Friday, September 20, 2013

प्रगतीच्या मार्गावर ... प्रेमाचा सुळसुळाट!

“मला love stories आवडत नाहीत! मला “I hate love stories” हा सिनेमाही आवडत नाही! हे प्रेमाचा भडिमार करणारे जे कोणी लोक आहेत न, ते सगळे खरे अतिरेकी आहेत! किती अरे त्रास द्यावा? त्याला काही प्रमाण? काही करा न करा, पण प्रेम कराच! बारा महिनेमे बारा प्रकारे करा. प्रेम केला नाहीत तर काहीच केला नाहीत! आयुष्यात काही करण्यासारखे असेल तर प्रेमच! प्रेम म्हणजे सर्वस्व. शेजारी पाजारी, कलीग, मित्र, मैत्रिणी, रस्त्यावर गर्दीमधले लोक, तो होर्न मारणारा काळा जाकेटवाला, सिग्नल तोडलेल्या बरोबर मांडवली करणारा पोलीस, किराणामाल वाला दुकानदार, करच्या दारावर टकटक करणारे भिकारी, हे सगळे तुम्ही नजरेआड झालात की प्रेमच करत असतात. मग तुम्हीच कसे काय करत नाही? प्रेमाचा विसर पडू देऊ नका. सगळीकडे प्रेमाच्याच आणाभाका घ्या.

आमच्याकडं प्रेम अमर असतं. प्रेम आंधळं असतं. प्रेम लुळं पांगळं पण असतं. कोण म्हणतो प्यार बिकाऊ नसतं? मी तर म्हणतो की प्रेमापेक्षा जास्ती बिकाऊ आणखी काहीच नसतं! प्रेमाच्या विक्रेत्यांचा सुळसुळाट तर पुण्यातल्या कुत्र्यांच्या सुळसुळाटापेक्षा जास्ती असतो! शाम्पू घ्या, तेल घ्या, साबण घ्या, टॉवेल घ्या, दात घासा, पाणी प्या, ज्यूस प्या, चिंगम चघळा, फिरायला जा, गाड्या घ्या, जेवायला जा, कपडे घाला, कपडे घालू नका, चड्ड्या घ्या, रुमाल घ्या, चोकलेट घ्या, बिस्कीट खा, पेन पेन्सिली घ्या, श्वास घ्या, मोबाईल घ्या, फोन करा, फोनची तोबा बिलं भरा, बल्ब घ्या, ट्यूब घ्या, घरं घ्या! आणि प्रेमात पडा. प्रेमात पडायचं असलं तर इतके सगळे अस्सल उपाय आहेत! का? का काय विचारता? का नसतंच विचारायचं. का विचारणारे शहाणे असतात आणि आपण तर हुशार आहोत! आपण कुठे शहाणे आहोत? हे सगळं करा म्हणजे कोणीतरी तुमच्या प्रेमात पडेल, किंवा तुम्ही कोणाच्यातरी प्रेमात पडाल! दिल दिल दिल करत पळत सुटा. “दिल” हरवा, मिळावा, सांभाळा, त्यावर छुरी चालवा, पागल बनवा, त्याची पुकार ऐका, त्याला शिव्या घाला, त्याचं ग्यान ऐका, ऐकू नका, दिल मध्ये कोणा कोणाला बसावा, तिथून हाकलून लावा, ते तोडा, फोडा, पायदळी तुडवा! Exchange offer देऊन त्याचा कुकर आणा! दिल मे दर्द घाला, कंदील घेऊन शोधात बसा. घंटा काही कळत नसेल, तरी दिलचा बोलबोला करत फिरा.

माणसानं नर आणि मादी याहून थोडासा वेगळा विचार केला पाहिजे. असे एकीकडे बोंबलायचं आणि दुसरीकडे मुलगी हुडका. मुलगा हुडका असा भडीमार करायचा! जनावरामध्ये आणि आपल्यामध्ये फरक एवढाच की त्यांना मार्केटिंगचा त्रास नसतो. बाकी हुंगत हुंगत फिरणं हे उपजत असतंच. नावाला आपण प्रगत.
"

एवढं बोलून हुशारला धाप लागते. तो खाली बसतो! हुशार काही प्रगत नाही हे पुराना लोकांना आधीच माहिती असतं. वर तांडव करत, चेहऱ्यावर एवढे भाव आणून तो काय बोलला ते पुराना लोकांना झेपलेलंही नसतं! पण तरीही सगळे दया येऊन टाळ्या वाजवतात! हुशारला शिकार का जमत नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत असतो. हुशारला आपण एवढं कसं बोललो याचं त्याला आश्चर्य वाटलेलं असतं. शाहरुख खानला 'वो सत्तर मिनिट ...' म्हणाल्यावर कसं वाटलं असेल, हे हुशारला कळलेलं असतं. आपल्याला शिकार येत नाही, हे लपवण्यासाठी आपण केवढा मोठा तमाशा केला, आणि त्यातलं काहीच या लोकांना कसं कळलं नाही, याचा हुशारला आनंदही होतो आणि दुःखही!


... थोड्या वेळा पूर्वी, 


हुशारला शिकार येत नाही हे बघून समस्त पुराना लोक चकित होतात. शिकार करत नाही आणि तरीही जिवंत आहे. हट्टा कट्टा आहे. त्यामुळे हा देव वगैरे आहे की काय असंही काही पुराना लोकांना वाटलेलं असतं. पण एकूणच हुशारची हुशारी आणि बोलणं ऐकून, तसं नसेल हेही त्यांना लगेच कळलेलं असतं.

हुशारच्या मित्रवर्गामध्ये “शिकार” या शब्दाचे विशेष अर्थ असतात. हुशार ला अजून कोणी शिकार सापडलेली नसते. पण इथं आपल्या अमुक अमुक मित्राची शिकार कशी आहे आणि त्याने काय काय केलेलं वगैरे सांगून हुशार फुशारकी मारणार असतो पण त्याला वेळीच पुराना लोकांना अभिप्रेत शिकार म्हणजे काय आहे हे कळून तो आपला उत्साहाची शिकार करतो! आणि फक्त मान हलवतो. सकाळी चुकून लवकर उठल्यावर हुशारला बाल्कनीमध्ये कबुतरं आणि क्वचित चिमणी दिसत असते. मग तो विस्कटलेले केस, टी शर्ट आणि चड्डीमध्ये, हातवारे करत त्यांच्या मागे पळत असतो. अशानं त्या पक्ष्यांची पण करमणूक होत असते. तेही म्हणून परत परत हुशारच्याच बाल्कनीमध्ये येऊन दररोज नित्य नियमाने मुक्तपणे घाण करत असतात. तेव्हा इथे पुराना लोकांकडून चुकून शिकार शिकलोच तर काय करायचं हे हुशारनं मनात पक्कं केलेलं असतं. आपल्याला शिकार अजून नाही मिळाली याचा राग खरी शिकार करून काढता येईल, असेही त्याला वाटून जाते. PS3 सोडला तर हुशार कुठेच शिकार सदृश काही करत नसतो.

थोड्या वेळाने हुशारला अभिप्रेत “शिकार” चा अर्थ पुराना लोकाना कळतो. आणि तीही शिकार हुशार कडे नाही हे कळून त्यांना खूप हसू येते. या सगळ्या आदिवासी लोकांवर आपल्याला आधीच इम्प्रेशन मारता येत नाही आणि आता तर यांनी जखमेवर बोट ठेवलं म्हणून हुशार पेटून उठतो. त्याच्यामधला activist जागा होतो!

“स्त्री आणि पुरुष. आणि मग एवढंच प्रेम? त्याच्या छटा असतात की! तुम्हाला काय कळणार म्हणा! तुम्हाला कुठं काय फरक पडतो!..." थोडा वेळ हुशारला काळातच नाही की पुढे काय बोलायचं. "पण खरं सांगू? तुमच्याहून आम्ही जास्ती काही वेगळे नाही या बाबतीत. म्हणजे तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे मान्य आहात. माहिती आहात. फरक एवढंच आहे की आम्हाला आम्ही अजून तुमच्यासारखेच आहोत हे मान्य नाहीये. माहिती नाहीये, असं म्हणणार नाही. इथं प्रेमाचं पिक येतं. एक गेला की दुसरा भेटतो. दुसरी गेली की तिसरी सापडते. हे सगळं ज्याला जमतो तो भाव खाऊन जातो. आम्हीही अशांनाच भाव देतो. कारण आम्हाला spicy आवडतं! वर आमच्यावर भडीमार होतो. एक ठराविक प्रकारे विचार करण्याचा. ठराविक गोष्टी आवडून घ्यायचा. ठराविक प्रकारे आयुष्य जगण्याचा!

मुळात मला love stories आवडत नाहीत! ...


थोडासा संदर्भ लागलाच तर ... प्रगतीच्या मार्गावर

Tuesday, September 10, 2013

Too busy to do good!

सकाळी सकाळी "पिंकी है पैसेवालोकी", "ताकी हो ताकी, हो ताकी ताकी ताकी रे" अशी आचरट गाणी कानावर पडली आणि दिवस सुरु झाला. मागच्या वर्षी "चिकनी चमेली", "पल्लू के पीछे छुपा के रख्खा है" या गाण्यांनी दिवस सुरु झाला होता. लोकांच्यातला सळसळता उत्साह तर काय सांगावा? त्यावर कलेची ही अशी आराधना. आणि आपली आराधना आजूबाजूच्या प्रत्येकाच्या कानापर्यंत पोचलीच पाहिजे, म्हणून प्रामाणिक धडपड. खूपच पवित्र वातावरण. सकाळी उठल्यापासून, ते आता पुढचे दाही दिवस अशाच भक्तीभावामध्ये न्हाऊन निघणार, या कल्पनेने मी तोंडावर पांघरूण घेऊन आणि आणखी एक तासभर झोपून घेतलो!

आपली सगळी तयारी चोख असल्याने, सकाळी सकाळी दुर्वा आणायला बाहेर जावे लागले. तिथे २ लहान मुलांची बडबड ऐकली. नुकतीच गोकुळाष्टमी झालेली. सोसायटीमध्ये लहान मुलानीपण काही बाही केलेलं. तर या दोघांची स्पर्धा सुरु होती. गोकुळाष्टमी vs गणेश चतुर्थी! त्यातल्या एकाचे स्पष्ट म्हणणे होतं की गणेश चतुर्थी म्हणजे सगळं वरवरचं असतं! गोकुळाष्टमीच जास्ती मजेशीर. असले सडेतोड मतं होऊ घातलेल्या भावी पिढी कडून ऐकून, मी उगाच आजू बाजूला घोटाळलो. "गोकुळाष्टमीला आपल्याकडे कोण आलेलं माहितीये न? आशिकी-२ मधली आरोही आलेली! माझ्या एका फ्रेंड कडे तर बिपाशा बसू आलेली! त्याच्या फ्रेंड कडे आलिया भट आलेली! मागच्या वर्षी तर सनी लिओन आलेली!" च्यायला यांना सनी लिओन कशी काय माहिती? असे विचार करून उगाच आश्चर्य वाटून घ्यायचा प्रयत्न केला. पण नाहीच झालं बुआ आश्चर्य! त्यांचे पुढे सुरूच होते, "गणेश चतुर्थीला काय? फक्त गाणीच असतात. येत कोणीच नाही! कसलं bore!" आता ही असली genuine चर्चा ऐकून मी उगाच मध्ये बोललो. "अरे, गोकुळाष्टमीला कृष्ण येतो आणि गणेश चतुर्थीला गणपती येतो! हे नाही का माहिती तुम्हाला?"

"वेडेच आहात काका. आई म्हणते. देव कायम आपल्या बरोबरच असतो!"

आधुनिकता आणि निरागसता याचा हा अनोखा मिलाप बघून मला पुढचं सुचेना. मी आपल्या दुर्वा घ्यायला निघून गेलो. नेहमीच आपल्या बरोबर असलेल्या देवाला वाहायला की खास आजच्या मुहूर्तावर भेटायला आलेल्या पिंकी किंवा चमेलीला वाहायला हे मात्र मला माहिती नव्हते.

पुढचे दहा दिवस आता गणपतीच्या मूर्तीसमोर चित्र विचित्र नाच बघायला मिळतील. जेवढी म्हणून अश्लील गाणी असतील, ती सगळी वाजतील. रस्त्यावर वाहतूक अडकून बसेल कारण गणपतीला बसायला जागा करून दिलेली असेल. ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस जाताना, हे सगळं सहन करत जावे लागेल. आणि असल्या कशाहीमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत. कारण धार्मिक भावना दुखवायचे मुद्दे वेगळेच असतात. किंबहुना, यापैकी कशाच्याही विरुद्ध बोलला, तर मात्र खूप लीकांच्या खूप काही भावना दुखावतील!

मला तर खात्री आहे गणपती दर वर्षी परत गेला की जाऊन, टिळकांना १० चाबूक मारत असेल. "ये तुने क्या कर दिया यार!" असे म्हणून!

पण हे सगळे आपलेच दात. आपलेच ओठ. आपणच वाढवलेल्या गोष्टी. आपणच दुर्लक्ष केलेल्या घटना. मग त्या आपणच सुधारावल्या पाहिजेत की.

माझ्या ओळखीचे एक आजोबा म्हणतात, "तुम्हा आजच्या पिढीला सगळ्यात काही न काही खुपत असतं! आणि मग आता तुम्ही याचा कीस पाडत बसणार. शेवटी फार फार तर मेणबत्त्या पेटवाल. त्या उपर काय कराल? एखादी गोष्टी चूक आहे म्हणून ओरडत फिरू नये. एखादी गोष्टी चूक आहे, तर बरोबर काय? ते शोधून काढावे. आणि त्याचा प्रचार करावा! हे थोडीच माहितीये तुम्हाला? चुका हुडकायच्या आणि फेसबुकवर टाकायच्या. या पलीकडे कुठे काय करता तुम्ही?"

थोडासा बदल आपणही करावाच की! जर काहीच बदल करणार नसू आपण, तर मग उगाच पुढच्या वर्षी लवकर या, असं कशाला म्हणायचं गणपतीला?

पण तो ही बिचारा येतो बापडा! पण कदाचित असं नसेल कशावरून की, गणपतीला अजून आशा असेल, काहीतरी बदल बघण्याची?

आता आपण त्याला किती काळ ताटकळवत ठेवायचं हे आपल्यावर अवलंबून. Perhaps, we all are too busy to do good things!

गणपती बाप्पा मोरया!

Sunday, July 28, 2013

प्रगतीच्या मार्गावर

एकदा काय होतं, आपल्या मधला एक हुशार गरजू होतकरू तरुण रस्ता चुकतो. आणि तो जाऊन पोचतो अशा ठिकाणी जिथे मनुष्य गुहेमध्ये राहत असतो. हुशार तरुणाचे नाव असतं हुसेन शामराव रहेजा. हुशार खूप हुशार असल्यामुळे तो नोकरी करत असतो. विरंगुळ्यासाठी तो सांस बहू वाल्या मालिकांना addict झालेल्यांना नावे ठेवत असतो. घरी येऊन मग तो आपलं वेगळेपण जपण्यासाठी, आपल्या खोलीत जाऊन Big Bang Theory, Mad Men, आणि Gray's Anatomy सारख्या मालिका नियमित बघत असतो. Computer समोर बसला म्हणजे काहीतरी कामच करत असेल असे मानून घरचेपण त्याला हुशार हुशार म्हणत असतात. एके दिवशी तो ऑफिसमध्ये खरेखुरे काम करतो आणि मग थकून जातो. बिचारा मग पडल्या पडल्या लगेचच झोपतो. हुशार सकाळी पक्ष्यांचा किलबिलाटाने दचकतो. पक्ष्यांचे आवाज हुशार ने फक्त Age of Empires आणि Dota मधेच ऐकलेले असतात. आपण या अशा ठिकाणी कसे काय आलो हे त्याला काळात नाही. अदल्या दिवशी office चा cab चा driver जरा पिलेला होता असा संशय आला होता. इतकंच त्याला आठवत असतं. सकाळी सकाळी या गुहेच्या दारात आपण कसे काय उठलो याचं कोडं काही त्याला उलगडत नाही! आता ऑफिसमध्ये जाऊन HR कडे तक्रार करायची आणि मगच त्या ड्रायवरला धडा मिळेल, असं ठरवतो आणि त्याला जरा बरं वाटतं. हुशार तसा लहानपणापासूनच समाज सुधारक वृत्तीचा असतो. लहानपणी तो शाळेतल्या शिपायाची तक्रार करत असतो.

