Saturday, February 08, 2020

क्रमशः

"फटाक पोरगी येत नाही की आज काल बाजूला बसायला. मग लागली सवय पीच्चर लाऊन बसायची." प्रामाणिक असलेलं कधीही बरं. उगाच दुर्लक्ष केल्यासारखं वाटू नये.


"मी तर झोपते फ्लाईट मध्ये."


तरीही माझं प्रामाणिकपणा सुरूच होता, "तुला पण भेटत नसेल न माझ्यासारखा. म्हणून सवय लागली असेल."


"Yeah. Right." तिनेपण मग प्रामाणिक व्हायचं ठरवलंच शेवटी.



आणि खरं सांगायचं तर, मला आठवत नाही की किती महिने झाले फ्लाईटमध्ये कोणीतरी बाष्कळ गप्पा मारायला सापडून! आणि whenever there seemed like a possibility, there was always a middle seat between that possibility and me, which was never empty. आणि इथे तर काहीही कारण नसताना ही बया माझ्या शेजारच्या बापयाला म्हणाली की तू बस हवं तर खिडकीपाशी. मी बसेन मधल्या सीट वर थोडावेळ.


बॉस. तिथेच आपण सिनेमा बंद केला. हेडफोन्स गुंडाळून आत ठेवले. आणि मुंडी वळवली. इतका विंडो सीटचा त्याग कोणी करतं का आजकाल? शेक-हॅण्ड साठी हात पुढे केला आणि म्हणालो,

"ग्यारह मुल्कों की पुलिस मुझे उधर ढूंढ रही है, और मै इधर हूं। I am don. नाम तो सुना होगा?"


पण पोरगी जरा जास्तीच हजरजबाबी निघाली. लै पिच्चर बघत असावी!

"तो तुम हकलाते हो की जानवर जैसा पानी पीते हो?"


"अगायायाया! तुला आयडिया नाही, किती सॉलिड सिक्सर मारलीय तू आत्ता!" Almost सीटवरून खालीच पडणार होतो मी!


पण माझा एकूणच awesomeness न झेपल्यामुळे, ती लगेच म्हणाली, "BTW, I am married.". प्रामाणिकपणा bites!


"होय की. I am सुद्धा married. खुश?" आपणसुद्धा कशाला सोडा?


"मग ठीके."


"What do you mean by मग ठीके?" ही बया पण कमी नव्हती!


"बाब्बो... तू बेअरींग सोडलं की डॉनचं!"


"Under normal circumstances, you tell me that you're Mona Darling, and not I'm married! मग कसं राहणार बेअरींग?"


"I'm sorry. But I'm really not Mona darling."


"Don't be sorry. I'll adjust. ही सगळी जनता आलीय आज, तू आणलय त्यांना?" बहारीनच्या विमानतळापासून या लोकांचा जरा बालिश चाळे युक्त गोंधळ सुरू होता.


"हो. माझीच पिलावळ आहे ही.


"अगं पण इतकी?"


"एकवीस जण आहे. कार्पोरेट ट्रीप."


"अरारारा."


"Yeah. I know. पण आता थोडा वेळ ते शांत बसतील. तू बोल. तुझं चालू दे."



आता काय? ट्रीप वर नेणारीच बया भेटली म्हणाल्यावर सगळ्या ट्रीपवाल्या अनुभवांची लिस्ट सुरू झाली. च्यामारी, इतक्या कॉमन जागा निघाव्यात आम्ही दोघांनी बघितलेल्या? म्हणजे, लंडनच्या ट्रेन झाल्या. पॅरिसमध्ये घंटा कळत नाही जगेचं नाव काये, झालं. न्यूयॉर्कमध्ये केवढी छोटी छोटीशी घरं असतात, रूममध्ये बॅग उघडली की अजून कुठेही हलता येत नाही, झालं! मॉस्को मध्ये किती चायनीज भरलेत, हेही झालं! शनी शिंगणापूर पासून सिंगापूर पर्यंत सगळं सगळं झालं. खटाखट.


"अथेन्स मध्ये पहिल्यांदाच?" हा आपला पावशेर ठेवायची मोमेंट.


"हो" ये पकड़ा!


"क्या बात है! प्लाका नावाची जागा आहे इथे एक. सगळे earthlings झोपतील कुछ घंटो में, तब उधर को घुमने आयेगा मै."


"क्यू?"


"क्यू is not a right question Mona Darling. Question is, do you want to join in? Athens का dessert खिलाएगा तेरेको?"


"मी टूर घेऊन आलीय. तुला समजतंय न? अजून तीन ठिकाणाहून येणारेत लोक. आम्ही सगळे एअरपोर्टला भेटू. मग सगळ्यांना घेऊन हॉटेल. चेक इन. तिकडचं सगळं. लोकांना जेवायला घालायचं. ते झोपले की मग उद्याची तयारी. कॉर्पोरेट टूर्स म्हणजे जरा ज्यादा कटकट असते. तुम क्या जानो रमेशबाबू?"


"हे बघ. मी तर जाणारे. आणि लै भारी काहीतरी खाणारे. तेरेको जमेगा, तो आओ। नहीं जमेगा, तो एक बात याद रखना."


"काय?"


"पानी पीते रेहना। जरूरी होता है। Keep drinking water"


"पाप को जला जला के राख कर दूंगा?"


"अगं तू किती कमाल आहेस! सिक्सर आहे हा अजून एक."


"नंबर दे तुझा. जमलं तर येईन."


"फक्त पुलिस को मत बताना। कारण I don't know what happens with the बारहवां मुल्क starts looking for me."


"असू दे की अरे, मर्द को कभी दर्द नही होता न?"


(क्रमशः)

No comments: