनर त्यानेच कशाला प्लान करायला पाहिजे, तीही करू शकतेच ना असं त्याचं लॉजिकल मन म्हणायचं. जसं तिला चांगलं वाटतं तसं त्यालाही चांगलं वाटेलच ना! तो विचार करे की सगळं जगानच का करावं तिच्यासाठी? तिनेही एक पाउल पुढे यावं हे कसं नाही समजत तिला? त्याला स्ट्रेच मारायचा आणि काय आवश्यक असतं म्हणून काय सांगते? तो काही बोलत नाही म्हणून पुश करते ईतकी असे वाटू लागायचं. तो तिच्यासाठी हक्काचा आहे हे मात्र अशावेळी त्याच्या लॉजीकल मनात नाही यायचं. हे असं सगळं द्वंद्व मनात झाल्यावर, तोच मग शब्द फिरवी. तिच्यामधे काहीतरी कमी आहे किंवा ती चुकतीये असे बोलायला त्याला कायमच जड जायचं. मग तो बऱ्याचदा सोडून द्यायचा. पण त्याला भिती असायची की हे सगळं मनामधेच दबून राहीलं आणि कधी एकदम अचानक बाहेर आलं तरं? सगळंच उध्वस्त होईल. त्याला स्वतःची भिती जास्ती वाटायची. रागारागात सगळं सजवलेलं नातंच तो तोडून टाकेल असंही वाटायचं. तिच्या दृष्टीनं त्याल तिच्या मनातलं कळत नाही हा अचंभा होता, तर त्याच्या मनातली भिती तिला का कळत नाही याचा त्याला राग आणि तितकच आश्चर्यही.

तो फार कमी वेळा अशा आक्रमक पवित्र्यात जाई. पण जेव्हा जाई तेव्हा तिला दुखावून जाई. ती मग त्याला सांभाळून घेई. म्हणे, "असं नाही यार करायचं. मी जरा आहे डिमांडींग, पण म्हणून तू घ्यायचं ना समजून. तू व्हायचं ना मोठं! I am your child. असं कोणी करतं का आपल्या मुलाला की बाबा बघ मीच तुझ्यासाठी योग्य नाही!" ती असलं काही बोलायला लागली की ओठ एकदम बदकासारखे बाहेर यायचे. त्याच्याकडं बघता बघता तो विषयच विसरायचा. त्याला वाटायचं, "काय उगाच ओरडलो! ती असेल एकवेळ थीरथीरी! मी तरी सांभाळून घ्यायचं ना!" तो काहीच बोलायचा नाही आणि नुसता हलकेच हसायचा. मग ती म्हणायची, "मी फार लहान आहे. कदाचीत मला नाही येत तुझ्यासारखं विचार करायला. स्वार्थी पण आहे. सगळं माझ्यासाठी मागते. सारखं तुलाच म्हणते की तू हे कर आणि ते कर!" एवढं सगळं बोलल्यावर त्यालाही बरं न वाटून तोही बोलून जायचा,
"तसं काही नाहीए रे. मी म्हणालो ना, मला खरच आवडतं तू असं मनातलं बोलल्यावर. असं राहूच नये मनामधे काही.टाकवं बोलून."
"No! Then I hurt you."
"नाही रे. सांगीतलं ना. मला आवडतं तू मन मोकळं केलस तर. हे बघ, माझ्या मनातपण तुझ्यासारखेच विचार येतात. पण everyone has to take own bets! I have taken mine. You should take yours. आपल्याला बोलायला वेळ आहे म्हणून प्रत्येक लहान सहान गोष्टीबद्दल एकमेकाला कोर्टामधे नाही उभं करायचं ना! काही गोष्टी आत्ता होत नाहीएत. तर नंतर होतील ना. नाही वाटेल खात्री आत्ता, पण तीच तर bet घ्यायचीये. मोठ्ठा डिसीजन घेतोय आपण. आपण राहतो आहोतच एकत्र ईतके वर्ष तसे पुढेही राहू. त्यात काहीच बदलणार नाहीए. बाकीच्या लहान सहान गोष्टी हॅंडल करू आपण रे. आपण एकत्र असणं महत्वाचं आहे. नाही का?"

हे बोलताना त्याने दोनवेळा तिच्या अपेक्षाना परत लहान सहान म्हणल्याचं ती नोटिस करायची पण एकुणच रावरंग पाहता विषयाला बगल देऊन सगळाच नूर बदलायची. त्याला हे ही फार आवडायचं. पण हे जसं शेवटी त्याने मनातलं बोलायचं मनामधे ठेवलेलं - तसं ईथे तिचंही काही आतल्या आतच रहायचं. एकमेकाना खुश कसं करायचं यामधे जरी मार खात असले तरी दोघाना एकमेकाना कसं दुःख नाही द्यायचं हे पक्कं माहित होतं. सुखाबद्दल भरपूर झटून झालेलं त्यांचं. कदाचीत आपापल्या गतायुष्यामधे. कुठेतरी नकळत दोघेही त्याच आयुष्याची मोजपट्टी वापरायचे. त्याच्या गतायुष्यामधे कदाचीत तो जसा होता तसा स्विकारणारं कोणीतरी होतं. तिला समजून घेणारं कोणीतरी तिच्याकडंही होतं. ती जेव्हा त्याच्यामधे सुधारणा सांगे, किंवा तो जेव्हा तिच्या छोट्या मोठ्या रोमान्सच्या कल्पनाना प्रतिसाद देत नसे, तेव्हा पुर्णपणे नकळत दोघानाही आपल्या भूतकाळामधल्या तुटलेल्या झोपाळ्यावरचं वारं झोंबायचं. पण नंतर ऊब मिळवायला दोघेही आपापल्या हक्काच्या ठिकाणीच जायचे. एकमेकाजवळ.
--------------------------------------

बऱ्याच वर्षानं भेटलेल्या मित्रासमोर तो आपली कहाणी सांगत होता. ही कहाणी जिव्हाळ्याची. त्याचा हुरूप बघण्यासारखा असे. फार कमी वेळा तो या कहाणीबद्दल बोले. कुठेतरी मागे सोडून आलेल्या कहाणीबद्दल.

"हे सगळं हे असं होतं बघा. कोणासोबतही जितका वेळ नाही काढला ईतका सहवास आम्हा दोघाना एकमेकांचा होता. जेव्हा निर्णयाची वेळ आली तेव्हा देवानं थोडा वेळही देऊ केला आम्हाला. पण आम्ही विचार करत करत त्याचा दुरुपयोग केला. शेवटी एकमेकाना ईतके अनकंफर्टेबल केले की ...
आणि मग ही आली"

ती हसली. त्याला मधेच थांबवून म्हणाली, "हं. माणसाचं मन क्रुर आहे. एखाद्या गोष्टीबद्दल कमालीची आपुलकी की किंवा प्रेम वाटण्यासाठी ती गोष्ट गमवावी लागते! आणि अशा गमावलेल्या गोष्टीना कळत नकळत कुरवाळत, हे मन आजच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतं."

त्याचा बोलायचा जोश अजुन कायम होता. "पुढचा डाव खेळताना कळात जातं की काय काय करता आले असते पण तेव्हा ऊशिर झालेला असतो. अशा हरलेल्या डावांच्या ओझ्याखाली आजचा डाव खलास होतो. काही कालावधीनंतर ईगो तयार होतात. टॉलरन्स लेवल कमी होतात. जेवढी मुभा एखाद्या अनभीज्ञ व्यक्तीला सहज देतो, तेवढीही एकमेकाला देताना ऊपकार केल्यासारखं वाटतं. एखाद्या नव्या नत्यामधे गुंतण्यासाठी मन सैरभैर होतं. नाहीच तर जुन्या नात्याचं अजीर्ण झालेलं वस्त्र तरी दूर करायची घाई होते. ते वस्त्र शिवून ठिक करण्यापेक्षा नागवं फिरणं जास्ती बरं वाटतं."

"त्यानंतर कदाचीत नव्या नात्याची सुरूवात जेव्हा होते, जेव्हा केव्हाही, तेव्हा सावध होते. ईच्छा अपेक्षांवरचे मुखवटे ऊडून गेलेले असतात. एकमेकाना समजून घेण्याच्या उपर आणि कशातच सुख राहत नाही. एकमेकांसाठी केलेल्या गोष्टीमधे तडजोड किंवा कॉंप्रमाईज ऊरत नाहीत, त्या उत्स्फुर्त वाटतात."

"एक क्षण वाटतं, किंवा वाटलं तरी पाहिजे, की अशीच सुरूवात मी मागच्या नात्याची केली असती तर? मला समज ऊशिरा आली यावर त्या नत्याचा बळी का चढवावा? नातं गमावल्याशिवाय समज नाही! आणि समज नसेल तर ते नातं नाही. कसं होतं ना की नात्याच्या गुंत्यामधे कधीतरी एक्सपायरी डेट येतेच. तारीख रीन्यू करावी लागते. नाहीतर आहे ते बिघडून जातं."

"आम्ही मग आमचं नातं सोडलं. खुप रडलो." तिनं त्याचा हात पकडला, पुढे बोलली, "आणि मग आठवड्याने त्याने एक ईमेल केलं. म्हणाला की मला आवडणार नाही पण त्यालाही असह्य झालं म्हणून त्यानं त्याच्या मनातलं सगळं परत त्याच्या नाटकातल्या नायकासाठी लिहिलं! त्याचा प्रयोग आहे. आणि येशील का विचारलं. मी काही ऊत्तर दिलं काही. त्याला अपेक्षीतच असावं कदाचीत. त्या दिवशी मग मुद्दामहून चुकून भेटलो. मी माझी ओळख करून दिली." बोलता बोलता तिचीही कळी खुलली. "जसं काही प्रथमच भेटतोय. तोही हसला आणि त्याने त्याचीही ओळख करून दिली. म्हणाला अवांतर वेळेत नाटकं बनवतो. बघायला बोलावला. मी म्हणाले, तू मन लावून नाटक बनवला असणार पण माझ्या निरसपणाला बघून ऊदास होशील. मला बोलायला आवडतं तू नाटक संपवून ये. मग आपण तुझ्या नाटकाबद्दल बोलत रात्र काढू. मी वाट बघेन. नाटक संपलं. येताना त्याने प्रथमच न विसरता बुके आणला. सोबत कॅंडल्सही आणल्या. शाळेत पहिला नंबर आलेला सांगायला जसं पळत यावं ना, तसा पळत आला. म्हणाला फक्कड झालं नाटक. मी हातामधल्या फुलांकडे बघत होते. नकळत ते बघायला एक अश्रूही डोकावला. त्याच्यामधला परत तोच खट्याळ भाव दिसला. तो म्हणाला, तुम्हाला आजच भेटलो. पण राहवलं नाही म्हणून फुलं वगैरे आणली. अगदी तुमच्यासाठीच आहेत असं वाटलं. एवढच. तुम्हाला आवडलं नसेल तर खरच राहू देत. माफ करा मला."

पुढे सांगायला तो सरसावला. "मी जेवण मांडेपर्यंत हिने गाणी लावली. म्हणाली माझ्याकडं बघून मला ईंग्लीश आवडत नाहीत असं वाटतं. म्हणून सुरूवात हिंदीनं करेल - दिल ही दिलमे हमको मारे, दिल दुखाना आपका सुरू झालं. चक्क तिने आज क्यू लगे दुनियाकी पेहली सुबहा फिरसे होगी पर्यंत तिनं तेच सुरू ठेवलं. तिला एव्हान माझ्या बॅगमधे एक नवी सीडी दिसली. माझ्याकडच्या सीडींवर बहुधा तिचंच राज्य असायचं म्हणून नवी सीडी तिला लगेच ओळखली. त्यावरच्या नावांवरून सरसर नजर सरकवत होती ती. Bryan Adams, Savage Garden, As long as you love me, Right here waiting ... वगैरे बरीच ओळखीची नावं दिसली. दिलही दिलमे ला मिळालेला वेळ तसाही माझ्यासाठी बराच होता. तिकडे माझ्या कॅंडल्स सेट झालेल्या, आणि ईकडे पहिले गाणं सुरू झालं - Nothing gonna change my love for you. एक नव्यानं ओळख झाली आमची. We moved on and we met us."

Friday, August 28, 2009

मराठी विरुद्ध मराठी

सकाळी सकाळी रस्त्यावर एक पोस्टर पाहिले ... जमलं तर त्याचा फोटोपण लावेन. त्यावर लिहिले होते - "अजुन लाज वाटते मराठीची?" का असेच काहीतरी. चित्रामधे ईंग्रजीमधले साइनबोर्ड्स होते. बऱ्याच दिवसापासून मनामधे आहे या विषयी लिहायचं. आजकाल एकदम नाजुकपण झालाय हा मराठीकरणाचा विषय! पण कोणी केले नाजुक त्याला? गरज होती का? बरेच मोठे मोठे लोक आता यावर वक्तव्य करतात. याबद्दल काही कळत नसताना याविषयी अधिकारवाणीने बोलायला जेवढी लोक आहेत तेवढीच याबद्दल समजून उमगून या वादापासून लांब राहणारीही लोक आहेत. दोघेही तितकेच घातकी.

खरं सांगायचं तर मलाही कळत नाही बऱ्याचदा की कसं हाताळायचं या मराठीकरणाच्या वादाला. कधी निर्णयाप्रत पोहोचूच शकलो नाही मी. मला मराठी लिहायला आवडते. मला मराठी बोलायलाही आवडते. म्हणून मी उटसूट सगळ्यांच्याबरोबर मराठी बोलायचच याचा आग्रह धरत नाही पण जिथे शक्य तिथे मात्र भरपूर वापरतो. मला कोल्हापुरी मराठी आणि तिथले खास असे शब्द आवडतात. ते कुठेही आणि कुठल्याही भाषेमधे चपखल बसतात आणि मी बसवतो. समोरचापण तितक्याच खिलाडू वृत्तीने ते ऐकूनही घेतो. प्रसंगी वापरतोही. पण हे सगळे केवळ मराठी आहे म्हणून नाकं मुरडणारे मराठी लोकही माझ्याकडे आहेत. त्याना भाषेमधे एखादा स्पॅनीश शब्द चालेल. एखादा हिंदीही कदाचीत चालेल. पण मराठी दिसला की मात्र नाकं मुरडतील. हे असं का? असं कसं झालं असावं? एकीकडे मी मराठी वश्विक पातळीवर नेणाऱ्या विश्व मराठी सम्मेलनामधे मदत करतो. दुसरीकडे "आतातरी मराठीचा आग्रह सोडा" म्हणणाऱ्या माझ्याच मराठी लोकांबरोबर वाद घालत फिरतो. एखादी भाषा जन्मजात मोठी नसतेच. कोणतीही नसेल. पण ती मोठी नाही म्हणुन कोणी तिचा हात सोडून दुसरीकडे जात नाही. तिला ऊच्च पातळीवर पोहोचवावे लागते.

आता शेजाऱ्याच्या घरतलं काहीतरी चांगलं वाटलं म्हणून आपण शेजाऱ्याकडंच जाऊन थोडीच राहतो? जे काही चांगलं आहे ते आपल्या घरातही करायचा प्रयत्न करतोच ना! शेजारच्या काकू जेवणामधे काहीतरी चांगलं बनवत असतील तर मी एक-दोनदा त्यांच्याकडे जावून जेवेनही. पण तिकडेच मुक्काम करणार नाही! माझ्या घरच्या जेवणावर अचानक आळणीचा शिक्का मारणार नाही. कदाचीत माझ्या घरीही तसच काहीतरी बनवायचा प्रयत्न करेन. नाही का? एखाद्या वेळेस ईदची बिर्याणी खायला दरवेळी करीमकडेच जाइन. त्यासमोर माझ्या पुलावचं कौतुक करणार नाही. पण तसेच मझ्या घरचे खाताना मला कमीपणाचेही वाटणार नाही. तेच भाषेबद्दल का नाही? माझ्याकडचं चांगलं तुम्ही घ्या, मला तुमच्याकडचं चांगलं घेऊ द्या. यात वावगं काय आहे? हातचं सोडून पळत्याच्या मागं लगल्यानं मी माझं असं जे होतं तेच सोडतोय, हे बघायला नको का? दुसऱ्याचच चांगभलं करता करता मीच अनाथ होत चाललोय. मला सगळं दुसऱ्यांचच आवडतं. आवडावंही जर चांगलं असेल तर. पण मग मी माझं का विसरावं? त्याची का लाज वाटावी? तेही तसच सुंदर करायला हातभार का नाही लावावा? पुढे पुढे याची ईतकी सवय होते की जे कोणी हातभार लावत असतील, त्यानाही तुच्छनजरेने बघतो. म्हणतो लेकहो आता तरी हे सोडा आणि बाहेर पडा जरा बाहेरचं जग बघा. ओपन माईंड ठेवा.

हा ओपन माईंड पाहिजे म्हणून शंख करताना मी बऱ्याच लोकाना ऐकलय. स्वतःच्या घरातून बाहेर या, बघा बाहेर काय सुरू आहे, ते स्विकारायचा प्रयत्न करा. हे सगळंही ऐकलय. मान्यही आहे मला. पण आजकाल एवढी वाक्यच मागे राहीलीयेत मागे. त्यामागचा हेतू अदृश्य झालाय. हे ओपन माईंड करताना, का म्हणून मी मराठीकडे क्लोज्ड माईंडने बघावं. केवळ मराठी आहे म्हणून गाणी वाईट. चित्रपट टाकाऊ. ईंग्रजी काहीही असेल तर आम्ही काही पूर्वग्रह न ठेवता बघून येणार. पण ही संधी मराठीला का नाही? काही लोकाना हा आकस मराठी बद्दल असतो. काहीना कुठल्याही ईंग्रजेतर भाषेबद्दल असतो. ओपन माईंडच असेल तर मग मराठीकडेच का नाही बघायचं ओपन माईंडनं? तिथं का लाज? केवळ आपलं ते कसं काय चांगलं असू शकेल या विचारामुळं?

भयंकर राग येतो अशावेळी. पण या सगळ्याला दुसरी बाजूपण आहे. माझे असेही लोक आहेत की जे मराठीचा अनावश्यक आणि अती आग्रह धरतात. वेळी संस्कृत शब्द वापरतील पण ईंग्रजी किंवा हिंदी नाही वापरणार. यांचे ओपन माईंड कदाचीत संस्कृतकडे. संस्कृतची मालमत्ता आपल्याच आज्ज्याची म्हणून ती मराठीच्या नावावर खपावायची आणि वर बाकीच्याना आग्रह धरून बसायचा की बाबानो तुम्हीही हेच केले पाहिजे. प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीमधे मराठी पाहिजेच म्हणून मागं लागायचं! हा अत्याचार का? जसे बीन बुडाचा विरोध नको तसाच अतिरेकी आग्रहही नको! समोरच्याला मराठी येते नसेल तर मुद्दामहून त्याच्याशी मराठी बोलणारे लोक काही कमी आहेत? का समोरच्याच्या मनात तिटकारा निर्माण नाही होणार? आणि तो आपणच निर्माण करायचा? समोरच्यालाच काय ईतर मराठी लोकानाही लाज वाटेल याची. म्हणजे आपण मदत करतोय मराठीला की आणि काही? पुढे याचं बिल भाषेवर कोणी फाडलं तर आणि हळू हळू नकळत त्या भाषेपासूनच दुरावलं तर कोणाला दोषी पकडावं? ज्यानी भाषेचं नाव खराब केलं त्याना की जे भाषेपासून दुरावले त्याना? आपलेच दात आणि आपलेच ओठ. लहानपणापासून मराठीपेक्षा ईंग्रजी शब्द वापरले की कौतुक कराणारे पालक जबाबदार की त्या पालकाना ईंग्रजीकडे ड्राईव करणारी आपणच केलेली कटथ्रोट स्पर्धा?