थोडा वेळ इकडे तिकडे भटकल्यावर हुशारला आपण onsite आल्या सारखं वाटू लागतं. पडेल ते काम करायचं आणि adjust व्हायचं त्याला शाळा कॉलेजपासून ट्रेनिंग मिळालं असल्यानं त्याला आपण onsite जाण्याच्या अगदीच लायक आहोत असं खूप आधीपासूनच वाटत असतं. Onsite जाऊन camera विकत घेण्याचं त्याचं स्वप्न असतं. Long Term Onsite असणार असेल तर Macbook घ्यायचं पण स्वप्न असतं. हुशार लगेच उठतो. आणि आजूबाजूला भटकायला निघतो. गुहेमध्ये ४-५ लोक कमरेला झावळ्या नेसून न्याहारी करत असतात. पण हुशार शाकाहारी असल्याने तो त्यांच्याकडे जात नाही. स्वतःच्या बलबुत्यावर गोष्टी शोधून काढाव्यात असं ठरवून हुशार चालायला लागतो. एवढी सगळी झाडं एकाच ठिकाणी बघून सुरुवातीला हुशार जरा बावचळून जातो. मधेच झाडावरून काहीतरी डोक्यावर पडल्यानं तो वैतागतो. "कुंड्यांमधलीच झाडं rocks" असं फेसबूकवर टाकायची इच्छा होते. पण त्यानं रोमिंग सुरु केलं नसल्याने त्याला काहीच करता येत नाही. थोडं फार भटकल्यावर त्याला कळतं की आजूबाजूच्या लोकांना खूप मुलभूत गोष्टीच माहिती नसतात! तब्बल ५ मिनिटं चालतो नी थकतो. ऑफिसच्या एका फ्लोरच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे चालायला हुशारला ५ मिनिटं लागत असतात. त्यानंतर कॉफी घेतली नाही तर तो पुढचे चालू शकत नसतो. इथे कुठेच कॉफी मिळायची शक्यता नसते. त्याला आजूबाजूला गुहाच गुहा दिसत असतात. एकही थेटर, कॉफी शॉप, किवा काहीच लागत नाही. हुशार परत मुळच्या गुहेपाशी येतो. आतमधल्या लोकांची न्याहारी झालेली असते. त्यातला एक तरुण बाहेर येतो. आणि हुशारला बघून विचारतो. "काही शोधताय का?"

Onsite असल्यानं हुशार त्याला इंग्रजीमध्ये विचारतो. "Who are you?"
तो म्हणतो, "मी पुराना"
"पुराना मतलब क्या?" Onsite असल्यानं हुशार आता आपल्या मराठी विचारांचं हिंदीमध्ये भाषांतर करून विचारतो.
"पुराना म्हणजे पुरुषोत्तम रामदेव नामधारी."
"तुझ्या कंपनीचं नाव काय?" हुशार शेवटी नाईलाजाने मराठीवर येतोच. जगातला प्रत्येक माणूस कुठल्याना कुठल्या तरी कंपनी मध्ये काम करतच असतो अशी हुशारची खूप गाढ समजूत असते. पुराना कुठल्याच कंपनीमध्ये काम करत नसतो. तो सकाळी उठून शिकारीसाठी बाहेर पडत असतो. त्याच्या कळपातल्या सगळ्यांबरोबर तो भटकत असतो. कळपातल्या सगळ्यांचेच नाव पुराना असतं. यांना काहीतरी वेगवेगळी usernames द्यावी लागतील हे हुशार मनाशीच लिहून ठेवतो. हे सगळे पुराने जे काही मिळेल ते सगळे एकत्र बसून खात असतात. उन पाउस वारा यापासून बचावासाठी निरनिराळी निवाऱ्याची साधनं बांधत असतात. कायम एकत्र राहत असतात. हे सगळं बघून हुशार मधला Entrepreneur जागा होतो. (Entrepreneur म्हणजे काय हे माहिती नसेल तर तुम्ही English Vinglish पहिलाच नाही राव!). तसा हुशार नोकरदार माणूस. त्याला हे असलं शोभत नाही हे हुशार ला माहिती असतं. पण आपल्याला आयुष्यात मोठं व्हायची हीच संधी आहे असे मानून तो विचार करायला लागतो.

आपण खूपच आदिमानवाच्या वस्तीमध्ये आलो आहोत हे त्याला कळलेले असतं. त्यांच्यामानानं आपण खूपच प्रगत. म्हणजे या सगळ्या पुरान्यानी न ऐकलेल्या किंवा न बघितलेल्या गोष्टी आपण यांना सांगू शकतो. आणि म्हणजे आपण देव बनून जाऊ यांच्यासाठी! देव नाही तरी कमीत कमी टाटा, बिर्ला किवा अंबानी यांच्या लेवलचे होऊच की, या विचारानं हुशार खूप खुश होतो. हुशारच बॉस त्याला कायम म्हणत असतो, You got to be at the right place at the right time, हुशारला त्याचा अर्थ आत्ता प्रथम कळालेला असतो. हुशारच्या मनामध्ये त्याने एक मोठं बिझनेस साम्राज्य उभं केलेलं असतं. त्याला "हुशार and sons" असं नाव पण लागलेलं असतं. आता परत जाऊन HR कडे resignation द्यायचं नी मग farewell ला काय स्पीच द्यायचं याच्या विचारामध्ये मग्न असतानाच पुराना त्याला विचारतो.

इतक्यात पुराना विचारतो, "तू काही खात नाहीस?"
"इथं सबवे नाहीये न. म्हणून नाही खाल्लं. onsite गेलोकी सुरुवातीच्या दिवसात फक्त सबवे मधेच खावं असं मला एकानं सांगितलेलं."
"तुला फळं, भाज्या, खायच्या असतील तर आपल्याकडे खूप आहेत. मगाशी एक ससा पण मारून आणलाय मी."
"नाही नाही! आमच्याकडे non-veg वगैरे खायचं असेल तर आम्ही फक्त अशाच ठिकाणी जातो जिथे ज्या प्राण्याला खायचं त्या प्राण्याचे खूप आनंदित वालं चित्र बाहेर लावलेलं असतं. जरा कमी गिल्ट येते त्यामुळं. पण तसंही मी आता शाकाहारी आहे. म्हणून सब वे."
"सब वे मध्ये काय असतं?"
"सांगेन. लवकरच सांगेन. पण सध्या माझा विचार वेगळाच आहे. तुम्हाला सगळ्यांना मी आता एकदम खूप सुधारावणार आहे. You are lucky to have me here! मी खुप प्रगत समाजातून आलोय. आता मी तुमचा समाजसुधारक होणार."
"आम्ही शिकार करू शकतो. हत्यार बनवू शकतो. स्वतःचे रक्षण करू शकतो. आम्ही खूप प्रगत जमात आहोत. आम्हाला आणखी काही सुधारावण्याची गरज नाही."
"अरे येड्या, आम्ही पण असेच म्हणतो आमच्याकडे. पण तुम्ही आमच्या लेवलला नाही आलेला अजून. आणि मी तुम्हाला मदत करेन." कस्टमरला मापात काढायचं ज्ञान हुशारला त्याच्या बॉस ने दिलेलं असतं. हुशार Dilbert वाचून त्यातूनही बोध घेत असतो. त्यामुळं पुरणाला मापात काढण्यात हुशारला काहीच गैर वाटत नाही.

"तुम्हाला मी प्रगत जमातीमध्ये गोष्टी कशा होतात ते सांगेन. मग तुमची पण प्रगती होईल."
"पण मला नकोये प्रगती. मी प्रगतच आहे."
 "पहिला धडा. आपल्याला नको असं काही नसतं. खास करून जर फुकट मिळत असलं तर नक्कीच ते आपल्याला हवं असतं. प्रगत समाजात असाच होतं. आधी आनंदी लोक शोधायचे. त्यांना सांगायचं की ते आनंदी नाहीयेत. कारण काहीही द्यायचं तुमच्याकडे हातरुमाल नाहीये किवा तुमच्या भिंतीचा रंग नीला नाहीये किवा तुम्ही सिनेमा वाल्या नायिका वापरते तो साबण वापरत नाहीये. असले काहीही कारण देऊन त्यांना सांगायचे की ते आनंदी नाहीयेत. मग त्यांना त्या त्या गोष्टी द्यायच्या. मग ते सगळे आनंदी होतात. हीच प्रगती. प्रगत झालास तर सही आयुष्य जगशील."
"मी आत्तापण सही आयुष्य जगतोय." पुराना आपला मुद्दा सोडताच नसतो.
"हे बघ. एक काम कर. प्रोजेक्ट प्लान बनवून आण आधी. मग बोलू आपण." हुशार ला आपल्या बॉसची खूप आठवण होत असते म्हणून तो नकळत तो बॉस सारखं असंबद्ध बोलायला लागलेला असतो.

पुरानाला कशाचा प्रोजेक्ट प्लान आणि काय याचा काहीही थांग पत्ता लागत नाही. तो तसाच त्याच्या गुहेमध्ये जातो. थोड्या वेळाने आणखी काही लोकांना घेऊन येतो. त्यांना सांगतो, "तुम्हाला म्हणालेलो न, भूतदया करावी. आता इकडे या. याच्याकडे बघा. नाही का तुम्हाला दया येत? मुके प्राणी पण असेच निरागस असतात. त्यांना सगळ्यांनाच लगेच मारायचे नसते. या इकडे. बसा याच्या समोर. तुम्हाला पण दया येईल. भूतदया शिकाल तुम्ही." पुरानाच्या असल्या पुरोगामी विचारामुळे लोक त्याचे विशेष ऐकत नसत. पण दुपारच्या जेवणानंतर करमणूक म्हणून ते बाहेर येऊन हुशारच्या समोर बसतात.

"अरे तुला प्रोजेक्ट प्लान आणायला सांगितलेला. तू प्रोजेक्ट टीम आणलास? Requirement च्या आधी recruitment? हे कसं कळलं तुला? तुला आणखी पण कोणी शिकवताय का?" आपण बिझनेस सुरु करण्याच्या आधीच आपल्याला competition आली की काय, या विचारानं हुशार थोडा वेळ घाबरतो. पण मग समोरचे कुतुहूल पूर्ण चेहरे बघून आपणच इथे शहाणे असे वाटून त्याला स्फुरण चढते. त्याच्या चेहऱ्यावरचे हे सगळे बदल बघून पुरानाच्या लोकांना हा माणूस खरच आता करमणूक करणार यावर विश्वास बसतो.

"हे बघा, तुम्हाला मी आता जे सांगणारे ते लक्ष देऊन ऐका."
लोक टाळ्या वाजवतात. पानात, झाडत सळसळ होते. पण हुशार ला एव्हाना असल्याची सवय झाली असल्याने, तो घाबरत नाही. पुढे सांगतो.
"आपण पैसा नावाचा प्रकार शोधून काढायचा. प्रगतीला गती मिळवण्यासाठी पैसा हवाच. मी बघतोय कधीपासून तुमच्याकडे पैसा वगैरे प्रकार नाहीचे. आपण तिथून सुरुवात करू. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याला काहीतरी ध्येय प्राप्त होईल."
"कसलं ध्येय?"
"Good Question!" हुशारला परत आपल्या बॉस ची आठवण येते. तोही हुशार ला असच म्हणून एक बिस्कीट देत असतो. हुशारने आपल्या ड्रोवर मध्ये ती सगळी बिस्कीट मांडून ठेवलेली असतात. हुशार आत्तापण हात आजूबाजूला करतो बिस्कीट शोधण्यासाठी, पण हातात माती येते. हुशारला मातीची सवय नसल्याने तो हात झटकतो नी पुढे बोलू लागतो. "ध्येय कसले? हा आमच्या प्रगत जमान्यात पण प्रश्न पडतो लोकांना" हुशार ला थोडा वेळ आपले annual appraisal आठवते. पण तो तसाच पुढे बोलतो "ध्येय पैशाचे. आपण पैसा नावाचा प्रकार बनवायचा. आणि मग तो पैसा कमवायचे ध्येय ठेवायचे. म्हणजे तुम्ही सगळे सुखी होणार. तुमची प्रगती होणार."
समोरच्या लोकांना हे खूपच गमतीशीर वाटते. तरीही न राहवून त्यातला एक विचारतो.
"पैसा आपण बनवायचा. मग परत कमवायचा कशाला?"
"Again good question. आता हे शिकवणारे मी तुम्हाला. पण हळू हळू. तुम्ही खरच लकी आहात. की तुम्हाला मी मिळालोय.!"
गर्दीमधला एक जण पुरानाकडे खुण करून सांगतो की त्याला आत्ताच दया आलीये. बाकीचे लोक आता परत करमणूक होणार म्हणून उत्साहित होतात.
"आपण न मुठभर पैसे कमवायचे. आणि मग आपल्या गरजेच्या सगळ्या गोष्टीला पैसे देत बसायचे. म्हणजे खायचे पैसे. प्यायचे पैसे. हसायचे पैसे. रडायचे पैसे. लिहायचे पैसे. वाचायचे पैसे. राहायचे पैसे. शिकायचे पैसे. शिकवायचे पैसे. काही हवे असेल तर त्याचे पैसे. काही नको असेल तर त्याचे पैसे. असे अखंड पैसे देत घेत बसायचे."
गर्दीमधून पुरानाने एक शंका विचारली. "म्हणजे पैसे तयार करायचे नी वाटत बसायचे. मग शिकार कधी करायची?"
"बरोबर. तुमच्याकडे काही सध्या organized नाहीये. सगळ्यांना सगळे मिळते. ते बरोबर नाही. पैसे आले की मग प्रत्येकाची ऐपत ठरवायची. मग ज्याच्याकडे जास्ती पैसे त्याला जास्ती गोष्टी. ज्याच्याकडे कमी पैसे त्याला कमी गोष्टी. पण सगळ्यांनी अखंड पैसेच मिळवायचे. आणि मग ऐपत वाढवायची."
"अरे हुशार, मग हे सोपे नाही का? आपण सगळे जायचे. शिकार करायची. नी गुहेत येऊन खायचे?" 
हुशारला जरा प्रश्न समजायला वेळ लागतो. त्याला "हुशार and sons" च भवितव्य धोक्यात दिसायला लागतो.
"पैसा बनवायचा. मग कमवायचा. मग तुम्हाला हसत खेळत राहता येईल. हे असच असतं आमच्याकडे"

हुशारचे विचार पुराना लोकांसाठी खूपच करमणुकीचा विषय बनतात. त्यांच्या दररोज दुपारी गप्पा रंगू लागतात. झाडाखाली बसून हुशार त्यांना वेगवेगळ्या "प्रगत" गोष्टी सांगत असतो आणि झाडावर बसून बाकी सगळे त्याच्या गोष्टी ऐकत असतात. 

(क्रमशः)

Tuesday, July 16, 2013

मिल्खा मिल्खा भागलास का?

काहीही दाखवतात आज काल सिनेमा मध्ये. भाग मिल्खा भाग बनवण्याच्या आधी राकेश मेहरा स्वतः खूप भागला असावा! नाहीतर काही pointच नाहीये असलं काहीतरी बनवण्यात. आपल्याला सिनेमाचं वेगळं लॉजिक माहितीये. जे काही आपण नेहमी जगतोच तेच परत सिनेमामध्ये काय दाखवायचं म्हणून तिथे fiction बनवायचं. आणि आपल्यालाही आवडतच की ते! आणि मग ते आवडतं म्हणून आपण त्याच्यासारखं करायचा अखंड प्रयत्न करायचा. मी तर दबंग सारखे पाठीला चष्मे लावून फिरण्याचे प्रकार पण पाहिलेत. गाण्यात कोणी ओरडला की "जो भी मै केहना चाहु, बरबाद करे अल्फाज मेरे" की इकडे तमाम जनतेचे पण अल्फाज लगेच त्यांना बरबाद करायला लागतात! खोटं का सांगू? मी पाहिलंय हे माझ्या डोळ्यानं. या इथंच की. फेसबुकवर! म्हणजे आजू बाजूला जे नाही ते सिनेमामध्ये दाखवायचं आणि मग जे सिनेमामध्ये आहे ते आजू बाजूला उभं करायचं! अशी काहीशी आपली मजा सुरु असते!

या सगळ्यात भाग मिल्खा पहिला आणि एकदम धक्काच बसला! तसे पुर्वीपण धक्के बसलेले असे. एकदाची भडास काढतोच म्हणून आज लिहितोच!