एकीकडे मला जसा मराठीला सावत्र वागणूक देणाऱ्यांचा राग येतो तसाच मी या अशा मराठीचे नाव बिघडवणाऱ्यांसमोरही हतबल होतो. मराठीच काय तर कुठल्याही भाषेमधे अशा प्रवृत्ती नसाव्यात. हे ३ गट आहेत - एक अतिरेकी लोकांचा, दुसरा विरोधकांचा आणि तिसरा राहिलेला समुहाचा ज्याला फक्त कोणाच्यातरी मागे जायचे माहित आहे. हा तिसरा गट बहुमताकडे पळतो. वरकरणी चलती असलेल्या किंवा सेक्सी गोष्टींच्या मागे जातो. या विरोधकाना काही बोलावे तर वाटते की कोणी मला अतिरेकी समजू नये. आणि या अतिरेकी लोकाना बोलावे तर वाटते कोणी मला विरोधकांमधे मोडू नये. आणि असे करत मीही समुहाचा एक भाग बनतो. आणि जिकडे ओघोळ जाईल तिकडे जातो. हाताशपणे. सगळे समजून ऊमगून, न समजलेल्यांच्या मागे. लोक असा बीन बुडाचा विरोध करायला लागले म्हणून या अशा अतिरेकी लोकांची गरज तयार झाली की असे अतिरेकी होतेच म्हणून विरोधक तयार झाले? कोंबडी आणि अंड्याचा वाद आहे हा. विरोधक असोत किंवा अतिरेकी, दोघेही टोकाच्या भुमिकेमधे! ही कट्टरता आता तर आणखीच तीव्र होत चाललीये. पण या सगळ्यामधे भाषा होरपळून निघतीये.

हे विरोधकही माझेच, हे अतिरेकीही माझेच. माझ्याच भाषेवर हल्ला करताहेत. मलाच सहन करायचेय. हा प्रश्न तसा नविन नाही. माहित होताच. पण मला अजुनही उत्तर मिळत नाहीए. काय प्रतिक्रिया द्यायची ते कळत नाहीए. मी कशी मदत करायची ते कळत नाहीए. ईच्छा आहे पण मार्ग दिसत नाहीए. दरवेळी असे रस्त्यावरचे काहीतरी पोस्टर किंवा टिवीवर एखादी बातमी बघून अशी अस्वस्थता जागी होते. पण ...

Saturday, May 23, 2009

Emotionally Challenged!

बऱ्याचदा मी या अशा चर्चेमधे अडकतो. काहीतरी सांगायला जावं आणि त्यातून एकदम डिबेट्सच सुरू व्हाव्यात. म्हणजे एखाद्या नविन कन्सेप्टबद्दल वाचावं. एकदम ईंप्रेस होऊन कोणालातरी सांगावं आणि त्यानं आपल्यावरच हल्ला चढवावा की किती फालतू, युजलेस कन्सेप्ट आहे किंवा एकदम अशक्य म्हणून पकाऊ आहे. मग आपणच एकदम जसे काही स्वतःचच काहीतरी खोटं पडतय अशा भावानं बाजीप्रभू व्हायचं. मग अगदी शिरा ताणून चर्चा. शेवटी मग थकून भागून चर्चेचा सामना अनिर्णित जाहीर करणे. कोणच कसं काय आपल्यासारखं पाहू शकत नाही - हा आणि एक नंतरचा अचंभा - कदाचीत आपण काहीतरी स्पेशल आहे असे स्वतःला वाटून घेण्यासाठी. याचसारखा दुसरा प्रकार म्हणजे एखादी घटना सांगताना कोणीतरी मधेच असिंप्टोटीक शेरा मारावा. आपण त्याची नोंद म्हणून काहीतरी म्हणावं आणि पुढं जावं आणि मग त्यावरच परत आपल्याला सगळ्यानी मागे ओढावं. आणि सुरू लढाई!

"तू वाचली का बातमी? ईथल्या कोणाची कोण पोर, भारतातमधे अपघातात सापडली. पोलिसानी आत्महत्या म्हणून बंद केली केस!"
"नाही गं वाचली." माझं ड्राईवींग सुरू होतं.
"तसंही या लोकाना काम करायला नको. त्यात आणि या मुलीचे आई वडिल देशाबाहेर ... कोणाचा बाप विचारतोय याना केस दाबली तर!!"
"असं नाही व्हायला पाहिजे. आज लोक येतात आपल्या देशात. आपण काळजी नाही केली त्याची तर बंद करतील लोक यायचे."
"अरे... टुरीस्ट लोकाना तर कसलं लुबाडतात माहीत आहे ना? दसपट भाव लावतात! कश्शातही"
"हं."
"आमच्या ऑफीसमधल्या कोण अमुक अमुक गेलेला ताज बघायला. सगळं आवडलं वगैरे त्याला. पण लोक उल्लू बनवतात म्हणून कडवट तोंड करून सांगत होता!"
"हा हा. बिचारा. मेरेको उल्लू बनाया! म्हणून रडत होता काय?"
"नाहीतर काय अरे. पण आपलच नाव खराब करतो यार आपण!"

खरतर मला असली क्रिबींग सेशन्स आवडत नाहीत. म्हणजे त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. फक्त आपल्या आतमधली अस्वस्थता बाहेर निघते. यामुळं कोणाचं काहीच होत नाही. फक्त स्वतःच स्वतःला समाधान देतो आपण. की बाबा, आपण बेधडक बोललो तरी. बोलल्यानंतर बरंही वाटतं. किंवा म्हणू अस्वस्थता कमी होते. पण सगळं आपल्याच विश्वामधे. असो. भारतामधले पर्यटक आणि त्यांच्या भोवतालचं जग बरच बरं होत चाललय. माझ्या ऑफिसमधला ऑस्ट्रेलिअन ब्रॅड पुण्यात मस्त ८-१० दिवस जाऊन खुश होऊन आला. पलीकडच्या राज्यात फेरफटका मारून यावा तसा. फार मोठी अचिवमेंट आहे यार. People are no more afraid of India, Crowd, and what not. पण हे मला तेव्हा नाही आठवले! मला वेगळाच प्रसंग आठवला. आणि दुर्दैवाने मीही क्रिब सेशनमधे हातभार लावला.

"अगं मीही मागे एकदा एक डिबेट बघत होतो. कोणा रशीयन का ब्रिटीश मुलीवर गोव्यामधे कोणीतरी अतीप्रसंग केला. डिबेट होती नॅशनल न्युज चॅनलवर. मुलीची आईपण तिथे. गोव्यातले लोकल रहिवासीपण उपस्थीत. मुद्दा काय तर, मुलगी ती तशीपण कमी कपडे घालून फिरायची, मुलांशी लगट करायची का असेच काहीतरी. तिच्यावरच संस्कारच नव्हते. आमच्याकडे कोणी करत नाही असे. and blah blah. I mean what the heck yaar! Does that give you right to do anything? डीबेट संस्कार या विषयावर की घडलेल्या घटनेवर? Talk about bloody संस्कार later yaar. तोंड वर करून बोलतात तरी कसे देव जाणे?"
"ओह. तिला वापरू देत ना कपडे कसलेही. Freedom आहे यार. ती तिच्या कल्चरने किंवा सवयीप्रमाणे वापरेल. म्हणून काहीपण कराल काय? तिला असतील ३-४ मित्र तिच्या देशात. म्हणून बोलली असेल गोव्यातही ३-४ मुलांशी. लगेच लगट काय? हे लोक तसेही वसवसलेले. हरकून गेले असतील मागे तिच्या. का म्हणून आपले कल्चर फोर्स करा तिच्यावर?"

विषय भरकटला हे ध्यानी येण्याच्य़ा आधीच माझीही वाट चुकली.
"That was not the time to discuss all that. जिथे जाऊ तिथल्या पद्धती, प्रपंच तिने बघीतले नाहीत. खरय. याबद्दल बोलू नंतर. मला या विषयाकडं जायचच नाहीए. कारण घडलेली घटना त्याच्याही पलीकडली आहे. बलात्कार हा गुन्हा आहे. आणि आहेच."
"हो रे. तसेही पद्धती नाही बघितल्या म्हणजे काय? आपण अमेरीकेत राहतो पण ईथे कोण आपल्याला फोर्स करते की त्यांच्यासारखे वागायला? आपण आपल्या रिवाजाप्रमाणे राहतोच ना?"
"आपण कोणच्याही रिवाजाला धक्का तर लावत नाहीए ना. हा प्रकार वेगळा आहे. आता जपानी कंपनीबरोबर व्यवहार करताना. त्यांच्या ग्रीटींग वगैरे करायच्या वेगळ्या पद्धती वगैरे नाही शिकत आपण? You should know how things will be received at new place, new cities, new country! आपलेच घोडे दामटा पुढं काय?"
"ते बिझनेस एटीकेटस. त्याचा काय संबंध ईथं? आणि असं कसं? आपल्या लोकाना काय म्हणे हौस लगेच मागे मागे जायची. झूमधले प्राणी आहेत काय पर्यटक? त्यांच्या वेगळ्या रीती तसे करत असतील. तुम्हाला काय लगेच सावज मिळाल्यासारखं त्याना पकडायचय? आपले रिवाज शिकवायला? काम नाहीए लोकाना! काहीतरी खुसपट काढून आपलं अस्तित्व दाखवायचय."

सहसा, यावर म्हणलं असतं की सगळ्या पुढारी लोकना, आपल्यासारख्या टाईमशीट्स भरायला लावल्या पाहिजेत! काम नाहीए त्याना! पण गाडी आधीच भरकटलेली. कुठेतरी कळत होतं की आपला मुद्दा सुटलाय आणि आपण दुसऱ्याच लाईनवर खर्ची पडतोय. पण ती एक भावना असते ना की समोरच्याला आपण काय म्हणतोय ते समजलच नाहीए! त्या तसल्या भावनेने आणखी शिरा ताणून मुद्दा मांडण्याचा जोश चढलेला. मुद्द्यवर येऊ रे नंतर.

"वेगासला गेलो. रोमचा गेटअप बघून लगेच म्हणालो आपण, In Rome, do as Romans do! तेव्हा का बरं नाही तुम्हाला हवं तसं केला? का म्हणून अट्टाहास रोमन व्हायचा? मला त्याविरुद्ध नाही बोलायचय. पण तसच, In India, do as Indians do का नाही? जास्ती restrictions आहेत म्हणून? ऊद्या माझ्या कोल्हापुरात कोणी आला. ऊघडा वागडा महाद्वार रोड वर फिरायला आला, छान ऊन पडलय म्हणून. लोक काय वेलकम करणार काय? शक्यच नाही. असशील तुझ्या देशामधे असं फिरत. पण दुसऱ्याकडं आलोय तर जरा त्यांच्या दमानं घ्यावं ना? मला हे म्हणायचय. दुसऱ्याच्या पद्धतींना, दुसऱ्याच्या रीवाजाला का धक्का लावा?"

"मग कसलं स्वातंत्र्य रे? ईथे मी मला हवं तसं करू शकते. वागू शकते. कोणी काही भुवया ऊंचावत नाही. सुरक्षीत वाटतं म्हणून. असं कुठं असतं काय? की स्वतंत्र आहात पण हे, हे आणि हे करायचं नाही. हे, हे आणि हे बघायचं नाही. हे, हे आणि हे बोलायचं नाही! आणि हे जर मोडलं तर मग जे होईल त्याला आणि कोणी जबाबदार नाही!"
"हे बघ. जे झालं मी त्याला डीफेंड करतच नाहीए. पण ..."
"नाहीतर काय? एवढे freedom पाहिजेच की!"
"अरे यार ... हक्क आणि कर्तव्य वगैरे काही शिकलोय की नाही शाळेत? फक्त "हक्क आहे, हक्क आहे!" म्हणून काय ऊड्या मारायच्या? तुमचे काही कर्तव्यपण आहे म्हणलं की मग तत्वज्ञान सुचतं होय? पण सोड मला बोलायचच नाहीए या विषयी. आपण भरकटतोय."
"मला फक्त एवढच सांगायचय ..."
"नको. मला ऐकायचच नाहीए. खूनकी नदिया बेह जाएंगी. जंग छीड जायेगी."

एव्हाना माझं ऑफिस आलं! गाडीमधून हकालपट्टी झाली. दोघानी एकमेकाची शक्ती बहुतांशी खाऊन झालेली. मनात चीडचीड होती. मुद्दा सोडून नाही त्या विषयावर बाजीप्रभू झाल्याबद्दल. जे घडले त्याबद्दलचा राग, अस्वस्थता दुसऱ्या विषयावर निघाली. तो विषय कदाचीत रास्त होताही. पण ...? माहित नाही यार. काही गोष्टी मनामधे एकदम स्पष्ट असतात. एखादी गोष्ट चूक, बरोबर, रास्त, खराब आह. आणि आहे म्हणजे आहे. Last thing, you want is to discuss, argue and proive it!! वाद करू पण. मग शेवटी हकनाक एनर्जी वाया घालवली असं वाटतं. आपल्या मनाविरुद्ध कोणीतरी आपली एनर्जी वापरून टाकली आणि आपण काहीच करू शकलो नाही!! असे काहीतरी. Talk about conclusions. Talk about actionables. Spend hours for that. Why the heck do we spend hours and hours to talk about our feelings and emotions? I feel so much emotionally challenged at these times! अर्धवट विषयांच बॅगेज, आणि स्वतःच्या कल्पना, आणि सिद्धांत अभेद्य नाहीत ही अशी भावना. या अशा तिटक्या विटांचं काय बनणार जर दररोज कोणी येऊन त्यांच्यावर वार करणार असेल तर. आणि तसेही कोणी पुर्णतः वेगळं म्हणत नाही. पण कदाचीत आपण आपले मुद्दे सिद्ध करण्याऐवजी आपले मुद्दे सिद्ध करण्यासाठी खपतो. आणि दुसऱ्याच्या विटाना नकळत भगदाडं पाडतो.

Whatever. वेळ कोणाला आहे ईथं! मी समोर बघून स्वतःशीच म्हणालो, "च्यायला, अजुन अख्खा दिवस आहे!!"

Saturday, May 02, 2009

बिंब

(स्फुर्ती: नुपुरची कविता)


असं होतं खरं मधेच ... अनोळखी वाटणं.
कधी ... हे आपणच का? ... असं होणं.
आरशात बघून विचारावं,
की नातं काय आपलं?
जे काल बिंब दिसलं
ते आज कुठं गेलं?
काही माझं हरवलं?
की मी कशात हरवलो?
मग दररोज आरशात बघणं
आणि आपल्याच बिंबाशी हितगुज करणं,
जुन्या बिंबाचं काय झालं,
आणि हे नवं कुठून तयार झालं
सगळं जरी आपलं असलं
तरी उगाच अनभीज्ञपणे वागणं
लाख यत्नानं ओळख पटवणं
आणि मग दुसऱ्या दिवशी परत कोणी वेगळच दिसणं!

Friday, February 27, 2009

मंदाकिनी

पाऊस आला पाहिला,
ना पाहिला मी सोहळा,
मृद्गंध सारा लोटला,
तोही असे ना वेगळा

शब्दास आली ही कळा,
दूरस्थ भासे भावना,
अल्हाद ना दे मानसी,
जैशी सुखाची शर्तशी

संगीत माया धुंदशी,
बेधुंद काया गुंगशी,
ना गंध वाटे त्यातही,
ना मग्न झाले आजही

झाले कसे वेडेपिसे,
हे अंतरीचे गूढसे,
कोणी असे का दूरचे,
लावी मनाला ओढसे




खरं सांगतो, हा वर जो काही प्रकार तयार झालाय, तो लिहिताना नाकी नऊ आले. बऱ्याच ब्लॉगवर मध्यंतरी कविता कविता पाहिल्या. मधे कुठेतरी वृत्तं वगैरेपण वाचली. मनोगत.कॉम ला धन्यवाद. तिथुनच हा किडा घुसला मनात. (मधेच सगळी वृत्तं, यमक वगैरेची बंधनं झुगाडून प्रसून जोशी सारखा धडा लिहायचा विचार आलेला पण त्याच्यासारखे आपल्याकडे शब्दभांडारही नाही आणि परत त्याला संगित लावून पावन करायला रेहमानही नाही). असो. मंदाकिनी मधे लिहायचा केलेला पहिला प्रयत्न आहे (म्हणून नाव पण तेच आहे. काही दुसरं सुचवलं कोणी तरी चालेल). समस्त कवीवर्गास अर्पण. आणि खरच, हे जो लोक वृत्तात वगैरे बसवून कविता लिहितात त्याना मनापासून सलाम. लयी महान आहात राव आपण! मलाही मजा आली आणि तेवढीच तारांबळही उडाली. :)

Tuesday, February 17, 2009

नॅनी

nani is offline. Messages you send will be delivered when nani comes online.
मी: Hey ... you there?

.
.
.
.
नॅनी: तू हल्ली ईतका बिजी कसा?
Sent at 11:16 AM on Monday
.
.

मी: सध्या जरा सिन्सिअर व्हायचे भूत चढलय ... मे बी त्याच्यामुळे
नॅनी: ईतका की ब्लॉगवर पण काही टाकला नाहीस. कित्येक वर्षात! १०० वर्ष झाली असतील!!!
मी: जखमेवर बोट!! :(
नॅनी: बिजी ऑफिसमधे. घरी काय बिजी ठेवतात तुला हे विचारतीये!
मी: कॉल्स असतात यार पुण्यामधे.
नॅनी: ऑफिसमधे प्युन तुझ्यापेक्षा जास्ती बिजी असेल.
मी: ;)
नॅनी: का काय झालं?
मी: आजतक मै तुमसे झूठ बोल रहा था. मै प्युन हू. हा ... मै प्युनही हू.
नॅनी: तुझी कंपनी भारी आहे बाबा. प्युनला अमेरीकेत ट्रान्सफर करतात!
मी: ईथे महाग असतात बाबा प्युन.
नॅनी: :) असो. पण ब्लॉगपासून दुरी का?
मी: परत जखमेवर बोट!
नॅनी: जखमच का खरं?
मी: नाहीतर काय? सप्टेंबर पासून नवा पोस्ट नाही. मग जखमच की!
नॅनी: तेच तर म्हणतीये.
मी: ११ अनपब्लीश्ड पोस्ट आहेत यार. सगळे अर्धवट राहिलेत. च्यायला मन पुढे सरकले की परत मागच्या विषयावर येतच नाही.
असो.
बघू.
होयेगा.
कुछ तो होयेगा.
हा वीकेंड.
गच्चीसाठी खच्ची!
नॅनी: चलो ... झोपायला जाते.
मी: बाय.
नॅनी: बाय. आणि लिही काहीतरी. तुझे पोस्ट्स खरच मिस् करते मी.
मी: आई शप्पथ! लेखक पेटला आता. लेखकाला माहितच नव्हते की त्याला कोणी मिस् करते. आता बासच.
हर हर महादेव.
नॅनी: :)
मी: झोप तू आता. सोक्ष मोक्ष लावतोच मी आता ईकडे.
नॅनी: पेटते रहो.

nani is offline. Messages you send will be delivered when nani comes online.

.
.
.
.
.
.

कोणाशी कधी कसे सुत जमावं याचा काही नेम नाही. एकदम अनपेक्षीत प्रकारे, काहीही कारण नसताना, किंबहुना चुकूनच आमची गाठभेट झाली. सुमारे ३ वर्ष झाली आता या ओळखीला. हा अनपेक्षीत प्रकार म्हणजे एक ईमेल होते की जे चुकुन मला आलेले.