१. नायक चक्क मेहनत घेताना दाखवलाय! असं कोणी करतं का? म्हणे मेहनत करायची. काबाड कष्ट करायचे. मग यश मिळणार! आपला आकाश कसा होता? टपोरीगीरी करायचा. मग शेवटी त्यालाच मिळते की नाही प्रीती झिंटा? उगाच कबिल बीबील काय व्हायचं? नायक म्हणाला कि कबिल झालाच की! नायिका पळवणे हे एकमेव गोल. प्यार प्यार करून थेऱ्या झाडायच्या. उसके लिये जगायचं असतं उसके लिये मरायचं असत! कष्ट बिष्ट काय! तेही नायिकेसाठी नाहीच म्हणे!!

२. नायिका म्हणते कुछ करके दिखाव. मग ये. आणि नायक मान्य करतो नि जातो कि खरच कूछ करायला! मला वाटलेलं एक गाणं म्हणेल नी मग सगळं sorted! अशीच असते कि पद्धत आपल्याकडे! नाही काय?

३. नायिका आता गेली. लग्न बिग्न केलं तिने हे कळल्यावर तर आपण लगेच तडक तिच्या घरी बिरी पोचतो. तिच्या नवऱ्याला धाब्यावर बसवून दुल्हनिया पळवून आणतो. हय गय नाय! कारण आपणच हिरो असतो न! पण इथे हा नायक बिचारा बर म्हणून आपल्या मूळ कामाला लागतो!!! कमीत कमी bomb defuse करणारा तरी व्हायचा न मग? तेही नाही. म्हणजे इतिहासावरून काही बोध घ्यायचाच नाही असं ठरवलं तर मग कोण काय करणार!

४. एकदा तर चिकणी पोरगी येते जवळ. तेही स्विमिंग पूल मध्ये. आणि हा म्हणतो "बाई, नंतर या!" ये लो करलो बात!! ऐसा भी कभी होता है?

५. सिनेमाभर नायक बिचारा इकडे तिकडे पळत असतो. आता नावात "भाग" आहे मान्य आहे! पण इतके कधी ते मनावर घेत का कोणी ते? हा चक्क athelete असतो. आणि सिनेमाभर athelete गिरी करत राहतो!! व्यायाम करतो. सराव करतो. काहीच्या काही! आपल्याला कुठे सवय असली? आम्ही शाळा college वरचे सिनेमे बघतो की ज्यात शाळा college केवळ २-४ मिनिट असतात! हे म्हणजे भलतच होतं!

६. आत्ता हे सगळं बघून काहीही परिणाम झालेत मनावर! कष्टेवीण फळ नाही असलं मनावर बिंबवल यांनी! मला वाटायचं exotic ठिकाणी ट्रीप केल्या. गाणी ऐकली म्हणाली आणि परत कामावर आलं की आपण एकदम स्टार होणार. म्हणजे गेले १०-१२ वर्षं तर मला असाच वाटतंय. आणि प्रयत्नही सुरु आहे. पण यांनी तर भलतच सांगितलंय. आता चक्क सकाळी सकाळी उठून मी कामावर येतो! या सिनेमाला कमीत कमी पेरेंटल गायडन्स तरी लेबल लावायचं न आधी! म्हणजे मनाची तयारी करून गेलो असतो!

७. हा माणूस चक्क एक गोल सेट करतो. आणि ते मिळवतो! हा म्हणजे अतिरेक होता! ते गोल कायम डोळ्यासमोर ठेवतो! असं नसतं यार करायचं. आम्ही तर अप्रेजल मध्ये गोल सेटिंग पण करायला कंटाळतो. मारत मरत करतो. आणि मग डायरेक्ट वर्षाअखेरीस त्याच्याकडे बघतो. असच तर करायचं असतं! असं दररोज दररोज कोण बघत बसेल त्याच्याकडे? लोक काय म्हणतील? तसंही अशा गोष्टी समोर ठळकपणे दाखवायच्या थोडीच असतात? म्हणजे तमाम जनतेला जाहीरपणे वेडावून दाखवण्यासारखे आहे हे! सेन्सर बोर्ड झोपलाय हेच खरंय.

८. मागे रांझाणा पाहिला नी कलेजेमे ठंडक पोचली. तडक जिममध्ये जावून सांगणार होतो. Body shody वगैरे काय बनवायची? धनुषकडे बघा! लवकरच सांगायचा प्लान होता. आणि आता मिल्खा बघितला! जरा टायमिंग चुकलच! आता सिनेमा आहे. आम्हाला कल्पना आहे की समोरचा जो आहे तो खरोखर मिल्खा नाहीये! तुम्ही अगदीच धनुषला वगैरे नाही आणणार काम करायला इतके माहिती आहे. पण इथे या माणसाने स्वतः कशाला मेहनत घेऊन मिल्खा व्हायचं? म्हणजे बघणाऱ्यांची पर्वाच नाही! झक मारत आज परत जिमला जावे लागणार!

आता काय. धावतो आहे. मिलाखा ने सांगितलंय. जरा दम लागला म्हणून म्हणून थांबायची पण सोय नाही! त्यांनी ते पण कवर केलय! बस भाग! एक गोल ठरव. आणि मग त्याकडं भाग! उगाच नाही ते लाड नाही करायचे! सिनेमांनी inspire करायचं थांबवलं पाहिजे यार! ये सब गया तेल लेने. आपण सिनेमा मोठा आहे म्हणून निषेध करू. असले आणि चार पाच सिनेमे आले तर हाहाकारच व्हायचा!


ता.क. पडद्यावर साक्षात नेहरू आले. नी त्यांची कोणी चेष्टा केली नाही! कमीत कमी government हा तरी आपल्या जिव्हाळ्याचा विषय! कोणावरही काहीही सबंध नसताना चेष्टा करायचं लायसन्स असतं की आपल्याकडं! नेहरूंच्या बद्दल आपला काही आक्षेप नाही. पण दिसला politics की घाल शिव्या अशीच की आपली पद्धत! कर चेष्टा! ते पण नाही यार या सिनेमामध्ये!

Thursday, June 20, 2013

The other side of an Umbrella

च्यायला भर पावसाळ्यात मुंबईला फेऱ्या मारायला लागणं या सारखी शिक्षा दुसरी नाही. सलग ३ आठवडे तिथे राहायचे. दिवसभर मिटिंग करायच्या. रात्री खोलीवर येऊन ऑफिस मध्ये फोन लाऊन बसायचे. सगळं झालं की बाहेर फिरून येऊ वाटलं की पाऊस दत्त म्हणून उभा. एक नाही ... दोन नाही ... आठवडाभर असच व्हावं? पाऊस वगैरे गोष्टी आवडतात मला पण त्याने अशा टाईट शेड्यूल मध्ये येऊ नये. म्हणजे रात्री विचार केला की चला घाला कशी, जाऊन भिजून येऊ आता तर तेही वांदे! कपडे थोडीच आणले होते इतके सारे! वर पुरवून वापर सुरु होता. हॉटेलमध्ये इस्त्री बिस्त्रीला थोडीच टाकतो आपण काही! सगळा गठ्ठा घरी आणून धुवायचा असतो! गप्प खिडकीतून पाऊस बघत आपण काय पाप केलं असावं याचा हिशोब लावत डोळे मिटायचे!

पहिला आठवडा असच गेला. विकेंडला फुकट फिरणे झाले. दुसरा आठवडा गेला तेव्हा जाम बोर झाले. जेलमध्ये बंद केल्यासारख वाटत होतं. दररोज काय अरे रात्री पाऊस? नोकरदार माणसाने बाहेर तरी कधी पडायचं? सोमवारी असच परत येताना चक्क खोलीवर पोहोचायच्या आधीच पाऊस आला!! अभी ये तो सोचाही नाही था! पाऊस काय रात्रीच येणार हेच नेहमीचे गृहीतक होते. पाऊस तर सुटला होता बेभान. मंगळवारी सकाळी पण आला. होटेलवाल्याचे छत्री उसनी घेतली. रिसेप्शनच्या काचेच्या दरवाज्यापासून ते गेटपर्यंत जाण्यासाठी जी मोठी छत्री असते. तीच छत्री घेऊन मी डायरेक्ट बाहेरच पडलो. आता हीच श्रींची इच्छा होती हेही मी सिद्ध करू शकतो. अगदीच. नेमक्या त्याच छत्रीवर हॉटेलचे नाव छापलेले निघून गेलेले का असावे? हे दैवी संकेत मी लहानपणापासूनच लगेच ओळखतो. स्वतःच्या या सगळ्या कौतुकामध्ये असताना एक मुलगी दिसली. चक्क तिला छत्रीची फिकीर नव्हती. भिजत चालली होती. एकदा वाटले की भिजू की नको, भिजू की नको असा प्रकार सुरुये तिचा. पण जे काही सुरु होतं ते entertaining सुरु होतं. पावसाने पांचट केलेल्या त्या ट्रीपमध्ये अचानक पाणी दा रंग देख के गाणं वाजल्यासाराख झालं.

इतके दिवस कशी काय दिसली नाही ही पोरगी? की तीही आपल्यासारखीच आली असेल २-३ आठवड्यासाठी? आई शप्पथ! ही जर आपल्याच होटेलमध्ये राहत असेल तर? मग आणखी ३ आठवडे ट्रीप लांबली तरी चालेल! पण ती माझ्या होटेल मधली नव्हती. इतक नशीब चांगलं असतं तर मुळात पावसाने इतका त्रास दिलाच नसता. पण डेप्युटेशन वरच आली असणार. नाहीतर आजवर दिसली असतीच की. आई शप्पथ! म्हणजे आज मीटिंगमध्ये पोचलो की समोर हीच दिसायची. मग दररोज आपण धाप्लेल्या छात्रीमधून एकत्र यायचे! ऑफिस आलं. ती काही नाही आली. परत जाताना पाऊस आला. हॉटेलमध्ये पोचल्यावर गार्डपण आला. म्हणजे गार्ड छत्री बघायला आला. पण हॉटेलचं नाव नाहीये बघून ओशाळला. Sorry sir म्हणून निघून गेला. पण च्यायला ती काही आली नाही. फोन आवरले. बाहेर पडायचा स्कोप नव्हताच. कारण दत्त दारात उभा होता. उभा काय कोसळत होता. काय नशीब आहे यार आपल? हे असलंच आयुष्य काढायचंय. सिनेमामध्ये काहीही दाखवतात यार. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही स्वित्झर्लंड मध्ये गाणे गायला हवे होतो! तर इथे तर ही मुलगी न माझ्या होटेलची. न कुठली! गाणं तर सोडूनच देऊ! सिनेमे सगळे बंद केले पाहिजेत यावर कधीतरी काहीतरी रोख ठोक लिहून आपण क्रांती करू अशा विचारात डोळे मिटले.

पुढच्या दिवशी ती परत दिसली. परत एकदा आईची शप्पथ घेऊन झाली. ही पोरगी इथल्याच कुठल्यातरी हॉटेलमध्ये असावी याचीही खात्री झाली! म्हणजे कालच्या दिवशी पण खूप साऱ्या खात्र्या झालेल्या. पण आजची जास्ती फ्रेश खात्री होती. तिच्या मागे मागे गेलो. छत्री हवी का असे विचारणार तोवर ती आणि एका बाईच्या छात्रीमध्ये घुसली. रंगीलाच्या आमिर खान सारखी पिवळी साडी नेसलेली तिनं. साला लंगुर के मुह मे अंगूर! मैत्रीणीच असतील. गप्पा मारत मारत निवांत चालत होत्या दोघी. नी मागून मी. शेवटी bus stop आला. पिवळा आमीर खान निघून गेला. आणि ही मुलगी बस मध्ये शिरली. माझा डीटूर झाला होता. मुलीच्या नादात मिटींगची पहिली २० मिनिटे चुकणार होती. पण पावसावर ढकलून मी माझी सही सलामत सुटका करून घेतली.

आता ही मुलगी मला दररोज दिसायला लागली. काह्तीअरी गडबड होती. ही आधी का दिसली नाही देव जाणे. पण ही हॉटेलमध्ये राहत नाही याची खात्री झालेली. ही एकदम पक्की खात्री होती. तिथेच आसपास राहणारी असावी ही. दररोज कोणीतरी विचित्र बाई हुदाकायची नी तिच्या छात्रीमध्ये शिरायची! सायको वगैरे असावी असंही वाटलं एकदा. पण सुंदर मुली सायको नसतात. त्यामुळे ती शक्यता लगेच cancel करून टाकली. एकदा संध्याकाळी घरी येताना भेटवी अशी खूप इच्छा होती. म्हणजे कुठे राहते वगैरे सगळाच ट्रेस लागला असता. पण सगळं असं मनासारखं झालं असतं तर मग कशाला? आपल्यालाला काहीही हवं असलं उत्कट की फक्त एकाच गोष्ट मिळत होती. ती म्हणजे धो धो पाऊस. पूर्वी असेच थकून भागून सगळे कवी लोक शेवटी पावसालाच सगळ्याची उपमा देत असावेत. पावसावरच्या सगळ्या romantic कवितांमध्ये मला अचानक मला हा समस्त कवींचा sadness दिसू लागला. कालिदास पण असच माझ्यासारखा ऑफिसला जाऊन जाऊन पाकला असावा. रात्री फिरायला मिळत नसेल पावसामुळे मग सगळे मनातले मांडे असावेत त्याचे. समोर पाऊस दिसतोय म्हणून पावसात सजवले असावेत मांडे! त्याला थोडीच साहित्य वगैरे माहिती असणारे. आपण काढली असणारेत साहित्यिक मूल्य त्यातून! त्या बिचाऱ्याला माझ्यासारखं sad डेप्युटेशन वर पाठवलं असणारे. आता कालिदासानं खरच पावसावर कविता केल्या होत्या की आपल्याला कवी म्हणाला की फक्त कालिदासच आठवतो? या सगळ्या गोंधळात ती चक्क परत दिसली. ही चर्चगेटवर काय करतेय? आई शप्पथ! ही पण याच इमारतीमध्ये येते की काय? काय हे दुर्दैव!! लगेच वीज कडाडली. हा हा हा हा करून गडगडत झाला. मला खात्री पटली की ही पोरगी याच इमारतीमध्ये येते. आणि मी मागचे इतके दिवस झाक मारत होतो. याला काहीच अर्थ नव्हता. आजही थोडावेळ बाहेर आलो नसतो तर हे ही कळले नसते!

पण ही पावसात बाहेर काय करतेय? कदाचित नसेल या इमारतीमाधली. नाहीतरी पावसात बाहेर काय करत असती? आता परत नवी खात्री झाली की या इमारतीमाधली नसावी. पण आपण इतके दिवस झाक मारत होतो हे नक्की होते. ही दररोज येत असावी इथे. आपण येड्यागत आत खुर्च्या गरम करत असायचो! आज भेटूच. तशी आठवडाभर ओळख आहेच की. लांबून का होईना. पण तिनेही कधीतरी बघितले असेलच की. आज एक चांगली गोष्ट अशी होती की आज पाठलाग करायचा नव्हता. ती साक्षात समोर होती. आणि आमच्या मध्ये कोणतीही आगाऊ बाई नव्हती की जिच्या छात्रीमध्ये शिरून ही अंतर्धान पावेल! आता मी हा असा समोर गेलो की ती हसेल माझ्याकडे बघून. मीही हसेन. नी मग छत्री मोठी आहेच आपली. तिला bus stop पर्यंत आपणही सोडूच की. मग परत ऑफिस आहेच की. नवे मित्र मैत्रिणी केलेच पाहिजेत. शाळा कॉलेज संपल्यावर कुठे काय नवे मित्र करतो आपण. आज ही संधी आलीये. दैवी संकेत आहे. जनसंपर्क वाढवलाच पाहिजे. वेगवेगळया गावात डेप्युटेशनला यासाठीच पाठवतात. असे म्हणत म्हणत. माझी चाल मंदावलेली. पण ही पोरगी कधी बाजूने येऊन निघून गेली कळलेच नाही.

I can't believe this. ती बाजूने निघून गेली नी मी प्लान करत होतो? Occupational Hazards!!! या ऑफिस नी ऑफिस च्या कामाने आयुष्य उध्वस्त केलेय माझे. हे काही नाही. स्त्रीदाक्षिण्य वगैरे काही आहे की नाही. मी जातो तडक. नी विचारतो. आजारी पडेल बिचारी. बस. Stop it! I don't need reasons. I am just asking. That's it.

"Excuse me!" तिने वळून बघितलं. "Should I drop you till the bus stop?" च्यायला घातली का कशी!! म्हणजे तिला कळणार आता की मी दररोज तिला follow करायचो! नाहीतर मला काय माहिती ही bus stop वरच जायची ते!? चला sorry म्हणू नी पळून जाऊ. हे आपल्या बस की बात नाहीये. सुंदर मुली झेपत नाहीत सहसा. मिटींग अर्धवट राहिलीये. दुसरीच कोणीतरी वाटलीस म्हणू आणि निघू!