आपल्या पुढची जनरेशन जशी नेहमी एकदम पांडू वाटते तशी नॅनीपण जरा पाकाऊ होती. चॅटमधे भरपूर "?" आणि "!"! शेवटचे अक्षर अगदी ओळभरेपर्यंत टाईप करणे हे असले प्रकार ठासून भरलेले. ईंटरनेट, ईमेल्स आणि चॅटचे पहिले नऊ दिवस सुरू असल्याने तेच तेच जुने झालेले फॉरवर्ड ईमेल्स पाठवायची. आठवड्याला "Must See...", "don't ignore", "toooooo good" या असल्या ईमेल्सचा रतिब टाकायची. आपण पाठवतो त्या ईमेल मधे काय आहे हे बघायच्या आधीच, माहित असल्या नसल्यांच्या ईनबॉक्समधे ते ईमेल पोहोचवणे म्हणजे आपले परमकर्तव्य आहे असे मानणाऱ्या लोकांपैकी एक होती ती. सुत जुळावे असे आणखी काहीच आमच्यात नव्हते - फक्त डेस्टीनी. माझ्या लेखी सर्वार्थाने निरर्थक प्रकारामधे मोडणारे सगळे गूण तिच्यात. आणि रूड हा शिक्का माझ्यावर आधीपासूनच. एकमेकाशी बोलण्याचे - बोलत राहण्याचे आम्हाला काहीच कारण नव्हते. कोणत्याही क्षणी, कोणत्याही दिवशी, "चल जा गेलास ऊडत" असे झाले असते तरी कोणालही नवल वाटले नसते. पण असे झाले नाही. उलट जास्तीच ट्युनींग जमत गेलं.

एकमेकांकडून काडीचीही अपेक्षा नाही आणि काही गमावण्याचे भय नाही. कदाचीत अशी एक बाजू कदाचीत प्रत्येकाला असते. आहेत त्या सर्व नात्यांना समांतर. आणि ती तशीच रहावी म्हणून मूक धडपडही सुरू असते. एकमेकापासून अनभीज्ञ असण्यामुळे आमच्यातल्या बोलण्यावर आमच्या आजूबाजूच्या तत्कालीक गोष्टींचा फारसा प्रभाव पडलाच नाही. एकमेकाचे मूड्स वगैरे प्रकार फारसे मधे आलेच नाहीत. नॅनी ऊगाच शंभर प्रश्न विचारायची. "काय संबंध हिचा?" हा विचार येण्यापेक्षा "काय फरक पडणार आहे?" हा विचार डोक्यात यायचा. खरं म्हणजे तर आजीबाईसारखे ईतके प्रश्न विचारते म्हणून नॅनी नाव पडलेले. आज जेव्हा असे कधी कधी निवांत बसतो तेव्हा वाटते, यार ... ३ वर्ष! केवढे काही झाले यात. मीही कुठच्या कुठे आलो आणि ती ही! जिथे आमच्या बोलण्यात "हू केअरस्?" भाव असायचा, तिथे बरेच दिवस कोणी पींग नाही केले की त्याचीही नोंद असायची. आणि हे असेच तब्बल ३ वर्ष सुरू आहे. मित्र व्हायला प्रत्यक्ष भेटायला थोडीच लागतं? बरेच किस्से ऐकलेले असे पेन फ्रेंड्स वगैरेचे. नॅनीमुळे मलाही असा एक अनुभव आला.

पण जरा विचार केला की वाटते की यात माझाच स्वार्थ होता. म्हणजे ते असे की कुठेतरी या मागच्या ईतक्या वर्षात हळू हळू मी स्वतःच गढूळ होत गेल्याची भावना येत होती. हाताकड बघीतलं की वाटायचं की यार ३-४ च तर रेघा आहेत. त्याही आखल्यासारख्या. असं कसं काय गिजमीट झाल्यासारखं वाटतय सगळं? बऱ्याच गोष्टी, बरेच विचार आतल्या आतच रहायचे. बोलतो कशाला? उगाच वाटायचे की आधी स्वतःकडे बघा - असले काहीतरी मीच स्वतःला म्हणून गप्प व्हायचो. आपलं अक्षर जरी चांगलं असलं तरी आपली पाटीच कोरी नसेल तर वाचणार तरी कोण? कधी काळी यावर असेही म्हणलो असतो, मी कसा का असेना म्हणून मी काय म्हणतो त्याचे महत्व आणि त्याचा दर्जा कमी थोडाच होतो? पण हळू हळू हे ऊत्तर पटेनासे झाले. आजुबाजूच्या बऱ्याच गोष्टींसाठी मी एक मूक प्रेक्षक व्हायचो. आणि आपण मूकपणे बघतो, म्हणून शब्द आणखीच रसातळाला जायचे. पण या सगळ्या गढूळपणात मग एक असेही अंग पुढे यायचे की जे एकदम पारदर्शक, एकदम स्वच्छ असायचं. अर्थाअर्थी काही संबंध नसताना, केवळ यात काही अशुद्ध नाही म्हणून बरं वाटायचं. त्याच्या टिकण्यानं किंवा न टिकण्यानं कोणालाही काही फरक पडणार नसायचा. पण तरीही त्याचं अस्तित्व ऊगाचच निरागस वाटायचं. त्यात कशाचं भय नाही. त्यामधे अजुनही खुली किताब आहोत आपण असे वाटायचं. यातून तयार होणारा नॉस्टॅल्जीयाच मग पुढे ते टिकवायला भाग पाडायचा. नॅनीबरोबरचं नातं कदाचीत माझ्यासाठी असं होत गेलं. आणि ते असच ठेवलं यामागं हा ईतका सगळा स्वार्थ! पण ... हे असं सगळं मला हल्ली वाटतं. म्हणजे आफ्टरमॅथ.

आपण टप्प्या टप्प्यानं मोठं होतो. प्रत्येक टप्प्यावर आपण वेगळे. बेटा बेटावरून पुढे जातो. प्रत्येक बेटावर कोणाकोणाला भेटतो. बऱ्याच कला दाखवतो. त्याची कदरही होते. त्यातून निर्माण झालेल्या अपेक्षांचे मुठभर मास चढवून मग पुढच्या बेटावर जातो. पण मग त्याच कला कलेकलेने मारूनही टाकतो. एक वेगळंच रुप घेतो. नव्या बेटावरच्या नव्या कला. चक्र सुरू. आणि मग परत एकदा या जुन्या बेटावरच्या सवंगड्यांची भेट झाली की मग मुखवटा पांघरतो. जसे काही आपण अजुन तसेच आहोत. पण मुखवट्यावीना होती ती मजा त्यात राहत नाही. कदाचीत समोरच्याला तिच मजा येतही असेल पण ते श्रेय कदाचीत मुखवट्याला आहे. बरीच बेटं पार केल्यावर, बरेच मुखवटे जमतात. आणि मग अचानक कुठेतरी एक जागा मिळते जिथे मुखवट्याची गरजच लागत नाही. कारण सगळंच अनोळखी. दरवेळी तितकंच नवं. मुखवट्यावीना स्वतःला बघणेही तितकेच रंजक. पुर्वी पुण्यात असताना दर वीकेंडला आश्रमातल्या मुलाना भेटायला जायचो. दरवेळी प्रचंड ताजंतवानं वाटायचं. त्या लहान लहान मुलांचा ऊत्साह बघून स्फुरण चढायचं. पण गेली २ वर्ष आता तो आश्रमही नाही आणि ती मुलंही नाहीत. अगदी तेवढं नाही, पण त्याची आठवण करून देणारं असं काहीतरी आहे हे बिना मुखवट्याचं वावरण्यात. नॅनी आणि माझी बडबड प्रसंगी अगदी निरर्थकही असली तरी यात अशी गोडी आहे. एकमेकाला चुकायचा स्कोपही आम्ही देत नाही आणि बरोबर चुक मोजतही नाही. एकदम काहीच्या काही बडबडत राहाणं आणि काहीच मनाला लावून न घेणं.

गेले ३ वर्ष ईतके काही झाले न भेटता. पुढेही कधी भेटू याची खात्री नाही. Thanks to Globalization. नॅनीचे लग्नही आहे आता थोड्या दिवसात. तिचे करीअरही सुरू होईल. एकामागून एक नव्या जबाबदाऱ्या खांद्यावरती घेईल. माझ्याही ऑफिसमधे माझ्या पुढच्या रोलची धडपड सुरू होईल. पायातली भिंगरी आणखी कुठेतरी घेऊन जाईल. आणखी एखादे बेट येईल. नवे लोक, नव्या कला, नवे मुखवटे. पण परत ती क्षणिक गडबड सरली की मेसेंजरवर एकमेकाला पिंग मारू ...

Hey ... you there?

Sunday, September 28, 2008

Am I doing it right?

This is amazing how we come up with innovative ways of Discriminating. आणि परत आपणच काही काळानंतर कोणालातरी नेताही बनवतो हा भेदभाव ऊखडून काढायला. Maybe this is what we call "Creating Opportunities"!

हिंदू मुस्लीम होते ... कदाचीत कमी पडले म्हणून आपण मराठा आणि ब्राह्मण आणि बरेच काही पण वापरले एकमेकांच्यात फरक करायला. तिथेही नाही भागले म्हणून पोटजातीही वापरल्या. हेही कमी पडले म्हणून आता प्रांत - म्हणे ऊत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय. Narayan Murthy had said once - We could be the only country where we love to get discriminated.

While we know that Discrimination is the PROBLEM, we still innovate and make efforts to have this problem last forever. Why do our "thoughtful" solutions again have discrimination involved. How could they be solutions then!?

आज सकाळी एक प्रेजेंटेशन पाहिले. म्हणे मराठी लोकाना आरक्षण द्या. मराठी माणूस कुठेच नाही. दहा बारा ऊदाहरणे. एकदम रीअल. कसे सगळीकडे ऊत्तर भारतीय आहेत आणि मराठी माणसाला स्थानच नाही! शेवट काय? तर म्हणे मराठी माणसालापण जागा करू. ऊत्तर भारतीयाना दाखवून देऊ आणि भैय्याना दाखवून देऊ त्यांची जागा काय ते!! मधेच दक्षिण भारतीयानापण टोले मारले होते! अंबेडकर, फुले वगैरेंची ऊदाहरणे दिलेली. या "आपल्या" माणसानी भेदभाव केला नाही पण आता "आपल्या" विरुद्ध होतोय! आणि असे बरेच काही.

अंबेडकर, फुले वगैरेंची ऊदाहरणे देऊन सांगायचे की तुम्ही आता फक्त मराठी लोकांच्या भल्यासाठी झटा! लाज कशी नाही वाटत या लोकांची नावं घ्यायला - देव जाणे? हीच शिकवण घेतली काय आम्ही? खरच थक्क व्हायला होतं. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी हालत आहे. रोग काय? त्याचा ईलाज काय? काहीतरी ताळमेळ हवा ना. या प्रकाराचे पुढच्या ५-६ वर्षामधे काय काय परीणाम होतील याची सुक्ष्म तरी कल्पना आहे का? आपला आवाज ऐकवायचा हा सर्वात सोपा मार्ग आहे - आजीबात दुमत नाही आणि आपण करतोही असे - एकदम अभिमानाने. हे अंगाला लागलेले वळण आहे आणखी काही नाही. याहून दुसरा मार्ग माहित नाही, पण कोणीतरी काहीतरी धडपड करतय म्हणून काहीच नाही तर आपला पाठींबा तरी व्यक्त करावा म्हणून केलेला आपलाही माफक यत्न. मी स्वतः काही करत नाही म्हणून मी स्वतःला आणखी कोण काय करतो त्यावर टिप्पणी करू देत नाही. शाळेतली सवय ना - स्वतः काही करायचे नाही तर जो करतोय त्याला का त्रास देतो? अजुनही कानात आहे हेच. कदाचीत म्हणून बरोबर चुक वगैरे तुलना होतच नाही.

मला या सगळ्याचा अंत माहीत नाही. मला ऊत्तरं माहीत नाहीत कारण मला प्रश्नच माहीत नाहीए. सर्वत्र मराठी लोक नसणं हा वादाचा मुद्दा आहे की कुठल्याही कारणाने भेदभाव होणं हा आहे? कदाचीत मी सर्वत्र मराठी माणसाना आणेनही. मग मी त्यात आडनावं बघून हिंदू किती, मुस्लीम किती, मराठा किती, ब्राह्मण किती हे बघेन! त्याही ऊपर आणि जाती - पोट जाती बघेन. कधी ऊठलाच किडा तर त्याविरुद्ध आवाज ऊठवेन. We will do it, not because it is right ... but because we are good at it and that is easiest.

कधीतरी आपण थांबले पाहीजे. किती काळ असेच मेसेजेस फॉरवर्ड करत राहणार? कधी विचार करणार? We have all the knowledge, we have brains, we know how to apply. Let's think. I do not know what to do and what will work but now, for sure, I know, this is not what I want to do.

Nothing against any individual - please do not take me wrong but really thought I should vent my thoughts somewhere and hence used the forum. I want this to be a better place for our next generations to come. Let them not fight the same battle. Battle against Discrimination.

का नाही मी विचार करत की कसे सुंदर बनवता येईल जग आपल्या पुढच्या पिढीसाठी? का त्यानीही त्यांचे आयुष्य घालवायचे अशाच गोष्टीसाठी. आज्जा लढला काळा गोरा साठी ... बाबा लढला हिंदू मुस्लीमसाठी आणि पोरगा लढतोय ऊत्तर - दक्षिण भारतीयांसाठी! कदाचीत नातू मोठा होईपर्यंत आम्ही आणि काहीतरी ईनोवेटीव भेद तयार करू! लढेल तोही. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही करयचा हे माझ्या मुलाला शिकवताना मी का म्हणून अशा ऊत्तराना पाठींबा देऊ की जी ऊत्तरे भेदभावाच्याच पायावर ऊभी आहेत?

पुढच्या पिढीला शिकवायचे काम मी सुरू केलेय. पण सध्याच्या पिढीला कोण सांभाळेल? प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचा आजिबात विचार नाहीए. एखादा मनुष्य त्याच्याच प्रांताच्या लोकाना पुढे आणताना बाकीच्यांची गळचेपी करतोय तर आहेच चुकीचे ते!! का नाही मी त्याला तिथेच बंद पाडत? का नाही त्याचाच निषेध करत? "तू तसे केलास तर मीही तसेच करेन ..." अरे... हे तर आपण शाळेत भांडताना करायचो. नाही काय? ही मधली ईतकी वर्षे शिकून काय प्रगती केली मग?

सगळं अनुत्तरीत आहे. म्हणून बाहेर काढायचं धाडस होत नव्हतं. आज आलं बाहेर. कोणाला यातून दुखावलं असेल तर मनापासून माफी मागतो. पण हे जग जितकं आपलं आहे तितकेच आपल्या पुढच्या पिढीचेही आहे. थोडी शक्ती हे सारे सुंदर बनवायला खर्च करू. ते नसेल तर कमीत कमी खराब करायला तरी नको खर्चूया.

Saturday, August 23, 2008

Life meri Blackberry

This is not the first time I am blogging during the journey, but this is different - thanks to American Airlines' "GoGo" - wifi with wings - which did not work but left the temptation that made me write all these things on my blackberry! Now this is quite interesting. You are in flight - several thousand fts above the ground, you make all the plans to write things, you pull out your bag n take out the laptop, start it and see that last 15 mins of battery are remaining, you still hurry n check the wireless, connect to it, see it connecting, by this time make even more plans like to email folks n all, and boom .... That bugger internet page takes you to a place that, with awesomely fresh look, asks you to pay first!! Ha ha, and then you think - "were you really expecting it to be free? This is US of A boss - nothing is free here."

Well not a very good start though, but not bad also. My earlier plans to catch a nap to remain fresh for next day were already in soup. I was up and in full mood of writing (though, do not know what) But then, as always, life meri blackberry! Pulled it out and here I am. Blogging - from mobile - flying - and smiling with no reason. This air hostess looks smarter - after seeing me pulling out the laptop n putting it back there in less than 10 mins with some restless gestures - she offerred me a different seat - where I am sitting now like a king with both the seats near to me empty, with my shoes off, n this blackberry in my hands n two tiny kids from next seat staring at me as if I am playing some kool game that their mom hasn't allowed them to touch in the flight.

Hmmmm ... Now this makes me feel better. Not sure if it is because I am doing this mobile blogging or because of these small things happening - but yeah, who cares?

Quite happening month it was - 4 more days to go - it could have been no larger than this - my parents came to US - or rather outside maharashtra for the first time n that too for more than a month which happens to be the longest period they have ever stayed away from home n home town in last more than 25 years! It was huge. While I am writing this, they are in another flight - on their way back. Things change so fast and that too upside down. You totally get to see what you never thought would happen but always hoped for. for example, my mom always dreamt about a cosy small home that she'll get to setup n manage of her own - I always wanted to see my dad taking a real long break from his daily routine. But even till couple months back, none of us knew it would happen in USA. That's God's way of telling - dude, just stay tuned - anything may come true!! God has his own tricks. You just need to know how to enjoy them. Expected/unexpected or good/ bad is a different ball game. Somehow I do not want to get into all that but have really want to continue enjoying it. This has developed a funny habit - I am actually trying find out some story, some meaning, some clue, some link or some interpretation in any of the happenings around me that could really make it worth living, remembering again, learning or something like that. It's fun.

This airhostess has come again, who seemed well n nice, now is offering me an apple juice and then chips with a real nice n wide smile saying, "only $3 for chips, sir". No wonders they hire more cute n smart n ... n ... girls in this industry. I just can't imagine a boy showing his teeth (or muscles?!) n selling some stupid chips or cookies and the passenger also buying it what he never wanted and that too with equally wide "thank you"! Only girls can make it happen. But maybe this time my blackberry was more powerful - my wide "thank you" didn't buy anything in reply to her offer. Said to her in my mind - "I just gave you a role in my first ever mobile blog! God bless your teeth!"

May be I am running all over the place now - not sure at the same time if this blackberry is going to save everything or not. This is high time my fingers should get off these tiny keyboard n sleep! After all how long can you write something descrete, perhaps disconnected, long enough? :) Those kids also have stopped stairing at me - making it less fun!

(Also high time - this blackberry should start supporting devnagari script - so that I can finish my other incomplete blogs - sometimes it feels like homework due or pending medicine that' s necessary to keep you alive!)

Good night.

Regards,

Rohit Bhosale -----------------------------------------------------------------------------------------

Sent from my Wireless Blackberry device.

Tuesday, February 19, 2008

कारण मला ऊशीरा पोहोचायचे नाही

एक मुलगा भेटायचा मला - २६ नंबरच्या बस स्टॉपवर. डगळ्या पायजम्यामधे असायचा कायम. ऑफीस, घर, पार्टी कुठेही काही भेदभाव नाही - सगळीकडे तसाच पेहराव! बघूनच मजेशीर वाटायचा गडी. बस स्टॉप नामक प्रकारावर नाहीतरी आपल्याला कंठ फुटतोच तसा याच्या बरोबरही फुटायचा. हा अवलीयाही तमाम जनतेप्रमाणे सॉफ्टवेअर कंपनीमधे. डोळ्याला चष्मा पण म्हणे बीना नंबरचा - स्मार्ट वाटावे म्हणून लावलेला. हसतमुख. सदैव चौकड्याचा शर्ट किंवा टीशर्ट मधे. ऊभ्या ऊभ्या बऱ्याच गप्पा व्हायच्या. हा अवलीया तंद्री लागली की मात्र एकदम हसत असा काही क्रीप्टीक बोलायचा की ऐकता ऐकता एकदम फ्युज ऊडाल्यागम वाटायचे.

हल्ली कार घेतल्यापासून बस स्टॉपवर जाणे कमी झाले - पण परवा अचानक जावे लागले आणि योगायोगाने हाही भेटला. अगदी तसाच, जसा पुर्वी असायचा. म्हणाला प्रोजेक्ट बदलतोय. लंडनकडे कूच करायच्या तयारीमधे होता. पोस्ट वगैरे पण भलतीच बदलली होती. गडी अजून तसाच होता मात्र. म्हणाला या बेटावरून पुढच्या बेटावर निघालो. याची बेटही कन्सेप्ट मला आधीपासून माहीत होती. एकदम सरळ बोलणारा माणूस मधेच भडकायचा पण. काही गोष्टी असा काही बोलून जायचा की ऐकणाऱ्याला काय प्रतीक्रीया देऊ हा प्रश्न पडावा! काहीही म्हणजे काहीच्या काही बोलायचा हा गडी - तेही हसत. आणि पुढच्या क्षणी विषय एकदम निराळा!
"You know what? She is not vergin! And I can bet on that. It is just that I do not want to talk about it. That doesn't mean that she should assume I know nothing! बात करती है! तुला सांगतो ... पोरीना नको त्या ठीकाणी माज ... आणि नको त्या ठीकाणी लाज वाटते!"
एक ना दोन. बरेचसे असे त्याचे कमेंट हळू हळू आठवू लागले. पुढच्या बेटावरचा प्रवास सुखाचा जावो म्हणून मी निघालो. एकूणच एक वेगळ्याच दृष्टीकोन असलेला हा गडी फक्त बस स्टॉपवरच्या ओळखीमधे बरेच काही नवल बोलून गेला. त्याची बेटाची कन्सेप्ट, हा गेल्यावर जास्ती आठवते हल्ली.
.
.
.
.