"ठीके!" ती किंचित हसून म्हणाली.

खल्लास!! परत आईची शप्पथ घेतली एक. तसे कोणाला follow थोडीच केलेले आपण! आपला रस्ता एक होता त्याला मी काय करणार? दैवी संकेत होता तो. मी पकडला. तिने उशिरा पकडला असेल. पण मदतच तर करत होतो.

पोरगी तर महा बिलंदर निघाली. जरा वेळाने म्हणाली की bus stop वगैरे नाकोचे तिला. अशीच फिरत होती! ऑफिस अर्धवट सोडून मी चक्क चालत होतो तिच्याबरोबर. ऑफिसचं मंगळसूत्र कधीच काढून खिशात ठेवलेलं. काहीही असलं तरी ती बोलत मात्र इंटरेस्टिंग होती. मी तसा माझ्याच धुंदीमध्ये होतो. पाणी दा रंग परत वाजत होतं! पावसानं इकडून तिकडून झोडपून काढलं होतं. पण Who cares? छान गप्पा होत होत्या. कॉलेजनंतर प्रथमच इतक्या खुलून कोण अनोळखी व्यक्तीबरोबर बोललो असेन. आता इतका पराक्रम झालाच होता. तर म्हणालो चाल .. मारीन ड्राईव्ह ला जाऊ. तीही बर म्हणाली. इकडे मिटींग धाब्यावर बसवलेली. मधूनच मी कुठे कसा गायब झालो? का गायब झालो? याची उत्तरं तयार करत होतो मनात. पण ही मुलगी वेळच देत नव्हती. कोणी सलग इतका वेळ कसे काय इंटरेस्टिंग राहू शकतं? I hope she was also thinking the same! थोड्यावेळात उन्ह पडलं चकक. ऑफिसमध्ये डीच मारल्याचं जरा गिल्ट फिलिंग आलेलं. पाऊस उतरला तसा आपला जोश पण उतरला. That's so not fair! मधेच चर्चा थांबली आमची. च्यायला काय वाटलं असेल तिला. हा का मधेच थांबला म्हणून? ऑफिसमध्ये गेलं पाहिजे यार. हे असले फालतू विचार अधे मध्ये कसे येतात काळात नाही. पण असो. मजा आली. बस पण. जाऊच आता. पाऊस उतरलं. चला. निघतो. वगैरे झालं. एकदम SRK जागा झाला. परत गेलो नी तिला छत्री देऊन आलो. म्हणालो घे. परत पाऊस आला तर! त्या छत्रीवर हॉटेलचं लिहिलेलं नाव निघून गेलेलं हा खरच दैवी संकेत होता याची खात्री झाली परत एकदा.

तिनं विचारलं काय करतोस? आता ऑफिस वगैरे बकवास गोष्टी काय सांगू. म्हणालो युनिवर्सिटीमध्ये आहे. जरा अचानक cool dude वरून हुशार फील आला मलापण. बाकी ती थोडीच छत्री परत करायला येणारे? आपले नशीब असते एवढे तर मग कशाला.

पुढे ऑफिस मध्ये काय झालं यासाठी परत कधीतरी लिहीन.

(Inspired by, https://www.facebook.com/notes/aditi-moghe/oh-umbrella-/542926972425668. अर्थातच, कल्पनाकी उडान)

Wednesday, June 19, 2013

The $ex and city!

काल सॉलिड धमाल झाली. खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या प्रकारे भीती वाटली. सकाळी एक बातमी छापून आली. फेसबुकने ती डोक्यावर घेतली. लोक आता सैरभैर होणार असे वाटू लागले पण तेवढ्यात दिवस संपला. बातमीचा lifa span संपला! आता तुम्हाला यावरून कशाचा काहीच क्लू लागत नसेल तर याचा अर्थ तुम्ही फेसबुक वाचत नाही. किंवा तुम्हालाही भीती वाटलेली पण आता लपवताय! फेसबुक न वाचणे म्हणजे ... बरं राहू दे. त्यावर परत कधीतरी. उगाच एका पोस्ट मध्ये इतक्यांदा विषयांतर नको. आपल्याला निवडणूक थोडीच लढवायचीये! (हे एका मित्राने सही सांगितलंय मला. कुठेही संवाद भरकटला की government, politics आणि corruption यावर काहीतरी भाष्य करून सोडून द्यायचा! त्याच्याहून चांगला escape route असूच शकत नाही! संबंध असो व नसो!) असो ... तर मला थोडीच निवडणूक लढवायचीये. आपण मुद्द्यावर येऊ की लोकांनी मुद्दा कसा सोडला!

काल चक्क हायकोर्टाने एक निर्णय दिला. म्हणजे निर्णय दिला ही न्यूज नाहीये. पण जो निर्णय दिला ती न्यूज आहे! मराठीमध्ये मथळा लिहायचा प्रयत्न केला पण जमत नाहीये ... म्हणून अख्खी न्यूजची लिंक देतो.

http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/couples-who-have-premarital-sex-to-be-considered-married-says-hc/article4824017.ece

हाहाकार! ही बातमी प्रत्येकापर्यंत वेगवेगळी पोचली असणार. लगेच पूर आले स्टेटस नी कमेंट चे! आणि करमणुकीचे कार्यक्रम सुरु झाले!

लग्न मंडप, कार्यालय, केटरींगवाले या सगळ्यांना तर धक्का बसला असणार! आता लग्नाच्या खर्चाने लोकांना देशोधडीला कसे लावणार? त्यांच्या असोसिएशनने बेकारी भत्ता वगैरेचे नियम वाचायला सुरू केले असावेत. स्पर्धेमुळे आधीच वांदे. आता या निर्णयामुळे तर सगळा डाव बदलला! कोर्टाने चक्क सांगितले की लग्न करण्याचा नी या सगळ्यांचा काहीही संबंध नाहीये!! काही हुशार कार्यालयवाल्यांनी लगेच कार्यालयाचे लॉजिंग बोर्डिंग मध्ये रूपांतर करायला सुरू केले असेल. बाहेर पाट्या लावल्या असतील "Hotel Decent - आमची कोठेही शाखा नाही!" बाजूला सलमान खानचा फोटो पण असेल! (आता सलमान खान "लग्न" या गोष्टीचा brand ambassador का? यावर चर्चा करायची असेल तर तुम्ही खुपच मागासलेले आहात यार!)

याहून जास्ती खळबळ टीवी सिनेमावाल्यांची झाली असावी! लग्नासाठी झगमग हवी. मोठा कार्यक्रम हवा. भरपूर लोक हवेत. हे सगळी गृहितकं आता उधळली गेली. कोर्टाचे जजमेंट असे म्हणतं.

"The court said marriage formalities as per various religious customs such as the tying of a mangalsutra, the exchange of garlands and rings or the registering of a marriage were only to comply with religious customs for the satisfaction of society."

घ्या म्हणजे! एका फटक्यात किस्सा खतम. इतकं खरं कसं बोलू शकतात कोर्टात? एक म्हणजे खरं? आणि तेही कोर्टात?? वर्षानुवर्ष अंधा कानून वगैरे करून जी काही चेष्टा चालवली होती त्याचं फळ हे! म्हणजे काही वेळा चक्क गोविंदाला पण वकील केलेला हो! शक्ती कपूर पण तिथे काहीतरी किस्से करायचा! कोर्टाने तरी किती वेळ सहन करायचं? त्यांनीही दिलं प्रत्युत्तर! सुरज बडजात्या (अरे होता न असा एक? विसरलात होय? चित्रहार बनवायचा! बघा आठवून!) पासून ते एकता कपूर पर्यंत सगळे हादरले असतील. मला वाटलं की हेच जरा लवकर झालं असतं तर "ये जवानी है दिवानी" मधून तरी सुटका झाली असती! पण इतका अधाशी कशाला होऊ. त्याचा पुढचा संभाव्य रिमेक तरी नाही व्हायचा यावर खुश होऊ!


"शादिके पेहले सेक्स नाही" असले डायलॉग नाहीत आता सिनेमामध्ये. किंबहुना "शादिके लिये सेक्स पेहले". हे असे काहीसे होईल. शादीवली रात पेक्षा शादिके पेहलेवली रात हे जास्ती प्रसिद्ध होईल. महेश भट्ट चा सुभाष घाई होईल! महेश भट्ट चे सगळे सिनेमे आता family movies म्हणून प्रदर्शित होतील! काही चतुर पत्रकारांनी हा त्याचाच किया कराया आहे अशी पण शक्यता वर्तवालीये! परदेस मधली महिमा चौधरी भारतामध्ये पळूनच येणार नाही! (असा पण होता न एक सिनेमा? असे काय करताय? "ये दिल" हे एकच गाणे नव्हते त्यात! त्यात एक अपूर्व अग्निहोत्री असतो. खूप futuristic विचाराने तो महिमाला अमेरिकेमध्ये घेऊन जातो नी तिथे म्हणतो "चाल अब जिंदगी जीते है!" तेव्हा हायकोर्टाने असला निर्णय दिलेला नसल्याने ती बिचारी अमेरिकेतून भारतामध्ये पळून येते! नी शाहरूखवर प्रेम करते! हा...! तोच तो परदेस). केवढा सारा खर्च वाचेल! ही स्कीम बचत गट किंवा सहकारी पत संस्था यांनीच काढायला हवी होती! पण असो, कोणाच्या का आरवण्याने होईना. सूर्य उगवला. किंवा चंद्र उगवला म्हणूया. Moon is closer to sex than the sun! God Bless Bollywood!

"ये शादी नाही हो सकती" असला डेंजर डायलॉग सिनेमामध्ये येऊन दंग नाही व्हायचा आता. नायक नी नायिका लगेच म्हणतील. अंकल, लेट हो गया. शादी को कब की हो गयी, ये बस satisfaction of society सुरु आहे. We are already satisfied!"

मला तर चिंता वाटते ते marriage certificate साठी त्रास देतात त्या लोकांची. आता काय करतील? विवाहित असूनही कोण्या कोपर्‍यातल्या ऑफिसामध्ये जाऊन चक्कर मारायला लावायचे. अहो आम्ही लग्न केलेय. प्लीज आम्हाला सर्टिफिकेट द्या! आता कदाचित ते कमी होतील. दवाखान्यात कदाचित फेऱ्या वाढतील! सिद्ध करा म्हणतील आम्हीच केले! परत कोर्ट म्हणते

"The court further said if necessary either party to a relationship could approach a Family Court for a declaration of marital status by supplying documentary proof for a sexual relationship"

"Documentary proof" हा तासही माझ्या विशेष कुतूहलाचा विषय आहे. आता यासंदर्भात ऑफिसचा फॉर्म कसा असेल याच्या कल्पनेत वेळ जरा छान गेला. आजूबाजूचे लोक म्हणाले असे एकटाच काय हसतोस अधेमधे! मी म्हणालो futuristic विचार करतोय! काही चतुर मित्रांनी फेसबुकवर खूप नोबल मार्ग सुचवला. म्हणाले टेप करून ठेवा. आणि तेच घेऊन जा ऑफिस मध्ये! म्हणजे आता MMS scandal अधिकृत केल्यासारखे झाले! म्हणजे सगळ्या MMS scandal पटू ना भीती! च्यायला धंदाच बसवला! सरकारी दफ्तरे आता अचानक इंटरेस्टिंग होणार! फायली धूळ खात पडायच्या. आता फायलींचे टेप होणार नी ते नित्य नियमितपणे बघितले जाणार. Fraud ला जागाच नाही हो म्हणजे! वर सगळे कर्मचारी कायम आनंदी. म्हणजे आनंद, परमानंद, अत्यानंद साठी LIC ची policy घ्यायची गरज नाही! Revolutionary निर्णय! बीट नाहीये!

आई बाबांची काळजी मिटेल! मुलं घरी येऊन सांगतील. वर-वधू संशोधनासाठी काय नाव घालते? माझे मागच्याच आठवड्यात लग्न झाले. पुढे म्हणतील की फक्त मला confirm करायचंय की खरच झालं की मला वाटतंय झालं? सगळाच किस्सा सोपा केला! लग्नाच्या आधी करण्याच्या सोपस्कारामध्ये आता divorce decree चा पण समावेश होईल. म्हणजे कभी किधर कुछ गलतीसे हो भी गया हो तो! म्हणजे करिअर कौन्सलिंग मध्ये आता पुढे कशामध्ये स्कोप आहे? या प्रश्नाला आता घटस्फोट या क्षेत्रात बूम येणारे असे लोक सांगायला लागतील! कारण कोर्ट म्हणतं की,

"The court also said if after having a sexual relationship, the couple decided to separate due to difference of opinion, the ‘husband’ could not marry without getting a decree of divorce from the ‘wife’."

राहून राहून मला सारखे वाटते! आपण एका revolutionary generation चा भाग आहोत! किती सार्‍या अभूतपूर्व गोष्टी आपल्या जनरेशन मध्ये घडतायत! काल ही मला परत असे वाटलं!

दिवसाच्या शेवटी परत एकदा बातमी पूर्ण वाचली. दिवसभर जे काही भविष्य रंगवून मनोरंजन केलेलं त्यापेक्षा बातमी जरा वेगळीच होती. एका ठराविक केस मध्ये महिना ५०० नी १००० रुपयांसाठी मारामारी सुरू होती. एकीकडे live-in रिलेशन मध्ये राहून, २ मुलं वगैरे होऊन नंतर एका माणसाने जबाबदारी टाळायचा प्रयत्न केला होता. मुलाच्या जन्माच्या वेळी सही करून दिलेली दवाखान्यामध्ये. तेव्हा जबाबदारी घेतली. नंतर संबंध बिघडल्यावर अलाहिदा! कोर्टाने या एका ठराविक केस पुरता निकाल दिला की बाबा फालतू बडबड करू नको. सगळी history पाहता. तुम्हाला दोघांना नवरा आणि बायको हा दर्जा दिलाच पाहिजे. कार्यालयात जाऊन रिंग नाही घातली म्हणून या जबाबदारीपासून आता इतक्या वर्षानंतर, इतके काही झाल्यानंतर, तू निसटून जाऊ शकत नाहीस! मुकाट्याने जे काही देणं लागतोस ते दे. नी घटस्फोट घे.

परत आता जाऊन स्पष्टीकरण वगैरे देणं आपल्या फेसबुक च्या रुलबुक मध्ये थोडीच आहे. जनता आज दुसऱ्या विषयावर गेलेली आहे. काल एक दिवस या बातमीवर करमणूक करून घेतली. आज दुसरी. काही वेळा या कशातूनही करमणूक करून घेण्याच्या आपल्या सवयीची भीती वाटते यार मला!

Monday, February 04, 2013

कुछ तेरे पास, कुछ मेरे पास


(खूप जुन्या लिखाणामध्ये सापडलेलं काहीसं. अपूर्ण म्हणून सोडून दिलं होतं ... कदाचित. यामध्ये अपूर्ण काय आहे समजायचा विचार केला गेले काही दिवस. पण नाही समजले! म्हणून जसेच्या तसे पोस्ट करतोय. एवढं सारं हिंदी आणि ते ही दर्दभरं, एकट्याला झेपायचं  अवघडच आहे. आत्ता आठवत नाही फारसं पण बराचसा भाग अस्मि ने लिहिला होता. कदाचित थोडेसे काना मात्रे उकर मी दिले असावेत ;-). असो ज्याला सापडले त्याचा माल!!!!!)