एका दुसऱ्याच जगामधे आलोय मी. मी स्वतः आणलेय मला ईथे. अगदी जाणून बुजून! ठरवून वगैरे नाही पण एकदमच अनभीज्ञ होतो यापासून असेही नाही - अगदी पुरेपूर कल्पना होती आपण कुठे जातोय याची. ऐलतीर पैलतीर करत करत आपला तीर कधीच मागे सोडलाय मी. कोणा अनोळखी बेटावरून फिरतोय. हा बेट माझा नाही पण या बेटाबद्दल कुतूहल नेहमीच होते मला. ईथे यायची अफाट ईच्छा पण होती. मी आलोय त्या बेटावर पण त्यासाठी स्वतःचा गाव सोडावा लगेल याची जाणीव ऊशीरा झाली. जसे एकदा बाटला की बाटला! परत मागे फिरतो वगैरे प्रकरण चालत नाही तिथे! दोनही गोष्टी एकदम नाही होत. आता ईथून मला माझा गाव दुरवर अंधूक दिसतो. त्या गावामधे आता मी पाहूणा असेन. कारण या बेटावरची धुळ मला चिकटलीये. या बेटावरचा मीठ मझ्या रक्तात गेलेय.

ईथे सगळीच नवलाई. मान, अपमान, स्वाभीमान किंवा आत्मविश्वासाचे कपडे काय तर अगदी लाज, शरम, आब्रू आणि मैत्रीचेही बुरखेही वेगळे. कोणी नवे म्हणेल तर कोणी वेगळे! पण माझ्या गावासारखे नक्कीच नाहीत. हे सर्व कुतुहलाने बघता बघता कधी स्वतःवर पांघरले कोणास ठाऊक? मी या लोकांच्यातलाच एक वाटतो माझा मला! कधीकधी बेटाच्या ऊंच टोकावर चढून बसून मी माझा गाव पाहतो. तिथे नसलेला मी पाहतो. कधी नोंद न केलेली मर्यादा पाहतो. ईथे सगळेच स्वतःसाठी आदर्श. मी माझ्या गावातले बुजुर्ग आठवतो. मला आदर्श म्हणणाऱ्यांपासून पळून येताना मागे सोडलेला माझा आदर्श पाहतो.

परतीचा रस्ता दरवेळी मिळेलच असे नाही, पण परत जाण्याची ईच्छा करून कोणी लक्ष्य गाठायला निघत नाही. अशी बरीच बेटं लागतील, बरेच किनारे सोडावे लागतील. कुठवर जाऊ शकतो आपण हे मापायला मी नक्कीच निघालो नव्हतो. कुठे पोचायचेय नसेल माहीत तर ईंधन वाया घालवायची काय गरज? आणि जर माहीत असेल तर दिरंगाई कशाची? हिशोब एकदम सरळ आणि सोपा - समजायला आणि बोलायला. निघालो तर आहे, पण माझ्यामधला मला आवडणारा "मी" मागे सोडत. आणि कदाचीत हाच प्रश्न आहे - ज्याला मागे सोडतोय, त्यालाच अंतिम लक्ष्यापर्यंत पोचवायचे होते - तोच नाही राहीला तर पुढचा प्रवास काय कामाचा?

ईथे लोक मर्यादा ओलांडतील आणि मग शांतपण एक वेगळेच नाव देऊन नामानिराळे होतील. ईंपल्स होती ती म्हणून बऱ्याच गोष्टी खपवतील. स्वतःलाच शहाणपणाचे धडे शिकवतील. एकदम कमीत कमी प्रश्न पडावेत असे सोयीस्करपणे आपलेच एक वेगळे तत्वज्ञान बनवतील. ना प्रश्न, ना ऊत्तरे या अशा अवस्थेमधे आपण किती खुश आहोत हे बघून समाधानी होतील. हे एकदम अचाट! अगदी अनाकलनीय पण वरकरणी एकदम चौकटीबद्ध. काहीच पंगा नाही. "चुका होऊ शकतात" हे माझ्या गावामधे सहानुभूती देताना वापरायचे वाक्य होते - या बेटावर ते ब्रीद भासते. लांबून चकाकत होते ते सोने होते की वाळू हे समजायच्या आत किंवा समजून घेण्याच्या आत, मीही चमकू लागतो. एकदम लख्ख! आणि मग कधी बेटाच्या किनाऱ्यावरून आपल्या गावाकडे बघणाऱ्यांच्या भाऊगर्दीमधे जाऊन मीही सामील होतो. हे बेट या अशांच्याच गर्दीमुळे मग दुरून ऊजळून निघत असावे!

ईथे थांबायचे कोणालाच नाहीए. मलाही नाहीए. पण जाऊ त्या बेटावर, त्या बेटाचा रंग पांघरू, हे प्रवासाच्या सुरूवातीला माहीत नव्हते. आणि ही मिळालेली समज एक तगमग जागी करते. मी पुढे पुढे चाललोय यावर समाधान मानायचे की मी परतीचा रस्ता मिटवतोय याचे दुःख? मी आणि माझे लक्ष्य यातले अंतर कमी करतोय कि त्या लक्ष्या पर्यंत ज्याला पोहोचवायचे होते त्याला मागे सोडतोय याचे दुःख. तसे मलाही माहीत होते की बऱ्या़च बेटांवरून जाणार आहे, पण प्रत्येक बेटाचा रंग लागत जाईल हे जरा निराळेच. रंग लागू नये म्हणून की प्रयत्न केला नाही - पण रंग लागल्यावर, आपण परत बाटलो असे काही मात्र वाटून गेले - दरवेळी.

सुख दुःखाच्या गोष्टी केल्या की ऊगाच जरा भावनीक झाल्यासारखे वाटते. हे बेट हा एक टप्पा आहे, प्रत्येक जण येतो या टप्प्यावर. या टप्प्यावर कोणीच थांबायचे म्हणून येत नाही. पण काही थकून तर काही समाधान मानून ईथेच नांगर टकतात. बकीचे पुढे जातात. थांबले ते बरोबर? की पुढे निघाले ते बरोबर? हे असले हिशोब मांडायचा माझा मानस नाही. तसे जरी समाधान आपले ईतके स्वस्त नाही की या टप्प्यावरच हत्यारं ठेवावी, पण कुठेतरी धुसर भीतीही वाटते - ऊद्या तसेच झाले तर ...? मी ईथेच अडकून पडलो तर...? किंवा ईथेच मलाही समधान गवसले तर...? हा आत्मविश्वासाचा कमकुवतपणा की या बेटावरच्या कपड्यांचा परीणाम? मला या प्रश्नाचे ऊत्तरही शोधायचाही विचार नाही, कारण मला विषयच बदलायचा नाही. पुढे एक दुसरे बेट वाट बघत असेल, मला तिथे ऊशिरा पोहोचायचे नाही.

Wednesday, December 12, 2007

पाऊस एकदम पाऊस होतो

संदिप खरेच्या या ओळी ऐकल्या ...

आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही!!

आणि मग एकदम लिहायची खुमखूमी आली ... पण मूड येत नव्हता ... तरीही काहीतरी खरडले ...

कळत नाही बऱ्याचदा ...
पाऊस आला की तू आठवतेस
की तू आठवलीस की पाऊस येतो

पण गाडी पुढे गेलीच नाही ...! तिथेच राहीलं सगळं ... ऊसनं दुखणं आणल्यासारखं वाटलं काहीतरी!
मधे कोणी म्हणाले - पाऊस सुरू झाला! पण लपून छपून कोणालातरी शोधल्यासारखा तोही रात्रीच येऊन जायचा ... जाताना आपण अलो असल्याच्या खुणा सोडून जायचा!

शेवटी काल आणि आज मस्त पाऊस झाला ... केल्वीन होब्स मधे होब्स अंगावर ऊड्या मारून येतो ... तसा! थंडीको मारो गोली म्हणत चक्क पावसात भिजत चालत ऑफिसमधे आलो.

परत काहीतरी खरडायचा मूडा आला ... आहे मुड तोवर लिहीतोय ... बाकी चुकभुल द्यावी घ्यावी :-)


रानात छंद मकरंद गातो
मनात मंद हळुवार राहतो
बघताच मागे वळूनी कधीही
असा बिलंदर कुठून येतो

कधी व्यस्त गाठतो
ओळखीचा एक गंध ठेवतो
मन खिन्न ऊदास असो
कसेही
येऊन तसाही हात पकडतो

वाड्याच्या दगडावर झिरपतो
ओसाड टेकडीवरही घसरतो
मी परदेशी जाईन कुठेही
माझ्यासाठी तिथेही पोहोचतो

ऊनाड नाचतो ...
बेभान गातो ...
अल्लड हसतो ...
साक्षी राहतो ...
हलकेच स्पर्शतो ...
तुडूंब भिजतो ...
काही समजावतो ...
बरेच सुनवतो ...

पाण्यासाठी स्वरूप होतो
न्हासाठी ओलावा बनतो
मोर येईल जेव्हा कधीही

पाऊस एकदम पाऊस होतो!