बोरीयतभरी जिंदगी, कुछ तेरे पास, कुछ मेरे पास
हर एक सांस लेनाभी लगे जैसे एक सजा,
विरानी गलीयोकी यादें है बस, कुछ तेरे पास, कुछ मेरे पास

सोचा थोडा नशा करले, तो सुहानी लगने लगे जिंदगी
पर हमने छुआ तो जैसे दारूभी फिकी फिकीसी हो गयी
बिना नशेकी शराबके, भरे हुए ग्लास, कुछ तेरे पास, कुछ मेरे पास

मंजिले कुछ धुंदलीसी,
तलाश मे खोये चांदसी
ओझलसे सितारे रेह गये ईस रातमे, कुछ तेरे पास, कुछ मेरे पास

वैसे हर एककी होती है जिंदगी जरासी उलझी,
जरासी टेढी, जरासी कडवी,
ईंटरवल के पेहले दी एंडवाली फिल्मे, कुछ तेरे पास, कुछ मेरे पास

कोशिश है शायद जीनेकी,
या शायद मर जानेकी
जो रेह गये बगैर जिये, ऐसे अनदेखे ख्वाब, कुछ तेरे पास, कुछ मेरे पास

सोचा था कभी सोचनेकी जरुरत ना होगी, ना मौके आएंगे
पर लगता है ये सोचनेमे जरासी गलती हो गयी
कभी न सोचनेके झूठे वादे सारे, कुछ तेरे पास, कुछ मेरे पास


शायद है भी नही जिंदगी ईतनी सॅडसी
अनदेखे खुशियोंके पल सारे रंगे हमने बोरीयतमे
यही खुदको समझाते हुए असली नकली बोहोतसे पल मेरे पास, बोहोतसे पल तेरे पास

Sunday, January 27, 2013

बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात

काहीच सुचेना. काहीच होईना. नन्नाचा पाढा सोडला तर बाकी काहीच येईना. टीवी वर बघाव तर मतं मांडायला भुकेली माणसं. Cameraman नं "ACTION" म्हणालं की लगेच समोर एकच भाकर आहे समजून तुटून पडतात. घटनेचे भुकेले news channels. बाहेर मेणबत्त्यांचा जमाना. कृतकृत्य व्हायचा कीवा जागृत नागरिक असल्याचा स्वतःला पुरावा द्यायची गरज वाटली की लगेच घ्यायची मेणबत्ती हातात आणि सुटायच! कधीकधी वाटतं की कारणही बघायची गरज लागणार नाही काही दिवसात. असाच बाहेर पडायचं हातात मेणबत्ती घेऊन, बघणारा आपापल्या सोयीनं अर्थ लावून घेईल. कीवा कधी कधी घरात कोणी ऐकेना म्हणून पण मिनी-मेणबत्ती मोर्चा पण निघेल. बेडरूम पासून हॉल पर्यंत. रस्त्यावरून जावं तर सगळेच असंतुष्ठ. काळा गॉगल लावून रस्त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यावर टांगलेल्या फोटो मधून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे घेणारे सोडले तर, बाकीचे कोणच खुश दिसत नाही. ते फोतोमाढले पण का एवढे खुश असतात कळत नाहीच. पण तरीही मी खुश नाही आणि ते कसे काय खुश? म्हणून कदाचित बाकीच्यांना आणखी चेव असावा. पेपरमधल्या बातम्या बघितल्या, तर त्यातही इतक्या सहज एखादी चांगली बातमी नाहीच सापडत! Depressing बातम्यांना मात्र उत आलेला असतो. म्हणजे मी का उघडावा पेपर? असा प्रश्न कोणालाच पडत नसेल? की आपल्याला तेच हवं असतं वाचायला?

असं तुम्हालाही नाही का वाटत की इतकं वाईट खरच झालं असेल का जग? काहीच चांगलं होत नसेल का आज काल? कोणालाच इच्छा होत नसेल का काहीतरी inspiring कीवा motivating सांगायची? ही कुठून घेतली आपण सवय? दुःख कुरवाळायची? गेले काही दिवस "आजकी २०० खबरे" असले बघायला मिळतंय news channel वर. त्या २०० पैकी एखादी तरी बातमी तुफान motivating असावी! की वाटावं, ये हुई न बात! चल आपणही असं काहीतरी करू! पण नाहीच होत च्यायला असं!

तसं सुखपण फारसं महाग नाहीचे? रेडिओवर बाई एक प्रश्न विचारते, जितका फालतू तितका चांगलं! म्हणजे "बे चा पाढा म्हणा" असेही असू शकतं. मग हजार call येतात. त्यात तुक्का बसतो एकाचा नि मग त्याला फुकट movie tickets मिळतात. लगेच तो lucky होतो. टाळ्या नि शिट्ट्या! सुख इतकं सोप्पही झालाय. तेही हेवा करावं असं सुख. कोणाला काही फुकट मिळाल की त्याचं उदात्तीकरण हमखास करतो आपण! टीवीवर फालतू प्रश्न सोडवून कीवा बऱ्याचद काहीही न करता झालेल्या lucky winner आपल्यासमोर goal देऊन जातात! म्हणजे फोन करत राहायचं! नंबर लागला की तुम्ही तुम्ही हिरो! काहीच नाहीतर, "च्यायला ते सगळे सुखी आहेत, मीच नाही!" हा आपलाच समज दृढ करायला ते पुरते. पुढे खूप वेळ आपण त्यांची चर्चाही करतो!

हे कुठेतरी काहीतरी चूक आहे हे आतून पण काळत असतच की. पण १० पैकी ८ लोक हे असेच करत असतील तर मी का मागे पडू? बहुमताकडे धावायची सवय नवीन नव्हे. म्हणून वेगळ चुकूनही नाही करत! सगळेच कुठेतरी इतके अगतिक झालेत की चुकून सहज असच मलापण lottery का लागावी ही प्रत्येकाची अशा आहे. आधी आशा होती, आता आग्रह आहे. कारण मला वाटतंय की मी सोडून बाकीच्या सगळ्यांना काही न काहीतरी फुकट मिळतंय! मग मलाच का नाही? तशा मलाही फुकट गोष्टी मिळत असतातच. पण ते आपल्याला मिळणं एकतर obvious असतं! किवा बाकीच्यांना आपल्याहून खूप जास्ती मिळत असतं, किवा आपल्याहून खूप जास्ती वेळा मिळत असतं! म्हणून It doesn't count! आणि या फुकट गोष्टी नाही मिळाल्यामुळे कदाचित हा राग! इतरांबद्दलचा! आणि त्यामुळं भूक कदाचित, आजू बाजूच्या खराब गोष्टी बघायची नी त्यातून आपलं frustration काढायची! हे सगळं असच असतं, हे आपल्या स्वतःच्याच मनावर नकळत बिंबवायची!

खरच काहीही नसेल चांगलं घडत जगात? मला नाही वाटत यार. असेल की काहीतरी. का कुठूनच पुढं येत नाही ते? का आपल्याला कोलाहल आवडतो? का नसलेल्या गोष्टींचे आकर्षण असते? कोणीतरी खडतर परिश्रम करून मोठं झालेला असेल, तर तो माणूस का आकर्षित करत नाही? "च्यायला मी कधी एवढं कष्ट करून काहीतरी मिळवणार?" असं वाटणारी वेडी माणसं कुठतरी असतीलच की? सत्यमेव जयतेच्या प्रत्येक भागात कोणी न कोणी inspiring आणलेलं. अशा माणसांचा उदो उदो करायला आपण कधी शिकणार? ही अशी उदाहरणं का विरून जातात? किती लोक आठवतात आपल्याला की जे सत्यमेव जयते मध्ये आले? ज्यांनी लोकांच्या हितासाठी खूप काही काही केलंय? का नाही देवी शेट्टी आठवत? का नाही विल्सन आठवत? का नाही आपण त्यांच्या तळमळीबद्दल दिवसेंदिवस बोलत? का नाही inspire होत? का या गोष्टी चार दिवसात विरून जातात आणि मग आपली नजर परत कोलाहालाकडे वळते? लोकांना जे बघायला आवडतं, ते आम्ही दाखवतो, छापतो! ही असली फालतू करणं आपण कधी सोडणार? Media वर ढकलायचं कधी सोडणार? किंवा आपल्याला कोणी न कोणीतरी लागतोच खापर फोडायला! अगदी कोणीच नाही सापडलं तर, Government आहेच! तसा government नेही स्टेटस maintain केला आहेच. पण आपल्या या desperate वागण्याला उत्तर काय? घडलेल्या प्रत्येक घटनेचं खापर फोडायला असे काही desperate व्हायचं की ते केलं नाही की मला कदाचित स्वतःकडे बघायची वेळ येईल हि भीती अंतर्मुख व्हायची वेळ येईल. मग उत्तरंच मिळायची बंद झाली तर? लोक आपल्याला जसे समजतात ते आपण आणि खरे आपण यातला फरक समोर आला तर? आणि सगळ्यात शेवटी काहीतरी action करायची जबाबदारी आपल्यावरच आली तर? मग खापर कोणावर फोडणार? मग त्याच्याशी कसे deal करणार?

शेवटी बोलाचीच कढी, आणि बोलाचाच भात. कंटाळा आला यार! खरच काहीतरी करुया. जमत नसेल तर प्रयत्न तरी करू. दुसऱ्यावर नको ढकलूया! मेणबत्त्या पकडणाऱ्या हातानी जरा डोकंपण खाजावूया. शोधून काढूया, की आपण स्वतः काय करू शकतो.

Sunday, April 03, 2011

भेटी आणि गाठी

ही कथा मला सलग सादर करायची नाहीये. म्हणुन एका विशिष्ठ क्रमाने पोस्ट्स टाकतोय. क्रम कथेच्या सुरुवातीला नमुद करत आहे. तसंही प्रत्येक पोस्ट स्वतंत्रही वाचता यावा असा लिहिताना प्रयत्नही केलाय.

...
...
...
...

==========================================


माणसं भेटत जातात. ओळखी वाढत जातात. काही टिकतात. तर काही हरवून जातात. अपेक्षा आणि ईच्छांचं पेव तर नंतर फुटतं. प्रेत्येक भेटीमधे कितीसं गुढ लपलय हे कळायला वेळ लागतोच. पहिल्या किंवा अनोळखी भेटीमधली मजा लहान मुलासारखी अल्लड आणि निरपेक्ष असते. कुठेतरी बल्कनीमधे तंद्री लावून ऊभं असताना जशी एखादी वऱ्याची झुळूक सहज येऊन सुखावून जाते. रिया आणि स्वानंद असेच एकमेकाना भेटून गेले. रियानं स्वानंदला नोटिस नक्कीच केलं. स्वानंदसाठी कदाचीत ती गर्दीमधली आणखी एक बेब होती. पण दुर्लक्ष करण्याजोगी नक्कीच नव्हे. पार्टीमधे दोघे ईतके मिसळून गेले की हे रन टाईम जमलय याची तसूभर कल्पना येणार नाही.


"The Riya!! ती तुच ना जिला कॉलेजमधे की कंपनीमधेही बरेच बरेच awards वगैरे मिळालेले" स्वानंद.
"वा! माझं प्रोफाईल कोणी वाटलेलं का ईथं?" रियाकडं तारीफ व्हावं असं बरच काही होतं पण तारीफ सुरू झाली की उगाचच uncomfortable व्हायची ती. काहीतरी तोकडी उत्तरं देऊन किंवा एकदम lame reaction देऊन ती विषय मिटवायची. कधी कधी मात्र या अकारण modesty चा कंटाळा देखिल यायचा तिला.
"तर तुझं प्रोफाईल वाटतात तर लोक! हं माझ्यासाठी जरा सोपं होतं. वैष्णवी बरच बोलायची तुझ्याबद्दल. तसं ती तिच्याबरोबरीच्या सगळ्याच मुलींबद्दल बोलायची. ... पण मुलींच्या बडबडीबद्दल तुला मी काय सांगावं?"
"हा आत्ता शेवटी होता तो कोणाला टाँट होता?"
"टाँट कुठचा काय?" मिष्किल हसत हसत दोघांचंही भटकणं असच सुरू होतं. "सांग तरी तुला कुठले कुठले awards मिळालेत?"
"चल! उगाच काय बवळट प्रश्न! हा काय Interview आहे माझा?"
"म्हणजे? Interview असतास तर सांगीतलं असतंस?"
"Interview असता तर मी आधीच माझ्या certificates ची फाईल दिली असती ना! परत परत कशाला सांगायचं?" पोरगी म्हणावं तितकी सरळ ऐकून नव्हती घेणार.
"भाव खाणं कसं आपसूकच जमतं मुलीना!"
बोलता बोलता दोघेही सबवे ट्रेन स्टेशनमधे घुसले.

...
...
...

"तुझा कोणी बॉय फ्रेंड वगैरे?"
चॅटमधे जसं asl? हा ईरीटेटींग प्रश्न असतो तसाच हा पण एक. मुली या प्रश्नाला सरावलेल्या असतातच. त्यांच्याहून जास्ती बाकीच्याना यात खुप ईंटरेस्ट असतो. रियालाही कोणी हे पहिल्यांदा नव्हतंच विचारलं. 
"का? वैष्णवीनं काही सांगीतलं असेलच की आधी?"
"हं ... म्हणजे आहे कोणीतरी?"
काही कारण नसतानाही हा प्रश्न कुतुहलाचा विषय असतोच. रियानंही वेळ न दवडता उलटा टोला मरला.
"माझ्यासारख्या मुलीला कोणी एकटं राहू दिलं असेल असं वाटतय तुला? म्हणजे टॉंट मारतोयस की सिंपथीसाठी?"
फोनवर असुनही कळेल असं विजयी हसून स्वानंदनं विचारलं "काय नाव?"
"तुला काय करायचय?"
"..."
"... तुला जर वैष्णवीनं सांगितलं असेल तर ... नविन"
नकळत गाठी उलगडत जातात. सहसा अवघड किंवा नकोसे वाटणारे संवाद सहज घडून जातात. दहापैकी नऊ वेळा आपल्याला जे आवडत नाही ते नेमके त्याचवेळेला सवय असल्यासारखे आपण करून जाते. आपण काहीतरी निराळं करतोय हे जरी कळत असलं तरी थांबायची इच्छा मात्र होत नाही. रियाची सहज उत्तरं आणि स्वानंदचा ओघवता स्वभाव हे एकमेकात गुंतत जाणार यात शंका नव्हती.
"म्हणजे? प्रत्येकाला बॉयफ्रेंड्सची वेगवेगळी नावं सांगीतलीस का काय?"
"हे बघ बाबा. कॉलेजच्या प्रत्येक वर्षी प्रत्येक कोणी नव्याबरोबर नाव जोडलं जायचं माझं. लोकाना विषय लागतात आणि मुलीना सेंटर ऑफ ऍट्रॅक्शन असायला. त्यासाठी काही खरोखर करायलाच पाहिजे असं कुठेय?"
"तुला म्हाणायचय काय? म्हणजे बॉय फ्रेंड आहे की नाही तुझा?"
"वा!! मला खुपच मजा येतेय आत्ता! तुला का रे ईतका ईंटरेस्ट? ... पण असो, चल आता नंतर बोलू." कुत्सित हसून रियानं फोन बंद केला.
"अबे ... हेलो ... हेलो बे!"

...
...
...

"तुला वैष्णवीच्या फोटो अल्बममधे बऱ्याचदा बघितलेला. त्यातही एकदम फ्लर्टच दिसायचास. आम्ही तर मधे काही काळ वैष्णवीला तुझ्या नावनं चिडवायचोही काही काळ. पण वैष्णवी आमची वरणभात मुलगी! कुंपणापर्यंत धाव तिची!"
"वैष्णवीनं सांगीतलेलं मला ते. आणि ‘फ्लर्टच’ दिसायचास म्हणजे?"
परत एकदा टिजींग हसून रिया म्हणाली, "तुझ्या असतील छप्पन गर्लफ्रेंड्स"
एखाद्या सैनिकानं जसं ‘मेडल्स किती मिळाली?’ यावर सरसावून उत्तर द्यावं तसं स्वानंदनं उत्तर दिलं, "छप्पन नाही पण ३ होत्या. किंवा साडे तीन म्हण. किंवा ३ च"
"यात कसं काय कंफ्युजन असू शकतं?" रियाचं आत्तापर्यंतचं आयुष्य बघता, या अशा दुसऱ्यांच्या भनगडीमधे पडून त्याना खांदा नाही द्यायचा असं तिनं नुकतंच ठरवलेलं. विकतचं दुखणं घेउन हात पोळल्याची जखम ताजी होती. तरीही ईथं चर्चा थांबायचं नाव घेत नव्हती. रियाचे पुढचे अंदाज सुरू होते. "आता त्या तिघींचीही लग्नं झाली असतील? आणि तुला आता मग डेस्पो वाटत असेल. ना?"
"चल ... डेस्पो जरा घाणेरडा शब्द आहे. मी डेस्पो नाहीये! हे बघ तुला म्हणालो मी असंच की मला आता सेटल व्हायचय लवकरात लवकर!! पण म्हणून काय डेस्पो नाहीये मी! कोणाशीही करणार नाही लग्न मी."
"हं ... म्हणजे झालीयेत तिघींचीही लग्नं?"
"हं ..."
"तसंही मुलीना कुठे असते लिबर्टी टवाळक्या करायची.  ड्रिम प्लस वन असा नियम. एक लफडं अलाऊड, मग घरचे कान धरून बसवतात बोहल्यावर."
"तुझं असं काही होतय का काय?
"माझं सोड. तुला ईनवाईट केलेलं की नाही?"
"तुला मजा येतेय ना ऐकायला? हस बयो. पण ठिक आहे गं ... चलता है. मला नव्हतं ईनवाईट वगैरे केलेलं. दोघींची झालीयेत लग्नं. तिसरीचं होईल आता."
"तुला मग आता ते ... म्हणजे ते ... असं ... सगळं रिवाईंड करावंसं वगैरे वाटत असेल ना. काश ब्रेक अप केला नसता तर ... वगैरे?"
"अं ... अगदीच नाही गं. पण पहिली जी होती ना तिचं आणि माझं बराच वेळ छान होतं. २-३ वर्षाची स्टेडी रेलेशनशीप होती आमची. मग नंतर डिफरन्सेस आले. पण आमचं म्युच्युअल ब्रेक अप होतं."
रिलेशनशीपमधे या अशा बनवलेल्या परीस्थितीजन्य व्याख्यांमधे रिया तशीही कच्ची होती. तिला न कळलेलं गुढ होतं ते. एनर्जी कुठल्या गोष्टींसाठी आजिबात वाया घालवायची नाही या बाबतीत रिया एकदम क्लिअर होती. आणि अशा मनासारख्या व्याख्या वळवणं तर तिला मान्यच नव्हतं. तरी हे बोलून दाखवेल तर ती रिया कसली. स्वानंदसाठी आयुष्याचा वेग कमी करणं हा अपराध होताच आणि त्यासाठी त्यानं बनवलेल्या अशा अनेक थेअऱ्या होत्या. गत आयुष्याचे कुठलेही फाजिल प्रश्न त्याच्याकडे आजिबात नव्हते. किंवा त्याला ठेवायचेच नव्हते. स्वानंदचा ‘म्युच्युअल ब्रेक अप" रियाला एक सोयिस्कर पळवाट वाटली. काही कारण नव्हतं पण मुलीना अशा बाबतीत सिक्सथ सेन्स असतोच.
"पुढं वाटलेलं मला की कदाचीत अविचारीपणाच केला जरासा. तिच्याशी खुपच परफेक्ट जमलेलं. मीच जरा अततायीपणा केला कदाचीत. पण चालायचच, आम्ही एकमेकाशी रिलेट करायचं तसंही बंद झालेलं."
"हं ... आणि मग you moved on ...?"
"I did. It wasn't easy but it was needed."
"प्रेम म्हणजे एक सोपस्कार आहे की काय तुला? नीडेड काय?"
"तसं नाही. ती ऑस्ट्रेलियाला गेलेली. परत येणार नव्हती. कुठे अडकून पडायचं. तिलाही मुक्त केलं. मीही मुक्त झालो. ती आलेली ईकडं त्या आधी पण तेव्हा संपलंच होतं सगळं आधीच. दुसरी एकदम ड्रिमगर्ल होती. मस्त नाचायची. म्हणजे तिच्याबरोबर सगळंच रंगित वाटायचं. फार कमी वेळ आम्ही एकत्र होतो. पण खुप छान होतं सगळं. पार्ट्या व्हायच्या बऱ्याच. डिस्कमधे जायचो आम्ही सगळेजण. रात्रीच्या रात्री नाचून काढायचो. खुप फिरायचो. डिनर करायचो छान छान. ती आर्किटेक्चरचं काहीतरी करायला आलेली. तिच्याबरोबर म्युजियमही पायदळी तुडवली एक दोन."
"आणि मग ..?" 
"मराठी होती ती. ती परत नाही येणार माहित होतं मला. तिचं लग्न ठरलेलं. चुक झाली कळल्यावर गदा माझ्यावरच येणार होती. मराठी मुलींच्यात दम नसतो यार ... with all due respect to you."
"हं ... म्हणजे पहिली मराठी नव्हती?" 
"छ्या. पंजाबी होती ती. पण बास झाले यार आता. आता मला किस्साच खतम करायचाय. आणि डेस्पो वगैरे काहीही नाहीये. नाहीतर मागच्या ईतक्या महिन्यात किंबहुना वर्षात कोणीतरी मिळाली असतीच की!"
रिया प्रतिक्रिया द्यायची असुनही स्वतःला थोपवत होती. आणि यावर जास्ती खोलात गेलं तर अर्ग्युमेंट्स सुरू होणार हे दोघानाही माहित होतं. कळत नकळत दोघंही काळजीपुर्वक त्या वाटेवर नाही जाणार याची काळजी घेत होते. का करत होते दोघं असं? काय गरज होती असली काळजी घ्यायची? कुठेतरी हा जरी योगायोग असल्यासारखं दोघं एकत्र आलेले, तरी त्या दोघानाही या वळणावर एक दुसऱ्या बरोबर असण्याची गरज होती. याची जाणिव त्याना व्हायला उशिर होता.

...
...
...

"तुला माहितय का स्वानंद, तू असंच रडत बसणारेस की तुला सेटल व्हायचय आणि ... शेवटी आपण दोघेच राहू बघ एकमेकासाठी!" Riya couldn't believe that she actually said this!!
"नाही गं. म्हणजे तू छान आहेसच. अगदीच आहेस. पण ... वाईट नको मानूस ... पण मी नाही बघितलं तुला तशा नजरेनं!"
रिया हसली. जसं काही आठवलं मागचं. पुढे म्हणाली, "हा मुलींचा डायलॉग आहे. आणि बघ ... फिल्मसारखं करू ... ४० वर्षापर्यंत कोणी नाही मिळालं तर करू आपण लग्न."
"अबे ... लडकी गलेहीच पड गयी यार."
"तुला कुठे कोणी मिळणारे होपलेस!? तू काय अपेक्षा ठरवल्यास काय? की कशी हवी गर्लफ्रेंड तुला?"
"माझ्या सगळ्या गर्लफ्रेंड्स छान उंच होत्या. मस्त फिगर. असं बरोबर असल्या की तमाम जग जिंकल्यासारखं वाटावं. एकदम बबली, खुप बडबड करणारी असावी. उगाच गोरीच हवी वगैरे असले काही करत नाही मी. पण ईतना तो होना चाहिये ना? आपण काय कामी आहे का काय?"
"हो रे हो ... शेवटी गोरी वगैरे असा हट्ट नाही म्हणून तर एकदम जनरसच झालास की बाबा! आलाय मोठा हिरो हिरालाल!" 
कशाचीतरी विचित्र खात्री होती रियाला. स्वानंदला अजुन झेपलं नाहीये हे जरी माहित असलं तरी तिलाही सगळेच कळालय असही नव्हतं. पण काहीतरी शिजणार आहे ईथं असं तिला कळालं होतं. स्वानंदच्या गोष्टी पटणाऱ्या नव्हत्या पण त्याकडं दुर्लक्ष करावंस असं काही वाटत होतं रियाला. आता बास यार. मीही लफडं करणार. होणारच आहे काहीतरी. उगाच हे तरी का रहावे करण्यावाचून? काहीतरी अचाट असे विचार. परिस्थीती. स्वानंद आणि तिच्या वाढत जाणाऱ्या भेटी. सगळंच तिनं मनातल्या मनात बांधलेल्या कथेसारखं घडत होतं. हे सगळेच तर टप्पे असतात.

नकळत भेटीगाठी गळाभेटी मधे बदलल्या आणि मग गळाभेटी जवळीकीमधे! त्या एका रात्रीमधे आपसांमधलं कापलेलं अंतर, सगळ्याच गोष्टींपासून किती दुर नेणारं होतं याची झलक दुसऱ्या दिवशी मिळाली. किचनमधे दुध शोधत असताना स्वानंदला मागून मिठी मारली तिनं.
"गूड मॉर्निंग ... टायगर...!"
"गुड मॉर्निंग मॅडम. कशी काय सकाळ?"
रियाच्या डगळ्या शर्टमधे ती तशीही झोपेतून ऊठल्यासारखीच वाटायची. खरच झोपेतून उठली असेल तर सांगायलाच नको. दुर्लक्षलेले केस, तरीही त्यासह खुलुन दिसणारं हसू. बास. एवढं बास होतं कोणालाही पागल करायला. तिच्याकडं पाठमोरं बघत स्वानंद म्हणाला, "तुला एक विचारू?"
"काय?"
"असं ते रिग्रेट .. किंवा .. ये मैने क्या कर दिया यार? ... असं काही नाही ना वाटतय तुला?" स्वानंदनं अडखळत हसत विचारलं.

Tuesday, November 02, 2010

Blind Date (Contd)

(पुर्वार्ध: Blind Date)

ब... प्पी... दा...!  ब... प्पी... दा...!  ब... प्पी... दा...!  ब... प्पी... दा...!  म्युजिक थांबलेलं तरी आता या अवाजानं जमिन हादरत होती. बप्पीदांबद्दल मला काही आकस नाहीये पण खरं सांगावं तर असं वाटलं, काय यार? बप्पीदांसाठी काय ईतका दंगा करायचा? पण पक्का मुरलेला डिस्कवाला समोरे तुषार कपूर आला तरी त्याला तु... षा... र! तु... षा... र! असे चित्कार टाकेल. म्हणजे माझं तुषार कपूरशीही वाकडं नाहीये. पण असो. डिस्कमधे येऊन खुश असल्याचा आविष्कार (किंवा साक्षात्कार) करण्यासारखी हीपण एक रिच्युअल असावी. किंवा जसा प्रचंड टॉलरन्स हा एक युएसपी आहे डिस्कचा, तसाच लोकांना बीनशर्त प्रेम करणं हाही दुसरा युएसपी असावा. मग तो तुषार असो किंवा बप्पीदा. जो मेन गेस्ट असेल त्याच्या तालावर मुकाट्यानं सगळे खुश होऊन नाचतात. किती विन-विन सिच्युएशन ना? असं आणि कुठं होतं यार? लोक ईतके गुण्यागोविंदानं नांदताना आणखी कुठे दिसतील? बप्पीदांची एंट्री जबरदस्त झाली. लोकांचा आवाज, ड्रमरने तेव्हाच धडाधड काहीतरी वाजवलं. बप्पीदांचा हात वर होताच, ठाकरेंसारखा. गळ्यात चेन्स. काळा पोषाख. आधीच पुरेसा लाईट नसतो डिस्क मधे. त्यात एवढासा देह. काळा काय म्हणून घातला असेल पोषाख? पण चालायचच, त्यावर चेन होत्या भरपूर. एकदम लखलख चंदेरी केलेलं बप्पीदाना. काहीतरी २-४ वाक्यं म्हणली यार त्यानी! पण आठवत नाही आजिबात. लोकानी टाळ्या मारल्या जब्राट.

हे सगळं सुरू असताना, आख्खी जनता वर बघत होती आणि एकच गरीब, गरजू, होतकरू तरूण आणि त्याच्याबरोबर आलेली फटाकडी खाली बघत होते. मी आणि सॅली होतो ते.
"Damn! Sally, I lost it!! s#it! I guess I dropped it. I knew it man! I just knew it. Who gets the phone no dance floor yar!?"
सॅलीला सहानुभूती होती की डिस्कची मजा खराब केल्याचा राग, हे काही समजून घेण्याच्या मनस्थीतीत मी आजिबातच नव्हतो. मी तिच्याकडं बघतही नव्हतो. अशक्य गोष्ट! असं कसं काय करू शकतो मी? एकदम सुरूवातीपासूनच्या सगळ्याच गोष्टी चुक वाटू लागल्या. फ्रेंड सिटींग?? असं कधी असतं का? साल्या माझ्या मित्राची फ्रेंड एकटी म्हणून तिला मी एंटरटेन करायचं? मला समजतात तरी काय लोक? आणि मी ही हिच्याबरोबर नाईट आऊटला कसा काय लगेच जाऊ शकतो? जगात असलेल्या अब्जावधी पर्यांयांपैकी कोणता पर्याय निवडला तर म्हणे डिस्क!?? का? का? डिस्क का? गरज काय होती? कधी नाचून माहीत नाही पण आम्हाला गोरी पोरगी घेऊन नाचायचय! साला निजामाची औलाद असल्यासारखं एका खिशात वॉलेट आणि दुसरीकडं फोन घेऊन नाचायची हौस. Impossible! I am just freaking impossible fellow!! वॉलेट आठवल्यावर क्षणभर आणखी पोटात बुडबुडा आला, पण वॉलेट होतं जाग्यावरच. ते अजुन हरवलं नव्हतं. सध्या फक्त फोन डिजास्टरच सुरु होतं. सॅलीपण बिचारी त्या गर्दीमधे खाली मुंडी फोन धुंडी करत होती. बप्पीदांचं बोलणं संपूच नये अशी मनोमन प्रार्थना करत मी माझा शोध सुरू ठेवला. कारण नंतर लोक परत नाचायला लागले तर मला हार्ट अ‍ॅटॅक येणार हे नक्की होतं. काहीही सुचत नव्हतं. एकदम शुन्य. There was no possible explanation I had for the situation! कोणावर साला ब्लेमपण टाकता येत नव्हता यार. फोन कधी पडला असेल? म्हणजे बप्पीदा येणार असं सांगीतल्यावर जेव्हा म्युजिक थांबलं, तेव्हा मला कळलं की फोन नाहीये खिशात. याचा अर्थ नाच सुरू असतानाच पडलाय फोन. आई शप्पथ सांगतो, छातीतून कळ येणं बाकी होतं. खास वाट बघून मुद्दमहून पांढराशुभ्र आयफोन घेतलेला. कायच्या काय जपून वापरलेला. एवढा महागाचा फोन घेण्याचं सत्कार्य करताना हजारदा विचार केलेला. आणि आता सगळं कोणाच्यातरी पायदळी तुडवलं गेलं असणार होतं. फोनवर एक स्क्रॅच आला तर दु:ख, पुढचे सगळे माफ, असलं गणित मी कित्येकाना सांगितलेलं. आता मला सगळे स्क्रॅच एकत्र मिळणार होते. वेळ जसा जसा वाढला तसे मला एकसंध फोन मिळण्याची आशा कमी होत होती.

सॅलीनं तेवढ्यात बोलावलं.
"Hey ... he saw your phone! I guess"
हे अशक्य आहे. मगाशी हिच्या कमरेत हात टाकून नाचताना ही पोरगी मदतीलापण येईल असं खरं सांगतो आजिबात वाटलं नव्हतं. एक शामका साथ, करा ऐश, कल हम कहा तुम कहा. असला प्रकार सुरू होता. पण कोणताही अशेचा किरण तेव्हा पुरेसा होता.

"Who? Did you find any phone? White one ... iPhone ..." पुढे 3GS, IOS4 हेही सांगायची फार ईच्छा होती
"White one. Yes. I did. It was on the floor"
बप्पीदांचे शब्द तिकडं संपले. म्युजिक परत सुरू. बप्पीदांचं गाणं सुरू. लोकांचा नाच सुरू. जमिनीचं हादरणं सुरू!!
माझा फोन जमिनीवर सापडला?? म्हणजे जमिनीवर होता तो! किती वेळ कोणास ठाऊक? तो सापडला याला? खाली बघून कोण कशाला नाचेल? म्हणजे पायच दिला असेल!! स्क्रीनवर दिला असेल का? नाही! नकोच. स्क्रीन कशी होती हे विचारायचं धाडसच नाही झालं. मी मख्खासारखा बघत होतो त्याच्याकडं. सॅलीनं विचारलं पुढं. "Where is it now?" स्वाभावीक प्रश्न होता हा. पण मला नाही सुचला. सॅलीला सुचला. त्या बाबाने स्टेजवर दिला म्हणे बप्पीदा यायच्या आधी. अशक्य योगायोग होता तो.