Saturday, November 17, 2007

प्रेमाचे आयसोटोप

कितीतरी गोष्टी समोर असतात बऱ्याचदा पण कधी बघण्याचा त्रास घेत नाही आपण. "आपण" कशाला म्हणू? म्हणजे ऊगाच स्वतः बद्दलचे शहाणपण जगाला चिकटवून सगळेच एक सारखे असल्याचे समधान. पण - मी - माझे - असे लिहीले तर परत वाचताना किती आत्म-केंद्रीत लिहीतो आपण असे वाटते! परत 'आपण'! असो. विषय वेगळाच आहे. तशी मधे ३-४ पोस्ट अशीच लिहून अर्धवट राहीलेली. गणेशोत्सव मधले 'कथा गदिमांच्या' असो किंवा 'मुलखावेगळी माणसं' असो किंवा 'रात चांद और गुलजार' कार्यक्रम असो. सगळे ड्राफ्ट मधेच राहीले. बऱ्याचदा एकदम जोशमे लिहीणे सुरू होते काहीतरी ... आणि पब्लीश करेपर्यंत नाहीच राहत. चालायचच.

तर प्रेम ... प्रेम विषय होता. तसे हेही सुरू करून महिना आरामात उलटला असेल - पण होय ... प्रेम हाच विषय होता ... किंवा तसा विषय काहीच नव्हता ... पण प्रेमापासून विषय सुरू झाले सगळे ... अपुर्ण ब्लॉगच्या कचऱ्यामधून ...

श्रृंगार रस बीभत्स नाही होणार याचे भान असलेले लोक म्हणून गदीमा, बाबूजी पेंढारकर आणि लावणी यांच्या बद्दल काहीतरी लिहायच्या विचारात होतो. सुरूवात चक्राला ती तिथून झाली. प्रेम प्रेम प्रेम ... सिनेमे ... पवसातली गाणी ... शाहरुखचे डायलॉग (तसे बॉलीवूडचे डायलॉग म्हणायचे होते ... पण तिकडे प्रेम या विषयावर शाहरूखची monopoly आहे ना .. म्हणून शाहरुख) ... या पलीकडे फार कमीवेळा गेलोय मी. मधे मधे प्रेम म्हणजे काय 'तसलेच' प्रेम कशाला हवेय म्हणून डीबेट वगैरे पण केलेली पण त्या नंतर परत प्रेम या शब्दाला ठरलेल्या चाकोरीच्या बाहेर काही नाही येवू दिले.

गेले दोन - चार दिवस मराठीमय दिवस होते ... मराठी नाटके ... सिनेमे बघणे कार्यक्रम सुरू होता. 'सातच्या आत घरात','श्रीमंत दामोदर पंत' आणि आज 'कार्टी काळजात घुसली'. सगळे एकदम वेगवेगळे विषय. सगळयांचा प्रेक्षकवर्ग वेगळा. पण कुठेतरी एक गोष्ट समान होती. प्रेम.

"असेल दामू थोडा वेडा... पण आमचे आयुष्य आता तोच आहे" असे म्हणणारा 'श्रीमंत दामोदर पंत' मधला दामूचा बाप ... किंवा "भडकलेले, चिडलेले कसेही पण बाबा तुम्ही मला खूप आवडलात." म्हणणारी ती 'कार्टी काळजात घुसली' मधली कार्टी! काहीतरी जुनेच पण नव्याने बघीतल्याचे जाणवले. काहीतरी हरवलेले परत मिळाल्यासारखे वाटले.

म्हणजे बघा ... एक मुलगी ... तब्बल १६ वर्षाने बापाला भेटते. बायको पोरीला टाकून गेलेला बाप - मोहन जोशी. त्याची त्याच्याएवढीच सडेतोड बोलणारी मुलगी. अगदी बापाच्या मैत्रीणीला "आत्या तुम्हाला म्हणता येणार नाही, आणि मावशी म्हणलेले मला चालणार नाही!" म्हणणारी! १६ वर्षानंतर फक्त बापने मायेने डोक्यावरून हात फिरवावा म्हणून आलेली ही मुलगी असो ... किंवा आपला वेडा दामूच आपले आयुष्य आहे मानणारे 'श्रीमंत दामोदर पंत' मधले आई वडील असोत. सारे बरेच काही बोलून जाते. प्रेमाच्या या छटा नवीन जरी नसल्या तरी ऊगाचच वेगळ्या वाटल्या खऱ्या.

एका भलत्याच संस्कृतीच्या कचाट्यात सापडल्याचा भास होतो हल्ली. आजूबाजूला बघावे तर एकदम Individualistic अशी अमेरीकन संस्कृती. स्वातंत्र्य अजीर्ण व्हावे अशी दृश्यं. आणि त्यात वावगं काहीच न वाटणारे लोक. मी पण कदाचीत. कारण स्वातंत्र्य ना! तुला नाही बरोबर वाटत, तर तू नको करू ना - ऊगाच बाकीच्याना काय सांगतो.

"प्रेम - प्रेम काय रे ... some times it works, sometimes it doesn't. If it does, it does. If it doesn't then wait a while, it will happen to you again"
असे म्हणणारे मीत्र आणि मग
"ईन्सान एक बार जीता है, एक बार मरता है। प्यारभी एकही बार करता है।"
म्हणणारा शाहरुख - एकमेकांशी वाद घालतात असे वाटू लागते.
किंवा अगदीच काही नाही तर - "साले ... तू कहा दुधका धुला है?" पण खरं बघावं तर विषय याही पलीकडचा आहे पण अलीकडच अडकून पडलाय.

कदाचीत म्हणूनच प्रेम ही कल्पना ठरावीक चाकोरीच्या बाहेर नाही जात. आयुष्याच्या आणाभाका देऊन प्रेमकथा संपत नाही ... तर सुरू होते. झाली तरी पाहीजे. आजूबाजूला बघावे तर पुढच्या पायरीपर्यंत कोणाला जायचेच नाहीए. कुठेतरी प्रेम लुप्त होताना दिसतेय. किंवा प्रेमाचा एकच आयसोटोप बाकी राहतोय आणि बाकी अंतर्धान पावतायत असे वाटतय. गेले सोळा वर्ष बाप असताना आम्ही पोरकी झालो म्हणताना रडणारी मुलगी आणि बापाने नकळत मायेने डोक्यावर हात ठेवल्यावर स्वर्ग मिळाल्यासारखे भाव दाखवणारी तीच मुलगी ... सोळा वर्षाने आपल्या मुलाशी फोनवार बोलणारा बाप ... सगळे चित्रच वेगळे. म्हणजे ती तगमग - ती अगतीकता - विरह - हर्ष - सर्व काही होते पण जसे काही वेगळ्याच कपड्यात. पण हे सगळे बघताना नवल का वाटावे ...? की या सगळ्या भावनांची ... सवय गेलेली? काहीतरी माझ्यामधेच मिसींग असल्यागत वाटतय. प्रेम हे फक्त ऊदाहरण आहे ... पण तशा कितीतरी गोष्टींमधे भलतीच सवय लागून गेलीये ...!

म्हणजे हे असेही असते. कदाचीत होतेच आधीपासून. पण बघतो कोण? त्यात स्पाईस नाही ना?! कदाचीत त्यामुळे. काय बघावे हे ही आपणच ठरवणार ... आणि काय नाही बघावे हे ही आपणच ठरवणार. प्रेमाबद्दलच बोलायचे तर ... ते ही प्रेम ... हे ही प्रेम. त्यात तुलना करणे योग्य नाही पण एकाकडे कानाडोळा आणि एकाकडे टकमक नजर! म्हणजे अगदी फक्त क्रिकेटचेच लाड आणि बाकी खेळांना सावत्र भावंडाप्रमाणे वागवल्यासारखे!

यातले काहीच नवे नव्हते. माहीत नव्हते असेही नव्हते. पण कदाचीत विसर पडला होता. किंवा नजरेला झापड लागलेली. रसायन शस्त्रामधे जसे पदार्थांच्या (की मूलद्रव्यांच्या ... आठले सर माफ करा, खरच शब्द आठवत नाहीए!) रुपाना आयसोटोप म्हणायचो तसे हे सारे प्रेमाचे आयसोटोप आहेत. काही नाहीसे होताना तर काहीना खास फुटेज खाताना. काहीना लुप्त होताना तर काहीना larger than life होताना. सगळे आपणच करतोय ... आपणस बघतोय. (परत 'आपण'! ...)

का कोणास ठाऊक ... नाटक बघून बरेच दिवस गेले ... पण हे विषय मनातून जात नाहीएत. कदाचीत कुठे तरी अनोळखी ठिकाणी चाललोय असे वाटतेय. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमधे आपण सहभागी जरी होत नसलो तरो कुठेतरी त्यांचा अतीरेक आपल्याला त्या सगळ्या गोष्टींना ईम्युन बनवतो! या ईम्युनीटीची हल्ली भीती वाटतीये!! ही ईम्युनीटी आपल्यात ऊतरणार नाही ना - याची भीती! प्रेम हे खरच फक्त ऊदाहरण आहे ... अशा बऱ्याच गोष्टी आता नव्याने दिसतायत. थोडे मान ऊंचावून मागे वळून बघीतले तर कळेल.

म्हणजे अगदी ... तुम्ही ऊभ्या आयुष्यात दारूला स्पर्शही कलेला नसेल हो ... पण ईतका सर्वाना दारू पीताना पाहीला असाल ... की ऊद्या तुमचा मुलगा जरी प्यायला लागला तरी त्याचा कान धरायच्या आधी स्वतःच बरोबर करतोय की नाही याचा विचार कराल! प्रश्न बापलेकाचा नाही ... प्रश्न सवयीचा आहे. वावग्या गोष्टीमधे वावगे बघण्याचा आहे. एकदम अचुक शब्दात मांडता येत नाहीए ही अस्वस्थता ... पण ... काहीतरी घोटाळतेय मनात हे बाकी खरं.

अगदी असे नाही ... पण बरेचसे असेच विचार येवून गेले ... तसाही या ब्लॉगवर एकदम पहीला पोस्ट टाकला तोही बऱ्याच अनुत्तरीत प्रश्नाचा!! तिच श्रृंखला अजून सुरू आहे ... हे सारे नवीन प्रश्न ... एवढेच

मेरे मन ये बता दे तू ... किस ओर चला है तू!! क्या पाया नही तूने ... क्या ढुंढ रहा है तू!?

(मी असे काही नाटक बघीतले हे तसे कोणाला सांगून पटणार नाही - म्हणून ईतके सगळे लिहून काढले!)