मी स्टेजकडं धाव घेतली. सिक्युरीटीनं आडवलं. स्टेजवरतर आणखी जोरात आवाज होता. त्याला सांगायचा प्रयत्न केला की माझा फोन स्टेजवर कोणाकडंतरी दिलाय. त्याला कळेना. आवाजामुळं तसंही घसा दुखेपर्यंत ओरडून बोलायला लागत होतं. विलन सारखं त्यानं मला फारसं काही न ऐकून घेता हाकललं. स्टेजवर जोवर बप्पीदा आहेत तोवर बाकी कोणाला एंट्री नाही! हाताशासारखं मी स्टेजच्या बाजूला ऊभा होतो. बप्पीदांचा डायहार्ड फॅनसारखा आधाशासारखं त्यांच्या गाण्याकडं बघत. माझ्यामागं एक गोड गोरी मेम असूनही! फोन आत्ता कोणाच्या पायात नाही हे ही कुठं थोडं होतं! पण काय? असंख्य शिव्या देऊन झालेल्या माझ्या मलाच! सॅलीनं मधेच मागे ओढलं. म्हणाली, "I want to use the restroom!" मनात म्हणालो, मग कर ना युज! मला काय सांगते? ईथ मी माझा फोन शोधायचं सोडून रेस्टरूम शोधू काय? पण हे डिस्कमधे नॉर्मलच. ढसाढसा प्यायची, आणि मग रेस्टरूमला पळायचं. तसंही बप्पीदा दमल्याशिवाय फोन मिळणार नव्हता. गेलो मॅडमबरोबर रेस्टरूम शोधायला. छताकडं बघत, भींतीवर रेलून बाहेर वाट बघत ऊभा राहीलो. मॅडम घुसल्या आत. किती मुर्खपणा केलाय आपण याचं गणित वर छतावर मांडायचा प्रयत्न करत होतो. म्युजिकपासून लांब आल्यामुळं आता तुलनेनं जरा शांत वाटत होतं. एवढ्यात एक सीक्युरीटी गार्ड दिसला. त्याला शांतपणे माझी दर्दभरी कहाणी सांगीतली. कमीत कमी मी काय म्हणतोय हे त्याला कळालं तरी होतं. निर्दयीपणानं मला स्टेजवरून हाकलणारा पहिल्या गार्डसारखा हा नव्हता. म्हणाला मदत करेल. त्यानं विचरलं, "Your girlfriend is inside?" आता या प्रश्नाचं ऊत्तर आपण जे काही पाहतो सिनेमामधे ते साफ चुक आहे. आजिबात एनर्जी नव्हती स्पष्टीकरण देण्याची आणि मुख्य म्हणजे गरजही नव्हती. कुठं त्याला शब्दबंबाळ करू सांगून की, 'नाही बाबा, ती फ्रेंड आहे जी गर्ल आहे?' किती बकवास? गौतम बुद्धाना जसा बोधी वृक्षाखाली साक्षात्कार झाल्यावर आनंद झाला चक्क तसं वाटलं मला तिथं! हे सगळं स्पष्टीकरण देण्याचं प्रकरण थोतांड आहे. मी दाबात काहीही आढेवेढे न घेता म्हणालो, "Yes, She is inside." आहाहा. काय ते सुख. ज्ञान प्राप्तीचे. पण गार्डनं पुढच्याच वक्यात विकेट काढली. "She is taking lot of time". आता यावर काय उत्तर देतात कोणाला ठाऊक? आता माझी गर्लफ्रेंड आहे म्हणजे ही किती सेकंदात रेस्टरूममधून बाहेर येते याचं गणित मी ठेवावं की काय? की 'तुला काय घाई आहे बाबा?' असं विचारावं गार्डला? शेवटी शरण येऊन, अरे ही आत्ता पाच सेकंदापुर्वी या प्रश्नाबरोबरच माझी गर्लफ्रेंड झालीये तेव्हा मला माहित नाही की का वेळ लावतेय, असं सांगावसं वाटलं. खरं तर मुलीना लागतो कशाला ईतका वेळ यार? आता लेका तुझी गर्ल फ्रेंङ असती तर तुला मी विचारलं असतं काय? पण असो, ईतक्यात सॅली आलीच बाहेर. हसली गोड आमच्याकडं बघून. सगळे प्रश्न, शंका चुपचाप आपल्याआप जाहिरातीतल्या मुह के किटाणूंसारख्या अचानक गायब झाल्या. आमची गाडी परत आत गेली. बप्पीदांचा निरोप घेणं सुरू होतं. माझ्या दिल की धडकने वाढलेली. लोक ओरडत होते परत ... ब... प्पी... दा!!! ब... प्पी... दा!!! ब... प्पी... दा!!! मला भेटलेला गूड मॅन गार्ड मगासच्या विलन गार्डशी आता बोलायला गेला. माझ्याकडे मधे मधे हात वगैरे करून काहीतरी सुरू झालं त्यांचं. मीही केविलवाणा चेहरा घेऊन ऊभा होतो. पण बाजूला सॅली होती. माझा केविलवाणा चेहरा आणि फटाकडी सॅली, यामधे साहजिकच सॅली जिंकत होती. पण काही का असेना. कोणाकडंका बघून होईना, फोन मिळाल्याशी कारण. विलन गार्डच्या चेहऱ्यावरची माशीही हालत नव्हती, लेकाचा मख्खासारखा ऐकत होता. मग कुठेतरी गेला आत मधे. मी परत वर चढलो स्टेजवर आणि गूड मॅन गार्डला विचारलं की बाबा काय झालं? तो काही बोलेल तोपर्यंत मगासचा विलन गार्ड क्लायमॅक्सला एकदम चांगल्या माणसासारखा हातात फोन घेऊन आला. खुशिनं पागल होणं काय असतं त्याची अनुभूती मिळाली मला पुढच्या काही क्षणात. स्क्रीनवर काहीही नव्हतं!! एकदम स्वच्छ. जसं काही झालंच नाही. एक रेघोटी होती हलकीशी पण तीही स्क्रीन प्रोटेक्टरवरच. मला विश्वासच बसत नव्हता. खुशीची परीसीमा! दुधात साखर म्हणजे समोर तमाम जनता खुशित बेभान झाल्यासारखी नाचत होती. जणू काही माझ्याच साठी. सुखद अनुभव होता तो! खरं सांगू तर हे ही वाईट नाही ना? कोणीतरी खुश आहे म्हणून आपण नाचावं. जसं काही आपणच खुश आहोत. खुश व्हायला कशाला काय कारण लागावं? कारण नसताना डिस्कमधे येऊन नाचलं तर बिघडलं कुठं? जगाच्या पाठीवर माझ्यासारख्या कोणा वेड्या माणसाला त्याची जवळ जवळ गमावलेली गोष्ट मिळाली म्हणून तमाम जनता नाचली तर काय वाईट? आता जनतेला आनंदाचा तपशील माहीती असावा असं थोडीच आहे? डिस्क ही एकदम मंदिर वगैरे सारखी गोष्टी वाटली क्षणभर. मी स्टेजवरून खाली ऊतरलो.


पण रुको ... पिक्चर अभीभी बाकी था मेरे दोस्त! एक शेवटची हिकअप अजुनही बाकी होती!

 ============================================================  
मी फोन वापरून पाहिला. सगळं सुरू होतं.  रात्रीचे २ वाजून गेलेले. सॅलीला आता ड्रिंक हवं होतं. परत डान्स फ्लोरवर जायची माझी ईच्छा नव्हती. फोन घेऊन तर नक्कीच नाही. आम्ही बारकडं रस्ता वळवला पण थोड्या वेळात संपलंच सगळं. म्युजिक थांबलं. लोकही पांगायला लागले. आम्हीही बाहेर पडलो. रात्रीचे ३ वाजत आले होतो. माझा हात सॅलीपेक्षा माझ्या खिशाकडंच जास्ती होता. फोन सही सलामत परत मिळाला या धक्क्यातून मी अजुन बाहेर आलो नव्हतो. घरी परतताना, फोन खिशातून घसरून कारच्या सीटखाली घसरला तेव्हा मी गाडी चालवत असताना कसरत करून तो परत खिशात ठेवला. अब एक पलभी दुर रहा जाये ना, असं. आम्ही घरी आलो. गादीवर पडल्या पडल्या झोपलो. म्हणजे, आपआपल्या गाद्यांवर पडल्या पडल्या झोपलो. अंगात आजिबात एनर्जी नव्हती. फ्रेंड सिटींगचा प्लान जवळ जवळ अंगावर येता येता राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा मित्र परत येणार होता आणि माझं हे फ्रेंड सिटींगचं प्रकरण संपणार होतं.

सकाळ झाली. मित्र काही आला नव्हता, पण सॅलीनं काहीतरी बनवलेलं. फटाक गोऱ्यापान मुलीनं सकाळी ब्रेकफास्ट बनवलाय म्हणून ऊठवणं यापेक्षा सुंदर ते आणखी काय. मुकाट्यानं उठून लगेच तयार झालो. काही तासांपुर्वीची माझी हालत आणि आत्ताची यात जमिन आसमानाचा फरक होता. फोन बघण्यासाठी नजर फिरवली, पांघरूणाच्या पसाऱ्यात काही दिसेना. समोर असा ब्रेकफास्ट तोही सॅलीनं बनवलेला. ते सोडून पांघरूण कोण आवरेल? पण परत फोन आठवला आणि मनाशी म्हणालो, ते काही नाही! आधी लगीन फोनचं. आत्ता जेव्हा विचार करतो, तेव्हा वाटतं सगळ्या ईलेक्ट्रॉनीक्स गॅजेट्सनी आयुष्य बरबाद केलय. मी सॅलीच्या ब्रेकफास्टसोडून आयफोनसाठी पझेसीव होतो! असो. ऊठलो. झरझर आवरलं सगळं. सॅलीनं एव्हाना आशा सोडून स्वतः खायला सुरू केलेलं. मी परत भेळसटलेलो. मला परत फोन सापडत नव्हता! आता हे म्हणजे अतिरेकी होतं. शक्यच नाही. पण माहित होतं गाडीमधे असेल. सॅलीचा ब्रेकफास्ट तसाच ठेवून मी पार्कींगकडे पळालो. आपला कर्वे रोडची जितकी रुंदी तितकाच रस्ता मधे होता पर्किंग आणि अपर्टमेंटमधे. कारमधे सगळीकडं पाहीलं, फोन कुठंच नव्हता! आता ऊगाचच अनईझी होत होतं. वर येऊन सॅलीच्या फोनवरून कॉल देऊन पाहिला. फोनवर रिंग तर वाजत होती. पण आख्ख्या अपार्टमेंटमधून कुठूनही आवाज येत नव्हता. परत गाडीमधे जाऊन पाहिलं. परत फोनवर रिंग वाजत होती, पण गाडीतूनही कुठूनही आवाज येत नव्हता! सॅली माझ्याकडं "What a loser?" अशा नजरेनं बघतीये असं मला उगाचच वाटलं. पण बिचारी शोधायला मदत करत होती! आता हे मात्र नक्की होतं की मी डिस्कमधे फोन नक्कीच पडला नव्हता. मला मधे गाडीमधे सीटखालून फोन काढतानाची कसरत आठवत होती. आता गाडी पार्कींगमधे लावून ते अपार्टमेंटपर्यंत येईपर्यंत काय होऊ शकेल? यावेळी मी नाचतपण नव्हतो. मला फायनल डेस्टीनेशन मुवी आठवला. म्हणजे काल कदाचीत चुकून सापडलेला फोन! त्याला जायचच होतं. आता गेला बापडा. विचार तर हाच होता. पण मन मानायला आजिबात तयार नव्हतं

मी परत परत कॉल करत होतो. कधी खाली जाऊन कार मधे तर कधी परत घरामधे शोधत होतो. अचानक रिंग बंद झाली! कट. वाजता वाजता कट!? पुढे वाजेचना. डायरेक्ट वॉईसमेल मधे! आई शप्पथ!? म्हणजे फोन चोरला कोणीतरी? आणि आता बंद केला! नाही. हे म्हणजे शक्यच नाही. पण कधी करेल हे कोणी? पार्कींगमधून घरापर्यंत येताना पाखरू नव्हतं रस्त्यावर. १० सेकंद लागले असतील फार फार तर. तेवढ्यात? कसं यार? काहीच अर्थ लागेना. वेडा झालेलो जवळ जवळ. त्यावर अशक्य गोष्ट कुठली असेल तर, १२ तासामधे आयफोन हरवल्याची दुसरी वेळ आणि मला मधेच आपण फेसबूकवर काय स्टेटस टाकणार याचा विचार आला! खरं सांगतो असाच विचार आला! किती कृर! पण आपलेच दात आपलेच ओठ! काहीतरी खरच बेसिकमधे गंडलंय माझ्या! फेसबूक?? काहीही काय

"How to track lost iPhone" यावर लगेच गूगल करायचं ठरवलं. मशिन ऊघडलं तसं नवं ईमेल आलं. यश कडून. "Your phone is with Navin. Please call me once you get it." आता मात्र मी बेशुद्ध पडायच्या मार्गावर होतो. यश? नविन? यांचा संबंध काय? दोघेही माझे कलीग. नविन तर त्याच अपार्टमेंट कॉंप्लेक्समधे रहायचा पण पार दुसऱ्या टोकाच्या ईमारतीत. म्हणजे मी रस्त्यात पाडलेला फोन नविनला मिळाला? आणि त्याने यशला फोन केला? काहीच गणित लागेना. यानी माझा बकरा केला असावा! पण कसा? सॅलीनं माझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून मला काहीही न विचारायचं ठरवलेलं. तिनं ब्रेकफास्टची प्लेट ठेऊन फोन सुरू झालेले. तिचा डार्लिंग यायचा होता. ती कशाला माझ्या फोनचं सुतक करत बसेल? मदत केली मात्र तिनं, कशाला नाही म्हणू? गोड दिसत होती कारमधे फोन शोधायला आलेली तेव्हा. नाईट ड्रेसमधे कदाचीत सगळ्याच मुली सुंदर दिसत असाव्यात. कदाचीत तेव्हा अजिबात मेकअप नसतो म्हणुन असेल. पण असो. पोरीनं गिवअप तरी कधीच मारला नव्हता माझ्यावर. सगळीकडे मदत करत होती. माझं पुढं चक्र सुरू झालं. फोन नविनकडं कसा? याचं कुतुहल असलं तरी जरा हायसं पण वाटलं. त्याच विचारात मी सॅलीकडं गेलो. ती पाठमोरी होती बाल्कनीमधे. फोनवर बोलून झालेलं तिचं नुकतच. तिला कळलं मी मागे ऊभा आहे. चपापून वळली मागं. माझ्या चेहऱ्यावरचे लॉस्ट लूक अजुन गेलेले दिसत नव्हते. मी तर भेळसटलेलो होतोच तसाही. "What? What happened?" असं ती म्हणेपर्यंत मी तिचा हात पकडला. आता क्षणभर तिच्या चेहऱ्यावरही लॉस्ट लूक आले. आत्तापर्यंत गोड वगैरे दिसणारा चेहरा जरा वेगळाच दिसला. पण मला लगेचच कळलं की मी न काही बोलताच तिच्या हातातला फोन घ्यायचा प्रयत्न करत होतो. आता तिला थोडीच कळणार की मी कोणते ईमेल बघीतले? आणि काय विचार आहेत माझ्या मनात सुरू ते. हॅंग झाली बिचारी जरा वेळ. आपले विचार कृतीपेक्षा वेगात पळतात यावर कित्येक शिक्षकानी कॉलेजमधे टाहो फोडलेच होते. आज थोबाड वगैरे फुटलं असतं. किंवा नाहीही. गोड आहे पोरगी असलं काही नसतं केलं. मी फोन प्रकरणामधे ईतका गुंगलेलो की काय घडतय बाजूला याचं ध्यान तसं कमीच झालेलं. सॅलीचा फोन घ्यायचा माझा प्रयत्न अजुन सुरू होता आणि तिला कळत नव्हतं मी काय करतोय ते!

"Dude! What are you doing?"
"अरे... I found the phone ... let me make a call ना! Please" हे असं ईंग्लीशमधे बोलताना मधे "अरे" आणि "ना" करणं मला अजिबात आवडत नाही तरीही अशा मोक्याच्या क्षणी मी असलं काही हमखास करतो.


तिनं सोडला फोन. हसली गोड परत आणि येडा मुलगा आहे असा लुक देऊन गेली आतमधे! अशक्य मुली असतात राव! या असल्या प्रसंगी कशाला तिनं असं गोड दिसावं? असो. मी नविनला कॉल लावला. म्हणाला की तो मुवी थेटर मधे आहे? मी मनात विचार केला, दुपारी बाराला कोण जाईल मुवीला? पण ते सोड, याला माझा फोन तिथं कुठं मिळाला? नविनच परत म्हणाला २ ला परत येईल तेव्हा देईल फोन. मी यशला फोन केला.
"बाबा! काय भानगड? तुला काय माहित नविनकडं फोन?"
"त्यानं कॉल केलेला मला. त्याला वाटलं तू गेलास शिकागोला"
"पण त्याला मिळाला कसा फोन?"
"मी सांगीतलं त्याला घ्यायला."
"???? तुला काय माहित फोन कुठं होता?"
"तुला जेवायला बोलवायचं होतं ना बाबा. सकाळपासनं कॉल करतोय. शेवटी फोन कोणीतरी ऊचलल्यावर ओरडलो मी, क्या भाई कितनी बार बुलाया तुझे?"
"मग?"
"तिकडून जरा दबकून आवाज आला, मै भाई नाही हू!"

आता मात्र सगळ्या मगासच्या टेन्शनचं रुपांतर पोट धरून हसण्यात झालं. या त्रयस्थानं यशला सांगीतलं की त्याला रस्त्यात आयफोन दिसला. पांढरा म्हणून दिसला, काळा असला तर मिस झाला असता. मधेच आपण पांढरा फोन निवडला याचं कौतुकही वाटलं. यशला सॅली प्रकरण माहित नाही म्हणून त्यानं जवळचा म्हणून नविनचा नंबर दिला. नविननं फोन घेतला खरा, पण मी शिकागोला असेन म्हणून तसाच मुवीला गेला आणि यशनं मेल कलं, चेक करायला की मी शिकागोला गेलो की आहे अजुन.

सुन्न!


अगदी अशिच अवस्था झालेली माझी! अशक्य नशिब होतं ते!

२ ला नविनकडून फोन घेतला. फोनवर अजुनही स्क्रॅच नव्हते पडलेले!

Monday, October 25, 2010

Blind Date

(या कथेचा मगच्या पोस्टशी संबंध नाही. नवा गडी नवं राज्य)
(कथा पुर्णपणे नसली तरी थोडीशी काल्पनिक आहे. त्यात कशाशीही साधर्म्य वगैरे शोधण्याचा प्रयत्न करू नये. साधर्म्य सापडल्यास, तो वाचकाचा कल्पनाविलास असेल, आणि त्याला लेखक जबाबदार नाही.)

अमेरीकेच्या रणधुमाळीमधे यावेळी बऱ्याच काही तिरपांगड्या गोष्टी घडल्या. शक्य असतं तर प्रत्येकावर काही ना काहीतरी लिहीलं असतं. पण असो. आता परत "आत्याबाईना मिशा असत्या" प्रकारच्या बाता नको मारायला. "अमेरीकेच्या लेटेश्ट ट्रिपमधे" असे म्हणायचे होते खरं तर, पण उगाच ईफेक्ट तयार करण्यासाठी रणधुमाळी वगैरे. नकोत्या ठिकाणी नाही ते करण्याचा किडा जरा उपजातच आहे आपल्याला काय करणार? पुण्यातून निघताना मला आठवतय, आदितीशी बोलणं सुरू होतं. कशाबद्दल? तर ब्लाईंड डेटबद्दल. म्हणे किती मज्जा येईल नं! आपण थोडीच मागं हटणार बाता मारायला? सुरू एकदम जोरदर चर्चा आणि कल्पनांचे मनोरे. पण आता कसं आहे नं, की देवानं पण काही गोष्टी विचित्र बनवलेत यार. म्हणजे ज्याचा जोरदार विचार कराल म्हणे तसलं काही खरच घडतं. याची खरच काही गरज नव्हती. पण आता करणार काय? म्हणालो नं, देवानं खरच काही विचित्र बनवलेत गोष्टी. काही लोकांसाठी ते शाहरुख खाननं बनवलेलं असेल. शिद्दत, कयामत, सजिश, कायनात वगैरे तो जे काही म्हणतो तसं. पण मुद्दा काय पुढे अमेरीकेत असल्या काही गोष्टी घडल्या. अगदी अशाच नाही, पण आता जवळपास देव डी आणि देवदास मधे जेवढा फरक होता, तेवढ्या फरकानं घडल्या. एक जवळपास ब्लाईंड डेट घडून आलीच आली. वर आणि बरेच काही उगाचच पणावर लागले. कारण काहीही नाही. बस झाले, एवढेच.

सॅली नावाची एक फटाक पोरगी योगायोगानं पदरात पडली. म्हणजे पडली म्हणजे एकदम धपाक करून पडली. आले देवाजीच्या मना. कोणा अमुकची तमुक फ्रेंड वगैरे. फ्रेंड सिटींगचा जॉब मिळालेला एका ईवीनींगसाठी. आता कसा आणि का ही वेगळी कथा. पण माझी सो कॉल्ड ब्लाईंड डेट अशी सुरू झालेली. ज्या गोष्टी एकत्र नाही यायला पाहिजेत, त्या सगळ्या एकत्र येऊ लागल्या, की बऱ्याच भलत्या आणि असंबद्ध गोष्टींची श्रुंखला सुरू होते. तसा प्रकार होता. माझ्या सुपिक डोक्यानं सॅलीला सुट होईल आशी आयडिया काढली. आम्ही डिस्को नाईटला जायचा प्लान केला. तोही बप्पी लहरी येणार होता त्या वाल्या. तीही लगेच तयार झाली. ऑलमोस्ट म्हणालीच - "What an idea, sirji". आता हे का केलं? याची मला आजिबात कल्पना नाही. मी तसा डीजे डिस्क वाला माणूसही नाही. पण आता काय सांगू? योग असतात सगळे, जशी सॅली धपाक करून पदरात पडलेली तसे. 

लगेच तयार होऊन आम्ही पोचलोही, अ‍ॅवलॉन नामक देसी डिस्कमधे. सॅलीतर आलेलीच फटाक कपडे घालून. माझ्या मंदबुद्धीनं गडबडीत एक काळा पायजमा आणि लाल टीशर्टवर भागवलं. डिस्कमधे पोरींना ड्रेस कोड नाही पण मुलाना मात्र आहे या स्वार्थी परंपरेचा मला क्षणभर विसर पडलेला. तसंही देसीच डिस्क आहे, करू अ‍ॅडजस्ट ही असली मनातल्या मनात कारणं केली अ‍ॅवलॉनला पोचल्यावर.  गोऱ्या पोरीना तसंही देसी गाण्यांची, खाण्याची भलती आवड. तशी सॅलीलापण. कोणा माझ्या देसी मित्रानंच पटवलेली हिला. आणि हिच्याबरोबर मी डिस्क मधे. "नादखुळा, गणपतीपुळा, तुमच्या लाईनीवर आमचा डोळा" हे जे काही लहानपणी शाळेमधे बोबडे बोल ऐकलेले, थोडंफार तसंच होणार होतं. म्हणजे माझा डोळा वगैरे नव्हता सॅलीवर पण त्रयस्थ होऊन पहाल तर तशी डेटच ना ही. असो. आपल्या डेट तशाही मनातल्या मनातच व्हायच्या. सॅली आणि मी पुसटशा पिवळ्या लाईटखालून लाईनीतून काऊंटर पर्यंत आलो. आत जाऊन येड्यागत देसी नाच करायला तिकीटपण काढले. माझ्या पायजम्याला कोणी जमेत धरलं नाही. कदाचीत सॅलीसारखी चिकनी पोरगी आत येणार नाही या भीतीनं मला डिस्काऊंट मिळाला असावा. दणदणीत आवाजात आत "पग घुंगरू" सुरू होतं. ड्रम बीट वर आख्खी जमिन वर खाली होतीये असं वाटत होतं. ईतकं जुनं गाणं का वगैरे विचार येण्याआधीच समोर बप्पीदांचं पोस्टर बघितलं. सोन्याच्या माळांच्याखाली दबलेला भलासा देह. डोळ्यावर गॉगल. हात वर उंचावलेला. ठाकरेंनी ही पोज आधी शोधली की बप्पीदांनी, असा उगाचच पीजे मनात येऊन गेला. सॅलीकडे बघीतलं आणि पीजे सांगायचा मोह आवरला. काय काय explain करणार हिला? ठाकरे कोण असा पहिला प्रश्न असायचा हिचा. आमच्या कोल्हापुरामधे असलं कोणी म्हणलं असतं तर आजुबाजूचे ४-५ शिव सैनिक पुढं सरसावले असते. काहीतरी काम मिळाल्याचं सुख असतच की. पण असो, त्यात नको पडायला. तसंही तिथे एकमेकाशी बोलायचं म्हणजे जवळ जवळ किंचाळूनच बोलावं लागणार होतं. मग आपली एनर्जी सांभाळून खर्च करणंच भलं.

बाईंनी मोर्चा बारकडं वळवला. काहीतरी दोन चार ग्लास रिचवल्याशिवाय या नाचणार कशा? किंवा याला मूड क्रिएशन म्हणूया. सुरेख पोजमधे बार स्टूलवर बसून बाईंनी चोहीकडे नजर टाकली. क्षणभर मला वाटलं की सगळं म्युजिक अचानक थांबलय आणि सगळे लोक (आणि कपल्स विशेषतः) रागानं (किंवा असुयेनं वगैरे) माझ्याकडं बघतायत, "भला ईसकी लडकी मेरे लडकीसे सफेद कैसे?". आता माझी काय चुक यार, कधी पडतो लंगुरके मूह मे अंगुर. सॅलीच्या ड्रिंकच्या ऑफरने मी तसा लगेचच भानावर आलो. बाईंसाठी वोडका आणि माझ्यासाठी लिंबू सरबत! छ्या! असं कसं. मी कशी अशी ऑर्डर करू? आजूबाजूच्या तमाम कपल्सको जेलस बनायेंगे वाल्या मगासच्या कल्पनेला यानं तडा गेला असता. तेवढ्यात सॅलीनेच तशी ऑर्डर करून टाकली. काहीही म्हणा, गोऱ्या पोरींच्या तोंडी काही छानच वाटतं. माझ्यासाठी हिने लेमोनेड (लिंबू सरबतचं लेमोनेड व्हायला ईतकं पुरे होतं) मागीतलं हे बघूनच, मला परत सगळी कपल्स परत माझ्याकडं मत्सरानं बघतायतचा भास झाला. परत म्युजिकवगैरे थांबलय असलं सगळं वाटलं. बार टेंडरनं एकदम विरक्त भावनेनं माझ्यासमोर जेव्हा लेमोनेड बडवलं तेव्हा थेट कॉलेजच्या कॅंटीनमधल्या वेटरची आठवण झाली. तोही असंच टेबलवर येऊन ऊपकार केल्यागत कटींग वगैरे बडवून ठेवून जायचा. अर्धा चहा कपात, अर्धा खालच्या थाळीत. ईथे थाळी नव्हती, पण प्रकार थोडाफार तोच होता. तसंही ग्लासमधे बर्फ जास्त! त्यातलं सांडणार काय? एकदा हातात ग्लास आला की बास. त्यात लेमोनेड आहे की वोडका हे फक्त तुम्हालाच माहित. परत एंबॅरेसमेंटचा सवाल नाही. सॅलीनं तिचे काहीतरी अनुभव सांगीतले. कधीकाळी मागे जेव्हा देसी डिस्कमधे आलेली तेव्हाचे. कळो न कळो हसणं प्राप्त होतं. तसं हसलो. मी सहसा येत नाही डिस्कमधे ही माहिती देण्याची गरज नव्हती. पण दिली उगाचच. तिला कळाली असेल नसेल काही कळालं नाही पण तिनंही मान हलवून माझ्यासारखंच प्राप्त हसुन दाखवलं. तसंही कोणी डिस्कमधे गप्पा मारायला थोडीच येतं? आणि येऊही नये म्हणून तसंही दणादण म्युजिक. आणि ते तर बप्पीदांचं! एव्हाना, नौ दो ग्याराह वगैरेची गाणी पण झालेली. तशी नॉन-बप्पीदा गाणीही होतीच. सॅलीनं मधे बप्पीदा कोण वगैरे समजून घ्यायचा माफक प्रयत्न केला. आता हिच्या ब्रायन अ‍ॅडम्स वगैरे उदाहरणांसमोर आता मी कसं समजवावं या प्रश्नातून त्या दाणादाण म्युजिकनं मुक्ती केली.

समोर आता आत घुसण्याकडे कूच केली. अशक्य उत्साहामधे नाचणारी जनता बघून जोश नाही चढला तर नवल. बाजुला सहसा कपल्सच असावीत. मला उगाच वाटलंही, हे सगळे खरच ईतके खुश असतील का? की असं बेहोश होऊन नाचतायत? ईतका आनंद! ईतकी मस्ती! जन्नत! काय माहित? खरच काय झालं असेल असं? मला त्यांच्या आनंदाचं नेहमीच कौतुक वातलय. पण नंतर नंतर तेही मॅनीप्युलेशन वाटायला लागलेलं. तिथं असं कोणीच नव्हतं याची मला अगदी खात्री होती जो ईतका वेड्यासारखा खुश होता. खरं तर दिवसभर कचकच झाली, कधी आठवडाभर बॉसनं डोकं खाल्लं, किंवा बरेच दिवस खुश झालोच नाही, मला वाटतं की असं काही झाल्यानं तिथं आलेली जनता खुप असावी. आठवड्याच्या खुशीचा कोटा भरवण्याची ही रिच्युअल! एकदम बेहद्द खुश होणं गरजेचं तर आहे. पण घडत काही नाही तसंलं! मग स्वतःच स्वतःचा मामा बनवायचा. नाचायचं ईथं येऊन. परवा झुठाही सही मधे जॉन अब्राहम पण पाखीला तेच सांगतो. वेडे, दुःखी झालीस की नाच. देवानंही कुठल्यातरी वेदामधे सांगीतलं असेलच की, वत्सा, दुःखी कष्टी झालास की नाच! शंकराचा तर स्वतःचा ब्रॅंडही होता. पण काहीही म्हणा, तिथे आलेले लोक खुशतर दिसत होती. एकमेकांच्यात मिसळलेले. ४-५ जणांचा घोळका जरी असेल तरी त्यांच्याही बऱ्याच कलाकारी चालू. वेगवेगळ्या पोज घेऊन गाण्याची नक्कल करण्याच्या. काही लोक केवळ नाच एंजॉय करत होते. आपल्यामधेच गुंग. नाचाची देसी स्टाईल तशी एकमेवाद्वितिय. वर डिस्को गाणी. आम्हीही त्या अनोळखी आनंदाच्या जश्नमधे सामिल झालो. ओळख असो नसो, काही तासांपुर्वी बऱ्यापैकी अनोळखी आणि एकमेकांसाठी अनभिज्ञ असलेलो आम्हीही तिथे मिसळून गेलो. नाचू लागलो. उड्या मारू लागलो. वेगवेगळ्या पोज देऊन एकमेकाना अ‍ॅप्रिशिएट करू लागलो. नाही म्हणलो तरी, कपल म्हणून नाचू लागलो. तेवढ्याशा छोट्या जागेमधे तसे भरपूर लोक मावलेले. पण सगळेच तितकेच झिंगलेले. आत आल्यावर तो लेमोनेड पिऊन नाचतोय की वोडका, हे कोणा सांगा. तसे एक टकीला शॉट सॅलीमुळं माझ्यात पण रिचलेला. त्यामुळं मीही काही फारसा वेगळा नव्हतो. सगळे सारखेच असल्यानं कोणाला कोणाचा धक्का वगैरे कळत नव्हतं. नाहीतर आपल्याला तर सवय कुठली? तर, धक्का लागला तर एकदम अक्षम्य गुन्हा केल्याचा लुक घेण्याची! पण तसं काही नसतं डिस्क मधे. सगळे किती छान नाचतोय असाच लूक देतात. तेही लूक दिला तर. नाहीतर रनटाईम अ‍ॅडजस्ट करणं सुरू असतच. कदाचीत हेही एक कारण असावं लोक डिस्कमधे येण्याचं. प्रचंड टॉलरन्स.

पण असो. सगळं सुरू होतं. बप्पीदा स्टेजवर येणार अशी अनाऊंन्समेंट झाली. लोक नाचायचे थांबले. स्वतःला स्थिरस्थावर करून झालं की जसं काही बप्पीदा काय म्हणतील. किंवा असच असेलही बुवा. कशाला प्रत्येक गोष्टीवर कमेंट करा? माझेही हात खिशात गेले. सॅलीबरोबर नाचताना मला आमच्या ऑफिसमधल्या एका बॉसचं दर्शन झालेलं. उंचीला जरा कमी, रंग सावळा. तरीही तिथल्या डिम लाईटमधे दिसलाच मला. अचानक माझ्यातल्या "लोग क्या कहेंगे" वगैरे जागा होऊन, शक्य तितक्या जागा बदलून पाहिलेल्या. आता या फिरंगबरोबर असं डिस्कमधे? आता हे का आणि कसं घडलं याचं ऊत्तर मी घरी जाऊन तयार करायचं ठरवलेलं. आताच हा येडा भेटला तर काय सांगू! आता म्युजिक थांबल्यावर परत एकदा माझं लक्ष चौफेर गेलं. काय सांगा, माझ्याच मागे ऊभे असायचे साहेब! पण असं काही नव्हतं. कदाचीत मलाही तिथं बघून त्यानीही असाच लपाछीपीचा डाव सुरू केला असावा. काय सांगा? हे सर्व सुरू असताना खिशातल्या हाताला अपेक्षित जाणिव नाही झाली आणि माझी असली नसलेली सगळी झिंग सर्रकन ऊतरली. समोरच्यानं मधेच परत अनाऊंन्समेंट केली, "Put your hands together for BA....PPI....DA!" आणि हात तसेच खिशामधे ठेवून सॅलीकडे वळून मी जवळ जवळ किंचाळलो, "सॅली!! माय आयफोन??"

(क्रमशः)
पुढचा भाग: Blind Date (Contd)